Paus kavita in marathi पाऊस कविता मराठी | rain poem in marathi

Paus kavita in marathi पाऊस कविता मराठी | rain poem in marathi

Paus poem in marathi
Pous kavita in marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Paus kavita in marathi तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.पाऊस कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून rain poem in marathi माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Paus kavita in marathi उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया rain poem in marathi मराठी कविता कडे.

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


 Paus kavita [ पावसाच्या धारा येती झरझरा ]


पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागोजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ
झळके सतेज, ढगांवर वीज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे, काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें
हर्षलासे फार, नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
झाडांचिया तळी, डोईवरी मारा
रानातील गुरे शोधिती निवारा
नदीलाही पूर, लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी, चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी
थांबला ओझर, उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें पक्षीजात खुले
धरणी हासली, सुस्नात जाहली
वरुणाच्या वर्षावाने मनी संतोषली

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


Paus kavita in marathi [ आला पह्यला पाऊस ]


आला पह्यला पाऊस
शिपडली भुई सारी
धरत्रीचा परमय
माझं मन गेलं भरी
आला पाऊस पाऊस
आतां सरीवर सरी
शेतं शिवारं भिजले
नदी नाले गेले भरी
आला पाऊस पाऊस
आतां धूमधडाख्यानं
घरं लागले गयाले
खारी गेली वाहीसन
आला पाऊस पाऊस
आला लल्‌करी ठोकत
पोरं निंघाले भिजत
दारीं चिल्लाया मारत
आला पाऊस पाऊस
गडगडाट करत
धडधड करे छाती
पोरं दडाले घरांत
आतां उगूं दे रे शेतं
आला पाऊस पाऊस
वर्‍हे येऊं दे रे रोपं
आतां फिटली हाऊस
येतां पाऊस पाऊस
पावसाची लागे झडी
आतां खा रे वडे भजे
घरांमधी बसा दडी
देवा, पाऊस पाऊस
तुझ्या डोयांतले आंस
दैवा, तुझा रे हारास
जीवा, तुझी रे मिरास

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


 पाऊस मराठी कविता [ पाऊस आणि तुझी आठवण ]


चिंब भिजुन पावसात
मन जाऊन बसतं ढगात
मोहरतात साऱ्या भावना
आठवणींच्या कृष्ण-धवल जगात

विजांसोबत सुरु होतो
मग ढगांचा लपंडाव
आठवणींनी पुन्हा गजबजतो
माझ्या मनातील उजाड गांव

कधी साकारते इंद्रधनु
उन्हासवे ओल्या पावसात
आठवणींना मग येतो बहर
रंगांनी सजल्या दिवसात

ओंजळीत गर्द अळवाच्या
चमकतात थेंब तेजाचे
आठवणींच्या धुंद धुक्याला
नवकोंदण तव प्रेमाचे

कधी संतत धार पावसाची
कधी साथ तिस वादळाची
कधी फुले बाग आठवांची
कधी वाहे सरिता आसवांची

सागराचा उग्र अवतार
सोबतीस पर्जन्य वारा
आठवांच्या रोखण्या ऊधाणा
तोकडा मनीचा किनारा

दररोज घडे श्रावणात
मेळ ऊन पावसाचा
सोबतीस माझ्या सदैव
हा खेळ संचिताचा

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


   rain poem in marathi [पाऊस गातो गाणे]


टिप टिप पाऊस
झो झो वारा
गीत गाऊ पाहतो
आसमंत सारा

कडाडणारी वीज
गडगडणारे ढग
धावण्यार्‍या छत्रीतली
आपली लगबग

डराव्‌ डराव्‌ बेडकं
छम छम तळे
लेझीम हाती घेऊनी जणू
थेंब लाटेवर पळे

खळ खळ झरा
तड तड पत्रा
पावसाने भरवली बघा
ताला सुरांची जत्रा

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


 rain poem in marathi [ दिवसभर पावसात असून ]


दिवसभर पावसात असून, सांग ना आई

झाडाला खोकला कसा होत नाही ?

दिवसभर पावसात खेळून, सांग ना आई

वारा कसा जराही दमत नाही ?

रात्रभर पाढे म्हणून, सांग ना आई

बेडकाचा आवाज कसा बसत नाही ?

रात्रभर जागून सुद्धा, सांग ना आई

चांदोबा झोपी कसा जात नाही ?

दिवसभर काम करून, सांग ना आई

तुला मुळी थकवा कसा येत नाही ?

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️

   पाऊस कविता [आता घे दुवा...]

का रं पावसा असा
कहर अवेळी मांडला?
शेतकरी राजा माजा
पार ओरबाडूनी गेला !

ग्याल सारं पिकपाणी
स्वप्न पण विखुरली,
घामाची, कष्टाची त्याज्या
झोळी पण रीती झाली !

नको रं असा कोसळु
ठेव जाणिव लेकरांची,
ऐकलसा खुप शिव्याशाप
आता घे दुवा तरी त्यांची !

झाल गेलं तो विसरतो
जुपल पुन्हा तो कामाला,
दिवु नकोस रं तू दगा
अजाबात पुढल्या वक्ताला !

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


   paus kavita in marathi  [पडणार कधी पाऊस धरतीवर]


नजर एकटक ती आकाशावर
पडणार कधी पाऊस धरतीवर
शेत तहानले ते त्रासले जनावर
अधीर मन जाईल का फासावर

अवकाळी नुकसान दरवेळी घात
सावरतील कां दिवस अंधारी रात
गरीबाच्या दारी पडेल का प्रकाश
हाती संजीवनी कि वाढेल जकात

दलालखोरी आता जीव काढू लागली
सरकारी परवाने त्यांना भेटू लागली
करेल का कुणी तरी आमचा विचार
कि यंदाही आम्ही फासावरच जाणार

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


    paus kavita in marathi  [पाऊस म्हणजे?]


पाऊस म्हणजे
उल्हास मनी दाटलेला,
निसर्गाच्या सानिध्यात
मन वेडा फुललेला।

पाऊस म्हणजे
चौफेरे दाटलेली हिरवळ,
क्षणात दूर करते
मनात आलेली मरगळ।

पाऊस म्हणजे
उत्साह शरीरात दाटलेला,
रखडलेली कामे करण्यास
बोनस वेळ मिळालेला।

पाऊस म्हणजे
उगाच सुट्टी मिळालेली,
विसरून चिंता कामाची
कुटूंबासोबत घालवलेली।

पाऊस म्हणजे
चिखलाचाच राडा सारा,
उग्रट दर्प हवेत अन्
वाटेभर कचरा पसारा ।

पाऊस म्हणजे
नदिला आलेला पूर,
घरात साचलेलं पाणी अन्
मुलांच्या रक्षणाची हुरहुर।

पाऊस म्हणजे
फक्त पाऊसच आहे,
जितके लिहावं त्यावर
तितके कमीच आहे।

पाऊस म्हणजे
शब्दांची सरच बरसते,
खोलवर मनात रूतलेली
सहजच कविता खुलते।

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


 rain poem in marathi  [वादळवारा]


वादळवारा ..वादळवारा ..
क्षणात येई क्षणात जाई
हलवितो निसर्ग सारा
वादळवारा ..वादळवारा ..!

कुण्या पक्षाचे घरटे उडाले
कुण्या झाडाचे अर्क गळाले
क्षणात आले कड़ी कपारी
चिले पीले हे सारे पळाले
गर्जतो मेघ ओढितो रेघ
पड़ती पाऊस धारा
वादळवारा ..वादळवारा ..!

वादळ उठले घरटे तुटले
पिल्यांना अजून, ना पंख फुटले
धडपड करती जमिनीवरी
वादळ ना ते शांत बसले
कसे आवरु कसे सावरू
क्षणात पडती गारा
वादळवारा ..वादळवारा ..!

असा कसा रे तु दुश्मनं
निसर्गाशी केले श्मशानं
तडफती प्राणी तुझ्या माराने
कुठे गेला रे तु दयावानं
झाले नायनाट दिसे मरणवाट
ना राहिला आम्हा थारा
वादळवारा ..वादळवारा ...!

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️


 rain poem in marathi [ पाऊस आलाय?.भिजून घ्या ]


पाऊस आलाय?.भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस?..भिजून घ्या

🌦️🌩️🌧️🌦️🌨️⛈️☔🌧️☔🌦️🌨️⛈️🌧️🌦️
Watch online rain poem in marathi

                          Video No.1

                    Video No.2


Paus kavita in marathi तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही पाऊस कविता or rain poem in marathi मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील सुपरहिट लोकगित


1 टिप्पणी:

  1. Jackpot City casino site【WG98.VIP】
    Jackpot luckyclub City casino site. The best online casino that's powered by Microgaming. Welcome to Jackpot City Casino and thousands of other games from Microgaming. Rating: 9.5/10 · ‎Review by LuckyClub

    उत्तर द्याहटवा