waghachi goshta वाघाच्या गोष्टी || मराठी गोष्ट chan chan goshti

waghachi goshta वाघाच्या गोष्टी || मराठी गोष्ट chan chan goshti

Chan chan goshti
Waghachi goshta

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता waghachi goshta लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. वाघाच्या गोष्टी  व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या वाघाच्या गोष्टी मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🐅🐆🦁🐅🐆🦁🐅🐆🐅🦁🐅🐆

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


वाघ आणि उंदीर:- waghachi goshta[ छान छान गोष्टी ]



        उन्हाळ्याच्या दिवसात, एक वाघ, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो  उंदीर वाघाला  खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, वाघाने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून वाघास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.

               पुढे एके दिवशी वाच अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात वाघ सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि वाघास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व वाघाची सुटका केली.


   तात्पर्य:- जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच

🐅🐆🦁🐅🐆🦁🐅🐆🐅🦁🐅🐆

stories for kids in marathi & marathi stories with moral values

                   Marathi story: 2


वाघाचा जावई || वाघाच्या गोष्टी || chan chan goshti



एकदा एक वाघ जाळ्यात अडकला होता. एकदा उंदराने जाळे कुरतडून त्याला मुक्त केले. यामुळे वाघ उंदरावर प्रसन्न झाला आणि म्हणाला, "तुला हवं ते मागं. मी तुझी इच्छा पूर्ण करीन.' वाघाने असे म्हणताच उंदीर म्हणाला, "महाराज आपण मला शब्द दिला आहे. माझी मागणी ऐकून आपण दिला शब्द मोडणार तर नाही ना?' यावर वाघ म्हणाला, "अरे नाही रे, मी राजा आहे आणि राजा आपले वचन कधीच मोडत नाही. माग तुला काय हवे ते'. यावर उंदीर म्हणाला, "मला तुमचा जावई करून घ्या.' वाघाने ते मान्य केले. त्याप्रमाणे वाघाने आपल्या मुलीशी उंदराचे लग्न लावून दिले. सर्व विधी झाले. पण सप्तपदीच्या वेळी नवरीच्या पायाखाली नवरदेव सापडले व चिरडून ठार झाले.


तात्पर्य : आपल्या कुवतीबाहेरच्या एखाद्या गोष्टीची हाव धरली, तर स्वत:चाच नाश ओढवतो.

🐅🐆🦁🐅🐆🦁🐅🐆🐅🦁🐅🐆

लहान मुलांचे गोष्टी मराठी गोष्ट || stories for kids in marathi

                  Marathi story: 3


वाघ आणि शिकारी Chan Chan goshti  waghachi goshta in Marathi



एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका वाघाने ते पाहिले, तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही."वाघ असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व वाघाच्या पंजात घुसला. वाघ तसाच विव्हळला. तीन पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून पळता आहात.' यावर वाघ कोल्ह्याला म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'


तात्पर्य : बुध्दीच्या सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते.

🐅🐆🦁🐅🐆🦁🐅🐆🐅🦁🐅🐆

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4


वाघ आणि  मूर्ख  उंट :- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]


          एका जंगलात एक वाघ त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी , पोटासाठी वाघ शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.

         एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि वाघाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो वाघाला म्हणतो मला मारू नका ! वाघ त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.

        एक दिवस, वाघ शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते. कधी - कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.

        एका संध्यकाळी , कोल्हा वाघाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा. वाघ म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही. नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच वाघाला विनंती करतो. पण वाघ त्याला खाण्यचे टाळतो.
 
        उंट विचार करतो की, वाघाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे. मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल. आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.


तात्पर्य  - आती शहाणा त्याचा बैल रिकामा.

🐅🐆🦁🐅🐆🦁🐅🐆🐅🦁🐅🐆

short moral stories in marathi written || lahan mulancha chan chan goshti
     
                 Marathi story 5


 शेतकरी आणि  वाघ :- waghachi goshta



        एके वर्षी एका जंगलात एक भयंकर वाघ राहत होता. एके दिवशी हरणाचा पाठलाग करत असताना तो रस्ता चुकला. रस्ता चुकलेले सिंह गावाबाहेरील शेतात घुसला. शेतकरी शेतातच राखण करीत उभा होता.

        शेतात घुसलेल्या वाघाला आपण पकडावे असे शेतकऱ्याला वाटले. असा विचार मनात आल्याबरोबर त्याने शेताच्या कुंपणाचे दार बंद केले. शेतकऱ्याने आपल्याला कोंडीत पकडल्याचे लक्षात येताच वाघाने त्या  शेतकऱ्याची मेंढरे मारून टाकली .

        मेंढयाची शिकार संपताच वाघाने बैलांवर हल्ला केला. हे पाहून शेतकऱ्यालाच खूप भीती वाटायला लागली. त्याने तात्काळ दरवाजा उघडला.वाघ लगेच पळून गेला शेताचे, मेंढ्यांचे आणि बैलांचे झालेले नुकसान पाहून शेतकऱ्याने जोरजोरात रडायला सुरुवात केली.

        इतका वेळ घरात उभे राहून सारा प्रकार बघणारी शेतकऱ्याची बायको पुढे आली. ती म्हणाली, 'तुम्ही स्वतः इतके घाबरट असताना तुम्ही वाघाला पकडण्याचा विचार कसा केला. आहो, लांबूनसुद्धा वाघाची डरकाळी ऎकली तरी तुम्ही थरथर कापता. अशा घाबरट माणसाने अशी कृत्ये करण्याचा विचारही मनात आणता कामा नये.' हे ऎकुन शेतकरी पुनः कामाला लागला.
.तात्पर्य -आती तिथे माती

🐅🐆🦁🐅🐆🦁🐅🐆🐅🦁🐅🐆

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी lahan mulanchya goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
marathi bodh katha कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा