Marathi bodh katha लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Marathi bodh katha लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Stories for kids in marathi
Marathi Bodh katha

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Marathi bodh kathaलहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Marathi bodh katha व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 Stories for kids in marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

Marathi bodh katha छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि लहान मुलांचे गोष्टी मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


कष्‍टाची कमाई श्रेष्‍ठ:-[ छान छान गोष्टी ]Marathi bodh katha


एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्‍येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्‍से करून वाटत असत. एक हिस्‍सा स्‍वत:साठी व दुसरा हिस्‍सा ईश्‍वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्‍यांना चोरी करण्‍याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्‍या ओट्यावर बसले. तेथे त्‍यांना एक संत भेटले. संताने त्‍यांना परिचय विचारला तर त्‍यांनी स्‍वत:बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्‍हणाला, तुम्‍ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्‍ही विचार केला आहे? चोर म्‍हणाले,'' आम्‍ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्‍ही जे धन किंवा वस्‍तू प्राप्‍त करतो ते आम्‍ही दोन भागांमध्‍ये वाटतो.
       एक भाग आम्‍ही स्‍वत:कडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्‍वराला चरणी अर्पण करतो. तेव्‍हा त्‍या संताने आपल्‍या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्‍यांना देत म्‍हणाला,'' आज तुम्‍ही चोरी करू श्‍कला नाहीत त्‍यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्‍से करा एक स्‍वत:साठी ठेवा आणि दुसरा ईश्‍वरचरणी ठेवा.'' दोघेही चोर आश्‍चर्यचकित झाले संतांच्‍या बोलण्‍याचा आशय समजून म्‍हणाले,''महाराज इथून पुढे आम्‍ही चोरी न करता कष्‍टाची कमाई करून खाऊ आणि त्‍यातील एक हिस्‍सा ईश्‍वरचरणी ठेवू.'' दोघेही संताला नमस्‍कार करून निघून गेले.


तात्‍पर्य :- पापाची कमाई असंतोष आणि दु:खाचे कारण बनते तर कष्‍टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्‍म्‍याला सुख देते.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi & marathi stories with moral values
         
              MARATHI STORY 2


अपमान आणि उपकार:- Marathi bodh katha लहान मुलांचे गोष्टी


एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात. पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो,"आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि,"पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?" लिहिणारा मित्र म्हणाला," जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत.


तात्पर्य :-"माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 3


कष्टाचे फळ:- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ] marathi stories for childrens


एका गावात एक म्हातारा शेतकरी रहात होता. त्याला पाच मुले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना कष्ट करणे माहितच नव्हते ते फक्त वडिलांच्या पैशांवर मजा करायचे.
त्यांच्या मनात नेहमी विचार यायचा की आपण गेल्यानंतर आपल्या आळशी मुलांचे कसे होणार, व त्यांचा संसार कसा चालणार? यावर त्या शेतकऱ्याला एक कल्पना सुचते व ते एके दिवशी आपल्या पाचही मुलांना जवळ बोलवितात व त्यांना सांगतात की आपल्या पूर्वजांनी शेतामधील एक सोन्याच्या नाण्यांनी भरलेला एक हंडा पुरलेला आहे. मी गावाला गेल्यावर तुम्ही शेत खणा व धन काढून ते आपापसात वाटून घ्या.

दुसऱ्या दिवशी तो शेतकरी गावाला गेल्यानंतर त्या पाचही जणांनी सोन्याचा हंडा मिळविण्यासाठी सर्व शेत खणून काढले पण त्यांना सोन्याचा हंडा सापडला नाही. मग त्यांनी विचार केला की एवढे शेत खणले आहे तर यात धान्य पेरावे म्हणून त्यांनी तेथे धान्य पेरले. त्यावेळेस पाऊसही चांगला पडला व त्यांनी पेरलेल्या धान्यामुळे त्यांना भरघोस उत्पन्न मिळाले. त्यांनी ते बाजारात जावून विकले व त्यांना भरपूर धन मिळाले. गावाहून वडील आल्यानंतर त्या पाचही मुलांनी झालेला प्रकार वडीलांना सांगितला. तेव्हा ते बोलले, ‘मी तुम्हाला याच धनाबद्दल सांगत होतो जर तुम्ही अशीच मेहनत केली तर तुम्हाला दरवर्षी असेच धन मिळत राहील.’


तात्पर्य - कष्टाचे फळ हे नेहमी गोड असते.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4


दोघां भावातील खटला:- Chan Chan goshti || Marathi bodh kathaएकदा एक गावात, दोघां भावात जमिनीवरून तंटा झाला व मामला कोर्टात पोहोचला.
त्यात एक भाऊ लखपती होता तर दुसरा गरीब होता. त्या दोघांना प्रत्येकी दहा लाख रूपये वाटणीमध्ये आले होते.
न्यायाधीशांनी एका भावाला विचारले तुझ्या भावाने सात वर्षात दहा लाख रूपये कसे काय खर्च केले.
श्रीमंत भाऊ म्हणाला, माझा भाऊ प्रत्येक काम नोकराकडून करवून घेत असे. कोणतेही काम त्याने केले नाही. नोकरही मनमानी करू लागले. एक रूपया खर्च येत असेल तर शंभर रूपये आल्याचे दाखवत असत. तो अन्नाला महाग झाला.
न्यायाधीशांनी विचारले, तुझी श्रीमंती कशी काय टिकून राहिली.
तो म्हणाला, माझ्या वाडवडिलांनी देणगी दिली म्हणजे मी परिश्रम करूच नये की काय, संपत्ती मिळाल्यावरही मी परिश्रम करण्याचे सोडले नाही. मी नोकरांवर कधीच अवलंबून राहिलो नाही. प्रत्येक कामात माझा सहभाग असल्याने नोकरांची बोलण्याची हिंमत होत नव्हती.
आता जेव्हा याच्याकडे फुटकी कवडीही उरली नाही म्हणून याने माझ्यावर दावा ठोकला आहे. याला परिश्रम करायला नको आहेत याने स्वत:ची संपत्ती तर आळसाने घालविली आता माझ्या संपत्तीवर याचा डोळा आहे. यावर न्यायाधीश महोदयांनी इतर साक्षीपुरावे तपासले व श्रीमंत भाऊच खरे असल्याचा निर्वाळा दिला.


तात्पर्य : मिळालेले धन हे टिकवून ठेवले पाहिजे आहे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || Marathi bodh katha

              Marathi story 5


सोन्याची अंडे देणारी कोंबडी:- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]


एका गावात एक खूप गरीब शेतकरी रहात असतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो एक कोंबडी विकत घेतो. जेणेकरून कोंबडी पासून मिळणारे अंडे विकून तो त्यापासून पैसे मिळवू शकतो.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आणलेल्या कोंबडीने एक सोन्याचे अंडे दिले होते. ते सोन्याचे अंडे बघून शेतकरी आश्चर्यचकित झाला व त्याला खूप आनंद झाला. त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले त्या बदल्यात त्याला खूप पैसे मिळाले. दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याने परत ते अंडे बाजारात विकले. अशा प्रकारे ती कोंबडी रोजच एक सोन्याचे अंडे देऊ लागली व तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणाऱ्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली व तो चांगले व आनंदी जीवन जगू लागला.

एकदा त्याच्या मनात विचार येतो की, ‘कोंबडी जर रोज एक सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील’ व आपण जर कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर आपण खूप श्रीमंत होऊ. या हव्यासापायी तो त्या कोंबडीला मारतो. पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही. तो खूप उदास होतो कारण कोंबडी मेल्यामुळे त्याला रोज मिळणारे सोन्याचे अंडे मिळणेही बंद झाले.


तात्पर्य - जेवढे आपल्याला मिळते त्यातच समाधान मानावे, कोणत्याही गोष्टींची जास्त हाव करू नये.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Marathi bodh katha आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular marathi bodh katha कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Stories for kids in marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:

Post a comment