lahan mulanchya goshti लहान मुलांचे गोष्टी || marathi bodh katha
![]() |
Lahan mulanchya goshti |
नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता lahan mulanchya goshti व लहान मुलांचे गोष्टी marathi bodh katha चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. lahan mulanchya goshti व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे marathi bodh katha उपलब्ध करून दिले आहे.Top 5 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.
लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.
👨👩👧👦👩👩👧👦👨👩👧👧👩👩👦👦👨👨👦👨👩👧👦👨👧👦👨👨👦👨👨👧👧👬👨👩👧👧👩👩👦👦
Marathi goshti || Chan Chan goshti
MARATHI STORY 1
निळा राजा :- lahan mulanchya goshti [ छान छान गोष्टी ]
एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो लांडगा स्वत: चा जीव वाचवण्यासाठी जंगलातून बाहेर जोरात पळत होता. भटकी कुत्री त्याचा पाठलाग करीत होती. जीवाच्या आकांताने धावणारा लांडगा गावाच्या एका टोकाला राहणाऱ्या घरात जाऊन पोहचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या परटाचे होते.
त्या परटाने कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या भांड्यात भरपूर नीळ आणि पाणी एकत्र करून ठेवले होते.
लांडगा परीटाच्या घरात पोहचला आणि त्याने सरळ खिडकीतून घरात उडी मारली. लांडग्याची उडी नेमकी निळीच्या भांड्यात पडली. लांडगा त्या भांड्यात लपून बसला. पाठलाग करणारी कुत्री घराबाहेर घुटमळली आणि थोड्या वेळाने निघून गेली.
सकाळ होताच लांडगा घरा बाहेर पडला आणि जंगलात पळून आला. आपला रंग निळा झाला आहे हे त्याला माहितच नव्हते. लांडगा जंगलात पोहताच त्याला बघून अनेक प्राणी पळून गेले. निळ्या रंगाचा प्राणी ते प्रथमच बघत होते. लांडग्याला काहीच समजत नव्हते कि हे सगळे प्राणी आपल्याला का घाबरत आहेत ?
नदीजवळ जाताच लांडग्याने स्वत:चे प्रतिबिंब पाण्यात बघितले त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वत:चे निळे प्रतिबिंब बघून त्याला समजले कि जंगलातील प्राणी आपणास का घाबरत आहेत ते..!
सर्व घाबरलेल्या प्राण्याचा लांडगा राजा झाला आता त्याचे दिवस मजेत चालले होते. एके रात्री जंगलातले काही लांडगे एकत्र आले आणि जोरजोरात आरोळ्या ठोकू लागले. 'निळा लांडगा' स्वत:चे राजेपण विसरून ओरडू लागला. निळ्या लांडग्याचा आवाज ऐकताच जंगलातील सर्व प्राण्यांना त्याचे खरे रूप कळले. आपण मूर्ख बनलो हे प्राण्यांना कळले सर्व प्राणी एकत्र आले आणि त्यांनी त्या लांडग्याला जंगलाबाहेर हुसकून लावले.
तात्पर्य - असत्य जास्त काळ टिकत नाही
👨👩👧👦👩👩👧👦👨👩👧👧👩👩👦👦👨👨👦👨👩👧👦👨👧👦👨👨👦👨👨👧👧👬👨👩👧👧👩👩👦👦
stories for kids in marathi & marathi stories with moral values
MARATHI STORY 2
लोभी बगळा आणि हुशार खेकडा:-【 lahan mulanchya goshti 】
एका जंगलात एक तळे होते. त्यात एक म्हातारा बगळा रहात होता. म्हातारपणामुळे तळ्यातील मासे पकडण्याची शक्ती सुद्धा नव्हती.
एके दिवशी भुकेने व्याकूळ झाल्याने तो बगळा त्या तळ्याकाठी रडत बसला होता. त्याचे रडणे ऐकून जवळच राहणारा खेकडा त्या बगळ्याची विचारपूस करण्यास आला, ''बगळेकाका, आज आपण इथं रडत बसलात तेव्हा आपल्या जेवणाची काही सोय नाही का?''
बगळ्याने सांगितले, ''बाळ, तुला काय सांगणार! मी आजपासून हिंसा करायची नाही असं ठरवलंय. उपासमारीने जीव गेला तरी चालेल... पण मी निश्चय सोडणार नाही. माझ्या अंगी आता एकदम वैराग्य आलंय! माझ्या आसपास इतके मासे हिंडताहेत पण मी ढुंकूनसुद्धा बघत नाही!''
खेकडा विचारतो, ''पण काका, हे वैराग्य अचानक कसं आलं? त्यामागे काही कारण घडलं कां?''
त्याबरोबर बगळा धूर्तपणे उत्तर देतो, ''बाळा! या तळ्यातच माझ्या जन्मापासून आजपर्यंत मी आयुष्य काढले. एका ज्योतिषाने मला भविष्य सांगतिल्याने मी दु:खी आहे!''खेकडा विचारतो, ''कसलं भविष्य?''
''अरे, आता बारा वर्षे पाऊस न पडून या तळ्यातले पाणी पूर्ण आटून जाणार. हे भविष्य ऐकल्यावर मी अतिशय दु:खी झालो आहे. '' बगळा डोळे पुसत बोलत होता, ''आता या तळ्यातले पाणी हळूहळू आटते आहे. ज्यांच्याबरोबर आज इतकी वर्षे आंनदात काढली ते आता नाश पावणार. छे! ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही!'' खेकडा घाबरून विचारतो, ''बगळेकाका, यावर उपाय नाही का?''
बगळा विचार करून सांगतो, ''आहे! एक उपाय निश्चित आहे! येथून जवळच एक मोठे तळे आहे. बाराच वर्षे नाही तर चोवीस वर्षे जरी पाऊस नाही पडला तरी पाणी आटणार नाही. माझ्या पाठीवर बसून येण्यास जे तयार होतील त्यानाच त्या तळ्यात जाता येईल.''
त्या खेकड्याने पाण्यातील सर्व प्राण्यांना ही गोष्ट सांगितली त्याबरोबर सर्व प्राणी ''मला आधी घेऊन जा, मला मला आधी घेऊन जा'' चा घोष करीत बगळ्याकडे येतात.
प्रत्येक प्राण्याला आपल्या पाठीवरून नेऊन बगळा तळ्याजवळच काही अंतरावरील दगडाच्या शिळेवर त्या प्राण्याला आपटून मारी. त्याला खाऊन टाकल्यावर पुन्हा दुसरा मग तिसरा... असा त्या प्राण्यांना खायचा क्रम बगळ्याने लावला.
खेकड्याला आता बगळ्याबद्दल संशय होता. म्हणून तो बगळ्याला विचारतो, ''बगळेकाका, खरं म्हणजे तुमची आणि माझी भेट पहिल्यांदा झाली. पण मला अजून तुम्ही त्या सरोवरात घेऊन गेलेच नाही.''
बगळाही धूर्तपणे विचार करतो, ''रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय. रुचिपलट म्हणून आज खेकड्याला खाऊ.'' बगळा खेकड्याला सांगतो, ''चल तर...बस पाठीवर!''
बगळा त्या नेहमीच्या शिळेजवळ खेकड्याला आणतो. खेकड्याला आजूबाजूला हाडे, काटे आणि मांस पडलेले दिसते. खेकडा बगळ्याला म्हणतो, ''काका...तुम्हीही थकला असाल. इथं विश्रांती घेऊ आणि मग त्या तळ्याकडे जाऊ.''
बगळा आपल्या पाठीवर बसलेला खेडका आपल्या तावडीत अडकलेला बघून खेकड्याला सांगतो, ''अरे मूर्खा...तळे बिळे काही नाही!'' आता तुला विश्रांती देतो माझ्या पोटात. तिकडे तुझे सर्व मित्र भेटतील.
चल घे देवाचं नाव!'' बगळ्याचा दुष्टपणा लक्षात आल्यावर खेकडा आपल्या दोन्ही नांग्यांनी बगळ्याची गोष्ट संपवतो आणि तळ्यावर जाऊन सर्व घडलेली हकीकत सांगतो आणि म्हणतो, ''जे या तळ्यात राहिलेत त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून आपण सर्व वाचलोत ! नशीब तुमचं...मी मध्येच मला न्यायला बगळ्याला सांगितलं! आता मी त्याला ठार मारल्याने आपण सुखाने राहू.''
तात्पर्य : लोभाच्या अतिरेकामुळे प्राण हि गमवावा लागतो.
👨👩👧👦👩👩👧👦👨👩👧👧👩👩👦👦👨👨👦👨👩👧👦👨👧👦👨👨👦👨👨👧👧👬👨👩👧👧👩👩👦👦
lahan mulanchya goshti लहान मुलांचे गोष्टी || stories for kids in marathi
Marathi story: 3
सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव :- Chan Chan goshti Marathi
एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.
एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .
सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.
थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,"जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते". गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.
तात्पर्य - आति शहाणा त्याचा बैल रिकामा
👨👩👧👦👩👩👧👦👨👩👧👧👩👩👦👦👨👨👦👨👩👧👦👨👧👦👨👨👦👨👨👧👧👬👨👩👧👧👩👩👦👦
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story: 4
दवबिंदू आणि गाढव:- Chan Chan goshti
एका जंगलात खूप प्राणी राहत होते. त्या जंगलात गाढव पण राहत होते. एके दिवशी ते गाढव त्याच्याच नादात चालत होते आणि ते खूप उदास होते. सगळे प्राणी त्याच्या आवाजाची थट्टा करत होते. त्याला वाटत होते की, आपला आवाज मधुर व्हावा. तेवढ्यात रस्त्याने चालता चालता त्याच्या कानावर एक मधुर स्वर आला.
तो त्या गोड आवाजाच्या दिशेने पाठलाग करत करत एका नाकातोड्याजवळ पोहचला. नाकतोडा एका पानावर बसून गाणं गुणगुणत होता. तो आवाज ऐकून गाढवाला काही शांत बसवेना. गाढवाने त्याला विचारले, तू काय खातोस ? काय पितोस ? तुझा आवाज इतका गोड कसा? याचे रहस्य मला सांग .
नाकतोडा खूप खोडकर होता. तो गाढवाला चेष्टेत म्हणाला,"मी तर दवबिंदू पितो म्हणून माझा आवाज इतका मंजुळ आहे.जर तुला असा मंजुळ आवाज हवा असेल तर तुला पण हेच करावे लागेल ."
गाढवाला तर मधुर आवाज पाहिजे होता, त्याने नाकतोड्याचे बोलणे खूप गंभीरतेने घेतले. गाढवाने ठरवले की,आता दवबिंदूच प्यायचे. बाकी काहीच खायचे नाही.
हळूहळू गाढव खूप अशक्त होऊ लागले आणि शेवटी ते मरण पावले. म्हणूनच आपल्याला गाढवासारखे मूर्ख बनायचे नाही. कोणाचाही सल्ला विचार न करता अमलात आणू नये.
असे केल्यामुळे नुकसान आपलेच होते. म्हणूनच नेहमी स्वत : विचार करायला हवा.
तात्पर्य - ऐकावे जनाचे करावे मनाचे
👨👩👧👦👩👩👧👦👨👩👧👧👩👩👦👦👨👨👦👨👩👧👦👨👧👦👨👨👦👨👨👧👧👬👨👩👧👧👩👩👦👦
lahan mulanchya goshti || stories for kids in marathi
Marathi story: 5
सोनेरी शिंगाचे हरिण :- Kids story in Marathi
एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.
एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.
शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.
हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले
तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत .
👨👩👧👦👩👩👧👦👨👩👧👧👩👩👦👦👨👨👦👨👩👧👦👨👧👦👨👨👦👨👨👧👧👬👨👩👧👧👩👩👦👦
मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी lahan mulanchya goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
marathi bodh katha कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा