essay in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
essay in Marathi लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

माझा आवडता खेळ निबंध maza avadta khel in marathi || Marathi Nibandh

माझा आवडता खेळ निबंध maza avadta khel in marathi || Marathi Nibandh

Maza avadata khel in Marathi
Maza avadata khel

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझा आवडता खेळ निबंध School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये maza avadta khel in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Essay on my favourite game in Marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.




शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी Information about cricket in Marathi Or maza avadta khel in marathi हे मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझा आवडता खेळ निबंध कडे.

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒


माझा आवडता खेळ निबंध मराठी maza avadta khel in marathi || Marathi Nibandh               

लहानपणी माझा सर्वांत आवडता खेळ कोणता असेल? तर तो ‘क्रिकेट’. पाचवी पासून सातवी पर्यंत मला जेंव्हा कधी शाळेपासून सवड मिळायची, तेंव्हा मी गल्लीतल्या माझ्या सवंगड्यांसोबत ‘क्रिकेट’ खेळायचो. आम्ही मुले इतर खेळही खेळायचो, पण ‘क्रिकेट’ हा आमचा सर्वांत प्रिय असा खेळ होता. भारताचा एखादा अटीतटीचा सामना टि.व्ही. वर पहात असताना मी भावुकही व्हायचो! एकदा भारत अशाच एका अटीतटीच्या सामन्यात जिंकता जिंकता हरला, तेंव्हा मला माझे अश्रू अनावर झाले, इतकं माझं क्रिकेटवर प्रेम होतं.

कालोघात ते सवंगडीही मागे पडले व तो खेळही मागे पडला. गेल्या दहा वर्षांत मी क्वचितच क्रिकेट खेळलो असेन. का कोणास ठाऊक? पण क्रिकेट या खेळातील माझी रुची ही हळूहळू फारच कमी होत गेली. जसं मी क्रिकेट खेळणं सोडलं, तसं माझं क्रिकेट पाहणं देखील बंद झालं. आता तर मला ‘भारताचा सामना कधी आहे?’ हे देखील माहित नसतं, तेंव्हा भारताचे सामने टि.व्ही. वर पाहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! वर्तमानपत्रात येणार्या बातम्या वाचल्यानंतरच मला त्याबाबत माहिती होते. सतत होणार्या ‘मॅच फिक्सिंग’ मुळे क्रिकेट हा खेळ पाहण्यात काही ‘अर्थ’ उरला आहे, असे वाटत नाही.

आय.पी.एल. ची लोकप्रियता ही तर माझ्यासाठी अगदी अनाकलनीय आहे! पुण्याच्या टिममध्ये पुण्याचे खेळाडू असत नाहीत, मुंबईच्या टिममध्ये मुंबईचे खेळाडू असत नाहीत, केवळ पैसा आणि प्रसिद्धी डोळ्यासमोर ठेवून आय.पी.एल. च्या व्यवसायात उतरलेले उद्योजग ‘पुणे वॉरिअर्स’, ‘मुंबई इंडियन्स’ म्हणून लोकांना भावनिक आवाहन करतात आणि लोक भुलतात! पुण्याचे, मुंबईचे खेळाडू बाजूला राहूदेत.. कमीतकमी मराठी खेळाडू तरी महाराष्ट्रातील शहारांच्या नावाने असलेल्या टिममध्ये असावेत की नाही!? आता काही लोक मला त्या टिममधील मराठी खेळाडूंची नावे सांगू लागतील.. पण मी इथे अपवादांबद्दल बोलत नसून संपूर्ण टिमबाबत बोलत आहे.

लोकांनी स्वतःहून क्रिकेट खेळावे त्यातून चांगला शारिरीक व्यायाम होतो, पण सतत टि.व्ही. वर दुसर्यांचा खेळ पाहून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे? मनोरंजनच हवे असेल, तर क्रिकेटहून अधिक चांगली अशी मनोरंजनाची कितीतरी साधने आहेत. शेवटी आवडी-निवडी या अगदी व्यक्तिगत असतात. पण आपल्या आवडी-निवडींमधून आपल्या जीवनात काही चांगला बदल होत आहे का? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. जर असा बदल होत असेल, तर आपण योग्य मार्गावर आहोत असे समजायला हरकत नाही. नाहीतर आपल्या आवडी-निवडी बदलायची वेळ आली आहे, असे निश्चित समजावे!


माझा आवडता खेळ क्रिकेट Information about cricket in Marathi

 🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.

भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. 'रणजी ट्रॉफी', 'दिलीप करंडक' व 'इराणी ट्रॉफी' हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.


क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत cricket information in Marathi

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.


क्रिकेटची साधने व पटांगण [माझा आवडता खेळ क्रिकेट निबंध]


चेंडू - वजन १५५ ग्रॅम्स, परिघ २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.

विकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.

पिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.


Cricket खेळाची सुरूवात [मराठी निबंध माझा आवडता खेळ]

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.

फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. 'प्ले' असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.

ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.

🏏🏑🏒🏸🏏🏑🏒🏏🏑🏒🏏🏒

माझा आवडता खेळ निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे maza avadta khel in marathi or Information about cricket in Marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





माझी शाळा निबंध Marathi nibandh || mazi shala in marathi || Essay on my school in Marathi

माझी शाळा निबंध Marathi nibandh || mazi shala in marathi || Essay on my school in Marathi

Essay on my school in marathi
Mazi shala in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझी शाळा निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये mazi shala in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Essay on my school in Marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये 2 निबंध माझी शाळा वर उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी शाळा निबंध कडे.

🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫



माझी शाळा निबंध मराठी || mazi shala in marathi nibandh || Essay on my school in Marathi

                        [No.1] 

मला वाटतं पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता आणि माझी शाळा इथेच थांबत नाही; ती शिक्षणाच्या विविध पद्धतींवर विश्वास करते. एज्युकेशन आणि लर्निंग मध्ये काय फरक आहे? मलाही तोच प्रश्न होता म्हणून मी आमच्या आदरणीय प्राचार्य महोदयांना विचारले, मी तुम्हाला हे सांगू शकेन, त्या फार चांगले समजावून सांगतात. त्यांनी मला सांगितले, पाठ्यपुस्तकांतून मिळते ते एज्युकेशन आणि आयुष्या मध्ये जे कायमचे शिक्षण चालते ते लर्निंग, आणि म्हणूनच आमच्या शाळेत खेळ, इतर शैक्षणिक उपक्रम, मोठ्या विद्यापीठांच्या शिक्षण यात्रा, अतिथी व्याख्यान वगैरे होत राहतात. माझ्या शाळेने माजी विद्यार्थी नेटवर्कची स्थापना केली आहे, त्यासाठी माझी शाळा लिंक्डइन स्कूल टूल आणि अलुमणी नेटवर्क साधनांचा वापर करते. 


            माझ्या शाळेचे बरेच माजी विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्सला, आयटी सारख्या क्षेत्रात काम करत आहेत, आणि ते जगातल्या वेगवेगळ्या देशांत आहेत. माझी शाळा या माजी विद्यार्थ्याच्या अनुभवाचा आणि काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या प्रगती साठी करत आहेत. मला हे सांगण्यास खूप अभिमान वाटतो की आमच्या उपनगरातील कोणत्याही इतर शाळेत ही सोय नाही आणि यामध्ये पूर्णपणे आमच्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम चे श्रेय आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, त्या एक समर्पित, टेक-प्रेमी आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल आहे. मी आशा करतो प्रत्येक शाळेला असे लीडर्स मिळावेत, मग भारतीय शिक्षण प्रणालीचा कायापलट व्हायला वेळ लागणार नाही.


या मध्ये माझ्या शाळेचे शिक्षक ही मागे नाहीत, सर्व शिक्षक MSCIT झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे की भारत आयटी हब आहे, आमच्या शाळेने भविष्यातील या संधींचा लाभ घेण्यासाठी शाळेमध्ये आयटी एज्युकेशन चालू केले आहे. आमचे कॉम्पुटर चे शिक्षक बी.टेक कॉम्पुटर सायन्स झालेले आहेत, आणि ते आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थीं आहेत. त्यांना कुठेही चांगली नोकरी मिळाली असती, पण त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडलं. आपल्या सगळ्यांना यातून शिकण्यासारखे खूप काही आहे, आपण सुद्धा शिक्षक करिअर चा विचार केला पाहिजे. माझ्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम या खूप tech-savvy आहेत, माझ्या शाळेची वेबसाईट सुद्धा आहे, आणि आमच्या शाळेची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ऑटोमॅटिक आहे. आमच्या जवळ पासच्या भागात इतकी तंत्रज्ञान प्रेमी शाळा नाही, आणि यामुळे मला माझ्या शाळेबद्दल अभिमान वाटतो.


जरी माझ्या शाळेने अश्या मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत, तरीही ऍडमिशन फीस (प्रवेश शुल्क) नाममात्र आहे. अन्य प्रतिस्पर्धी शाळांमध्ये शुल्क जवळपास दुप्पट आहे आणि खूप लपविलेले शुल्क सुद्धा असतात. भारतीय पालक शिक्षणाबद्दल फारच गंभीर आहेत, ते आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्षमतेमध्ये जे काही करू शकतात ते करतात. बऱ्याच खाजगी शाळा याचा फायदा घेतात आणि जास्त प्रमाणात देणगी आणि फी मिळविण्याचा प्रयत्न करतात. माझे पालक माझ्या शाळेचे आपल्या मित्रांच्या समोर अभिमानाने कौतुक करतात. त्यांचे काही मित्र आपल्या मुलांना माझ्या शाळेत स्थानांतरित करणार आहेत. पालकांचा आदर राखल्याबद्दल मी आमच्या शाळेचे आभार मानले पाहिजे.


मी माझ्या शाळेबद्दल खूप वेळ बोलू शकतो, पण वेळेच्या मर्यादेमुळे मला जास्त बोलता येणार नाही. आमची शाळा शहरातील उत्तम शाळांपैकी एक आहे, शिक्षणाची गुणवत्ता, भविष्यकालीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माझी शाळा इतरांपासून खूप वेगळी आहे, आणि मला याचा खूप अभिमान आहे. मला आशा आहे की,माझी शाळा अशीच प्रगती करत राहो आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे. प्राचार्य महोदया, शाळेबद्दलचे माझे मत व्यक्त करण्यास मला अनुमती देण्यासाठी मी आपला आभारी आहे.


🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫🏤🏫



Majhi shala nibandh in Marathi || माझी शाळा निबंध My School Essay In Marathi 


                        [ No.2]


माझ्या शाळेचे नाव शारदा विद्या मंदिर आहे, आणि तिची इमारत २ नद्यांच्या संगमावर आहे . माझी शाळा अर्ध्या एकराच्या क्षेत्रात पसरलेली आहे, त्यामध्ये शाळेची इमारत, कॅम्पस आणि एक मोठे मैदान आहे. माझी शाळा सेमी-इंग्रजी शाळा आहे आणि मुख्य भाषा मराठी आहे, आमच्याकडे ५वी ते १०वी पर्यंत ६वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात अ आणि ब तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे ५० विद्यार्थी आहे, आणि माझ्या शाळेची एकूण संख्या ६५० एवढी आहे. माझी शाळा ग्रामीण भागात आहे, शाळेत मुलींची संख्या वाढवण्यासाठी आमची शाळा दरवर्षी मोहीम चालवते, आणि याचे परिणाम खूप चांगले आहेत.

माझ्या शाळेबद्दल मला सगळ्यात जास्त आवडणारी एक गोष्ट म्हणजे लिंग, धर्म किंवा जातीच्या आधारावर ते भेदभाव करत नाहीत. आपल्यासारख्या ग्रामीण भागात ही समस्या खूप प्रचलित आहे परंतु आमच्या प्रिय प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेत हा भेदभाव आता प्रचलित नाही.

आमच्या शाळेचा निकाल नेहमीच उत्तम असतो, मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के यश प्राप्त केले

आमची एक विद्यार्थीनी दीपिका जिल्हा टॉपर आणि संस्कृतमध्ये राज्यात अव्वल आली. याचे सर्व श्रेय आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि प्रिन्सिपल सरांना जाते . माझी शाळा जरी ग्रामीण भागातील असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत . गेल्या आठवड्यात प्रिन्सिपल सर यांनी सांगितले की, या वर्षापासून सर्व विज्ञान आणि गणित वर्ग संगणकीकृत प्रणालीवर घेतले जातील, शाळेने सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर्स देखील खरेदी केले आहेत. पालकांनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे, त्यांनी असे केवळ चित्रपटांमध्ये पाहिले होते, पालक हे जाणून खूष आहेत की त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. आम्हाला जिल्हास्तरावर “स्कूल ऑफ दी इयर” पुरस्कारही मिळाला. आमच्या टेक-प्रेमी प्रिन्सिपल आणि एस.एस.सी च्या यशामुळे आम्ही हा पुरस्कार जिंकला आहे.

मला अशा शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे. मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, आणि आमचे भविष्य सुंदर बनवण्यात मदत करत राहील


🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫🏤🏫


माझी शाळा निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे माझी शाळा मराठी निबंध mazi shala in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


धन्यवाद !


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi || सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती मराठी

सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi || सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती मराठी

About savitribai fule
Savitribai fule information in Marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! सावित्रीबाई फुले निबंध  School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये savitribai fule information in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती मराठी मध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.

शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये सावित्रीबाई फुले निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी savitribai fule information in marathi Or savitri bai fule mahiti हे मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया सावित्रीबाई फुले निबंध कडे.

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

सावित्रीबाई फुले निबंध savitribai fule information in marathi सावित्रीबाई फुले माहिती मराठी


    सावित्रीबाई फुले (जानेवारी ३, इ.स. १८३१ – मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्यासह त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
                 सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी जानेवारी ३, इ.स. १८३१ रोजी सावित्रीबाईंचा जन्म झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली. एका दुबळ्या मुलाचे फुल हिसकावून घेणार्‍या धटिंगणाला त्यांनी अद्दल घडविली, तर पक्ष्यांची अंडी खाणार्‍या नागाला त्यांनी ठेचून मारले.
                  फाल्गुन कृष्ण पंचमी, शालिवाहन शक १७६५ (इ.स. १८४०) रोजी ज्योतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. म्हणजे त्या वेळच्या रूढीनुसार लग्नाला उशीरच झाल्याचे मानले गेले. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
                 सावित्रीबाईंचे पती ज्योतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केलेला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचं व बोलताही यायचं. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या.
                ‘त्यांनी करेल ते र्मों आणि आपण शिकलो की पाप’ हा ज्योतिरावांनी वडिलांना विचारलेला प्रश्र्न सावित्रीला पतीच्या ध्येयाची जाणीव देऊन गेला. ‘सेठजी, टाकलं पाऊल मागं घेऊ नका. तुमी शिकावं असं मलाबी वाटतं’…. या शब्दात त्यांनी पतीला ताकद दिली. ज्योतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वत: शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
              १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे भिड्यांच्या वाड्यात शाळा सुरू झाल्यानंतर सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. त्या काळात लोक म्हणत जो शिकेल, त्याच्या सात पिढ्या नरकात जातील. त्यावर उपाय म्हणून त्यांना सांगण्यात आलं की “गोर्‍या साहेबानं एक शोध लावलाय की, जो शिकणार नाही त्याच्या चौदा पिढ्या नरकात जातील”. नरकाच्या भीतीने का हाईना लोक शिक्षणाला होकार देऊ लागले.
               १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
                सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी “धर्म बुडाला…. जग बुडणार…. कली आला….” असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
                शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढी परंपरांनाही त्यांनी आळा घातला. लहानपणीच लग्न झालेल्या अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. पतीच्या निधनानंतर एकतर त्यांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन केले जाई. त्यांना कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्‍या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
               ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.
                केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतरही (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
                इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला.
                इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे व परिसरात प्लेगाच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून त्यांनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देऊ लागल्या. प्लेगाच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून मार्च १०, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼👩‍💼

सावित्रीबाई फुले निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे savitribai fule information in marathi or savitribai fule in marathi nibandh आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी diwali eassy in marathi || maza avadta san essay in marathi

माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी diwali eassy in marathi || maza avadta san essay in marathi

Diwali essay in Marathi
Maza avadta San diwali

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझा आवडता सण दिवाळी निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये दिवाळी निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून diwali eassy in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये दिवाळीची माहिती उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी diwali information in marathi कडे.

🌝🎆💥💣🌝🎆💥💣🎆💥🌝


माझा आवडता सन दिवाळी || diwali eassy in marathi || maza avadta san


अश्विन महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी हा सण असतो. दिवाळीला दीपावली असेही म्हणतात. दीपावलीच्यावेळी अनेक दिव्यांची किंवा दीपांची झगमगाट आणि लख्ख असा प्रकाश सगळीकडेच पाहायला मिळतो. त्याचबरोबर सगळीकडे रंगबेरंगी फटाके आणि सर्वांच्या घरोघरी विद्युत रोषणाई,आकाशकंदील पाहायला मिळतात. त्यामुळेच तर या सणाला दीपावली असे म्हणतात. दिवाळी हा सण जवळपास तीन हजार वर्षे जुना आहे. या सणाची सुरुवात फार प्राचीन काळापासून झाली आहे. असे पुर्वजांना आढळले आहे. परंतु काहीलोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून श्री प्रभू रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले त्यादिवशी दिवाळी हा सण साजरा करतात. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा करतात. पावसाळा संपून नवीन पिके हाती आल्यानंतर शरद ऋतूच्या मध्यभागी एका वेगळ्याच आनंदात हा सण येतो. यावेळी शेतकरीसुद्धा सुखावलेले असतात कारण त्यांच्या हाती नवीन पिके आलेली असतात. त्यामुळे शेतकरी पण मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात. दिवाळीच्या वेळेस लक्षमीपूजनाच्या दिवशी शेताची आणि शेतीच्या अवजारांची ते पूजा करतात. गुरांचीसुद्धा पूजा करतात आणि त्यांना गोड पदार्थ खाऊ घालतात. या सणाला आपल्या भारतात बहुतांश सर्वांनाच सुट्टी असते.

 सहामाही परीक्षा झाल्यानंतर आम्हाला दिवाळीची सुट्टी असते. परीक्षेच्याआधी जेव्हा शिपाईकाका वेळापत्रक आणतात तेव्हा आम्ही सर्वच मित्र-मैत्रिणी परीक्षेचे वेळापत्रक पाहताना परीक्षा कधी आहे हे पाहण्याआधी दिवाळीची सुट्टी कधी आहे हे पाहतो. सहामाही परीक्षा झाल्यांनतर मोठ्या उत्साहाने आम्ही सर्वजण दिवाळीच्या तयारीला लागतो. मी घरातील साफसफाई करण्यात आईला मदत करते. त्यानंतर दिवाळीच्या ४-५ दिवस अगोदर सर्व फराळ बनवण्यास मदत करते. आम्ही दोघी मिळून सर्व फराळ बनवतो कारण सर्व नातेवाइकांना फराळ द्यायचा असतो. तसेच दिवाळीच्या अगोदर आम्ही आमच्या सोसायटीच्या परिसरात सर्व मित्र-मैत्रिणी मिळून किल्ला बनवतो. आम्ही दरवर्षी शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करतो. त्या किल्ल्यावर आम्ही धान्यसुद्धा पेरतो त्यामुळे दिवाळीपर्यंत किल्ला खूप मस्त दिसतो कारण पूर्ण गावात उगवलेले असते.

 किल्ल्यावर आम्ही वेगवेगळी चित्रे मांडतो. त्यामध्ये शिवाजी महाराजांसाठी आसन तयार करतो त्यावर दरवर्षी शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती ठेवतो. किल्ल्याच्या आजूबाजूला गुहा,विहीर तयार करतो. किल्ल्याचे दरवाजे आणि तटरक्षक भिंती तयार करतो. खूप मजा येते किल्ला बनविताना. दिवाळीच्या प्रत्येक दिवशी आम्ही भाऊ-बहिणी सकाळी लवकर उठतो. दररोज आई आम्हाला सर्वांना उटणे लावून अंघोळ घालते. नंतर दिवाळीसाठी घेतलेले नवीन कपडे घालून आम्ही फटाके उडविण्यासाठी जातो. सर्व मित्र-मैत्रिणी नवीन नवीन कपडे घालून मस्त आवरून आलेले असतात आम्ही खूप धमाल मस्ती करतो आणि सायंकाळीसुद्धा आम्ही खूप फटाके वाजवतो. त्यानंतर सायंकाळी एकत्र बसून आम्ही फराळाचा आस्वाद घेतो.

 दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवशी धने आणि गुळाच्या प्रसादाला खूप महत्व आहे. या दिवशी पूजेसाठी घरातील धन,दागिने आणि धने अशा वस्तू पूजेसाठी ठेवल्या जातात. त्यानंतर येते ती नरकचतुर्दशी या दिवशी सर्व लहान मुले लवकर उठून सुगंधी उटण्याने अंघोळ करून नवीन कपडे घालतात आणि सर्वजण मिळून फटाके वाजवतात. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा आहे. श्रीकृष्णांनी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदीखान्यातल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस दुष्ट नरकासुराचा वध करून आनंद साजरा करण्याचा.

 या दिवशी भारतात अनेक ठिकाणी नरकासुराचा पुतळा जाळतात,फटाकेसुद्धा वाजवतात आणि उत्साह साजरा करतात. नरकचतुर्दशीनंतर येते ते लक्ष्मीपूजन यादिवशी आम्ही घरी पुरणपोळी बनवतो. देवाला पुरणपोळीचा आणि फराळाचा नैवेद्य दाखवतो. यादिवशी आरोग्यलक्ष्मी(केरसुणी) हिची पूजा खूप महत्वाची असते. तसेच यादिवशी पूजेमध्ये लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती,दागिने,सोने-नाणे,पैसे,धने अशा सर्व वस्तू पूजेमध्ये ठेवतात. देवीची पूजा आई मनोभावे मांडते आणि तिची पूजा करते. ११ किंवा २१ पणत्या एका ताटामध्ये लावून देवीसमोर ठेवते. मग आम्ही सर्वजण मिळून पूजा आरती करतो. मनोभावे नमस्कार करतो. मग मी देवीला पुरणपोळी आणि फराळाचा नैवेद्य दाखवते. मग आम्ही पूजा झाल्यानंतर सर्व मित्र-मैत्रिणी मिळून खूप फटाके वाजवतो.

 लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी पाडवा असतो. पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त. ह्या दिवशी अनेक नवीन प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी बरेच लोक सोने खरेदी करतात,तर कोणी नवीन घर घेत,कोणी नवीन वस्तू खरेदी करत. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला भेट म्हणून एखादी वस्तू,दागिना किंवा साडी भेट देतो. त्यानंतर येते ती भाऊबीज. भाऊबीजेचा दिवस म्हणजे बहीण-भावाच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा असतो. ह्या दिवशी बहिणी आपल्या भावांसाठी दिव्यांची आरास करतात आणि मोठ्या आत्मीयतेने ओवाळून त्यांच्या समृद्धी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करतात. ओवाळून झाल्यानंतर आपल्या भावाला नारळ आणि करदोरा देतात. अशी ही दिवाळी पाच दिवसांची असते. दिवाळी कधी संपते ते उत्साहाच्या भरात कळतही नाही.

 आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात वाढत्या प्रदूषणामुळे बरेच लोक प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करतात.तसेच शाळा आणि काही सामाजिक संस्थासुद्धा प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचा संदेश देतात. आपला देश हे आपले घर किंवा आपला परिसर समजून आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. त्याचबरोबर फटाके कमी आवाजाचे वाजवले पाहिजेत आणि फटाक्यांचा वापर कमीत कमी करून दिवाळी साजरा केली पाहिजे. तरच ध्वनीप्रदूषण आणि वायुप्रदूषण रोखता येईल. आणि आपल्या सर्वांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करता येईल.

🌝🎆💥💣🌝🎆💥💣🎆💥🌝

माझा आवडता सण दिवाळी निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे diwali eassy in marathi or diwali information in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏





Diwali eassy in marathi दिवाळी निबंध मराठी diwali information in marathi || diwali eassy in marathi

Diwali eassy in marathi दिवाळी निबंध मराठी diwali information in marathi || diwali eassy in marathi

Diwali Nibandh
Diwali essay in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! Diwali eassy in marathi करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये दिवाळी निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून diwali information in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये दिवाळीची माहिती उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी Diwali eassy in marathi कडे.

💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥


माझा आवडता सन दिवाळी || diwali eassy in marathi || diwali chi mahiti


                     
दिवाळीचे दुसरं नांव दीपावली. हा उत्सव म्हणजे दीपोत्सव. दिव्यांचा उत्सव दिव्यांच्या असंख्य ओळी घराअंगणात लावल्या जातात. म्हणून तिचं नाव दीपावली.

ह्या सणाची सुरवात वसुबारसेपासून योते आणि भाऊबीज साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. सर्व अबाल वृद्ध, मुले, स्त्रीया ह्यांचा हा लाडका सण. दिवाळी येणार म्हटलं की आवराआवर रंगरंगोटी. नव्या कपड्यांची, दागिन्यांची, घरातील वस्तूची खरेदीची ही पर्वणी. फटाक्यांची आतिषबाजी अन चविष्ट दिवाळी फराळाचा स्वाद हे ह्या सणाच आणखी एक वैशिष्ट्य.

आपला भारत देश हा कृषीप्रधान देश. आपली थोर संस्कृती सुद्ध सर्वंवर प्रेम करायला शिकवणारी. म्हणूनच की काय वसुबारस ह्या दिवशी आपण गाय आणि वासरू ह्यांची पूजा करतो. त्यांना गोडाचा घास खाऊ घालतो. दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा.

धनत्रयोदशीला तिन्ही सांजेला केली जाणारी धनाची पूजा, नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद ह्याला ही फार मोठे महत्त्व आहे. ह्याच दिवशी एक दिवा तयार करून तो यमदेवतेसाठी लावला जातो. दक्षिण दिशा ही यमाची दिशा म्हणून त्या दिवशी त्या दिव्याची ज्योत ही दक्षिणेला केली जाते.

नरक चतुर्दशी हा मुख्य दिवाळीचा पहिला दिवस. ह्या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचे. नवीन वस्त्रे परिधान करायची. देवदर्शन घ्यायचे आणि सर्वांनी एकत्र जमून दिवाळी फराळ करायचा असा हा आनंद साजरा करण्याचा दिवस. ह्या दिवसाची एक पौराणिक कथा जोडली आहे ती अशी की श्रीकृष्णानी अत्याचारी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदी शाळेतल्या सोळा सहस्त्र कन्यांची मुक्तता केली. तो हा दिवस, दुष्टाचा नाशा आणि मुक्ताचा आनंद हे या दिवसामागचे आनंद साजरा करण्याचे कारण आहे.

अश्विनातले शेवटचे दोन दिवस आणि कार्तिकाचे पहिले दोन दिवस अशी ही चार दिवसांची मुख्य दिवाळी. अश्विन वद्यअमावस्येला संध्याकाळी घरोघरी, दुकानांतून सोन्या-चांदीच्या पेढ्यातून, ऑफिसातून लक्ष्मीपूजन केले जाते. घरातल सोन नाणं-रोकड ह्यांची पूजा करतात. व्यापारी सर्व हिशेबाच्या वह्यांच पूजन करतो. ह्या धनलक्ष्मीच्या पूजनाबरोबरच त्या दिवशी आरोग्य लक्ष्मी ( केरसुणी ) हिची पण पूजा करतात. लक्ष्मी पूजनानंतर फटाक्यांची अतिषबाजी करून आनंद साजरा केला जातो.

पाडवा म्हणजे बलिप्रतिपदा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त. ह्या दिवशी अनेक नवे प्रकल्प चालू केले जातात. पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते. पती पत्नीला पाडव्याची भेट म्हणून वस्तू, दागिना किंवा साडी भेट देतो.

कार्तिक शुद्ध द्वितीयेलाच यमद्वितीया किंवा भाऊबीज असे म्हणतात. बहिण भावाच्या उत्कट प्रेमाचा हा दिवस, बहिण भावाला स्नान घालते, गोड भोजन देते, ओवाळते आणि भाऊ बहिणीला ओवाळणी घालतो.

दिवाळीच्या सणातला लहान मुला मुलींचा आनंदाचा भाग म्हणजे आकाशकंदिल तयार करणे, किल्ला करणे, त्यावर चित्रे मांडणे, संध्याकाळी दारापुढे छान छान रांगोळ्या काढणे आणि फटाके वाजविणे इ. दिपावली हा सण सर्वत्र आनंद व उत्साहाने साजरा होतो. परस्परांना भेट वस्तू, शुभेच्छापत्रे इ. देवून आनंद दिला घेतला जातो. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळी म्हणजे अत्यंत आनंदी. सुखद दिपावलीच्या अनेक सुखद आठवणींपुढे अनेक दिवस मनांत रेंगाळत राहतात.

💣💥💣💥💣💥💣💥💣💥💣💥

Diwali eassy in marathi तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे दिवाळी निबंध मराठी or diwali information in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏