Gavakadchya goshti छान छान गोष्टी ||marathi chan chan goshti
![]() |
Gavakadchya goshti |
नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Gavakadchya goshti व लहान मुलांचे गोष्टी marathi chan chan goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Gavakadchya goshti व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे छान छान गोष्टी उपलब्ध करून दिले आहे.Top 5 Gavakadchya goshti या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.
Gavakadchya goshti शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या marathi chan chan goshti काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.
👨👧👧👭👨👧👦👨👨👦👨👦👦👨👧👦👬👨👨👦👨👦👨👧👦👨👦👨👩👧👧
Marathi goshti || Chan Chan goshti
MARATHI STORY 1
तेनालीराम आणि कंजूस व्यापारी:- gavakadchya goshti [ छान छान गोष्टी ]
राजा कृष्णदेवराय यांच्या राज्यात एक कंजूस व्यापारी रहात होता. त्याच्याजवळ पैशांची कमतरता नव्हती, पण खिशातून एक पैसा पण काढताना त्याच्या अतिशय जीवावर येत असे. एकदा त्याच्या काही मित्रांनी त्याला एका चित्रकाराकडून त्याचे स्वःताचे चित्र बनविण्यास तयार केले. तेव्हा तो तयार झाला परंतु जेव्हा तो चित्रकार त्याचे चित्र बनवून घेऊन आला तेव्हा त्या व्यापाऱ्याची इच्छा होत नव्हती, की मूल्य स्वरूपात त्या चित्रकाराला शंभर सुवर्णमुद्रा दयाव्यात.
तो व्यापारी पण एक कलाकारच होता. चित्रकाराला येत असलेले बघून व्यापारी घरात गेला व काही वेळातच आपला चेहरा बदलून बाहेर आला त्याने चित्रकाराला सांगितले, ‘तू काढून आणलेले चित्र जरापण चांगले नाही, तूच सांग तू काढून आणलेल्या चित्रातील चेहरा माझ्या चेहऱ्याशी जरा पण मिळतो का?’ चित्रकाराने बघितले खरोखरच व्यापाराचा चेहरा व चित्रातील चेहरा वेगळा आहे. तेव्हा व्यापारी बोलला ‘जेव्हा तू असे चित्र बनवून आणेल की जे माझ्या चेहऱ्याला मिळते जूळते आहे, तेव्हाच मी तू आणलेले चित्र विकत घेईन.’ पुढे दुसऱ्या दिवशी चित्रकार आणखी एक चित्र बनवून आणतो जो हुबेहूब व्यापाऱ्याच्या चेहऱ्याशी मिळतो, जो पहिल्या दिवशी व्यापाऱ्याने बनविला होता. हया वेळेला पुन्हा व्यापाराने आपला चेहरा बदलला व चित्रकाराच्या चित्रामध्ये चुका काढू लागला. चित्रकार खूप अपमानित झाला त्याला हे समजत नव्हते की या प्रकारच्या चुका त्याच्या चित्रात का होत आहेत?
दुसऱ्या दिवशी तो आणखी एक चित्र बनवून घेवून आला, त्याच्याबरोबर पुन्हा तेच घडले. आता त्याला व्यापाऱ्याचा दुष्टपणा समजला होता. त्याला माहिती होते की व्यापारी कंजूस आहे, तो आपल्याला पैसे देणारी नाही. परंतु, चित्रकार आपल्या इतक्या दिवसांची मेहनत पण वाया जाऊ देणार नव्हता. खूप विचार केल्यानंतर चित्रकार तेनालीरामकडे गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली.
काही वेळ विचार केल्यानंतर तेनालीराम बोलला, ‘उदया तू त्या व्यापाऱ्याकडे एक आरसा घेऊन जा, आणि त्याला सांग की तुझा खरा चेहरा घेऊन आलो आहे. चांगल्या प्रकारे मिळतो का बघून घे. थोडा पण फरक जाणवणार नाही. बस, मग काय तुझे काम झाले म्हणून समज.’ दुसऱ्या दिवशी चित्रकाराने तसेच केले.
तो आरसा घेऊन व्यापाऱ्याकडे पोहोचला आणि त्याच्या समोर आरसा ठेवला. ‘हे घ्या शेठजी तुमचे योग्य चित्र बनवून आणले आहे, यात जरापण चूक होणे शक्य नाही.’ चित्रकार आपले हसू सावरत बोलला.
‘परंतु हा तर आरसा आहे.’ व्यापारी गोंधळून बोलला.
‘तुमचा खरा चेहरा आरशा व्यतिरिक्त कोणीच बनवू शकत नाही. लवकरात लवकर माझ्या चित्रांचे मूल्य मला दया.’ चित्रकार बोलला.
व्यापाऱ्याला समजले की, हे सर्व तेनालीरामच्या हुशारीचा परिणाम आहे. त्याने लगेचच एक हजार सुवर्णमुद्रा चित्रकाराला दिल्या.
👨👧👧👭👨👧👦👨👨👦👨👦👦👨👧👦👬👨👨👦👨👦👨👧👦👨👦👨👩👧👧
stories for kids in marathi & marathi stories with moral values
MARATHI STORY 2
सगळयात जास्त चतुर कोण ?Gavakadchya goshti
एक दिवस, बोलता बोलता राजा कृष्णदेव रायने तेनालीरामला विचारले ‘कोणत्या प्रकारचे लोक सगळयात जास्त मुर्ख असतात आणि कोणत्या प्रकारचे लोक अधिक चतुर असतात?’
तेनालीरामने त्वरीत उत्तर दिले ‘ब्राम्हण हे सगळयात जास्त मुर्ख असतात व व्यापारी हे सगळयात जास्त चतुर असतात.’
‘हे तू काय बोलत आहेस, तेनालीराम? ब्राम्हण हे उच्चशिक्षित व ज्ञानी असतात. तू व्यापाऱ्यांची ब्राम्हणांबरोबर तुलना कशी करू शकतो?’ राजा बोलला.
‘महाराज! मी माझा मुद्दा पटवून देऊ शकतो.’ तेनालीराम बोलला.
‘कसे?’ राजाने विचारले.
‘मी उदया राजदरबारात सर्वांसमक्ष पटवून देईल.’
दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार पूर्ण भरलेला होता, तेव्हा तेनालीराम बोलला आपल्या अध्यात्मिक गुरूंना बोलवावे. राजगुरू आल्यावर तेनालीराम बोलला ‘मी हे आत्ता सिध्द करून दाखवेल महाराज, परंतु तुम्ही या कामात लक्ष देणार नाही असे मला वचन दया तेव्हा मी कामास सुरूवात करेन.’
राजाने तेनालीरामचे म्हणणे मान्य केले. तेनालीरामने आदरपूर्वक गुरूंना विचारले ‘राजगुरू, महाराजांना तुमच्या शेंडीची आवश्यकता आहे, याबद्दल तुम्हाला तुम्ही मागाल ते बक्षिस मिळेल.’
राजगुरूंनी विचार केला की इतक्या वर्षापासून जपलेली शेंडी कशी कापून दयावी? परंतु राजाची आज्ञा कशी टाळू शकतो. त्यांनी सांगितले ‘तेनालीरामजी, मी शेंडी कशी देऊ शकतो.’
तेनालीराम बोलला ‘राजगुरूजी, आपण आजन्म महाराजांचे मीठ खात आहात. शेंडी अशी वस्तु तर नाही ना, जी परत येऊ शकत नाही, आणि महाराज आपण मागाल ते बक्षिस दयायला पण तयार आहेत.’ राजगुरूंना मनातल्या मनात समजले की हा तेनालीरामचा काही तरी डाव आहे.
तेनालीरामने विचारले ‘राजगुरूजी, आपल्याला शेंडीच्या बदल्यात काय बक्षिस पाहिजे?’
राजगुरूंने सांगितले की ‘पाच सुवर्ण मुद्रा खूप होतील.’
पाच सुवर्णमुद्रा राजगुरूंना दिल्या गेल्या आणि केशकर्तन करणाऱ्याला बोलवून राजगुरूंची शेंडी कापण्यात आली.
आता तेनालीरामने राज्यातील सर्वात प्रसिध्द व्यापाराला बोलविले.
तेनालीरामने व्यापाराला सांगितले ‘महाराजांना तुमच्या शेंडीची गरज आहे.’
‘सर्व काही महाराजांचेच आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा घेऊ शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, की मी एक गरीब माणूस आहे.’ व्यापारी बोलला.
‘तुम्हाला तुमच्या शेंडीची मागाल ती किंमत दिली जाईल.’ तेनालीराम बोलला.
‘सर्वकाही तुमची कृपा आहे परंतु....’ व्यापारी बोलला.
‘तू काय बोलू इच्छितो?’ तेनालीरामने विचारले.
‘खरे तर, या शेंडीमुळे मी सर्व काही व्यवस्थापित करू शकतो. माझ्या मुलीचा विवाह केला होता तेव्हा मी माझ्या शेंडीची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी पूर्ण पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. मागच्या वर्षी माझ्या वडिलांचा मृत्यू झाला, तेव्हापण याच कारणामुळे पाच हजार सुवर्णमुद्रा खर्च केल्या होत्या. माझ्या या गोंडस शेंडीमुळे बाजारात जेव्हा मला गरज पडेल तेव्हा कमीत कमी दहा ते बारा हजार सुवर्ण मुद्रा उधार मिळतात.’ आपल्या शेंडीवर हात फिरवत व्यापारी बोलला.
‘या प्रकारे तुमच्या शेंडीची किंमत पंधरा हजार सुवर्ण मुद्रा झाली आहे. ठिक आहे! तुला तुझी ही किंमत दिली जाईल.’
पंधरा हजार सुवर्णमुद्रा व्यापाराला दिल्या गेल्या व व्यापारी शेंडी कापण्यासाठी बसला. जसे न्हाव्याने शेंडीजवळ वस्तारा नेला, व्यापारी जोरात बोलला ‘सांभाळून न्हाव्या, तुला माहित नाही का ही महाराज कृष्णदेवराय यांची शेंडी आहे ते.’
हे ऐकून राज चिडला व बोलला, ‘या व्यापाऱ्याची इतकी हिंमत की तो माझा अपमान करतो? त्याला धक्के मारून दरबारातून काढून टाका.’
व्यापारी पंधरा हजार सुवर्ण मुद्रांची थैली घेऊन तिथून निघून गेला.
काही वेळानंतर तेनालीराम बोलला, ‘आपण बघतले का महाराज, राजगुरूंनी पाच सुवर्णमुद्रा घेवून आपली शेंडी कापून दिली व व्यापारी पंधरा हजार सुवर्णमुद्रा घेवून गेला त्याचबरोबर आपली शेंडीही वाचवून घेऊन गेला. तुम्हीच सांगा, ब्राम्हण चतुर की व्यापारी?’
राजा बोलला ‘तू योग्य सांगितले होते, की व्यापारी चतुर असतात.’
👨👧👧👭👨👧👦👨👨👦👨👦👦👨👧👦👬👨👨👦👨👦👨👧👦👨👦👨👩👧👧
लहान मुलांचे गोष्टी मराठी गोष्ट || stories for kids in marathi
Marathi story: 3
पुरोहिताचा बदला:- Chan Chan goshti ||Gavakadchya goshti
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका गावात एक राजा राहत होता. त्या राजाच्या मालकीची एक खूप मोठी फळांची बाग होती. त्या बागेत खूप माकडे रहात होती. एकदा त्या बागेतून राजपुरोहित जात होते. त्या बागेतील माकडांनी त्यांना खूप त्रास दिला. त्यामुळे पुरोहित चिडले त्यांनी या त्रासाचा बदला घेण्याचा ठरविले.
त्यामुळे माकडांच्या प्रमुखाला काळजी वाटू लागते. तो सगळ्या माकडांना बाग सोडून जायला सांगतो. पण काही माकडे ती बाग सोडून दुसरीकडे जातात आणि काही माकडे तिथेच राहतात.
काही दिवसांनी राजाच्या तबेल्याला आग लागते आणि त्या आगीत खूप घोडे पोळले जातात. राजा चिंतेत पडतो मग तो आपल्या पुरोहिताला सल्ला विचारतो.
पुरोहिताला माकडांचा सूड घेण्यासाठी ही खूप मोठी संधी असते. तो राजाला सांगतो की, ' घोड्यांना बरं करण्यासाठी माकडांचे मांस जखमेवर लावणे सर्वात उत्तम .' लगेचच राजा त्याच्या सैनिकांना सांगतो की बागेतल्या सगळ्या माकडांना मारून टाका आणि त्यांचे मांस आणा.
अशाप्रकारे ज्या माकडांनी त्यांच्या प्रमुखाचे ऐकले नाही त्यांना प्राण गमवावे लागले.
👨👧👧👭👨👧👦👨👨👦👨👦👦👨👧👦👬👨👨👦👨👦👨👧👦👨👦👨👩👧👧
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story: 4
मनाची एकाग्रता [ लहान मुलांचे गोष्टी marathi chan chan goshti ]
एकेकाळी एक वृद्ध योद्धा होता. त्याच्या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्याला कोणत्याही प्रकारच्या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्याची ख्याती सर्वत्र पसरली होती. त्याने त्याच्या शिष्यांना व मुलांना युद्धकलेचे शिक्षण देण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी एक तरूण योद्धाही प्रसिद्ध होत होता. दिग्गज योद्धेही तरूण योद्ध्यासमोर हार मानत असत. प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे ओळखून त्याला सहज पराभूत करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय कमी कालावधीत त्याने वृद्ध योद्धा सोडल्यास सर्व योद्ध्यांना पराभूत केले होते. त्याचे नाव सर्वत्र गाजू लागले. मिळणारी प्रसिद्धीचा आता त्याच्या मनात अहंकार जागृत झाला. त्याने विचार केला की या वृद्धालाही हरवून 'अजिंक्य' हे बिरूद लावून मिरवू. त्याने वृद्ध योद्ध्याला आव्हान दिले. शिष्यांनी मनाई केली तरी वृद्धाने त्याचे आव्हान स्वीकारले. तरूण योद्धा ठरलेल्या दिवशी वेळेवर रणांगणात येऊन उभा राहिला. भविष्यातील विजयाची कल्पना मनात धरून तो आनंदी होत होता. पण वृद्ध मात्र शांत आणि संयमित स्थितीमध्ये त्याच्यासमोर उभा होता. युद्ध सुरु झाले. तरूणाच्या प्रत्येक वाराला वृद्धाकडे प्रतिवार तयार होता.तरूण योद्धा हळूहळू का होईना दमू लागला आणि आपण युद्ध हरतो आहे हे लक्षात येताच त्याने वृद्धाला अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. जेणेकरून वृद्धाचे लक्ष विचलित होईल पण त्याचा उपयोग झाला नाही. वृद्ध अविचल राहिला त्याचा संयम ढळला नाही. अखेरीस तरूण योद्धा पराजित झाला. त्याने स्वत:हून हार पत्करली व तेथून पराजित होऊन निघून गेला. तो गेल्यावर शिष्यांनी व वृद्धाच्या मुलांनी वृद्धाला विचारले,''बाबा, तो तरूण तुम्हाला अपशब्द वापरत होता तरी तुम्ही शांत कसे राहिलात'' तेव्हा वृद्ध गुरु म्हणाला,'' मुलांनो कोणत्याही युद्धात शारीरिक बळाबरोबरच मनाची एकाग्रता महत्वाची असते. कोणत्याही परिस्थितीत मन कणखर असेल तर तुमचा विजय निश्चित आहे.''
👨👧👧👭👨👧👦👨👨👦👨👦👦👨👧👦👬👨👨👦👨👦👨👧👦👨👦👨👩👧👧
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || Marathi bodh katha
Marathi story 5
आईची थप्पड :- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]
एका छोट्या गावची गोष्ट आहे. त्या गावातील एका शाळेमधील छोट्या मुलाची गोष्ट आहे. एकदा एका मुलाने वर्गातील मुलाचे पुस्तक चोरले. घरी येउन त्याने ते पुस्तक आईला दाखविले. त्याच्या आईने त्याला ओरडण्याऐवजी त्याला ते पुस्तक स्वत :कडेच ठेवायला सांगितले.
त्या मुलाला वाटले की, चोरी करण्यात काहीच चूक नाही. कारण त्याच्या आईनेच त्याला प्रोत्साहन देत होती. थोड्याच दिवसात त्याने कपडे चोरले. ते त्याने आईला दाखवले. आईने त्याला रागवायचं सोडून त्याचे पुन्हा खूप कौतुक केले. काही वर्षांनी मुलगा मोठा झाला.पण त्याची चोरी करण्याची सवय गेली नाही.
पुढे तो मोठ-मोठ्या वस्तू चोरायला लागला. तो मोठा चोर बनला. पण एक दिवस तो एका चोरीमध्ये त्याला पोलिसाने पकडला गेला. पोलीस जेव्हा त्याला जेलमध्ये घेऊन जात असताना तेव्हा त्याची आई रडायला लागली. आईला रडताना पाहून तो मुलगा पोलिसांना म्हणाला, मला माझ्या आईला काहीतरी सांगायचे आहे.
तो आईच्या कानाजवळ गेला आणि कानाला कचकन चावला. त्याचे असे वागणे पाहून त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटले आणि रागही आला. आईने त्याला एक थोबाडीत मारली.
मुलगा त्याच्या आईला म्हणाला,"हीच थोबाडीत जर तू मला पहिल्यांदा पुस्तक चोरलं होतं तेव्हा मारली असतीस तर आज ही वेळ आली नसती. "मुलाने बरोबर म्हटले होते. आईनेच त्याला चोर बनवले होते.
👨👧👧👭👨👧👦👨👨👦👨👦👦👨👧👦👬👨👨👦👨👦👨👧👦👨👦👨👩👧👧
मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Gavakadchya goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Gavakadchya goshti कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा