कावळा चिमणीची गोष्ट stories for kids in marathi || कावळ्याची गोष्ट chan Chan goshti

कावळा चिमणीची गोष्ट stories for kids in marathi || कावळ्याची गोष्ट chan Chan goshti

कावळा चिमणीची गोष्ट Stories for kids in Marathi
कावळा चिमणीची गोष्ट

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता कावळा चिमणीची गोष्ट stories for kids in marathi लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. चिमणी कावळ्याची गोष्ट व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi उपलब्ध करून दिले आहे.Top 6 kavala chimani chi goshta या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत आहेत.

लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1



कावळा चिमणीची गोष्ट kavala chimani chi goshta [ छान छान गोष्टी ]


एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होत मेणाच, छोटंस आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे. आळशी कावळ्यासारखं  बसायला तिला मुळीच आवडत नसे. याउलट कावळयाचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्याबावल्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणालाच आवडायचा नाही. 

          एक दिवस काय झालं आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाटयाचा वारा सुटला. टप् टप् पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वहायला लागलं. कावळयाच घर होत शेणाच. तेही पाण्यात वाहून गेल. हू...हू...हू...हू...! कावळा काकडला. आता कुठे जाव बर? एवढयात त्याला आठवल, चिमणीच घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !'      

          चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला काजळ-पावडर लावते' थोडावेळ थांबून पुन्हा कावळयाने कडी वाजवली 'चिऊताई, चिऊताई, दार उघड !' चिमणी आतून म्हणाली 'थांब माझ्या बाळाला झोपवते' इकडे कावळयाला खूप भूक लागली होती.

         पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा! एवढंस तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिऊताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. 

        कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाली 'तू बैस चुलीपाशी'. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर ! कावळयाच्या तोंडाला पाणी सुटले.त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोडया वेळाने पाऊस थांबला. कावळयाने घरटयाचे मागचे दार उघडले आणि तो भुर्रकन् उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड.

तात्पर्य - लबाडपणाचे   ध्येय  कधीच  साध्य  होत नाही. 

🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧

stories for kids in marathi & marathi stories with moral values 
            
              MARATHI STORY 2


चिमणी कावळ्याची गोष्ट || कावळयाची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस 


     एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिला ना? तोच तो. तो लोळ लोळ लोळला, तर शेणाने भरला. त्याने वर पाहीले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रड रड रडला अन् घरी येऊन झोपी गेला. 

          एक होती कामसू चिमणी. पहिल्या गोष्टीत पाहिली ना घर स्वच्छ ठेवणारी? तीच ती. ती लोळ लोळ लोळली. तर मोत्याने भरली. तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला. तिने बिळात हात घातला तर तिला अंगठी मिळाली. ती देवळात गेली तर तिला साडी-चोळी मिळाली. ती साडी-चोळी नेसली, पालखीत बसली अन् घरी येऊन झोपी गेली.

तात्पर्य - लबाडपणाचे   ध्येय  कधीच  साध्य  होत नाही. 

🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 3


कावळ्याची गोष्ट मूर्ख कावळा:- Moral stories for childrens


एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका कावळ्याला वाटले. त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, कावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली. तो तिथे आला व त्‍याने कावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार कावळा आहे.''

तात्‍पर्य :- काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.

🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4

कावळ्याची गोष्ट [कावळा आणि कालव]:- Chan Chan goshti 


एक कावळा समुद्राकाठी फिरत असताना त्याला एक कालव सापडले. त्यातील मांस काढून खावे म्हणून तो ते दगडावर आपटू लागला. जवळच एक लबाड डोमकावळा बसला होता. 
तो त्याला म्हणाला, 'मित्रा, दगडावर आपटून हे कालव काही फुटणार नाही, तेव्हा तू हे तोंडात धरून उंच उंच जा आणि तिथून ते खाली टाकून दे. म्हणजे ते फुटेल.'

कावळा बिचारा भोळा होता. त्याने कालव तोंडात धरून एक उंच भरारी मारली आणि तिथून ते खाली टाकून दिले. जमिनीवर पडताच लबाड डोमकावळ्याने ते पळवले आणि तो उडून गेला.

तात्पर्य - लबाड मनुष्याच्या सांगण्यावर कधीही विश्‍वास ठेवू नये.

🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧

short moral stories in marathi written || lahan mulancha chan chan goshti
       
                 Marathi story 5

 कावळ्याची गोष्ट [कावळा आणि कुत्रा]:-

एकदा एका कावळ्याने सटवाईला काही वस्तू अर्पण करण्याचे ठरविले. त्यासाठी कुत्र्याला त्याने आपल्याबरोबर येण्याची विनंती केली. कुत्रा म्हणाला, 'देवीला तुझा इतका कंटाळा आहे की, तू दिलेल्या वस्तूंचा ती मुळीच स्वीकार करणार नाही.'

यावर कावळा म्हणाला, 'अरे, यासाठीच तर मी तिला वस्तू भेट देण्याचं ठरविलं आहे. तिचा माझ्यावरचा रोष दूर व्हावा आणि तिनं माझं कल्याण करावं या हेतूनेच मी तिला या वस्तू अर्पण करणार आहे.'

तात्पर्य - देव आपल्याला प्रसन्न होईल म्हणून देवीची पूजा करणारे खूप असतात. खर्‍या भक्तिभावाने देवाला पूजणारे थोडेच.

🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧

stories for kids in marathi || chan chan goshti

            Marathi story : 6

चिमणीची गोष्ट chimni chi goshta [पोपट आणि चिमणी]:- marathi stories for childrens

एका बागेत एक लहान पोपट रहात असे. त्याची व एका चिमणीची मैत्री झाली. चिमणी बागेत इकडेतिकडे उडया मारून आपले भक्ष्य मिळवीत असे व वरचेवर येऊन त्या पोपटास भेटत असे. तिचा प्रेमळ स्वभाव पाहून पोपटास आनंद होत असे.

तो एकदा आपल्या आईस म्हणाला, ‘आई, ही चिमणी किती चांगल्या स्वभावाची आहे! इतकी चांगली मैत्रीण दुसर्‍या कोणास क्वचितच लाभली असेल.’ हे ऐकून त्याची आई म्हणाली, ‘आणि तुझ्यासारखा मूर्ख मुलगाही दुसर्‍या कोणास क्वचितच लाभला असेल! ‘अरे, ही चिमणी आज तुला इतकी चांगले वाटते आहे, पण उदया हिवाळा सुरू झाल्यावर तू जेव्हा थंडीत कुडकुडत बसशील, तेव्हा ही मात्र तुझ्यापासून लांब कुठेतरी मजा करीत असेल.’

तात्पर्य :- कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी.

👨‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👦👩‍👩‍👧‍👧👨‍👦👨‍👧‍👦👨‍👧‍👧👨‍👩‍👧👨‍👨‍👧‍👧👨‍👨‍👧‍👧👨‍👧👨‍👦‍👦👪

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular 
Kids story कावळा चिमणीची गोष्ट chan chan goshti कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा