माझी शाळा निबंध Marathi nibandh || mazi shala in marathi || Essay on my school in Marathi

माझी शाळा निबंध Marathi nibandh || mazi shala in marathi || Essay on my school in Marathi

Essay on my school in marathi
Mazi shala in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझी शाळा निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये mazi shala in marathi हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Essay on my school in Marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये 2 निबंध माझी शाळा वर उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी शाळा निबंध कडे.

🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫



माझी शाळा निबंध मराठी || mazi shala in marathi nibandh || Essay on my school in Marathi

                        [No.1] 

मला वाटतं पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता आणि माझी शाळा इथेच थांबत नाही; ती शिक्षणाच्या विविध पद्धतींवर विश्वास करते. एज्युकेशन आणि लर्निंग मध्ये काय फरक आहे? मलाही तोच प्रश्न होता म्हणून मी आमच्या आदरणीय प्राचार्य महोदयांना विचारले, मी तुम्हाला हे सांगू शकेन, त्या फार चांगले समजावून सांगतात. त्यांनी मला सांगितले, पाठ्यपुस्तकांतून मिळते ते एज्युकेशन आणि आयुष्या मध्ये जे कायमचे शिक्षण चालते ते लर्निंग, आणि म्हणूनच आमच्या शाळेत खेळ, इतर शैक्षणिक उपक्रम, मोठ्या विद्यापीठांच्या शिक्षण यात्रा, अतिथी व्याख्यान वगैरे होत राहतात. माझ्या शाळेने माजी विद्यार्थी नेटवर्कची स्थापना केली आहे, त्यासाठी माझी शाळा लिंक्डइन स्कूल टूल आणि अलुमणी नेटवर्क साधनांचा वापर करते. 


            माझ्या शाळेचे बरेच माजी विद्यार्थी बायोटेक्नॉलॉजी, रोबोटिक्सला, आयटी सारख्या क्षेत्रात काम करत आहेत, आणि ते जगातल्या वेगवेगळ्या देशांत आहेत. माझी शाळा या माजी विद्यार्थ्याच्या अनुभवाचा आणि काँनेकशन्स चा वापर माझ्या शाळेच्या प्रगती साठी करत आहेत. मला हे सांगण्यास खूप अभिमान वाटतो की आमच्या उपनगरातील कोणत्याही इतर शाळेत ही सोय नाही आणि यामध्ये पूर्णपणे आमच्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम चे श्रेय आहे. मला त्यांचा खूप अभिमान वाटतो, त्या एक समर्पित, टेक-प्रेमी आणि रिझल्ट ओरिएंटेड प्रिन्सिपल आहे. मी आशा करतो प्रत्येक शाळेला असे लीडर्स मिळावेत, मग भारतीय शिक्षण प्रणालीचा कायापलट व्हायला वेळ लागणार नाही.


या मध्ये माझ्या शाळेचे शिक्षक ही मागे नाहीत, सर्व शिक्षक MSCIT झालेले आहेत. आपल्याला माहीत आहे की भारत आयटी हब आहे, आमच्या शाळेने भविष्यातील या संधींचा लाभ घेण्यासाठी शाळेमध्ये आयटी एज्युकेशन चालू केले आहे. आमचे कॉम्पुटर चे शिक्षक बी.टेक कॉम्पुटर सायन्स झालेले आहेत, आणि ते आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थीं आहेत. त्यांना कुठेही चांगली नोकरी मिळाली असती, पण त्यांनी शिक्षण क्षेत्र निवडलं. आपल्या सगळ्यांना यातून शिकण्यासारखे खूप काही आहे, आपण सुद्धा शिक्षक करिअर चा विचार केला पाहिजे. माझ्या शाळेच्या प्रिंसिपल मॅडम या खूप tech-savvy आहेत, माझ्या शाळेची वेबसाईट सुद्धा आहे, आणि आमच्या शाळेची पूर्ण ऍडमिशन प्रोसेस ऑटोमॅटिक आहे. आमच्या जवळ पासच्या भागात इतकी तंत्रज्ञान प्रेमी शाळा नाही, आणि यामुळे मला माझ्या शाळेबद्दल अभिमान वाटतो.


जरी माझ्या शाळेने अश्या मोठमोठ्या गोष्टी साध्य केल्या आहेत, तरीही ऍडमिशन फीस (प्रवेश शुल्क) नाममात्र आहे. अन्य प्रतिस्पर्धी शाळांमध्ये शुल्क जवळपास दुप्पट आहे आणि खूप लपविलेले शुल्क सुद्धा असतात. भारतीय पालक शिक्षणाबद्दल फारच गंभीर आहेत, ते आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी त्यांच्या क्षमतेमध्ये जे काही करू शकतात ते करतात. बऱ्याच खाजगी शाळा याचा फायदा घेतात आणि जास्त प्रमाणात देणगी आणि फी मिळविण्याचा प्रयत्न करतात. माझे पालक माझ्या शाळेचे आपल्या मित्रांच्या समोर अभिमानाने कौतुक करतात. त्यांचे काही मित्र आपल्या मुलांना माझ्या शाळेत स्थानांतरित करणार आहेत. पालकांचा आदर राखल्याबद्दल मी आमच्या शाळेचे आभार मानले पाहिजे.


मी माझ्या शाळेबद्दल खूप वेळ बोलू शकतो, पण वेळेच्या मर्यादेमुळे मला जास्त बोलता येणार नाही. आमची शाळा शहरातील उत्तम शाळांपैकी एक आहे, शिक्षणाची गुणवत्ता, भविष्यकालीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे माझी शाळा इतरांपासून खूप वेगळी आहे, आणि मला याचा खूप अभिमान आहे. मला आशा आहे की,माझी शाळा अशीच प्रगती करत राहो आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करावे. प्राचार्य महोदया, शाळेबद्दलचे माझे मत व्यक्त करण्यास मला अनुमती देण्यासाठी मी आपला आभारी आहे.


🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫🏤🏫



Majhi shala nibandh in Marathi || माझी शाळा निबंध My School Essay In Marathi 


                        [ No.2]


माझ्या शाळेचे नाव शारदा विद्या मंदिर आहे, आणि तिची इमारत २ नद्यांच्या संगमावर आहे . माझी शाळा अर्ध्या एकराच्या क्षेत्रात पसरलेली आहे, त्यामध्ये शाळेची इमारत, कॅम्पस आणि एक मोठे मैदान आहे. माझी शाळा सेमी-इंग्रजी शाळा आहे आणि मुख्य भाषा मराठी आहे, आमच्याकडे ५वी ते १०वी पर्यंत ६वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात अ आणि ब तुकड्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये सुमारे ५० विद्यार्थी आहे, आणि माझ्या शाळेची एकूण संख्या ६५० एवढी आहे. माझी शाळा ग्रामीण भागात आहे, शाळेत मुलींची संख्या वाढवण्यासाठी आमची शाळा दरवर्षी मोहीम चालवते, आणि याचे परिणाम खूप चांगले आहेत.

माझ्या शाळेबद्दल मला सगळ्यात जास्त आवडणारी एक गोष्ट म्हणजे लिंग, धर्म किंवा जातीच्या आधारावर ते भेदभाव करत नाहीत. आपल्यासारख्या ग्रामीण भागात ही समस्या खूप प्रचलित आहे परंतु आमच्या प्रिय प्राचार्य सर यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शाळेत हा भेदभाव आता प्रचलित नाही.

आमच्या शाळेचा निकाल नेहमीच उत्तम असतो, मागच्या वर्षी दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के यश प्राप्त केले

आमची एक विद्यार्थीनी दीपिका जिल्हा टॉपर आणि संस्कृतमध्ये राज्यात अव्वल आली. याचे सर्व श्रेय आमचे शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी, आणि प्रिन्सिपल सरांना जाते . माझी शाळा जरी ग्रामीण भागातील असली तरी आम्ही खूप वेगाने आधुनिक शिक्षण पद्धती वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहोत . गेल्या आठवड्यात प्रिन्सिपल सर यांनी सांगितले की, या वर्षापासून सर्व विज्ञान आणि गणित वर्ग संगणकीकृत प्रणालीवर घेतले जातील, शाळेने सॉफ्टवेअर आणि प्रोजेक्टर्स देखील खरेदी केले आहेत. पालकांनी या संकल्पनेचे कौतुक केले आहे, त्यांनी असे केवळ चित्रपटांमध्ये पाहिले होते, पालक हे जाणून खूष आहेत की त्यांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. आम्हाला जिल्हास्तरावर “स्कूल ऑफ दी इयर” पुरस्कारही मिळाला. आमच्या टेक-प्रेमी प्रिन्सिपल आणि एस.एस.सी च्या यशामुळे आम्ही हा पुरस्कार जिंकला आहे.

मला अशा शाळेचा भाग असल्याचा खूप अभिमान आहे. मी आशा करतो आमची शाळा असेच गुणवंत विद्यार्थी तयार करत राहील, आणि आमचे भविष्य सुंदर बनवण्यात मदत करत राहील


🏫🏰🏫🏰🏫🏣🏤🏫🏤🏣🏢🏫🏤🏫


माझी शाळा निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे माझी शाळा मराठी निबंध mazi shala in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.


धन्यवाद !


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा