Marathi Nibandh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Marathi Nibandh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Information about cricket in marathi | क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti

Information about cricket in marathi | क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti

Cricket information in Marathi
Cricket information in Marathi


नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही.सर्व मजेत ना! Cricket खेळाविषयी जाणून घेण्याची जी उत्सूकता तुमच्यामध्ये आहे,त्यामुळे आज या लेखातून आपण Information about cricket in marathi क्रिकेट ची माहिती मराठी मधे पाहणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti मिळणार आहे.आपणास विनंती आहे कृपया हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा,जेणेकरून आपल्याला information about cricket in marathi मिळेल.




Cricket information in Marathi | क्रिकेट खेळाची माहिती

Cricket ground map
Cricket ground map


क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट ईंडिझ, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, केन्या आहेत.


इतिहास असे समजले जाते की ह्य खेळाची सुरवात इंग्लंड मधील केंट व ससेक्स प्रांतात झाली. तेराव्या शतकात इंग्लंडचे युवराज एडवर्ड यांनी नेवेन्डन, केंट येथे क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये १९५८ मध्ये सर्व प्रथम क्रिकेट या शब्दाची लिखित नॊंद झाली. सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूप वाढली. १८०० मध्ये खेळात बरेच परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला. १९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिद्ध झाला. २००० साली क्रिकेटचा नवीन प्रकार ट्वेंटी२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली. या खेळाची मुख्यत्वे दोन अंगे आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी. कसोटी क्रिकेटमध्ये ४ डाव, तर इतर प्रकारांत २ डाव खेळले जातात. दोन्ही संघ आलटून-पालटून फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कप्तानांसमोर नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम डावात फलंदाजी करायची अथवा गोलंदाजी, याची निवड करतो. फलंदाज करणाऱ्या संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या यष्टी पर्यंत जातात तेव्हा १ धाव पूर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा चेंडू फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हाच धाव घेतात. फलंदाजाने चेंडू सीमापार केल्यास, यष्टींदरम्यान धाव घेण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी चेंडूचा पहिला टप्पा सीमेवर अथवा सीमेपार पडला तर सहा धावा, नाहीतर चार धावा फलंदाजाच्या खात्यात जमा होतात. ह्या शिवाय गोलंदाजाने गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते. 


         गोलंदाजी करणाऱ्या संघाचा उद्देश दुसऱ्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येते (त्रिफळाचीत, झेल,यष्टीचीत, पायचीत (एल.बी.डब्ल्यू.),धावचीत).हा खेळ सहा चेंडुचे १ षटक या प्रमाणे खेळला जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे टोक बदलले जाते व क्षेत्ररक्षण करणारया संघाचा नविन खेळाडू गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस पंच सुध्दा आपाआपली जागा बदलतात. प्रत्येक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याच्या संघातील नविन फलंदाज फलंदाजीस येतो. जेव्हा १० फलंदाज बाद होतात तेव्हा तो संघ सर्वबाद झाला असे म्हणले जाते. ह्या नंतर फलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो तर गोलंदाजी करनारा संघ फलंदाजी करतो. जो संघ दिलेल्या षटकमर्यादेत सर्वात जास्त धावा करतो त्याला विजयी घोषित केले जाते. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात सामना संपण्याचे मापदंड वेगवेगळे आहेत.


फलंदाज बाद होण्याचे प्रकार
Cricket rules and regulations
Cricket rules and regulations

दहा वेगवेगळ्या पध्दतीने फलंदाज बाद होऊ शकतात. एक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याची जागा नविन फलंदाज घेतो. जेव्हा दहा फलंदाज बाद होतात तेव्हा एक डाव संपतो. खाली दिलेल्या दहा प्रकारांन पैकी पहिल्या सहा प्रकाराने फलंदाज सहसा बाद होतो.

झेल - जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबाद्चे क्षेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांना ही दिल्या जाते. ( नियम ३२)
त्रिफळाचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु फलंदाजी करणारया फलंदाजाच्या टोकावरिल यष्टींना लागतो तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३०)

पायचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु बॅटला न लागता फलंदाच्या पायावर,पॅड्वर किंवा शरीरावर आदळतो तेंव्हा पंच चेंडु यष्टींन वर गेला असता कि नाही हे ठरवुन फलंदाजाला बाद देउ शकतो. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते.


धावचीत - जेंव्हा क्षेत्ररक्षक, गोलंदाज अथवा यष्टीरक्षक, फलंदाज धाव घेण्यासाठी धावत असतांना अथवा इतर कोणत्याही कारणासाठी क्रिझ मध्ये नसतो तेव्हा चेंडु मारुन यष्टी उडवतो तेव्हा त्याला धावचीत म्हणतात. ह्या बळीचे क्षेय कोणालाही दिले जात नाही.


यष्टीचीत - चेंडु खेळतांना जेंव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो व चेंडु त्याला चकवुन यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेंव्हा बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात. गोलंदाजा व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३९)




History in the Cricket in Marathi क्रिकेटचा ‍इतिहास 

Cricket information in Marathi
Cricket information in Marathi


क्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद मात्र सापडते. सतराव्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. पण त्याला सध्या असणारा क्रिकेट हा शब्द मात्र, क्रिकेट न खेळणार्‍या फ्रान्स या देशाची भाषा फ्रेंचमधून आला आहे.


पहिला आंतराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या जगमरात जवळपास २० देशात हा खेळ खेळला जातो. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड या देशात हा खेळ सर्वांत जास्त खेळला जातो.

क्रिकेटचा प्रसार करण्याचे श्रेयसुद्धा इंग्लंडला जाते. इंग्रजांनी ज्या देशांवर राज्य केले तेथे त्यांचे अधिका‍री क्रिकेट खेळत. त्यामुळे हा खेळ इंग्लंडबाहेर गेला. १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम बनायला सुरूवात झाली. १७७४ मध्ये त्यात प्रथम सुधारणा होत, पायचीत, तीन यष्टी, बॅटची लांबी यांचे नियम ठरवण्यात आले.
त्यानंतर दोन पंच नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७७८ साली लॉर्डसवर एमसीसी क्लबची स्थापना करण्यात आली. 

१७५१ साली यॉर्कशायर हे सामन्याचे पहिले अधिकृत ठिकाण ठरले. १७६० मध्ये गोलंदाजी चेडू टाकू लागले. फिरकी गोलंदाजी करू लागले. १७७२ मध्ये धावफलक निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या सुरवातीला लंडन व डार्टफोर्ड हे दोन क्लब अस्तित्वात आले.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये अमेरिका व कॅनडात झाला. १८५९ मध्ये इंग्लंडचे व्यावसायिक खेळाडू उत्तर अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले. १८६४ मध्ये ओव्हरआर्म गोलंदाजी टाकण्यात येऊ लागली. १८७७ मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली. १८८२ मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.
१८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी खेळणारा तिसरा देश म्हणून मान्यता मिळाली. १८८९ पर्यंत एक षटक चार चेंडूंचे होते. त्यानंतर पाच चेंडूंचे एक षटक झाले, तर १९०० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले. त्यानंतर आठ चेंडूंचे एक षटक करण्याचा प्रयोगही या क्रिकेट खेळणार्‍या तीन देशांमध्ये झाला. पुन्हा १९४० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले.

दुसर्‍या महायुध्दाच्या आधी भारत, वेस्ट इंडीज व न्यूझीलंड या तीन देशांना कसोटी खेळण्याची मान्यता मिळाली. युध्दानंतर पाकिस्तानलाही कसोटी खेळणारा देश म्हणून मान्यता मिळाली. विसाव्या शतकाच्या शेवटी श्रीलंका, झिंबाव्वे व बांगलादेश यांनाही मान्यता मिळाली. अशा तर्‍हेने क्रिकेट सर्वत्र पसरत गेल


स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.


भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. 'रणजी ट्रॉफी', 'दिलीप करंडक' व 'इराणी ट्रॉफी' हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.


क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत


क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.

क्रिकेटची साधने व पटांगण

चेंडू - वजन  १५५ ग्रॅम्स, परिघ  २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.


विकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.


पिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.



खेळाची सुरूवात [ cricket in marathi ]



क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.


फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. 'प्ले' असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.


ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.


information about cricket in marathi बद्दल आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.तुमचा प्रतिसाद व आपल्या कौतूकाची साथ मला असे आर्टिकल लिहण्यास स्फुर्तिदायक ठरेल.आपणास विनंती आहे क्रिकेट खेळाची माहिती आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा.


जय हिंद,वंदे मातरम


धन्यवाद



Mahatma gandhi information in marathi महात्मा गांधी माहिती | details about mahatma gandhi

Mahatma gandhi information in marathi महात्मा गांधी माहिती | details about mahatma gandhi

Mahatma Gandhi Information in marathi
Mahatma Gandhi Information in marathi

नमस्कार,मझ्या प्रिय बंधु भगिनिंनो. आज या पोस्टमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे महात्मा गांधी माहिती.मित्रांनो Mahatma gandhi information in marathi साठी आपण उत्सुक असालच.आमच्याकडे माझ्या वाचकांची details about mahatma gandhi साठी मांगणी होती,त्यामुळे आज मी तुम्हाला महात्मा गांधी ची माहिती देत आहे.कृपया करून mahatma gandhi information शेवटपर्यंत वाचा.



Mahatma gandhi information in marathi | Mahatma Gandhi Biography



Mahatma Gandhi Full Name: Mohandas karamchand Gandhi


महात्मा गांधी पुर्ण नाव: मोहनदास करमचंद गांधी


Date of birth: 2 October 1869


महात्मा गांधी जन्म तारीख: 2 आक्टोंबर 1869


Place of birth: Porbandar, Gujrat


महात्मा गांधी जन्म ठिकाण: पोरबंदर,गुजरात


गांधीजींचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी  गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई होते. करमचंद गांधी तत्कालीन काठेवाड प्रांतातील पोरबंदरमध्ये दिवाण होते. त्यांच्या आजोबांचे नाव उत्तमचंद गांधी असे होते त्यांना उत्ता गांधी असेदेखील म्हणत. पुतळीबाई या करमचंद यांच्या चौथ्या पत्नी होत्या. आधीच्या तीन पत्नी प्रसूतिदरम्यान मृत पावल्या होत्या. करमचंद हिंदु मोध समाजातील होते तर पुतळीबाई वैष्णणव समाजातील. अत्यंत धार्मिक वातावरणातील बालपणाचा मोठा प्रभाव गांधीजींच्या पुढील आयुष्यावर दिसून येतो. विशेषत: अहिंसा, शाकाहार, सहिष्णुता, इतरांबद्दल करुणा या तत्त्वांचे बीज याच काळात रोवले गेले. जैन धार्मिक असलेल्या आईमुळे मोहनदास वर जैन संकल्पना आणि प्रथांचा प्रभाव होता. प्राचीन वांग्मय यातील श्रावणबाळ आणि हरिश्चंद्र या दोन कथांचा मोहनदासचा मनावर गहिरा परिणाम होता. स्वतःच्या आत्मचरित्रात ते कबुल करतात की या दोन कथांमुळे त्यांच्या मनावर अमिट परिणाम झाला होता. ते लिहितात “त्याने मला झपाटले आणि मी अगणित वेळा माझ्याशीच हरिश्चंन्द्रासारखा वागलो असेन” गांधीच्या सत्य आणि प्रेम या दैवी गुणाशी झालेल्या स्व ओळखीचा माग हा या पौराणिक पात्रांपर्यंत येऊन पोहोचतो.


                  मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे ‘महान आत्मा’. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.



Information about mahatma gandhi in marathi | महात्मा गांधी बद्दल माहिती मराठी


Mahatma Gandhi Information
Mahatma Gandhi Information

                इ.स. १८८३ मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा कस्तुरबा यांच्या बरोबर बालविवाह झाला. इ.स. १८८५ मध्ये जेव्हा गांधीजी १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांना पहिले अपत्य झाले, पण ते खूप कमी काळ जगले. त्याच वर्षी आधी करमचंद गांधींचा स्वर्गवास झाला होता. पुढे गांधीजी आणि कस्तुरबा यांना अजून चार मुले झाली- इ.स. १८८८ मध्ये हरीलाल, इ.स. १८९२ मध्ये मणिलाल, इ.स. १८९७ मध्ये रामदास आणि इ.स. १९०० मध्ये देवदास.


               शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी इ.स. १८८८ मध्ये ते इंग्लंडमध्ये लंडनला युनिव्हर्सिटी कॉलेज, वकिलीचे शिक्षण घेण्यास गेले. तेथे त्यानी इनर टेंपल या गावी राहून बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्यायशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंडला जाण्याआधी त्यांनी आईला जैन साधूच्या उपस्थितीत आपण मांस, बाई व बाटली (दारू) यापासून दूर राहू असे वचन दिले होते, त्याचे त्यांनी तिथे पालन केले. परंतु लंडन मधील सपक शाकाहारी जेवणाची चव त्यांना आवडली नाही आणि लंडनमधील दुर्मिळ असलेली एक भारतीय खानावळ सापडेपर्यंत ते खूप वेळा उपाशी राहत. गांधीनी तेथे इंग्रजी चालीरीती ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ नर्तनाची शिकवणी लावणे. ते इंग्लंडमध्ये शाकाहारी संस्थेचे सदस्य बनले आणि लवकरच त्याच्या अध्यक्षपदी पोहोचले. तेथे ज्या शाकाहारी व्यक्तीना गांधी भेटले, त्यातील काही स्त्रिया थिओसोफ़िकल सोसायटीच्या सदस्य होत्या त्यांनी गांधीना आपल्यात येऊन मिळण्यासाठी आणि भाषांतरित आणि मूळ भगवद्‌गीता वाचण्यासाठी प्रोत्साहन दिले. आधी धार्मिक गोष्टीत रस नसणारे गांधी धार्मिक गोष्टीत रस घ्यायला लागले.


                   इंग्लंडमध्ये कायद्याचा अभ्यास करून ते बॅरिस्टर बनले आणि हिंदुस्थानात परत येऊन वकिली करू लागले. १८९१ मध्ये ते इंग्लंड सोडून परत भारतात आले. भारतात आल्यावर कळले की त्यांच्या आईचा ते लंडनमध्ये असतानाच देहान्त झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबाने ही बातमी त्यांच्यापासून लपवून ठेवली. मुंबईमध्ये कायद्याची प्रॅक्टिस उभी करण्याची त्यांची योजना सफल झाली नाही कारण ते कोर्टात बोलण्यासाठी अतिशय लाजाळू होते. खटल्यांसाठी मसुदा तयार करण्याच्या साध्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ते राजकोटला परत आले परंतु एका ब्रिटिश अधिकाऱ्याच्या विरोधात गेल्याने हे काम त्यांना बंद करावे लागले. १८९३ मध्ये त्यानी त्याकाळच्या ब्रिटिश साम्राज्यामधील नाताळ(दक्षिण आफ्रिका) मधील एका पदासाठी दादा अब्दुल्ला आणि कंपनी नावाच्या एका भारतीय कंपनीसाठी एक वर्षाचा करार केला.


                 असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयांना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सुत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळ चालू केली. गांधीजी आजीवन साम्प्रदायीकातावादा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) चे विरोधक होते आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. ढासळत जाणाऱ्या खिलाफत चळवळीला त्यानी आधार दिला आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.


                गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना खऱ्या भारताचे मूळ म्हणून पाहिले आणि स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विसटर्न चर्चिल याने त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून निर्भत्सना केली. स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल अशी त्यांची साधी राहणी होती.


                 गांधीनी आयुष्याची २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवली, जेथे त्यानी त्यांचे राजकीय दृष्टीकोन, नैतिक आणि राजकीय नेतृत्व कौशल्ये विकसित केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या श्रीमंत मुस्लिमांनी आणि अतिशय कमी अधिकार असणाऱ्या गरीब हिंदू गिरमीट्यानी गांधीना नोकरी दिली. ‘भारतीयत्व’ सर्व धर्म आणि जातींमध्ये उतरले आहे असा दृष्टिकोन आयुष्यभर ठेवत गांधीनी या सर्वाना भारतीयच मानले. मुख्यत्वे धर्माच्या बाबतीत ऐतिहासिक भिन्नता आपण सांधू शकू असा त्यांना स्वतःबद्दल विश्वास होता आणि हा विश्वास घेऊन ते भारतात आले. येथे त्यांनी या विश्वासाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये गांघींना समाजाच्या विकालांगाची ओळख झाली. भारतीय धर्म आणि संस्कृती यांमध्ये असलेल्या गुंतागुंतीच्या समस्यांपासून आपण दूर आहोत याची त्यांना जाणीव झाली आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना समजून घेऊन व त्यांचे नेतृत्व करून आपणास भारत समजला असे ते मानू लागले.

दक्षिण आफ्रिकेत गांधीना गौरेतर लोकांबद्दल असलेल्या भेदभावाला सामोरे जावे लागले, तेथील भारतीयांना दिली जाणारी असमान वागणूक अनुभवली. पहिल्या वर्गाचे तिकिट असतांनासुद्धा त्यांना पिटरमारित्झबर्गमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी तृतीय वर्गाच्या डब्यात बसण्यास सांगितले. गांधीजीनी नकार देताच त्यांना अपमान करून रेल्वे मधून ढकलून देण्यात आले. ती संपूर्ण रात्र गांधीनी फलाटावरील गेस्टरूममध्ये काढली. गांधीनी ठरवले असते तर उद्दाम वर्तन करणाऱ्या त्या रेल्वे अधिकाऱ्यास ते अद्दल घडवू शकले असते. पण सूडभावनेने कोणाला शिक्षा करविणे हा त्यांचा हेतू नव्हता तर अन्यायकारक व्यवस्था बदलवणे हा त्यांचा हेतू होता. पुढे एकदा, प्रवाशांना वाट करून न दिल्यामुळे वाहन चालकाने त्यांना मारले. पूर्ण प्रवासात त्यांना अनेक यातना सहन कराव्या लागल्या. अनेक हॉटेलमधून त्यांना हाकलून देण्यात आले. अशा अनेक घटनांपैकी अजून एक घटना म्हणजे, डर्बनमध्ये न्यायाधीशाने त्यांना त्यांची टोपी काढून ठेवण्याचा हुकूम दिला. गांधीजींनी तेव्हाही नकार दिला. या घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याऱ्या ठरल्या. हे सर्व अनुभव घेतल्यावर गांधीनी स्वतःचे समाजातील स्थान आणि ब्रिटीश राज्यातील आपल्या लोकांची किंमत याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे भारतीयांबद्दलच्या वंशभेद, असमानता यांना सामोरे गेल्यावर गांघीजींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यास व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. तेथील भारतीयांचा मतदानाचा हक्क काढून घेणारा कायदा लागू करण्यात येणार होता या कायद्याला विरोध करणाऱ्या भारतीयांना मदत करण्यासाठी गांघीजींनी आपले दक्षिण आफ्रिकेतील वास्तव्य काही काळासाठी वाढवले. हा कायदा रद्द करण्यात जरी ते अयशस्वी ठरले तरी यामुळे भारतीयांवरील अन्यायाकडे लक्ष वेधण्यात त्यांची चळवळ यशस्वी झाली. त्यांनी इ.स. १८९४ मध्ये नाताल भारतीय काँग्रेसची स्थापना केली व याद्वारे दक्षिण आफ्रिकेतील विखुरलेल्या भारतीयांना त्यांनी एका राजकीय पक्षात परावर्तित केले. इ.स. १८९७ मध्ये काही काळाच्या भारतातील वास्तव्यानंतर डरबन मध्ये उतरत असताना काही गोऱ्या लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला व त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. आणि केवळ पोलीस अधीक्षकाच्या पत्नीच्या सहकार्याने त्यांची सुटका झाली. या घटनेत त्यांच्या तोंडाला इजा झाली आणि दोन दात तुटले. पण त्यांनी न्यायालयात तक्रार करण्यास नकार दिला. वैयक्तिक त्रासाबद्दल न्यायालयात जाणे त्यांच्या तत्त्वांमध्ये नव्हते.

                   इ.स. १९०६ मध्ये ट्रान्सवाल सरकारने एका नवीन कायद्याची घोषणा केली. या कायद्यानुसार तेथील प्रत्येक भारतीयाला स्वतःची नोंदणी करणे बंधनकारक झाले होते. याला विरोध करण्यासाठी बोलवलेल्या सभेमध्ये, त्या वर्षीच्या ११ सप्टेंबर ला, गांधीजींनी, पहिल्यांदाच आपल्या अजूनही विकसित होत असलेल्या असलेल्या सत्याग्रहाच्या किंवा अहिंसात्मक कार्यप्रणालीला आपलेसे केले. त्यांनी भारतीय बांधवांना अहिंसक पद्धतीने या कायद्यास विरोध करण्यास सांगितले व असे करतांना झालेले अत्याचार सहन करण्यास सांगितले. तेथील समुदायाने या आवाहनाला साद दिली आणि आगामी सात वर्षात हजारो भारतीयांनी हरताळ केल्यामुळे, नोंदणी करण्यास नकार दिल्यामुळे, नोंदणी पत्रक जाळून टाकणे आणि तत्सम अहिंसात्मक कार्यात सामील झाल्यामुळे लोकांनी तुरुंगवास भोगला, चाबकाचे फटके खाल्ले आणि बंदुकीच्या गोळ्याही खाल्या. सरकारने भारतीय आंदोलकांचा हा विरोध यशस्वीरीत्या मोडून काढला तरी पण या अहिंसक चळवळीची व लोकक्षोभाची नोंद घेण्यास आणि गांधींशी वाटाघाटी करण्यास स्वतः तत्त्वज्ञ असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील नेता जॉन क्रिस्तिआन स्मट्स याला भाग पडले. शांततामय मार्गाने निदर्शने करणाऱ्या निदर्शकांवरील दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने केलेल्या कठोर कारवायांमुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. गांधींच्या कल्पनांनी आकार घेतला आणि सत्याग्रहाची संकल्पना या संघर्षादरम्यान परिपक्व झाली.


                  इ.स. १९१५ मध्ये गांधीजी कायमसाठी भारतात परत आले. एक प्रमुख भारतीय राष्ट्रवादी, थिओरिस्ट आणि संघटक अशी त्यांची आंतरराष्ट्रीय ख्याती होती. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक संमेलनांतून बोलले. खऱ्या अर्थी भारताचे राजकारण व समस्या यांचा परिचय त्यांना गोपाळ कृष्ण गोखले यांनी करून दिला. गोपाळ कृष्ण गोखले हे तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रमुख नेते होते. गोखले त्यांच्या संयम, संतुलन आणि व्यवस्थेच्या आतमध्ये राहून काम करण्याच्या आग्रहाबद्दल ओळखले जात. आजही ते गांधीजींचे राजकीय गुरू म्हणून ओळखले जातात. गांधीनी गोखल्यांचा ब्रिटीशांच्या व्हीगीश परंपरांवर आधारित उदार दृष्टीकोन अनुसरला, आणि तो पूर्णपणे भारतीय दिसण्यासाठी बदलला. १९२० मध्ये लो. टिळकांचा मृत्यू झाल्यावर ते राष्ट्रीय सभेचे प्रमुख नेते बनले.


                गांधीजीना पहिले मोठे यश १९१८ मध्ये चंपारण आणि खेडामधील सत्यग्रहात मिळाले. चंपारण, बिहारमधील जमीनदार, जे प्रामुख्याने ब्रिटिश होते, स्थानिक शेतकऱ्यांना सक्तीने नीळ उत्पादन करावयास लावत असत. त्यांना योग्य मोबदला पण मिळत नसे. यांमुळे ते सतत गरिबीत राहत. शेतकऱ्यांची गावे अत्यंत घाणेरडी आणि आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठेवली जात. तसेच दारू, अस्पृश्यता, पडदा पद्धत अशा अनेक समस्या या गावांमध्ये होत्या. यावर भर म्हणजे तेथील दुष्काळ, पण इंग्रजानी तरीही अनेक जाचक कर लादले होते आणि ते वाढतच होते. गुजरातमधील खेडा मध्येसुद्धा स्थिती काही वेगळी नव्हती. गांधीजींनी तिथे एक आश्रम उभारला. तिथे त्यांनी त्यांच्या लहान-मोठ्या सर्व अनुयायांना एकत्र केले. त्यांनी त्या भागातील परिस्थितीची माहिती गोळा केली व तिचा सखोल अभ्यास केला. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी गावाच्या स्वच्छतेचे तसेच शाळा, रुग्णालयाच्या बांधकामाचे काम हाती घेतले. याचसोबत गावातील प्रमुखांना वर उल्लेखलेल्या प्रथा नष्ट करण्यास प्रवृत्त केले.


                 गांधीनी १९२० ला काँग्रेस च्या नेतृत्वाची सूत्रे हातात घेतली. डिसेंबर इ.स. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पूर्ण अधिकार गांधीजींना देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची पुनर्बांधणी नवीन संविधानानुसार करण्यात आली. ज्याचा मुख्य उद्देश होता – स्वराज्य. त्यानंतर मागण्यांमध्ये सतत वृद्धी करत करत (काही ठिकाणी थांबत आणि तडजोड करत) २६ जानेवारी १९३० काँग्रेस ने भारताचे स्वातंत्र्य जाहीर करून टाकले. अधिकाधिक वाटाघाटी होत गेल्या आणि काँग्रेस ने १९३० मध्ये प्रांतीय सरकारमध्ये भाग घेऊ पर्यंत ब्रिटिशांना हे ओळखता आले नाही. १९३९ च्या सप्टेंबर मध्ये कोणाशीही सल्लामसलत न करता व्हाईसरॉय ने जेंव्हा जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले तेंव्हा गांधीनी आणि काँग्रेस नी ब्रिटीश सरकारचा पाठींबा काढून घेतला. गांधीनी १९४२ मध्ये तत्काळ स्वराज्याची मागणी करेपर्यंत आणि ब्रिटीश सरकारने प्रतिसाद म्हणून त्यांना आणि लाखो काँग्रेस च्या नेत्यांना तुरुंगात डांबेपर्यंत तणाव वाढतच गेला. दरम्यान मुस्लीम लीग ने ब्रिटन ला सहकार्य केले, आणि गांधींच्या तीव्र विरोधाला डावलून मुस्लिमांच्या संपूर्ण स्वतंत्र राष्ट्राची, पाकिस्तानची मागणी केली. १९४७ मध्ये ब्रिटिशानी भूमीची फाळणी केली आणि गांधीनी अमान्य केलेल्या शर्तींवर भारत आणि पाकिस्तानने वेगवेगळे स्वातंत्र्य मिळवले.


 असहकार चळवळ –


               गांधीजींनी असहकार, अहिंसा आणि शांततामय विरोध यांना शस्त्र म्हणून इंग्रजांविरुद्ध वापरले. पंजाबमध्ये जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांच्या क्रोधाचा उद्वेग झाला आणि अनेक ठिकाणी हिंसक विरोध झाले. गांधीजींनी जालियनवाला बाग हत्याकांड तसेच त्यानंतरचे हिंसक विरोध दोन्हींचा निषेध केला. त्यांनी या दंग्यांना बळी पडलेल्या ब्रिटिश नागरिकांबद्दल सहानुभुती दर्शविणारा आणि दंग्यांचा निषेध करणारा एक ठराव मांडला. या ठरावाला काँग्रेसमध्ये सुरुवातीला विरोध झाला. पण गांधीजींच्या तत्त्वांनुसार कोणत्याही प्रकारची हिंसा ही पाप होती आणि त्याचे समर्थन करता येणे शक्य नव्हते. हे तत्त्व मांडणाऱ्या त्यांच्या भावनाप्रधान भाषणानंतर काँग्रेसने त्यांचा ठराव मान्य केला. पण या हत्याकांडाच्या आणि त्यानंतरच्या हिंसेच्या पश्चात गांधीजींनी आपले सर्व लक्ष पूर्ण स्वराज्यावर केंद्रित केले. त्यांच्या पूर्ण स्वराज्याच्या कल्पनेत पूर्ण वैयक्तिक, धार्मिक आणि राजकीय स्वातंत्र्य समाविष्ट होते. असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला पण असहकार चळवळ जोमात असतांनाच असस्मात थांबवण्यात आली. याला कारण ठरले,उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण. ४ फेब्रुवारी १९२२ रोजी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला केला व नंतर पोलिस ठाण्याला आग लावली. जमावावरील गोळीबारात ३ जण मरण पावले तर पोलिस ठाण्यात २३ पोलिस जळून मरण पावले. पुढे अजून जास्त हिंसक घटना घडतील या भीतीने गांधीजींनी चळवळ स्थगित केली. १० मार्च १९२२ ला गांधीजींना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली व सहा वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला. इ.स. १९२४ मध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासानंतर अपेंडिक्सच्या ऑपरेशनच्या कारणावरून त्यांची सुटका करण्यात आली. गांधीजी तुरुंगात असतांना त्यांच्या नेतृत्वाअभावी काँग्रेसमध्ये फूट पडू लागली. शेवटी काँग्रेसचे दोन गटात विभाजन झाले. एका गटाचे नेतृत्व चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते. हा गटाचा कल संसदीय कार्यकारणीत भाग घेण्याकडे होता. पण चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या गटाचा याला विरोध होता. हिंदू-मुस्लिमांमधला चळवळीदरम्यान वाढीस लागलेला एकोपासुद्धा हळूहळू कमी होत होता. गांधी़जींनी हे मतभेद दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले. इ.स. १९२४ मध्ये त्यांनी यासाठी तीन आठवड्यांचा उपवास केला. पण या प्रयत्नांना म्हणावे तितके यश मिळाले नाही.


स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह-


                गांधीजींनी १९२८ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात एक ठराव पास केला. त्याद्वारे ब्रिटिश सरकारकडे भारताला सार्वभौम दर्जा देण्याची मागणी करण्यात आली व ही मागणी मंजूर न केल्यास परत पूर्ण स्वराज्यासाठी असहकार चळवळ सुरू करण्यात येईल असे बजावण्यात आले. पक्षातील सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू यांच्यासारख्या तरुण नेत्यांची मागणी तात्काळ स्वराज्याची होती. पण गांधीजींनी ब्रिटिश सरकारला उत्तरासाठी एका वर्षाचा अवधी दिला पण ब्रिटिश सरकारने काही उत्तर दिले नाही आणि ३१ डिसेंबर इ.स. १९२९ मध्ये लाहोर अधिवेशनात भारताचा ध्वज फडकवण्यात आला. हा दिवस काँग्रेसने स्वराज्य दिन म्हणून साजरा केला. गांधीजींनी मग मार्च इ.स. १९३० मध्ये मिठावरील कराच्या विरोधात सत्याग्रहाची घोषणा केली आणि त्याची परिणिती प्रसिद्ध दांडी यात्रेत झाली. १२ मार्चला अहमदाबादहून निघालेली यात्रा, ६ एप्रिलला ४०० कि.मी. (२५० मैल) चा प्रवास करून दांडीला पोहोचली. हजारोंच्या संख्येने भारतीय या यात्रेत सहभागी झाले होते. ही यात्रा इंग्रजांची भारतातील पाळेमुळे उखडण्याच्या प्रयत्नांमधील सर्वांत यशस्वी प्रयत्न ठरली. ब्रिटिशांनी उत्तरादाखल ६०,००० हून अधिक लोकांना तुरूंगात डांबले. शेवटी लॉर्ड एडवर्ड आयर्विन यांच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सरकारने गांधीजींशी वाटाघाटी करण्याचे ठरवले. मार्च इ.स. १९३१ मध्ये गांधी-आयर्विन करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय कैद्यांना मुक्त करण्याचे मान्य केले आणि त्याबदल्यात कायदेभंगाची चळवळ बंद करण्याची मागणी घातली. याबरोबरच गांधीजींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एकमेव प्रतिनिधी म्हणून लंडनमध्ये होणाऱ्या गोल मेज परिषदेचे आमंत्रण दिले. ही परिषद गांधीजी आणि पक्षासाठी निराशाजनकच ठरली, कारण त्यामध्ये सत्तांतरणावर भर देण्याऎवजी भारतातील राजे-रजवाडे आणि अल्पसंख्यक यांच्यावर जास्त भर देण्यात आला होता. यातच भर म्हणजे आयर्विननंतर आलेले लॉर्ड विलिंग्डन यांनी राष्ट्रवाद्यांची चळवळ नरम पाडण्याचे प्रयत्न चालू केले. गांधी़जींना अटक करण्यात आली. त्यांचा अनुयायांवरील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना वेगळे करण्याचा हा डाव होता. पण त्यांचे हे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत.


                 इ.स. १९३२ मध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मागणीनुसार ब्रिटिश सरकारने दलितांना वेगळे मतदारसंघ देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात गांधीजींनी सहा दिवसांचे उपोषण केले. यामुळे ब्रिटिश सरकारला अजून जास्त समानतेवर आधारित मतदारसंघ विभागणी करणे भाग पडले. या वाटाघाटी दलित समाजातील (भूतपूर्व क्रिकेट खेळाडू) पालवणकर बलू यांच्या मध्यस्थीने पार पडल्या. याबाबत गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुण्यामध्ये झालेल्या करारास पुणे करार असे म्हटले जाते. येथून पुढे गांधीजींनी दलितांच्या उद्धारासाठी काम करणे चालू केले. ते दलितांना हरिजन (देवाची माणसे) म्हणत. ८ मे इ.स. १९३३ ला गांधीजींनी दलित चळवळीसाठी २१ दिवसाच्या उपोषणाची सुरुवात केली त्यांचे हे प्रयत्न तितके यशस्वी ठरले नाहीत. दलित समाजामधून त्यांना पुरेसा पाठिंबा मिळाला नाही.  इ.स. १९३४ च्या उन्हाळ्यात गांधीजींवर तीन अयशस्वी प्राणघातकी हल्ले झाले. जेव्हा काँग्रेसने निवडणूक लढवण्याचा आणि फेडरेशन आराखड्याअंतर्गत सत्ता हातात घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा गांधीजींनी आपल्या पक्ष-सभासदत्वाचा राजीनामा दिला. गाधींजी पक्षाच्या या निर्यणाबद्दल असहमत नव्हते. पण त्यांना असे वाटले की, जर त्यांनी राजीनामा दिला तर, त्यांची भारतीयांमधील प्रसिद्धी, पक्षाच्या इतर साम्यवादी, समाजवादी, कामगार प्रतिनिधी, विद्यार्थी, धार्मिक रूढीतत्त्ववादी आणि व्यापारी वर्गातील प्रतिनिधींना आपले विचार जनतेसमोर मांडू देण्याच्या आड येणार नाही. तसेच गांधीजी राज (ब्रिटिश) सरकारमध्ये सहभाग स्वीकारलेल्या पक्षाचे (काँग्रेसचे) नेतृत्व करून इंग्रजांना त्यांच्याविरुद्ध बोलण्याची अजून एक संधी देऊ इच्छित नव्हते.


                  गांधीजी इ.स. १९३६ मध्ये पक्षात परत आले तेव्हा जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे लखनौ येथे अधिवेशन चालू होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या भविष्याबद्दल विचार करण्यापेक्षा आधी पूर्ण स्वराज्य कसे मिळेल यावर सर्व लक्ष केंद्रित करण्यात यावे, असे गांधीजींचे मत होते. पण तरीही पक्षाच्या समाजवादी धोरणाचा अवलंब करण्याच्या निर्णयाला त्यांनी विरोध केला नाही. इ.स. १९३८ साली पक्षाध्यक्षपदी निवडून आलेले सुभाषचंद्र बोस आणि गांधीजीं यांच्यात अनेक वाद झाले. गांधीजींच्या या विरोधाची मूळ कारणे सुभाषचंद्रांचा अहिंसेवरील अविश्वास ही होती. गांधीजींचा विरोध असूनसुद्धा बोस सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले. पण जेव्हा सुभाषचंद्रांनी गांधीजींच्या तत्त्वांना सोडून दिले आहे असे कारण पुढे करून देशभरात अनेक पक्षनेत्यांनी सामुदायिक राजीनामे दिले, तेव्हा सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.


दुसरे महायुद्ध आणि भारत छोडो आंदोलन –


                  इ.स. १९३९ मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले आणि दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. सुरुवातीला गांधीजी ब्रिटिशांना ‘अहिंसक नैतिक पाठिंबा’ देण्याच्या मताचे होते. पण पक्षातील इतर नेते, भारतीय लोकप्रतिनिधींचे मत घेतल्याशिवाय भारताला एकतर्फीपणे युद्धात ओढल्यामुळे नाखुश होते. सर्व काँग्रेस नेत्यांनी मंत्रिमंडळातून सामुदायिक राजीनामे देण्याचे ठरवले. दीर्घ विचारविनिमयानंतर गांधीजींनी जाहीर केले की, भारत या युद्धाचा एक भाग बनणार नाही, कारण हे युद्ध वरवर तर लोकशाहीवादी स्वातंत्र्यासाठी म्हणून लढवले जात होते आणि दुसरीकडे तेच स्वातंत्र्य भारताला नाकारण्यात येत होते. जसेजसे युद्ध पुढे सरकत गेले तसेतसे गांधीजी स्वातंत्र्याची मागणी तीव्र करत गेले. त्यांनी एक ठराव मांडला ज्याद्वारे इंग्रजांना ‘भारत सोडून जा’ (भारत छोडो) असे ठणकावण्यात आले. हा गांधीजी आणि पक्षाचा ब्रिटिशांना भारतातून हाकलून देण्याचा सर्वांत स्पष्ट व अंतिम प्रयत्न होता. पक्षातील आणि इतरही काही नेत्यांनी गांधीजींवर टीका केली. यात ब्रिटिशांचे समर्थन करणारे तसेच त्यांना विरोध करणारे दोन्ही गट सामिल होते. काहींना वाटले की इंग्रजांच्या जीवनमरणाच्या अशा या युद्धात त्यांना विरोध करणे अनैतिक होय तर काहींचे मत होते की गांधीजी मिळालेल्या संधीचा पूर्ण उपयोग करून घेत नाही आहेत. भारत छोडो चळवळ भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील सर्वांत प्रभावी चळवळ ठरली. यात लाखांच्या संख्येने लोकांना अटका झाल्या, अभूतपूर्व अत्याचार करण्यात आला. हजारो आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मरण पावले. गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे स्पष्ट केले की भारताला तात्काळ स्वातंत्र्य दिल्याशिवाय भारत महायुद्धात मदत करणार नाही. गांधीजींनी हेसुद्धा स्पष्ट केले की यावेळेस एखाद-दुसऱ्या हिंसक घटनेमुळे ही चळवळ मागे घेण्यात येणार नाही. आवरात ठेवलेल्या अराजकतेपेक्षा खरी अराजकता बरी. असे सुचवून त्यांनी काँग्रेस सदस्यांना अहिंसेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि भारतीयांना ‘करो या मरो’ (करा किंवा मरा) हा मूलमंत्र दिला.


                   गांधीजी आणि काँग्रेसची पूर्ण कार्यकारणी समिती यांना इंग्रजांनी ९ ऑगस्ट इ.स. १९४२ ला मुंबईमध्ये अटक केली. गांधीजींना दोन वर्षासाठी पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये बंदिवासात ठेवण्यात आले. तेथील वास्तव्यात गांधीजींना वैयक्तिक आयुष्यात दोन धक्के सहन करावे लागले. सहा दिवसांनंतरच त्याचे खाजगी सचिव महादेव देसाई वयाच्या ५०व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले आणि त्यांच्या पत्नी कस्तुरबा १८ महिन्यांच्या बंदिवासानंतर २२ फेब्रुवारी इ.स. १९४४ ला मरण पावल्या. ६ अठवड्यांनंतरच गांधीजींना तीव्र मलेरिया झाला. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीमुळे आणि ऑपरेशनच्या आवश्यकतेमुळे त्यांना युद्ध संपण्याआधीच ६ मे इ.स. १९४४ ला सोडण्यात आले. ते बंदिवासात मरण पावले तर संपूर्ण देश संतप्त होईल अशी भीती ब्रिटिश सरकारला वाटत होती. जरी भारत छोडो आंदोलनाला माफक यश मिळाले तरी करड्या जरबेने व कडक उपाययोजनांनी इंग्रजांनी इ.स. १९४३च्या अंतापर्यंत भारतातील आपले राज्य सुरळीत ठेवले होते. युद्धाच्या शेवटी इंग्रजांनी भारतीयांच्या हाती सत्ता देण्याचे स्पष्ट संकेत दिले. तेव्हा गांधीजींनी आंदोलन संपवले आणि जवळपास एक लाख राजनैतिक कैद्यांची सुटका करण्यात आली ज्यामध्ये काँग्रेस नेत्यांचापण समावेश होता.


स्वातंत्र्य आणि भारताची फाळणी –


                   इ.स. १९४६ मधील ब्रिटिश कॅबिनेट मिशनच्या शिफारशी नामंजूर करण्याची सूचना गांधीजींनी काँग्रेसला दिली. या शिफारशींमधील मुस्लिम बहुसंख्य राज्यांच्या एकत्रीकरणाबद्दल गांधीजी साशंक होते. त्यांच्या मते ही फाळणीची नांदी होती पण जरी पक्ष गांधीजींचा सल्ला खचितच मानत असे, तरी यावेळी मात्र त्यांनी हा सल्ला मानला नाही. कारण पंडित नेहरू आणि पटेलांना माहित होते की जर ब्रिटिशांच्या शिफारशी मान्य नाही केल्या तर राज्य कारभाराचे नियंत्रण मुस्लिम लीग कडे जाईल. इ.स. १९४६ आणि इ.स. १९४८ च्या दरम्यान ५,००० हून जास्त व्यक्ती दंगलींमध्ये मारले गेले. गांधीजींनी अशा प्रत्येक योजनेचा जोरदार विरोध केला जी भारताची फाळणी दोन राष्ट्रांत करेल. भारतातील बहुसंख्य मुस्लिम, जे हिंदू आणि शिखांच्या सोबत राहत होते, ते फाळणीला अनुकुल होते. अजून म्हणजे, मुस्लिम लीगचे नेते, मोहम्मद अली जिना यांना पश्चिम पंजाब, सिंध, उत्तर-पश्चिम फ्रंटियर प्रांत आणि पूर्व बंगालमध्ये बराच पाठिंबा होता. हिंदू-मुस्लिमांमधील अंतर्गत युद्ध टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणून काँग्रेसने फाळणीच्या आराखड्याला मान्यता दिली. काँग्रेस नेत्यांना माहित होते की गांधीजी फाळणीला तीव्र विरोध करतील आणि गांधीजींच्या पक्षातील आणि देशातील पाठिंब्यामुळे त्यांच्या अनुमतीशिवाय पुढे जाता येणार नाही. गांधीजींच्या निकटच्या सहकाऱ्यांनी फाळणीचा (त्या परिस्थितीतील) सर्वोत्तम पर्याय म्हणून स्विकार केला होता. सरदार पटेलांनी गांधीजींना पटवून देण्याचा प्रयत्न केला की, फाळणी हा अंतर्गत युद्ध टाळण्यासाठी एकमेव पर्याय आहे.  त्यांनी उत्तर भारतातील तसेच बंगालमधील प्रक्षुब्ध जमावाला शांत करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिम समाजातील नेत्यांसोबत दीर्घ चर्चा केल्या. इ.स. १९४७ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरदेखील, भारत सरकारचा फाळणी करारानुसार ठरलेले ५५ कोटी रूपये पाकिस्तानला न देण्याचा निर्णय त्यांना आवडला नाही. तसेच हिंदू आणि मुस्लिम नेते एकमेकांना समजून घेण्यात असमर्थता दाखवीत होते. या सर्व कारणांनी गांधीजी अत्यंत व्यथित झाले होते. त्यांनी या दंगली बंद करण्याच्या आणि पाकिस्तानला ५५ कोटी देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण चालू केले. गांधीजींना भीती वाटत होती की, पाकिस्तानमधील अस्थिरतेमुळे आणि असुरक्षिततेमुळे तेथील लोकांचा भारताबद्दलचा राग वाढवेल आणि या दंगली देशाच्या सीमा ओलांडून जातील, तसेच हिंदू आणि मुस्लिमांमधील शत्रुत्व परत डोके वर काढील आणि त्याची परिणिती अंतर्गत बंडात होईल. त्यांच्या आयुष्यभराच्या सहकाऱ्यासोबतच्या अनेक वादविवादांनंतरही गांधीजी आपल्या निर्णयावरून मागे हटले नाहीत आणि शेवटी सरकारने आपला निर्णय मागे घेतला आणि पाकिस्तानला ५५ कोटी रूपये दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय हिंदू महासभा यांचे नेते यांचे तसेच अन्य हिंदू नेते, मुस्लिम नेते व शीख नेते यांनी हा हिंसाचार थांबवण्याचे आणि लोकांकडून शांतता राखण्याची मागणी करण्याचे वचन दिले. यानंतर गांधीजींनी संत्र्याचा रस पिऊन आपले उपोषण सोडले.


                  ३० जानेवारी १९४८ ला दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. त्यांचा मारेकरू नथुराम गोडसे हा एक पुरोगामी हिंदू होता व त्याचे संबंध जहालमतवादी हिंदू महासभेशी होते. त्याच्या मते पाकिस्तानला पैसे देऊन भारताला दुबळे पाडण्यासाठी गांधीजी जबाबदार होते. गोडसे आणि त्याचा सहकारी नारायण आपटे यांच्यावर खटला दाखल करून त्यांना दोषी ठरवण्यात आले. त्यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला फाशी देण्यात आली. गांधीजींच्या राज घाट येथील समाधीवर ’हे राम’ असे लिहिले आहे हे त्यांचे शेवटचे शब्द होते.


गांधीजींच्या मृत्यूनंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी रेडियोवरून देशाला संबोधित केले:


                “माझ्या मित्र आणि सहकाऱ्यांनो, आपल्या आयुष्यातून प्रकाश निघून गेला आहे आणि सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे आणि मला कळत नाही आहे तुम्हाला काय आणि कसे सांगावे. आपले आवडते नेते-राष्ट्रपिता, ज्यांना आपण प्रेमाने ’बापू’ म्हणत असू, आता आपल्यामध्ये नाही आहेत. कदाचित तसे म्हणणे चूकच ठरेल, पण आपण त्यांना आता बघू शकणार नाहीत, जसे आपण त्यांना इतके वर्ष बघत आलो आहोत. संकटांमध्ये त्यांचा सल्ला घ्यायला आपण आता धावत जाऊ शकणार नाही. त्यांच्या सानिध्यातील शांती आणि समाधान आपल्याला मिळणार नाही. हा एक प्रचंड धक्का आहे, केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर या देशातील कोट्यावधी लोकांसाठीसुद्धा.”


                  गांधीजींच्या अस्थी रक्षापात्रांमध्ये भरून देशभरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पाठविण्यात आल्या. जवळपास सर्व अस्थींचे विसर्जन १२ फेब्रुवारी १९४८ ला अलाहाबाद येथील संगमावर करण्यात आले पण काही अस्थी लपवण्यात आल्या होत्या. १९९७ मध्ये तुषार गांधी यांनी एका रक्षापात्राचे विसर्जन केले. हे रक्षापात्र एका बँकेमधील लॉकरमध्ये सापडले होते आणि न्यायालयात खटला दाखल करून हस्तगत करण्यात आले होते. ३० जानेवारीला त्यांच्या परिवाराने अजून एका रक्षापात्राचे विसर्जन मुंबईत गिरगाव चौपाटीवर केले. हे पात्र एका दुबई-स्थित व्यापाऱ्याने मुंबईमधील एका वस्तुसंग्रहालयाला पाठविले होते. अजून एक रक्षापात्र पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये आहे (जिथे गांधीजी १९४२ आणि १९४४ च्या दरम्यान बंदिवासात होते) आणि दुसरे एक पात्र लॉस एंजेलस येथील सेल्फ रिअलायझेशन लेक श्राइन येथे आहे. त्यांच्या परिवाराला जाणीव आहे की तेथील अस्थी राजकीय फायद्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. पण ते पात्र तिथून काढून घेतल्यास तो मठ बंद पडेल या भीतीने गांधीजींचे वंशज ते रक्षापात्र तिथून काढून घेऊ इच्छित नाहीत.


गांधीजींची तत्त्वे –


               गांधीजीनी एकादश (अकरा) व्रतांचा स्वीकार केला होता. ती पुढीलप्रमाणे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रम्हचर्य, अपरिग्रह, शरीरश्रम, आस्वाद, सर्वत्र भयवर्जन (निर्भयता), सर्वधर्म सामान्ताव्य (सर्वधर्म समभाव), स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यतेचा त्याग). निर्भयता या तत्वाला गांधीजी आधारभूत मानत.  त्यांच्यामते निर्भयतेमुळेच इतर तत्वांचे पालन करता येऊ शकते.

                   गांधीजींनी आपले आयुष्य सत्याच्या शोधासाठी अर्पण केले होते. त्यांचे आत्मचरित्र माझे सत्याचे प्रयोग या नावाखाली प्रसिद्ध आहे. गांधीजींनी म्हटले आहे की, सर्वांत महत्त्वाची लढाई ही स्वतःच्या वाईट प्रवृत्ती, भय आणि असुरक्षितता यांच्यावर मात करणे ही होय. “परमेश्वर सत्य आहे.” असे त्यांचे मत होते. पुढे त्यांनी ते, “सत्य (हेच) परमेश्वर आहे.” असे बदलले. जरी अहिंसेचे तत्त्व गांधीजींनी स्वतः मांडले नसले तरी इतक्या मोठ्या राजकीय स्तरावर अहिंसेचा अवलंब करणारे ते प्रथमच व्यक्ती होते.  “जेव्हा मी निराश होतो, तेव्हा मी स्मरण करतो की, इतिहासात प्रत्येक वेळी सत्य आणि प्रेमाचाच विजय होत आला आहे. (इतिहासात) अनेक क्रूरकर्मे होऊन गेले आणि काही काळासाठी ते अजिंक्य पण वाटले, पण नेहमी शेवटी त्यांचा पराभवच झाला आहे.


                 “विध्वंस हा सर्वंकषतावादाच्या नावाखाली केला गेला की, स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या नावाखाली (त्यातील) मृतांसाठी, अनाथांसाठी आणि गृहहीनांसाठी काय फरक असणार?”

                  “डोळ्यासाठी डोळा सर्व जगाला अंधळे करून सोडेल.”
                  “अशी अनेक ध्येयं आहेत ज्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण असे एकही ध्येय नाही ज्यासाठी मी कुणाचा जीव घेईन.”

Mahatma gandhi information in marathi या लेखाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या लिहीण्यातून महात्मा गांधी माहिती mahatma gandhi information सांगण्यात काही चुका झाल्या असतील तर माफ करावे.आपणास माझी एक विनंती आहे कि महात्मा गांधी यांची माहिती आपल्या सर्व मित्र परिवारात शेअर करण्यास विसरू नका.


जय हिंद,वंदे मातरम


धन्यवाद



kho kho information in marathi | खो खो खेळाची माहिती मराठी kho kho mahiti

kho kho information in marathi | खो खो खेळाची माहिती मराठी kho kho mahiti

Information about kho kho in Marathi
Information about kho kho in Marathi


नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही.सर्व मजेत ना! खो खो खेळाविषयी जाणून घेण्याची जी उत्सूकता तुमच्यामध्ये आहे,त्यामुळे आज या लेखातून आपण kho kho information in marathi खो खो खेळाची माहिती मराठी मधे पाहणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला खो खो खेळाची माहिती kho kho mahiti मिळणार आहे.आपणास विनंती आहे कृपया हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा,जेणेकरून आपल्याला kho kho khelachi mahiti मिळेल.



kho kho game information in marathi | खोखो खेळाची माहिती


खो खो हा एक भारतीय मैदानी खेळ आहे. ह्या खेळासाठी मैदानाच्या दोन टोकांना रोवलेले खांब सोडल्यास कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. ह्या खेळ खेळण्यास अतिशय सोपा आहे, तरीही हा खेळ गतिमान असल्यामुळे ह्या खेळात चपळतेचा, गतीचा कस लागतो व हा खेळ उत्कंठावर्धक होतो.
खो-खोची सुरुवात नेमकी कधी झाली हे कळणे कठीण आहे. ह्या खेळाचा उगम महाराष्ट्रात झाला. 

पकडापकडीच्या खेळातून उत्क्रांती होत ह्या खेळाचा जन्म झाला असावा. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या खेळात सुसूत्रता आणण्यास सुरुवात झाली. १९१४ साली पुणे जिमखाना येथे खो-खोचे नियम बनवण्यासाठी एका समितीची स्थापना झाली. १९२४ साली बडोदा जिमखान्याने खो-खोची नियमावली प्रसिद्ध केली. १९५९-६० साली भारत सरकारने आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथे खो-खोची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली.


खो खो खेळाची माहिती मराठी नियम

Kho kho game rules and regulations
Kho kho game rules and regulations

खो-खोमध्ये दोन संघ असतात. प्रत्येक संघात १२ खेळाडू असतात. परंतु एका वेळेस ९ खेळाडू खेळतात. खेळ दोन भागांमध्ये विभागला जातो. दोन भागांमध्ये ५ मिनिटे विश्रांतीचा कालावधी असतो. प्रत्येक भागात पुन्हा दोन उपभाग असतात. त्यातील पहिल्या उपभागात पहिला संघ पाठलाग करतो व दुसरा संघ बचाव करतो. दुस-या उपभागात पहिला संघ बचाव करतो तर दुसरा पाठलाग करतो. दोन्ही उपभगांमध्ये २ मिनिटे विश्रांतीचा काळ असतो. थोडक्यात, संपूर्ण खेळ साधारणतः ३७ मिनिटे (७+२+७+५+७+२+७) चालतो.

खेळाच्या सुरुवातीला पाठलाग करणा-या संघाचे आठ खेळाडू दोन खांबांमधील आठ चौकोनांत आळीपाळीने विरुद्ध दिशांना तोंड करून बसतात. नववा खेळाडू कोणत्याही एका खांबाजवळ उभा राहतो.बचाव करणा-या संघाचे तीन खेळाडू मैदानात असतात. खेळ सुरु झाल्यावर पाठलाग करण्या-या संघाचा नववा खेळाडू बचाव करणा-या संघाच्या तीन खेळाडुंना बाद करण्याचा प्रयत्न करतो. पाठलाग करणा-या खेळाडुवर खालील बंधने असतात.

kho kho game ground information in marathi | kho kho khelachi mahiti


एकदा एका खांबाकडील दिशा पकडल्यावर तो आपली दिशा बदलू शकत नाही (खांबाला स्पर्श करून तो आपली दिशा बदलू शकतो)
तो दोन खांबाना जोडणारी रेषा ओलांडू शकत नाही.
पळ्ण्याची दिशा बदलण्यासाठी पकडणारा खेळाडू इतर खेळाडुंना खो देऊ शकतो. खो देण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे घडते.

पळणारा खेळाडू मैदानाच्या ज्या बाजूस असेल, त्या बाजूस पाठ करून बसलेल्या खेळाडुंनाच तो खो देउ शकतो.
खो देताना पळणारा खेळाडू खो दिल्या जाणा-या खेळाडुच्या पाठीवर थाप मारुन 'खो' असा आवाज करतो.

खो घेतलेला खेळाडू मग, त्याचे तोंड असलेल्या बाजूस उजव्या किंवा डाव्या दिशेस (पकडण्यासाठी) पळण्यास सुरुवात करतो.

ज्याने खो दिलेला आहे तो खेळाडु, खो घेतलेल्या खेळाडुची जागा घेतो.

वरील प्रकारे खो-खोची साखळी सुरु रहाते.

बचाव करणा-या खेळाडुवर मैदानात पळताना कोणतेही निर्बंध नसतात. कोणताही बचाव करणारा खेळाडू खालील प्रकारांनी बाद होऊ शकतो
पकडणा-या खेळाडुने (बचाव करणा-या खेळाडुस) तळ्हाताने स्पर्श केल्यावर
बचाव करणारा खेळाडू मैदानाबाहेर गेल्यास
· बचाव करणारा खेळाडुने मैदानात उशीरा प्रवेश केल्यास
बचाव करणा-या संघाचे तीनही खेळाडू बाद झाल्यावर पुढचे तीन खेळाडू मैदानात प्रवेश करतात. नवीन खेळाडुंनी पुढचा खो देण्याआधी मैदानात उतरणे आवश्यक असते. अन्यथा त्यांना बाद धरण्यात येते.

बाद केलेल्या प्रत्येक खेळाडुच्या बदली प्रतिस्पर्धी संघाला एक गुण मिळतो. पहिल्या भागाच्या अखेरीस प्रत्येक संघाचे गुण बघितले जातात. ज्यासंघाचे गुण जास्त, त्या संघाची विरुद्ध संघावर दोन्ही संघांमधील गुणांच्या फरकाइतकी आघाडी धरली जाते. दुस-या भागाच्या अखेरीस, जो संघ आघाडी मिळवितो तो संघ त्या आघाडीने विरुद्ध संघावर मात करतो.

kho kho ground information in marathi


खोखोचे क्रीडांगण १११ फूट (३३·६ मी.) लांब व ५१ फूट (१५·५ मी.) रुंद असते. मध्यपाटीची रुंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४·६८मी.) असते. खुंटाची उंची ४ फूट (१·३६ मी.) व परीघ १३" ते १६" (३३·०२ ते ४०·६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८. १/२ फूट (२·५४  मी.) असते. बाकी सर्व पाट्यांचे मधील अंतर ८ फूट (२·४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५ ' × ५१' (४·५६ मी. × १५·५४  मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२·४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुद्ध बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळास प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू खेळात भाग घेतात. अशा रीतीने खेळणा-या संघातले सर्व खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतात. वेळ संपल्यानंतर दुसरा संघ खेळावयास मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानाला ही गोष्ट सांगावी लागते.

बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून ‘खो’ म्हटले म्हणजे तो उठून पळणा-याचा पाठलाग करू लागतो आणि खो देणारा त्याची जागा घेतो. खो मिळाल्यावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणा-याला दिशा बदलता येत नाही. उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा (दोन्ही खांद्यांना जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल, त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही. खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.

kho kho game information in marathi | kho kho marathi mahiti

Kho kho khelachi mahiti
Kho kho khelachi mahiti

खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठ्यांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २ १/२ मिनिटे आणि दोन डावांनंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरुद्ध संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.

खोखोच्या सामन्यासाठी दोन पंच, एक सरपंच, एक गुणलेखक आणि क्वचित प्रसंगी काही सामन्यांत वेळाधिकारी असतो. अन्यथा ही कामगिरी सरपंच पार पाडतो.



kho kho information in marathi बद्दल आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.तुमचा प्रतिसाद व तुमचा प्रतिसाद व आपल्या कौतूकाची साथ मला असे आर्टिकल लिहण्यास स्फुर्तिदायक ठरेल.आपणास विनंती आहे खो खो खेळाची माहिती मराठी आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा.

जय हिंद,वंदे मातरम

धन्यवाद



माझा आवडता खेळ निबंध maza avadta khel in marathi || Marathi Nibandh

माझा आवडता खेळ निबंध maza avadta khel in marathi || Marathi Nibandh

Maza avadata khel in Marathi
Maza avadata khel

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझा आवडता खेळ निबंध School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये maza avadta khel in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Essay on my favourite game in Marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.




शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी Information about cricket in Marathi Or maza avadta khel in marathi हे मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझा आवडता खेळ निबंध कडे.

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒


माझा आवडता खेळ निबंध मराठी maza avadta khel in marathi || Marathi Nibandh               

लहानपणी माझा सर्वांत आवडता खेळ कोणता असेल? तर तो ‘क्रिकेट’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘क्रिकेट’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘क्रिकेट’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टि.व्ही. वर पहात असताना मी भावुकही व्हायचो! एकदा भारत अशाच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला, तेंव्हा मला माझे अश्रू अनावर झाले, इतकं माझं क्रिकेटवर प्रेम होतं.

कालोघात ते सवंगडीही मागे पडले व तो खेळही मागे पडला. गेल्या दहा वर्षांत मी क्वचितच क्रिकेट खेळलो असेन. का कोणास ठाऊक? पण क्रिकेट या खेळातील माझी रुची ही हळूहळू फारच कमी होत गेली. जसं मी क्रिकेट खेळणं सोडलं, तसं माझं क्रिकेट पाहणं देखील बंद झालं. आता तर मला ‘भारताचा सामना कधी आहे?’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! वर्तमानपत्रात येणार्या बातम्या वाचल्यानंतरच मला त्याबाबत माहिती होते. सतत होणार्या ‘मॅच फिक्सिंग’ मुळे क्रिकेट हा खेळ पाहण्यात काही ‘अर्थ’ उरला आहे, असे वाटत नाही.

आय.पी.एल. ची लोकप्रियता ही तर माझ्यासाठी अगदी अनाकलनीय आहे! पुण्याच्या टिममध्ये पुण्याचे खेळाडू असत नाहीत, मुंबईच्या टिममध्ये मुंबईचे खेळाडू असत नाहीत, केवळ पैसा आणि प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून आय.पी.एल. च्या व्यवसायात उतरलेले उद्योजग ‘पुणे वॉरिअर्स’, ‘मुंबई इंडियन्स’ म्हणून लोकांना भावनिक आवाहन करतात आणि लोक भुलतात! पुण्याचे, मुंबईचे खेळाडू बाजूला राहूदेत.. कमीतकमी मराठी खेळाडू तरी महाराष्ट्रातील शहारांच्या नावाने असलेल्या टिममध्ये असावेत की नाही!? आता काही लोक मला त्या टिममधील मराठी खेळाडूंची नावे सांगू लागतील.. पण मी इथे अपवादांबद्दल बोलत नसून संपूर्ण टिमबाबत बोलत आहे.

लोकांनी स्वतःहून क्रिकेट खेळावे त्यातून चांगला शारिरीक व्यायाम होतो, पण सतत टि.व्ही. वर दुसर्यांचा खेळ पाहून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? मनोरंजनच हवे असेल, तर क्रिकेटहून अधिक चांगली अशी मनोरंजनाची कितीतरी साधने आहेत. शेवटी आवडी-निवडी या अगदी व्यक्तिगत असतात. पण आपल्या आवडी-निवडींमधून आपल्या जीवनात काही चांगला बदल होत आहे का? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जर असा बदल होत असेल, तर आपण योग्य मार्गावर आहोत असे समजायला हरकत नाही. नाहीतर आपल्या आवडी-निवडी बदलायची वेळ आली आहे, असे निश्चित समजावे!


माझा आवडता खेळ क्रिकेट Information about cricket in Marathi

 🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.

भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. 'रणजी ट्रॉफी', 'दिलीप करंडक' व 'इराणी ट्रॉफी' हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.


क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत cricket information in Marathi

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.


क्रिकेटची साधने व पटांगण [माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध]


चेंडू - वजन १५५ ग्रॅम्स, परिघ २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.

विकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.

पिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.


Cricket खेळाची सुरूवात [मराठी निबंध माझा आवडता खेळ]

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.

फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. 'प्ले' असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.

ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

माझा आवडता खेळ निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे maza avadta khel in marathi or Information about cricket in Marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





Shivaji maharaj information in marathi शिवाजी महाराज माहिती | about shivaji maharaj in marathi

Shivaji maharaj information in marathi शिवाजी महाराज माहिती | about shivaji maharaj in marathi

Shivaji Information In Marathi
Shivaji Information In Marathi

नमस्कार,मझ्या प्रिय बंधु भगिनिंनो. आज या पोस्टमध्ये आपल्यासाठी घेऊन आलो आहे शिवाजी महाराज माहिती.मित्रांनो shivaji maharaj information in marathi साठी आपण उत्सुक असालच.आमच्याकडे माझ्या वाचकांची about shivaji maharaj in marathi साठी मांगणी होती,त्यामुळे आज मी तुम्हाला शिवाजी महाराज माहिती देत आहे.कृपया करून shivaji maharaj yanchi mahiti शेवटपर्यंत वाचा.



“प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।”


हि ओळ तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकली असेलच. हे शब्द आहेत राजमुद्रेतले, जे शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्यच प्रतीक आहे. हे शब्द जेवढे स्फूर्तिदायी वाटतात तेवढाच विस्मयकारी त्यांचा अर्थ हि आहे, तो असा,


प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…



shivaji maharaj information in marathi | Shivaji Maharaj Biography



एक राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं आणि जन्म दिला जगातील एका प्रतिष्टीत अशा मराठा साम्राज्याला. ह्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला जगातील महान अशा मराठा साम्राज्याचे अधिपती श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती देणार आहोत. दरवर्षी १९ फेब्रुवारी ला आपण शिव जयंती साजरी करतो.


शाळा आणि कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना ह्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर निबंध अथवा भाषण द्यावे लागते. ह्या आर्टिकल द्वारे तुम्हाला शिवाजी महाराज्यांसारख्या थोर राजाबद्दल माहित मिळेल आणि हि माहिती तुम्हाला तुमच्या निबंध अथवा वक्तृत्व स्पर्धेत नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरु करूया.


छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योध्या आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. ते जगातील काही महान राजांमध्ये एक होते आणि लोक आजही त्यांना तेवढाच आदर आणि सन्मान देतात. शिवाजी महाराजांची ख्याती भारतात तसेच पूर्ण जगातही आहे. एक शूरवीर योद्धा ज्याच्याकडे प्रशासकीय कुशलता, आधुनिक लष्करी डावपेचांमध्ये पारंगतपणा आणि दूरदृष्टी होती आणि म्हणूनच शिवाजी महाराज एक महान योद्धा तसेच एक जाणता राजा होते आणि प्रचंड मोठे, सामर्थ्यशाली असं मराठा साम्राज्य उभारू शकले.



शिवाजी महाराज माहिती | शिवाजी महाराज वंशावळ


Shivaji Maharaj information

शिवाजी महाराजांचा जन्म म्हणजे मुघलांनी त्रासलेल्या जनतेसाठी एक शुभ शकुनच होता. त्रस्त जनतेला शिवरायांच्या जन्मानंतर एक आशेचा किरण दिसू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जुलिअन दिनदर्शिकेनुसार १९ फेब्रुवारी १६३०, हिंदू दिनदर्शिकेनुसार फाल्गुन कृष्ण तृतीयेला पुण्यातील जुन्नर मधील शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले व आईचे नाव जिजाबाई भोसले होते. जिजाबाई शिवाजी महाराजांना प्रेमाने शिवबा हि म्हणत. शहाजी महाराज विजापूर च्या राजाच्या सेवेत होते आणि पुण्यातही काही भागाचे ते जहागीरदार होते.


शिवरायांची आई जिजाबाई ह्या सिंदखेड च्या लाखोजी जाधवांची कन्या. त्या अतिशय धार्मिक आणि महत्वाकांक्षी होत्या. लहानपणापासूनच त्यांनी शिवाजी महाराजांना सत्यासाठी आणि न्यायासाठी लढायला शिकवले आणि शेवटी सत्याचाच विजय होतो हे त्यांना पटवून दिले. मोठे होत असताना आई जिजाऊंची हि शिकवण कायम शिवाजी महाराज्यांचा सोबत होती आणि त्याचा प्रभाव शिवाजी महाराजांवर होता.



chhatrapati shivaji maharaj information in marathi शिवाजी महाराज माहिती



शिवाजी महाराजांच्या अंगी जन्मतःच नेतृत्व क्षमता होती. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सह्याद्रीच्या कडेकपार्या फिरून काढल्या आणि आपल्या प्रदेशाबद्दल सर्व माहिती आत्मसात करून घेतली. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी काही विश्वासू मावळ्यांना जमवून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. हेच मावळे त्यांच्या स्वराज्य निर्मितीच्या प्रवासात त्यांचे सोबती होते. हे मावळे स्वराज्य भावनेने प्रेरित होते आणि स्वराज्यासाठी आणि शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला हि तयार होते. १६४० मध्ये शिवरायांच्या विवाह सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला.


१६४५ पर्यंत शिवाजी महाराजांनी आदिल शहा च्या पुणे प्रदेशाच्या आजूबाजूच्या चाकण, कोंढाणा, तोरणा, तसेच सिंहगड आणि पुरंदर या किल्ल्यांचा ताबा घेतला होता. शिवाजी महाराजांच्या ह्या यशस्वी लढायांमुळे आदिल शहा अस्वस्थ होऊ लागला आणि त्याला शिवाजी महाराजांकडून मुघल साम्राज्याला धोका आहे ह्याची जाणीव झाली. आदिल शहा ने शिवरायांचे वडील शहाजीना कैद केले आणि एकाच अटीवर मुक्त केले कि शिवाजी महाराज यापुढे आदिल शहा च्या प्रदेशावर चढाई करणार नाही.


काही वर्षांनी शहाजी राजेंचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांनी आपली घोडदौड पुन्हा सुरु करून जावळी च्या दरीखोऱ्यातला प्रदेश चंद्रराव मोरे जो विजापूर चा जहागीरदार होता त्याकडून जिंकुण घेतला. ह्या घटनेने आदिल शहा चा राग अनावर झाला आणि त्याने आपल्या शक्तिशाली सरदारांपैकी एक सरदार अफजल खान ह्याला शिवरायांना पराभूत करण्यात धाडले.


अफजल खानाने शिवाजी महाराजांना मारण्यासाठी षडयंत्र रचले आणि त्यांना भेटीसाठी प्रतापगडावर बोलवले. पण अफजल खानाला माहित नव्हते कि शिवाजी महाराज त्याच्या एक पाऊल पुढे आहेत. महाराजांनी खानाचा डाव ओळखला आणि त्यांनी गनिमी काव्याचा डाव रचला. जेव्हा ते प्रतापगडावर भेटले तेव्हा खानाने शिवरायांना आलिंगन देण्यासाठी जवळ बोलावले आणि जवळ येताच शिवरायांवर वार करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्यावरच उलटा पडला. शिवरायांनी आपल्या अंगरख्याखाली चिलखत घातले होते.


राजेंनी चपळाईने लपवलेला वाघनख्या बाहेर काढल्या आणि खानाच्या पोटात खुपसल्या. खानाचा कोथळा बाहेर आला आणि खान कोसळला. शिवाजी महाराजांवर हल्ला झाला हे समजताच जंगलात लपलेल्या मावळ्यांनी खानाच्या ३००० सैन्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या ह्या हल्ल्यामुळे खानाचं सैन्य बिथरले आणि मारले गेले. ह्याच गनिमी काव्याचा उपयोग करून शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. गनिमी कावा हि पद्धत ज्याला इंग्रजी मध्ये गुरिल्ला वॉरफेर असं म्हणतात हि आजही जगातल्या मोठमोठ्या देशांच्या लष्करामध्ये वापरली जाते. प्रतापगडाच्या घटनेवरून शिवाजी महाराजांची चपळाई, दूरदृष्टी आणि शोर्य दिसून येते.


समर्थशाली असे मराठा साम्राज्य दूरवर पसरवल्यांनतर शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला. जुन ६, १६७४ रोजी रायगडवर आयोजीत राज्याभिषेक सोहळ्यात शिवाजी महाराजांच्या मराठ्यांचा राजा छत्रपती म्हणून गौरव करण्यात आला. ह्या राज्याभिषेक सोहळ्यात सुमारे ५०००० लोक हजर होते आणि पंडित गागा भट्टांनी राज्याभिषेकाचा विधी पार पाडला. ह्या राज्याभिषेकात शिवरायांचा छत्रपती, शककर्ते, क्षत्रिय कुलावतंस आणि हिंदू धर्मोद्धारक अशा नावांनी गौरव करण्यात आला.


शिवाजी महाराजांची एक कुशल राज्यकर्ता म्हणून ख्याती होती. त्यांनी अष्टप्रधान मंडळ सुरु केले ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीस एक ठराविक जबाबदारी देण्यात आलेली. पेशवा, मजुमदार, डबीर, पंडितराव,सेनापती, सचिव, मंत्री, न्यायाधीश अशी अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांची पदे असत.


शिवाजी महाराजांची प्रशासकीय धोरणे अतिशय अनुकूल आणि मानवी होती. त्यांनी चौथ आणि सरदेशमुखी ह्या दोन प्रकारच्या कर पद्धतींची सुरुवात केली. त्यांनी राज्याची ४ विभागांमध्ये विभागणी केली आणि प्रत्येक विभागाचा प्रमुख मामलतदार असे. त्यांनी कायम स्त्री स्वातंत्र्याला प्रोत्साहन दिले आणि ते कायम स्त्रियांचा आदर करत. त्यांनी त्य्यांच्या मावळ्यांना देखील कोणत्याही स्त्री ला इजा किंवा अनादर होईल असं ना वागण्यास सक्त ताकीद दिली होती. शिवाजी महाराक हिंदुत्व, मराठी आणि संस्कृत भाषेचे समर्थक होते परंतु त्यांनी नेहमी दुसऱ्या धर्मांचा आदर केला. त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती आणि धर्माचे सैनिक होते.



chhatrapati shivaji maharaj information | shivaji maharaj mahiti


Shivaji Information Marathi
Shivaji Information Marathi

शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या सुरक्षिततेबद्दल खूप सावध होते. त्यांना गड किल्ल्यांची ची ताकद माहित होती आणि म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रात तसेच पूर्ण भारतामध्ये खूप किल्ले उभारले. समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रू पासून सुरक्षा करण्यासाठी महाराजांनी समुद्री किल्ले आणि आरमार हि उभारले.


४ दशके स्वराज्यासाठी लढल्यांनतर एप्रिल ३, १६८० रोजी आजारपणामुळे रायगडावर शिवाजी महाराज अनंतात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरही मुघलांसोबतची मराठ्यांची लढाई चालूच राहिली. शिवाजी महाराज्यांनंतर त्यांचे पुत्र संभाजीराजेंनी स्वराज्याची सूत्रे हातात घेतली. पण दुर्दैवाने मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. शिवाजी महाराजांचे चरित्र सभासद बखर मध्ये लिहले गेले.


आज एकविसाव्या शतकात हि लोक शिवाजी महाराजांचा तेवढाच आदर करतात. शिवरायांच्या जीवनावर खूप चित्रपट, पोवाडे, नाटके, गाणी, बनवली गेली. खूप अशी ठिकाणे, संग्रहालये, स्टेडियम्स, शिवाजी राजांच्या नावाने नावाजली गेली. मुंबई मधील विमानतळाला देखील शिवाजी महाजारांचं नाव देण्यात आलं. शिवजयंती आपण खूप खूप उत्साहात साजरी करतो. लेझीम च्या तालावर शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक निघते, एकमेकांना शिवाजी महाराजांचे फोटोस, व्हिडिओस सोसिअल मीडिया वर पाठवले जातात.


मुंबई मध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम जोमात सुरु आहे. शिवाजी महाराजांचा  २१० फुटांचा हा पुतळा जगातील सर्वाधिक उंच पुतळा असेल. हे स्मारक बांधण्यासाठी ४००० करोड इतका खर्च येणार आहे. म्हणून काही लोक ह्यास विरोध हि करत आहेत. जर जे पैसे शिवाजी महाराजांनी बनवलेल्या किल्ल्याचा नूतनीकरण व डागडुजीसाठी वापरले तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा सन्मान होईल असं त्यांचं म्हणणं आहे.


शिवाजी महाराज एक उत्कृष्ट राजा, धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते आणि दूरदृष्टी असणारे योद्धा होते. ते जनतेच्या कल्याणासाठी लढत राहिले म्हणूनच त्यांना जाणता राजा संबोधण्यात येते. राजेंबद्दलचा मान आणि आदर आजही लोकांमध्ये दिसून येतो. जर आज शिवाजी महाराज जिवंत असते तर ह्या जनतेचं त्याच्याबद्दलच प्रेम बघून भारावून गेले असते. पण त्याचबरोबर देशात चाललेल्या भ्रष्टाचार, गुन्हे, दंगली बघून उदास हि झाले असते. अशा ह्या थोर राज्याला माझं शत शत नमन.


shivaji maharaj information in marathi या लेखाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.माझ्या लिहीण्यातून शिवाजी महाराज माहिती about shivaji maharaj in marathi सांगण्यात काही चुका झाल्या असतील तर माफ करावे.

आपणास माझी एक विनंती आहे कि chhatrapati shivaji maharaj information आपल्या सर्व मित्र परिवारात शेअर करण्यास विसरू नका.

जय हिंद,वंदे मातरम


धन्यवाद