chan chan goshti | marathi goshti लहान मुलांचे गोष्टी marathi bodh katha
![]() |
Chan chan goshti |
नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता chan chan goshti व marathi bodh katha चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. लहान मुलांचे गोष्टी व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे marathi goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.
लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या chan chan goshti काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.
🐪🐘🐹🐿️🐼🦃🐓🐣🐧🕊️🐑🐪
Marathi goshti || Chan Chan goshti
MARATHI STORY 1
कबुतर आणि भांडखोर कोंबडे:- लहान मुलांचे गोष्टी [ chan chan goshti ]
एके काळची गोष्ट आहे. एक माणूस एका गावात राहत होता. त्याच्याकडे दोन कोंबडे होते. एक दिवस तो बाजारातून येत असताना त्याला एक माणूस कबुतर पक्षी विकत असताना दिसतो. त्याने विचार केला माझ्या मुलांना हा पक्षी खूप आवडेल आणि त्यांना छान वाटेल.
त्याने तो कबुतर पक्षी खरेदी केला आणि आपल्या घरी घेऊन आला. त्याने कबुतर पक्षाला कोंबडयांबरोबर ठेवण्याचा निर्णय घेतला. पण कोंबडे कबुतर पक्षाला त्रास देत असत. कोंबडे त्याच्या मागे मागे जात आणि त्याला आपल्या चोचींनी मारत होते.
एकदा कबुतर पक्ष्याने विचार केला की, हे मला का त्रास देतात. मी यांच्यासाठी नवीन आणि अनोळखी आहे आसे समजून हे माझ्याशी वाईट वागतात.
एक दिवस कबुतर पक्ष्याने पहिले की, ते दोन्ही कोंबडे एकमेकांमध्ये भांडण करत असतात. एकमेकांवर आपल्या चोचींनी वार करत आहे. तेव्हा तो स्वतःशीच म्हंटला की, मला यांच्या वागण्याचे दुख वाटून घेता कामा नये. मला यांच्या वागण्याची तक्रार पण करायला नको.
हे मला चोचींनी मारत आहेत. मी हे पाहू शकतो की, हे एकमेकांमध्ये देखील लढाई करू शकतात. हा तर त्यांचा स्वभावच आहे. आपण इच्छा असूनही कोणाचाही स्वभाव बदलू शकत नाही .
तात्पर्य - जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही .
🐪🐘🐹🐿️🐼🦃🐓🐣🐧🕊️🐑🐪
stories for kids in marathi & marathi stories with moral values
MARATHI STORY 2
भित्रा व शूर मित्र:-marathi bodh katha
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर दोन मित्रांवर हल्ला करतो. त्यातला एक मित्र जीव वाचवण्यासाठी पळून जाऊन लपून बसतो. पण दुसरा शूर मित्र चोराचा मुकाबला करतो आणि त्याला जखमी व निशस्त्र करतो.
हे पाहून डरपोक, भित्रा मित्र परत येतो. तिथे जवळ एक लाकूड पडलेलं असते ते लाकूड घेतो आणि चोराला म्हटला 'थांब आता मी तुला माझी बहादुरी दाखवतो. त्याला माहित होते की,चोर आता त्याचे काही नुकसान करू शकत नव्हता. त्यामुळे भित्र्या मित्राने परीस्थितिचा फायदा घेतला. तो चोरासमोर बढाया मारू लागला. शूर मित्र त्याला म्हणला, तू आता शौर्याचे नाटक नको करूस.
स्वत:ची हातातील लाकूड फेकून दे. तू अशा वागण्याने दुसऱ्यांना मुर्ख बनवू शकतो. मला तुझे खरे रूप कळले आहे. खंर म्हणजे तू येथेच थांबून माझी मदत करायला हवी होती. धीराचे शब्द उच्चारून माझा आत्मविश्वास वाढवायला हवा होता. मी पहिले आहे तू किती भित्रा आहे.
तू तुझा जीव वाचवून पळून गेलास. कुठल्याही संकटाच्या क्षणी तुझ्या सारख्या माणसावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. हे एकूण भित्रा मित्र खाली मान घालून तेथून निघून गेला.
तात्पर्य -विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नये
🐪🐘🐹🐿️🐼🦃🐓🐣🐧🕊️🐑🐪
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story: 3
कपटी साप आणि लाकुडतोड्या :- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ] marathi stories for childrens
हिवाळ्यातील गोष्ट आहे, एक दिवस सकाळी एक लाकुडतोड्या जंगलातून घरी जात होता. त्याला रस्त्यावर बर्फात एक साप पसरलेला दिसला. तो साप खूपच अशक्त होता. थंडीमुळे सापाची शारीरिक अवस्था खूपच खराब झाली होती, आकाशात उडणाऱ्या घारीने त्याला उंचावरून फेकले असावे, असे लाकुडतोड्याला वाटले.
लाकुडतोड्याला सापाची द्या आली. त्याला माहित होते की, जर सापाला अर्धमेल्या अवस्थेत सोडले तर कोणी न कोणी पक्षी त्याला खाऊन टाकेल.
लाकुडतोड्याने सापाला आपल्या कोटाच्या खिशात अलगद ठेवले आणि घरी घेऊन गेला. घर उबदार होते. घरात शेकोटी पेटविलेली होती. त्याने सापाला शेकोटी जवळ ठेवले. त्याच्या बायकोने सापाला औषध लावले आणि दुध पाजिले.
थोड्याच वेळात सापाला बरे वाटू लागले. लाकूडतोड्याच्या मुलांना साप खूप आवडला होता. एक मुलगा सापाला प्रेमाने गोंजराण्यासाठी पुढे जाऊ लागला. सापाच्या जवळ जाऊन मुलगा त्याला हाताळणार एवढ्यात सापाने बाळाला दंश करण्यासाठी फणा काढला.
हे पाहून लाकुडतोड्याने क्षणाचीही दिरंगाई न करता आणि उपकार न जाणणाऱ्या सापाचे कुऱ्हाडीने तुकडे केले. ज्या लाकुडतोड्याने त्याचे प्राण वाचविले होते त्याच्याच मुलाला दंश करण्यासाठी साप पुढे सरसावला आणि प्राण गमावून बसला.
तात्पर्य- उपकाराची फेड अपकाराने करण्याचा प्रयत्न केल्यास असेच होते.
🐪🐘🐹🐿️🐼🦃🐓🐣🐧🕊️🐑🐪
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story 4
हुशार मुलगा आणि चोर:- [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चोर होता. त्याला आपण चोर असण्याचा गर्व होता. त्याला वाटायचे की, आपल्या इतके हुशार कोणीच नाही. यथे मला
मला चोरी करण्यामध्ये कोणीच हरवू शकत नाही. तो सहज कोणालाही मूर्ख बनवत असे. तो कोठेतरी चोरी करायला गेला आणि चोरी न करता परत आला आहे अस कधीच झाले नाही .
एके दिवशी चोराने एका विहिरीजवळ एका मुलाला पहिले. तो मुलगा रडत होता. चोराने त्याला विचारले, "तू का रडत आहेस?" मुलाने त्याला दोरीचा एक तुकडा दाखवून म्हटले की, "या विहिरीत, माझी चांदीची बादली पडली आहे."
चोराने विचार केला, "पहिली मी याची बदली काढून देतो. मग याची बादली चोरुयात". विचार करून चोर मुलाला म्हणाला ,"तू रडणे थांबव" मी बादली शोधून काढतो.
त्याने कपडे काढले आणि विहिरीत उडी मारली. त्याने बादली शोधली, पण त्याला तिथे काहीच मिळाले नाही. जेव्हा तो विहिरीतून बाहेर आला.त्याने पहिले की, मुलगा त्याचे सगळे कपडे घेऊन गायब झाला होता. त्याने चोराला मूर्ख बनवले होते व चोर स्वताच फसला होता.
तात्पर्य- गर्वाचे घर खाली .
🐪🐘🐹🐿️🐼🦃🐓🐣🐧🕊️🐑🐪
marathi goshti || stories for kids in marathi
Marathi story: 5
हुशार बेडूक :- Kids story in Marathi ||chan chan goshti
फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे .एकदा एक राजा आपल्या मुलांसाठी राजवाड्याजवळ एक मोठ्ठ तलाव बांधतो आणि त्यात मुलांना खेळण्यासाठी मासे सोडतो.
तलाव तयार झाल्यावर त्याची मुलं तलाव पाहायला जातात. त्या तलावात सगळ्या माशांबरोबर एक बेडूकपण राहत असते. राजाच्या मुलांनी त्याअगोदर बेडूक कधी पाहिलेले नसते त्यामुळे त्यांना वाटते तलावात हा बेढब प्राणी कशाला? ते राजाला जाऊन सांगतात कि तलावात त्यांना न आवडणारा एक बेढब प्राणी आहे.
राजा लगेचच त्याच्या शिपायांना सांगतो कि त्या बेढब प्राण्याला मारून टाका. तेव्हा शिपाई तलावाच्या काठावर उभे राहून आपापसात काय करायचे ते ठरवू लागतात. कोणी सांगतात त्याला जाळून टाका, चिरडून टाका. सर्वांच्या वेगवेगळ्या सूचना येतात. शेवटी पाण्याला घाबरणारा वृध्द शिपाई सांगतो कि 'त्या प्राण्याला दूर वाहत्या पाण्यात फेकून द्या म्हणजे तो वाहत जाऊन खडकावर आपटेल आणि मरेल.'ते ऐकून हुशार बेडूक म्हणाले मला पाण्यात फेकू नका नाहीतर मी मरून जाईन.'
बेडूकाची याचना ऐकून शिपाई त्याला पटकन पाण्यात फेकून देतात. बेडूक जोरजोरात हसू लागते आणि म्हणते 'या मूर्ख लोकांना माहित नाही कि, मी पाण्यात किती सुरक्षित आहे.'
तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.
🐪🐘🐹🐿️🐼🦃🐓🐣🐧🕊️🐑🐪
मित्रांनो तुम्हाला या chan chan goshti लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
marathi bodh katha कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व marathi goshti आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा