Parichay goshti लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi
![]() |
Parichay goshti |
नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Parichay goshti व लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Stories for kids in marathi व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 Parichay goshti या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.
लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Parichay goshti मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.
🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲
Marathi goshti || Chan Chan goshti
MARATHI STORY 1
दोन मित्र आणि अस्वल:- parichay goshti [ छान छान गोष्टी ] Stories for kids in marathi
एका गावात राम व श्याम नावाचे दोन जिवलग मित्र रहात होते. राम हा शरीराने बारीक व श्याम हा थोडा जाड होता. एकदा ते दोघे दुसऱ्या गावात जायला निघाले. त्यांनी आपसात असे ठरविले की, ‘प्रवासात जर एखादयावर काही संकट आले तर दुसऱ्याने त्याला मदत करावी.’
वाटेत पुढे जाताना त्यांना एक अरण्य लागते. तेव्हा त्यांच्यासमोर एक अस्वल येते व ते त्यांच्या अंगावर धावून येते. त्या दोन मित्रापैंकी राम हा बारीक व चपळ असल्यामुळे जवळ असलेल्या झाडावर चढून बसतो. पण श्याम हा जाड असल्यामुळे त्याला पळणे शक्य नव्हते व झाडावर पण त्याला चढता येत नव्हते, तेव्हा तो आपला श्वास कोंडून मेल्याचे सोंग घेऊन जमीनीवर पडतो. अस्वल त्याच्या जवळ येऊन त्याच्या कानाजवळ हुंगून बघतो आणि हे प्रेत आहे असे समजून त्याला काहीही उपद्रव न करता तो निघून जातो.
अस्वल गेल्यावर झाडावर चढलेला राम खाली उतरून आपल्या सोबतच्या मित्राला विचारतो ‘श्याम, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितले?’ श्याम उत्तरला ‘अस्वलाने मला सांगितले की, तुझ्यासारख्या लबाड मित्राच्या शब्दावर पुन्हा विश्वास ठेवू नकोस.’
तात्पर्य - खरा मित्र तोच जो संकटात धावून येतो.
🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲
Marathi goshti || Chan Chan goshti
MARATHI STORY 2
कासव आणि हंस:- Parichay goshti
एका तळयात एक कासव रहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते ते त्याला कधी कधी भेटायला यायचे. तो तासन तास गप्पा मारायचे. ते हंस त्या जागेपासून खूप उंच आणि वर उडायचे व परत आल्यानंतर कासवाला त्यांनी केलेले साहसी कृत्य सांगायचे.
खूप जास्त उन्हामुळे कासव रहात असलेले तळे हळूहळू कोरडे व्हायला लागते व लवकरच त्या तळयात थोडेच पाणी शिल्लक रहाते, त्यामुळे ते कासव काळजीत पडते.
एके दिवशी ते हंस त्याला बघायला येतात, तेव्हा ते बघतात की कासव खूप काळजीत आहे. ‘काय समस्या आहे मित्रा? तू असा काळजीत का दिसतोस?’ एक हंस बोलला.
‘हे तळे आता कोरडे पडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना की, मी पाण्याशिवाय जगूच शकत नाही. जर हे तळे पूर्णपणे कोरडे झाले तर, मी मरून जाईल.’ ते गरीब कासव बोलेले.
कासवाच्या मरण्याच्या विचाराने ते हंस खूपच दुःखी झाले, कारण त्यांना त्याच्या मित्राला वाचवयाचे होते.
‘आम्ही तुला कशा प्रकारे मदत करू शकतो?’ ते बोलले.
कासव बोलले ‘मी असा विचार करतो आहे की आता मी संपणार आहे.’
ते तिघे मित्र अनेक मार्गांनी विचार करतात की कासवाला कसे वाचवावयाचे.
शेवटी कासव बोलते की ‘ऐका माझ्याकडे एक कल्पना आहे, आपण एक काठी घेऊ या मी मधोमध त्या काठीला माझ्या दाताने पकडेल, तुम्ही दोघ काठीचे दोन्ही टोक आपल्या पायात पकडा व उडा, अशा प्रकारे तुम्ही मला दुसऱ्या तळयात घेऊन चला. जिथे भरपूर पाणी असेल.’
हंस तयार झाले पण ते कासवाला बजावून सांगतात की, ‘आम्ही तुला सुरक्षित घेऊन जाऊ परंतु आपल्या या प्रवासात एक धोका आहे, तू मात्र काहीही बोलू नकोस आणि काठीवरची पकड सोडू नकोस. जर तू तुझी पकड सोडली तर उंचावरून पडल्याने तात्काळ तुझा जीव जाऊ शकतो.’
‘मी याबाबतीत दक्ष राहीन.’ कासव बोलला, तुम्ही जा व काठी घेऊन या म्हणजे आपण आपला प्रवास चालू करू शकतो.
हंस काठी घेऊन येतात. कासव त्याच्या दाताने काठी पकडते. दोन्ही हंस काठीची दोन्ही टोके पकडतात आणि उडायला सुरूवात करतात. ते जंगल, डोंगर, झाडे व गाव यावंरून उडतात. जेव्हा ते गावाजवळून उडतात तेव्हा गावातील लोक त्याकडे बघतात आणि आश्चर्य चकित होऊन बोलतात ‘आम्हाला यावर विश्वासच बसत नाही, किती सुंदर दृश्य आहे हे.’
कासवाला खूप अभिमान वाटला. त्याला असे वाटले की सर्वांचे लक्ष हे माझ्याकडेच आहे. त्याला असे वाटले की, आपण हे सर्व हंसाना सांगावे. कोणाच्याही हे लक्षात आले नाही की, हंस उडत आहे ते फक्त कासवामुळेच. हे सर्व बघून लोक कौतुक करत होते. जसजसे ते एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे उडत होते तसतसे कासवाला जास्तीत जास्त अभिमान वाटत होता.
शेवटी त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि त्याने हंसाचे आभार मानण्यासाठी तोंड उघडले. ‘ज्या क्षणाला त्याने तोंड उघडले, तेव्हा त्याची काठीवरची पकड सुटली आणि तो खाली जमिनीवर पडला व मेला.’ हंस त्याच्याकडे दुःखी होऊन बघतात व बोलतात, ‘जर कासवाने आपल्या सल्याचे पालन केले असते तर असे घडलेच नसते.’ आणि नंतर ते उडून जातात.
तात्पर्य - मुर्खपणाची कृती एखादयाचा मृत्यू घडवून आणण्यास कारणीभूत ठरते.
🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲
parichay goshti || gavakadchya goshti in Marathi
Marathi story: 3
जशी कारणी तशी भरणी :- Chan Chan goshti Marathi [ parichay goshti ]
एका गावात एक माणूस राहत असतो. त्याच्या पत्नीचे नाव होत शांताबाई. शांताबाई दिसायला खूप सुंदर होती. तो आपल्या पत्नीवर म्हणचे शांताबाईवर खूप प्रेम करत असे. पण शांताबाईचा स्वभाव खूप क्रूर असतो. ती आपल्या सासू-सासऱ्याशी नीट वागत नसे, नीट बोलत नसे. ते अंध असतात म्हणून ती सासू-सासऱ्याशी छळत असते.
एक दिवस शांताबाई त्याच्या नवऱ्याला सांगते कि तुमच्या आई वडिलांना जंगलात सोडून या. मी त्यांची काळजी घेणार नाही. सुरुवातीला नवरा काही ऎकत नाही. काही दिवसांनी ती त्याला सारखे- सारखे तेच सांगू लागली त्यामुळे शेवटी निर्णय घेतला बायकोचे ऎकुन तो आपल्या अंध आई-वडिलांना जंगलात सोडून येतो. त्याचे आई-वडील त्याची विनवणी करतात. आम्ही अंध आहोत आम्हाला सोडून जाऊ नकोस. पण तो त्यांचे काहीच ऎकत नाही.
आई-वडिलांना सोडून येत असतांना तो एका खोल खड्यात पडतो. त्याच्या पायांना मोठी दुखापत होते. तिथून एक साधू जात असतो तो त्याला बाहेर काढतो त्याच्या पायाला खूप लागले असते . त्यामुळे तो अपंग होतो.
त्याला कळते आपण आपल्या अंध आईवडिलांना एकटेच सोडल्यामुळे देवाने आपल्याला शिक्षा दिली. तो आईवडिलांकडे जातो. त्यांची क्षमा मागतो व त्यांना घरी आणतो.
तात्पर्य - संस्काराची बीजे लहानपणीच पेरले जातात.
🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story: 4
लोभी विक्रेता :- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]
एकदा एक व्यापारी आपल्या वस्तू विकायला गावात येतो. त्या गावात एक लहान मुलगी आपल्या आजीबरोबर राहत असते. तिला कानात घालण्यासाठी कानातले घ्यायचे असते. पण तिच्याकडे पैसेच नसतात. ती आपल्या आजीला सांगते कि आपण आपली जुनी ताट विकून मला कानातले घेऊयात का? आजी तयार होते. आजी तिच्याकडे एक ताट देते.
ती लहान मुलगी ते ताट घेऊन व्यापाऱ्याकडे जाते. व्य्पारी ते ताट नित निरखून पाहतो. त्याला समजते हे ताट सोन्याचे आहे. पण तो मुलीला ते सांगत नाही. उलट तो तिला म्हणतो या ताटाला काहीच किंमत मिळणार नाही. मुलगी नाराज होते.
त्या दुकानदाराला तो ताट फुकट घ्यायचे असते म्हणून तो ते परत देऊन टाकतो.
थोड्या दिवसांनी दुसरा एक विक्रेता येतो. त्या मुलीला पुन्हा कानात घालण्यासाठी कानातले घ्यायच्या असतात. तिची आजी पुन्हा तेच ते ताट त्या दुसर्या विक्रेत्याला दाखवते. तो त्या आजीला सांगतो कि, आजी हे ताट सोन्याचे आहे. आजीला आश्चर्य वाटते. तो विक्रेता त्या ताटाच्या मोबदल्यात त्यांना त्याच्याकडील सर्व वस्तू देऊन टाकतो.
थोड्या दिवसांनी पुन्हा तो हावरट, लोभी दुकानदार येतो. ताटाबद्दल चौकशी करतो. आजी चांगलीच भडकते. खरा प्रकार लक्षात आल्यावर तो पळून जातो.
तात्पर्य - नेहमी खरे बोलावे आणि प्रामाणिक राहावे.
🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲
marathi goshti || stories for kids in marathi
Marathi story: 5
मुलगा आणि आई :- Parichay goshti
एका गावात एक कुटुंब राहत होते. ते खूप धार्मिक होते. त्याची पत्नी खूप धार्मिक असल्यामुळे ते खूप दान-धर्म करत असतात. त्यांना एक मुलगा असतो. परंतु त्याला देव-धर्म करणे आवडत नसते.
एक दिवस त्याची आई त्याला मंदिरात एका साधूचे प्रवचन ऐकण्यासाठी त्याला पाठवते. त्याच्या आईला आशा वाटते की प्रवचन ऐकण्यामुळे तरी मुलात काही बदल होईल, ती त्याला प्रवचन ऐकण्याच्या बदल्यात पैसे देण्याचेही वचन देते. मुलगा पण तिचे ऐकतो आणि मंदिरात जातो. पण मंदिरात जाऊन प्रवचन ऐकण्याएवजी तो मंदिरात झोपतो.
दुसऱ्या दिवशी त्याची आई त्याला ठरल्याप्रमाणे पैसे देते. तिला वाटते आपल्या मुलाने त्या साधूला घरी बोलावले असेल पण तो तसे काहीच कले नाही. तो ते पैसे घेऊन बाहेरगावी जाऊन व्यापार करण्याचे निर्णय घेतो . त्याची आई त्याला नको जाऊ सांगते पण मुलगा तिचे काही ऐकत नव्हता .
तो बोटीत जात असतो आणि समुद्रात अचानक वादळ येते.बोट इकडे तिकडे भरकटू लागते. ती बोट पाण्यात बुडते, त्यात तो मुलगा पण बुडतो. आईचे न ऐकल्याची त्याला किंमत मोजावी लागते.
तात्पर्य - मोठ्यामाणसंचे ऐकल्याने फायदा होतो.
🌲💐🌱🏵️🌳🌻🌷🌿🌴🌲🍁🌲
मित्रांनो तुम्हाला या Parichay goshti लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Stories for kids in marathi कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व marathi goshti आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा