Marathi kavita on life आयुष्यावर आधारित मराठी कविता | marathi poems on life

Marathi kavita on life आयुष्यावर आधारित मराठी कविता | marathi poems on life

Marathi poems on love
Marathi Kavita on life

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Marathi kavita on life तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच. आयुष्यावर आधारित मराठी कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून marathi poems on life माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Marathi kavita on life उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया marathi poems on life मराठी कविता कडे.

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

Marathi kavita on life [निघून जाते आयुष्य]


निघून जाते आयुष्य
खिसे आपुले भरताना
वेळ जाते निघून
दिवस रात्र धावताना
हरवून गेले आहे सारे
सुख विकत घेताना
क्षणभर हसणे सुद्धा
महाग झाले लोकांना
विसरलीत नातीगोती
सारे जवळ असताना
धावपळीचे आयुष्य
निमूटपणे जगताना
आयुष्य आहे सुरेख
कुणीच पाहत नाही
नुसती दगदग सुरु
वेळ कुणाजवळच नाही
बसून मित्रांसोबत
आज कुणी बोलत नाही
सुखामागे धावताना
माणूस आज हरवला आहे
हातच सुख सोडून
दुःखामागे लागला आहे
आयुष्य काय आहे
आज कुणाला कळले नाही
जगण्याचे गुपित कोडे
कुणालाच उमजले नाही

- गणेश म. तायडे, खामगांव

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

 marathi poems on life  [ बळीराजा ]


बळीराजा गेलाय संपावर
या संपाच्या नादात
वेळ आणली त्यानं पहा
उपासमारीची समाजावर

संप संप करून काय भेटलं
शेवटी शासनानं गाजरच दिलंय
या राजकारणी लोकांच्या नादी लागून
बळीराजानं स्वतःचं हाल करून घेतलंय

बडा राजकारणी आज
शेतीवर कर्ज घेऊन मजेत राहतोय
घेणं देण नाही त्यांना बळीराजाच
त्यांच्या चुकीचे बळीराजा फळ भोगतोय

त्यांना फक्त आपल्या
स्वतः च्या कर्ज माफीचं पडलंय
बळीराजा पुरता बुडलाय आज
संपाच्या नादात त्यानं हे कुठं पाहिलंय

बळीराजा अजून पण विचार कर रे
बड्या राजकीय नेत्यांनी
तुला पूर्ण जनते पासून तोडलंय
का स्वतःच पायावर धोंडा पडतोय रे
राजकीय नेत्यांना दे लाथळून स्वतःच हो तू जनतेच्या मनातला राजा
हो तू आता खरा खुरा बळीराजा


कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील


🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

 marathi poems on life [जीव नको देऊस मित्रा]



खोट्या प्रेमासाठी जीव
नको देऊस मित्रा
आई बापाचा जीव आहे
तुझ्यावर त्यांचा तरी
विचार कर लेकरा

जीवन दिलंय देवानं तुला
जगण्यासाठी एव्हड्या
लवकर जीवनाला नको
होऊस तू भित्रा
तळ हाताच्या फोडा प्रमाण
जपलंय त्यांनी तुला लेकरा

प्रेमाचं काय आज आहे उद्या नाही
पैश्याची जो पर्यंत नांदी आहे
तो पर्यंत तुझ्या सोबत तिची चांदी आहे

खोट्या प्रेमासाठी जीव
नको देऊस मित्रा
बहीण आहे तुला जरा
तिचा तरी विचार कर लेकरा
तू गेलास तर तिला
आधार कोण देईल मित्रा

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

   marathi poems on life [ ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..]


आयुष्य जगताना दुसऱ्याचा पण विचार करणारी..
मित्र आणि नातेवाईकांत रमणारी..
सण वार एकत्र साजरी करणारी..
सुखात दुःखात वाटेकरी होणारी..

कितीही होवो त्रास.. न थकता काम करणारी..
देशात काय चाललय.. यापेक्षा शेजारी सांभाळणारी..
नाटक सिनेमा मध्ये रमणारी..
ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..

राब राब राबणारी..
पण भविष्याची तयारी करून ठेवणारी..
स्वतः बरोबर दुसऱ्यांचा सुद्धा विचार करणारी..
ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..

चांगल्याला चांगलं म्हणणारी..
काही अभद्र घडलं तर हळहळणारी..
मनातील भावना निखळपणे व्यक्त करणारी..
ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..

रांगेत थांबणारी..
महागाई वाढली तरी.. तक्रार न करणारी..
सरळ मार्गी चालणारी..
वाकड्यात न शिरणारी..
झालेच चुकीचे तर माफी मागून वेळ मारून नेणारी..

ती तुमच्या आमच्या सारखी साधी माणसं असतात..
देश चालवणारी….

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

   Marathi kavita on life मी म्हणालो मनाला


मी म्हणालो मनाला
थोडा विचार कर ना रे ?
बद्लतय जग सारे
थोडा तू बदल ना रे ?
विसर जुन्या रुढी परंपरा
मनाची कवाडे थोडी उघड ना रे
आपलीच आहेत ती लेकर
बरोबर त्यांच्या चाल ना रे
मी म्हणालो मनाला
आजूबाजू ला जरा बघ ना रे
संपलय आपले कर्तुत्व
नव्या पीढित रम ना रे
प्रत्येक पीढीच विद्रोही आसते
स्वताची तरुनाई आठव ना रे
विश्व चक्र हे आसेच चालणार
नवी पीढी जुन्याशी भांडनार
बदल स्रुस्तिचा अटळ नियम
एवध तरी समज ना रे
मी म्हणालो मनाला
थोडा विचार कर ना रे ?

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

  Marathi kavita on life [ मला सुद्धा जगायचंय ]


पेटलेल्या दिव्यामधील
    मिणमिणती वात म्हण
    तुझ्या उमेदीला दिलेली
    नशिबाने मात म्हण
    पण तुझ्या वंशवेलीवर मला फुल बनुन उगायचंय
    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

    तुच दिली आस मला
    तुच दिला प्राण हा
    तुच माझी माता व्हावी
    मिळावा सन्मान हा
    हक्क आहे तो माझा मला ही जग बघायचंय
    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

    माझा गुन्हा, माझा दोष
    मला काहीच कळत नाही
    का करते तु माझ्यावर रोष
    मला काहीच कळंत नाही
    तु ही कधी मुलगी होती हे मी का तुला सांगायचंय
    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

    नको समजुस मी तुला
    जिंदगीभरचा भार होईल
    दुर्गा होईल, शक्ती होईल
    मी तुझा आधार होईल
    समजावुन सांग तु तुझ्या मनाला असं नाही वागायचंय
    आई! मला मारु नकोस मला सुद्धा जगायचंय

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

 Marathi kavita on life [ आयुष्याचा भागीदार ]


तिच्या दिशेने पावलं
    आपोआप माझी वळतात
    मलाही उमजेना अशा
    वाटेला भावना कळतात

    भव्यतेची ओढ मला
    स्वप्नं माझी साहसी
    झोका घेता आकाशी भिडे
    ती ही आहे धाडसी

    पुस्तकांचे ओझे माझे
    ती लिलया पेलेल का?
    झेप घेऊनी धडपडलो
    तर ती मला झेलेल का?

    नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
    तीक्ष्ण विचारांचे बाण
    सोसेल का तिच्या बुद्धीला
    माझ्या धनुष्याचा ताण

    खळाळते हास्य तिचे
    नम्रतेचा शृंगार
    तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
    मला आयुष्याचा भागीदार

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

 Marathi kavita on life [ जगण्यासाठी अजुन काय हवं?]


आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती
ठायी असेल युक्ती तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?


थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडाबडेजाव,
सगळयांच्या तोडी आपलंच नाव,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,
दोन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ
जीवनात असली जर एक तळमळ
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,
एक मागणं, अक अभिलाषा,
मनात भरलेली सदा नशा,
जगण्यासाठी अजुन काय हवं?


🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

marathi poems on life [बलिदान त्या महान हुतात्म्यांच]


चला झाले , संपले , श्रद्धांजलि वाहिली .
मुंबई पुन्हा एकदा कामा मध्ये जुंपली.
दोन चार दिवसात हे सार बदलून जाईल
राजकरन याचे फक्त वाढत राहिल
आज शिवराज गेले , उदया आबा जातील
फक्त मतांचा आणि मतांचा फायदा पक्ष पाहतील
सरकार "यो करेंगे , त्यों करेंगे " गात राहिल
विरोधी पक्ष नाही, नाही करत साथ जाईल.
गुप्तचर यंत्रनेत भ्रास्ताचाराची किड भर भरून वहिल
पकडले तर जुन्याचा शिवराज, नव्याच स्माईल
ठोस काही उत्तर यांना मिळनारच नाही .
पाक व्याप्त कश्मीर वर हल्ला केल्यास
मतांच गणित जुळनार नाही
त्या पेक्ष्या घोंघडे भिजत ठेवणे हे जास्त चांगल
सलमान , संजू प्रकरणी कसे लोकानाच टांगल
आजचे शहीद , उदया आठवणार ही नाहीत
पुढचा हमला होस तोवर या हल्ल्याचा निकाल,
तपास चालु , पाकिस्तान कडून चाल ढकल ?
तेव्हा पुन्हा चैनल वाले ही जुनी मढ़ी काढतील
सत्य कमी यांचीच मिर्ची जास्त भरतील .
बलिदान त्या महान हुताम्यांच
इतके मात्र करुन राहिल .
सामान्य मानसाच्या दुवेने
स्वर्ग ही त्याना मिळून जाईल

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

marathi poems on life [ माझे जगणे होते गाणे ]


माझे जगणे होते गाणे
सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे

🚵🏋️👨‍🦯👨‍🦼🤾🤺🏇🧞🦸🪂🤴👨‍🏫👨‍❤️‍👨🤱

Marathi kavita on life तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही आयुष्यावर आधारित मराठी कविता or marathi poems on life मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा