Marathi poems on nature निसर्ग कविता | Nisarg Kavita in Marathi

Marathi poems on nature निसर्ग कविता | Nisarg Kavita in Marathi

Nisarg kavita
Marathi poem on nature

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Marathi poems on nature तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच. निसर्ग कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Nisarg Kavita in Marathi माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Marathi poems on nature उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया निसर्ग कविता कडे.

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

  marathi poems on nature [एक झाड]


एक झाड लांब लांब
फांद्या असणारं
दुरूनही जवळ घेऊन
येणारं,
एक झाड माळरानात एकटच
चिडीचीप उभं असणार
मायेचं प्रेम कुणा ना कुणासाठी
जपणार.

एक झाड कधीही न बोलणार
रोज नव्या उमेदीच बीज पेरणार
एक झाड वादळ वाऱ्याशी तग
धरून धीट राहणार
वाटसरुला शांत स्वप्नात पाहणार.

एक झाड दुसऱ्यासाठी
झिजण्याचा ध्यास देणारं
सृष्टीला नवा श्वास देणारं.

एक झाड अथांग समुद्र
तिराशी उभं असणार
लाटांशी खळखळूण हसणार.

एक झाड बागेत रोपटं
म्हणुन असणारं
चिमुकल्यांसोबत लपंडाव खेळणार.

एक झाड बांदावरून शेताच
राखण करणार
बाळाला शांत झोळीत
निजवणार.

एक झाड प्रत्येकाला
हवं हवं असणार
माणसाशी
माणुसकी जपणार.

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

   marathi poems on nature  [फुलराणी]


हिरवे हिरवेगार गालिचे – हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती – फुलराणी ही खेळत होती

गोड निळ्या वातावरणात – अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचला त्या भूलीला – अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी – झोके घ्यावे, गावी गाणी
याहुन ठावे काय तियेला – साध्या भोळ्या फुलराणीला ?

पुरा विनोदी संध्यावात – डोल डोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला – चुंबून म्हणे फुलराणीला
“छानी माझी सोनुकली ती – कुणाकडे ग पाहत होती ?
तो रविकर का गोजिरवाणा – आवडला अमुच्या राणींना ?”
लाजलाजली या वचनांनी – साधी भोळी ती फुलराणी

आंदोली संध्येच्या बसुनी – झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल – नभी चमकती ते ग्रहगोल
जादूटोणा त्यांनी केला – चैन पडेना फुलराणीला
निजली शेते निजले रान – निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणि ही – आज कशी ताळ्यावर नाही ?
लागेना डोळ्याशी डोळा – काय जाहले फुलराणीला

या कुंजातुन त्या कुंजातुन – इवल्याश्या या दिवट्या लावुन
मध्यरात्रिच्या निवांत समयी – खेळ खेळते वनराणी ही
त्या देवीला ओव्या सुंदर – निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनि राहिले सगळे रान – स्वप्नसंगमी दंग होउन
प्रणयचिंतनी विलीन वृत्ती – कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होउनी – स्वप्ने पाही मग फुलराणी

कुणी कुणाला आकाशात – प्रणयगायने होते गात
हळुच मागुनी आले कोण – कुणी कुणा दे चुंबनदान
प्रणयखेळ हे पाहुनि चित्ति – विरहार्ता फुलराणी होती
तो व्योमीच्या प्रेमदेवता – वार्यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरुन खाली – फुलराणीसह करण्या केली
परस्परांना खुणवुनी नयनी – त्या वदल्या ही अमुची राणी

स्वर्गभूमीचा जुळवित हात – नाचनाचतो प्रभात वात
खेळुनि दमल्या त्या ग्रहमाला – हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गंभीर शांती – मंद मंद ये अवनी वरती
वीरू लागले संशयजाल – संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनि – हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्नसंगमी रंगत होती – तरीहि अजुनी फुलराणी ती

तेजोमय नव मंडप केला, – लख्ख पांढरा दहा दिशाला
जिकडे तिकडे उधळित मोती – दिव्य वर्हाडी गगनी येती
लाल सुवर्णी झगे घालुनी – हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबि फेटा – झकमणारा सुंदर मोठा
आकाशी चंडोल चालला – हा वाङनिश्चय करावयाला
हे थाटाचे लग्न कुणाचे – साध्या भोळ्या फुलराणीचे

गाउ लागले मंगल पाठ – सृष्टीचे गाणारे भाट
वाजवि सनई मारुत राणा – कोकिळ घे तानावर ताना
नाचु लागले भारद्वाज – वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रविकर – नवरी ही फुलराणी सुंदर
लग्न लागते सावध सारे – सावध पक्षी सावध वारे
दवमय हा अंतपट फिटला – भेटे रविकर फुलराणीला
वधूवरांना दिव्य रवांनी – कुणी गाइली मंगल गाणी
त्यात कुणीसे गुंफित होते – परस्परांचे प्रेम अहा ते
आणिक तेथिल वनदेवीही – दिव्य आपुल्या उच्छवासाही
लिहीत होत्या वातावरणी – फुलराणीची गोड कहाणी
गुंतत गुंतत कवि त्या ठायी – स्फुर्तीसह विहराया जाई
त्याने तर अभिषेकच केला – नवगीतांनी फुलराणीला

कवी: बालकवी

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

   marathi poems on nature [ हे सूर्यभास्करा]करतो नमन तुम्हाला
होता समय उदयाचा
उधळतो रंग केशरी चहूदिशांना

अभ्राअभ्रांत डोकावे, प्रकाश किरणांचा
रंगात रंगे सोनेरी, काठ मेघराजाचा
लालीत खुले दृश्य, विहंगम देखाव्याचा
लागे तीट उदयास, उडता थवा पाखरांचा

दृश्यात अदृश्य चमके, चांदण्या आकाशा
जसा समर्थ पुरुषाच्या, पाठी उभ्या सुकांता
दडतो आदित्य पाठी, फिरणाऱ्या पृथेच्या
होते निशा चराचरांत, पांघरून काळोख रातीला

केशरी तप्त गोळा, हर्षात उसळे अंबरा
होई अस्त त्याक्षणी, अजिंक्य काळरातीचा
झुके मस्तक त्यादिशी, होता प्रभा आकाशी
करे प्रारंभ प्रात:काळी, जीवसृष्टी कर्मास दाहीदिशी

दे ऊर्जा आम्हांस,
हरेक दिसास,
देऊन अर्घ्य तुम्हांस
वाहू दे सामर्थ्य नसानसांत

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

   Nisarg Kavita in Marathi [समुद्र किनारा]


वाहतो पाण्याचा झरा,वाहतो थंड वारा
पाहून असा नजारा,
आठवतो "समुद्र किनारा"....

समुद्राच्या किनारी रुतलेली अखंड वाळू
झोपले त्यावरी कधी,
वाटे जणू आई मायाळू...

संध्याकाळाच्या वेळी सूर्य जणू पाण्यात बुडे
संध्याकाळाच्या या दृश्याने,थवा पक्षांचा उडे.....

दिवसा नंतर रात्र संपूनी
रात्रीनंतर दिवस संपूनी
पाहून असा नजारा
आठवतो "समुद्र किनारा"....

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

  Nisarg Kavita in Marathi [आवडतो मज अफ़ाट सागर]


आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे

मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावार करणाऱ्या वाऱ्याच्या संगती

ऊन सावळी विणते जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येतो, सागरही गरजतो,
त्या वेळी मी चतुर पणाने दूर जरा राहतो.

खडका वरुनी कधी पाहतो, मावळणारा रवी
धागा धागा ला फुटते तेव्हा, सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जाला खालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी.

दूर टेकडी वारी पेटती निळे , तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

   निसर्ग कविता फुलपाखरू !


फुलपाखरू !
छान किती दिसते । फुलपाखरू

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

पंख चिमुकले । निळेजांभळे
हालवुनी झुलते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

डोळे बारीक़ । करिती लुक लुक
गोल मनी जनु ते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

मी धरु जाता । येई ना हाता
दुरच ते उड़ते । फुलपाखरू
छान किती दीसते । फुलपाखरू

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

  Rain poem in marathi [चाळीतला पाऊस बरा वाटायचा]

चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा

छपरावर आदळून तो किती जोराने पडतोय याचा अंदाज यायचा
दाराला प्लास्टिक लावून ओघाळणाऱ्या पवळाना अडवण्यात आनंद मिळायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा

शाळेची तयारी करताना तो नसायचा, घरातून बाहेर पडताना नेमका हजर व्हायचा
दप्तर भिजवायचा… पुस्तकांना भिजवून स्टोव्ह वरील भांड्यावर त्यांना उताणी पडायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा

वरा आला की टीव्ही वरील दूरदर्शनच्या कार्यक्रमांना फुल सटॉप द्यायचा
मग बाप माझा खांद्यावर घेऊन मला अँटिना हलवायला सांगायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा

मग कुठून तरी तो टिपटिप करून घरात गाळायचा
त्याखाली एखादं भांड ठेवून त्यातच त्याला साचवायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा

गटारातलं पाणी वाढवून तो मोरीत शिरायचा
आईची चीडचीड सुरू झाली की निमूटपणे मागे परतायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा

गांढूळ ही जमिनीतून घराच्या कोपऱ्यात शिरायचा
मग मीठ टाकून त्याच्या अंगावरील वेदना अनुभवायच्या
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा

साचलेल्या चिखलात तो पोरांना लोळवायचा
हातात शीग घेऊन मातीत खुपसून खेळायला लावायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा

उकिरड्याचा त्रास व्हायचा
पण तरीही पाऊस हवाहवासा वाटायचा
खरंच चाळीतला पाऊस बरा वाटायचा
कारण तेव्हा तो घरात ही यायचा

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

  Rain poem in marathi [बरसून घे ना पावसा आता]

नभात विजांचे खेळ सारे
झाले आता आमचे पाहून
हाल ते सारे शेतकर्‍याचे
कठोर ढगास झाले सांगून

सारे झाले व्याकूळ फार
बळीराजा अन् धरणीमाता
किती प्रार्थना करू तुझी रे
बरसून घे ना पावसा आता

पाहू नको रे ढगा आडून
पाहतो पावसा तुझी वाट
धाव घे, सारे डुलव शेत
लावू नकोस आमची वाट

तुझ्या येण्याची झाली रे वेळ
नकोच आता उशीर करू
हात जोडून करतो विनवणी
नुकसान कोठे नको रे करू

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

paus kavita in marathi [बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी]

आतुर झाला चातक , अन आतुरले मोर
आतुरले कान , तुझा ऐकण्या तो शोर
मातीही आतुरली , तुझ्या अशा छंदासाठी
तसे आतुरले जग , तिच्या दुर्मिळ गंधासाठी

जगी एक आस आता , बस तुझ्यावरी
बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी

भू माझी माय , तिची मशागत केली
जन्मासाठी माझ्या , तिला करशील का रे ओली
पीक येईल बहरून , सारं जग दुवा देईल
आलास असा धावून , तरच साथ तुझी होईल

जगाच्या त्या पोशिंद्याला , साथ दे तू खरी
बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी

झडली पालवी , नवलाई संगे ये
साथ घे वाऱ्याची , जरा घाईतच ये
सुकं माझं मन , ओलं करण्या तू ये
अंत नको पाहू , दुःख सरण्या तू ये

सरेल सारं दुःख , खरी आस माझ्या उरी
आतुर झाला चातक , अन आतुरले मोर
आतुरले कान , तुझा ऐकण्या तो शोर
मातीही आतुरली , तुझ्या अशा छंदासाठी
तसे आतुरले जग , तिच्या दुर्मिळ गंधासाठी

जगी एक आस आता , बस तुझ्यावरी
बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी

भू माझी माय , तिची मशागत केली
जन्मासाठी माझ्या , तिला करशील का रे ओली
पीक येईल बहरून , सारं जग दुवा देईल
आलास असा धावून , तरच साथ तुझी होईल

जगाच्या त्या पोशिंद्याला , साथ दे तू खरी
बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी

झडली पालवी , नवलाई संगे ये
साथ घे वाऱ्याची , जरा घाईतच ये
सुकं माझं मन , ओलं करण्या तू ये
अंत नको पाहू , दुःख सरण्या तू ये

सरेल सारं दुःख , खरी आस माझ्या उरी
आतुर झाला चातक , अन आतुरले मोर
आतुरले कान , तुझा ऐकण्या तो शोर
मातीही आतुरली , तुझ्या अशा छंदासाठी
तसे आतुरले जग , तिच्या दुर्मिळ गंधासाठी

जगी एक आस आता , बस तुझ्यावरी
बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी

भू माझी माय , तिची मशागत केली
जन्मासाठी माझ्या , तिला करशील का रे ओली
पीक येईल बहरून , सारं जग दुवा देईल
आलास असा धावून , तरच साथ तुझी होईल

जगाच्या त्या पोशिंद्याला , साथ दे तू खरी
बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी

झडली पालवी , नवलाई संगे ये
साथ घे वाऱ्याची , जरा घाईतच ये
सुकं माझं मन , ओलं करण्या तू ये
अंत नको पाहू , दुःख सरण्या तू ये

सरेल सारं दुःख , खरी आस माझ्या उरी
बरसू दे रे नभा , तुझ्या सरीवर सरी

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

Rain poem in marathi [सुरू झाल्या पाऊस धारा]

मन वेडे गुंतले पागोळ्यांत
सुरू झाल्या पाऊस धारा
निरोप घेत उकाड्याचा कसा
वाहतो आहे खुशीत वारा

उल्हास दाटला चोहिकडे
लागले सजू डोंगर रान
नदी वाहते जोमात आता
सारे विसरती जगण्याचं भान

पहात होती धरती वाट
कसा येऊन गेला बिलगून
पाऊस होता उनाड-लबाड
धरतीला पहा गेला सजवून

तपश्चर्या मोठी संपली आज
धरेने घेतले पावसाला बाहूत
नटून थटून सजली धरणी
ऊठून दिसते हिरव्या शालूत

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

 Rain poem in marathi [पाऊस आणि तुझी आठवण]

चिंब भिजुन पावसात
मन जाऊन बसतं ढगात
मोहरतात साऱ्या भावना
आठवणींच्या कृष्ण-धवल जगात

विजांसोबत सुरु होतो
मग ढगांचा लपंडाव
आठवणींनी पुन्हा गजबजतो
माझ्या मनातील उजाड गांव

कधी साकारते इंद्रधनु
उन्हासवे ओल्या पावसात
आठवणींना मग येतो बहर
रंगांनी सजल्या दिवसात

ओंजळीत गर्द अळवाच्या
चमकतात थेंब तेजाचे
आठवणींच्या धुंद धुक्याला
नवकोंदण तव प्रेमाचे

कधी संतत धार पावसाची
कधी साथ तिस वादळाची
कधी फुले बाग आठवांची
कधी वाहे सरिता आसवांची

सागराचा उग्र अवतार
सोबतीस पर्जन्य वारा
आठवांच्या रोखण्या ऊधाणा
तोकडा मनीचा किनारा

दररोज घडे श्रावणात
मेळ ऊन पावसाचा
सोबतीस माझ्या सदैव
हा खेळ संचिताचा

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

 paus kavita in marathi [पाऊस गातो गाणे]

टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा

कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

 marathi poems on nature [निसर्गासारखा नाही रे सोयरा ]निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप

त्याच्या संगतीत फिटतो संदेह
वितळतो क्षोभ माया मोह
त्याच्या संकीर्तनी मुरविता देह
भेटतो उजेड अंतर्बाह्य

त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

 Rain poem in marathi पाऊस कविता


एकदा पावसाने तुला विचारले.
साधारण कधी येऊ?
तर तू म्हणालीस,
-इच्छा नसताना.
पावसात तू जितकी चिंब भिजायचीस
तितकीच माझ्याकडे येताना कोरडी.
मग तूच मला गोष्ट सांगितलीस,
आपण दोघं ज्या कागदी नावेवर बसलो होतो
ती उलटल्याचई.
नंतर पावसाचे आणि तुझे वैर झाले.
तो वेगळ्याच टापूत बरसू लाघला
आणि तू वेगळ्या
मी मधल्यामध्ये कोरड्या नदीसारखा
आतून झिरपू लागलो.
नंतर नंतर
पाऊस आलच नाही
कधी तरी येईन एवढंच म्हणाला आणि
बी रुजल्यानंतरचं वाट पाहणं
आपण दोघाणि स्वीकारलं
समजूतदारपणे.

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

   marathi poems on nature [आनंदी आनंद गडे , इकडे तिकडे चोहिकडे]


वरती खाली मोद भरे , वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला
मोद विहरतो चोहिकडे

सूर्यकिरण सोनेरी हे , कौमुदि ही हसते आहे
खुलली संधया प्रेमाने , आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान सफुरले
इकडे, तिकडे, चोहिकडे

नीलनभी नक्षत्र कसे , डोकावुिन हे पाहतसे
कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ?
तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो
इकडे, तिकडे, चोहिकडे

वाहति निर्झर मंदगती , डोलित लतिका वृक्षतती
पकी मनोहर कूजित रे , कोणाला गातात बरे ?
कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहिकडे

स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात
त्यांना मोद कसा मिळतो , सोडुिन स्वार्था तो जातो
द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला
इकडे, तिकडे, चोहिकडे

🌄🌅☀️🌲☘️🌾🌻🌼🌹🌺🌴🌵🌅🌄

Marathi poems on nature तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही निसर्ग कविता or Nisarg Kavita in Marathi मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा