सूर्य उगवला नाही तर निबंध || surya chi mahiti Marathi Nibandh || sun information in marathi

सूर्य उगवला नाही तर निबंध || surya chi mahiti Marathi Nibandh || sun information in marathi

Sun information in Marathi
Sun information in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! सूर्य उगवला नाही तर निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये surya chi mahiti Marathi Nibandh हा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून sun information in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Most Asked Marathi Essay आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये 2 निबंध surya chi mahiti वर उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया माझी sun information in marathi कडे.

🌕🌖🌔🌕🌖🌖🌗🌓🌔🌕🌗🌕


सूर्य उगवला नाही तर निबंध || surya chi mahiti Marathi Nibandh || Essay on Sun in Marathi


                        [No.1]

सूर्याचे एक नाव आहे 'दिनमणी'. दिन म्हणजे दिवस. मणी हा शब्द तेजोगोल ह्या अर्थाने वापरला आहे. दिवसा सार्या सृष्टीला दृष्यमान करणारा, 'तम निशेचा' संपविणारा, आणि सार्या चराचरांना ऊर्जेचा अविरत पुरवठा करणारा तो 'तेजोनिधी लोहगोल' आहे. सजीवांना जगण्यासाठी अन्नाची गरज असते. वातावरणातील पाणी व कर्ब-द्वि-प्राणिल यांच्या प्रकाश-संश्लेषणाद्वारे वनस्पती प्राथमिक अन्न तयार करतात. प्रकाशाचा मूळ स्त्रोत अर्थातच सूर्य. इथे हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, की सजीवांचा जीव-की-प्राण असलेल्या प्राणवायूचे पुनर्विमोचनही याच प्रकाश-संश्लेषण प्रक्रियेत होत असते. अशाप्रकारे सजीवांना प्राणवायू पुरविण्याचे कामही तो सूर्यच अप्रत्यक्षरित्या करीत असतो. सजीवांना पाण्याची नितांत गरज असते. ऋतुचक्र फिरते ठेऊन सप्तसिंधूंचे पाणी सजीवांना सोपविण्याची सोयही तो सूर्यच करतो. यावरून स्पष्टपणे जाणवते ते हेच की जीवनाचे दुसरे नावच सूर्य असावे. जर सूर्य नसेल तर जीवन संभवतच नाही.

संप ही प्रतिष्ठितांविरूद्ध कष्टकर्यांनी करावयाच्या संघर्षाची एक संकल्पना आहे. रशियन राज्यक्रांतीनंतरच्या समाजवादी युगात संप, ही संकल्पना रूढ झाली. मालकांकरवी आपल्या उचित मागण्या मान्य करवून घेण्यासाठी, विहीत काम करण्यास संघटीतपणे नकार देण्याचा हा हक्क आधुनिक जगाने मान्य केला. वारंवार क्रांतीची गरज भासू नये म्हणून, असहाय्य कामगारांनी, सशक्त व्यवस्थापनाशी, संघर्ष करण्याचा सनदशीर मार्ग म्हणजे संप.

सर्व सृष्टीची उलाढाल ज्याचे ऊर्जेविना अशक्य आहे तो सूर्य असहाय्य नाही, अशक्त तर नाहीच नाही. त्याला सृष्टीविरूद्ध संप जर करावयाचा असेल तर तेवढी सृष्टी सशक्त नाही. शिवाय आपले म्हणणे कुणी मान्य करावे ह्यासाठी सूर्य सृष्टीवर अवलंबून नाही. म्हणून 'सूर्य संपावर गेला तर.....' हे शीर्षकच विसंगत आहे. 'सूर्यावाचून जीवन' असा एक अर्थ त्यापासून काढता येईल व तशी कल्पना करता येईल. पण मग खरा प्रश्न तर हा असेल की 'सूर्यावाचून जीवन ...., किती काळ?' ह्या प्रश्नाची अनेक उत्तरे संभवतात. या शीर्षकाशी सुसंगत निबंध लिहायचा असेल, तर त्या उत्तरांचाच उहापोह करावा लागेल.

 महाभारतीय युद्धात अभिमन्यूनी रणांगणावर देह ठेवल्यानंतरचा दिवस. एक प्रहर दिवस शिल्लक असतांनाच सूर्य मावळतो. अन्यायाने अभिमन्यूचा शेवट करणार्यांना शासन करण्यास असमर्थ ठरलेला अर्जुन अग्निकाष्ठे भक्षण करण्यास सिद्ध होतो. हे असंभव दृष्य सदेह साजरे करण्यासाठी स्वत: जयद्रथ युद्धभूमीवर प्रकट होतो. आणि काय आश्चर्य, सुदर्शन चक्रापाठी अदृष्य झालेला सूर्य कृष्णलीलेने दीप्तीमान होतो. मग काय! 'हा सूर्य अन् हा जयद्रथ' असे कृष्णाने अर्जुनास सांगताच जयद्रथाचा वध होतो. अन्यायाचे परिमार्जन होते. काही काळच सूर्य अदृष्य होण्याचा हा किस्सा जगदविख्यात आहे. यात सूर्य अदृष्य होण्याचा निव्वळ आभास घडविलेला आहे. एरव्हीही सूर्याच्या अभावातच त्याच्या प्रभावाची जाणीव आपल्याला सदैव होत असते.

 चंद्राच्या पाठीमागे सूर्य दडतो तेंव्हा सूर्यग्रहण होते. काही काळच का होईना पण सूर्य (पूर्णत: किंवा भागश:) दिसेनेसा होतो. या काळात अज्ञात आकाशस्थ वस्तू, ज्या एरव्ही प्रखर सूर्यप्रकाशात दिसत नाहीत त्या दिसू शकतात. म्हणून अशा वस्तूंचा वेध घेण्याची संधी मिळते. म्हणूनच आजकाल ग्रहणांचा अभ्यास केला जातो. अशाप्रकारे काही काळ सूर्य (पूर्णत: किंवा अंशतः) दिसेनासा होण्याने खगोलशास्त्रात नवे शोध लागू शकतात.

 वैशाखवणवा संपतासंपता मौसमी वारे सिंधूसागरावरून काळ्याकुट्ट ढगांची फौज देशावर घेऊन येतात. रात्रीच काय पण दिवसाही दिसेनासे होते. भर दिवसा आकाशात सूर्य कुठे असावा हे सुद्धा सांगता येत नाही. दिवसचे दिवस, किंबहूना आठवडे-आठवडे सूर्यदर्शन होत नाही. सूर्याच्या नसण्याने काय होते त्याचे वर्णन करण्याची मुळी गरजच उरत नाही. प्रत्येकाला सूर्य कधी उगवेल याचीच भ्रांत पडलेली असते. कारण, कारण ..... . धुतलेले कपडे सुकत नाहीत. वातावरणातली वाढलेली आर्द्रता श्वसनाच्या रोगांचे भांडार उघडते, जसे की सर्दी, दमा, न्युमोनिया वगैरे वगैरे. रस्तोरस्ती तुंबलेले पाणी चिखलात रूपांतरित होत असते तर आजुबाजूची डबकी डासांच्या पैदाईशीची माहेरघरेच बनतात. माशांचे काफीले घराघरांवर आक्रमण करतात. कोकणात उडत्या पाखरांच्या पंखांनाही शेवाळं फुटावं अशी परिस्थिती असते. आणि म्हणूनच या सार्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सूर्याची अतिशय निकड भासू लागते. सूर्याच्या अभावानी नरक वाटू लागणारा परिसर, मग त्याचे प्रभावानीच स्वर्गवत होऊ लागतो. सूर्य प्रकटताच रोगराई आपला पसारा आवरू लागते, डास, माशांना पुढील पर्वणीची वाट बघावी लागते. रस्ते सुकून कोरडे पडतात. धुतलेले कपडे वाळू लागतात. पिके जोमाने वर येतात. अन् सुगीचे दिवस येतात.

                    मात्र बराच काळ सूर्य नसला तर पृथ्वीवर हाहा:कार उडेल. दैनंदिन ऊर्जेची आवक थांबेल. ऊर्जेचा जमवलेला साठा हळूहळू पण निश्चित स्वरूपानी कमी होत जाईल. मौसमी वार्यांना खीळ बसेल. ऋतुचक्र थांबेल. दिनचर्या, रात्रंदिन, अहर्निश हे शब्द अर्थहीन होतील. धृवप्रदेशाप्रमाणे भलीमोठी रात्रच काय ती शिल्लक उरेल. अंतत: तिथल्या प्रमाणेच सारी सृष्टी निर्जीव व बर्फमय होईल.

हे असे जर असेल तर, सूर्य नकोसा वाटेल असे कधी होऊ शकेल काय? हो! अशाही परिस्थितीची कल्पना करता येईल. आजही असे अनेक प्रदेश आहेत जिथे उन्हाळा कमालीचा तापतो. मग कविवर्य 'अनिल' वर्णन करतात 'केळीचे सुकले बाग' अन् 'कशी करू तुज सावली, माझ्या प्रितीच्या फुला' असा त्यांना प्रश्न पडतो. कवीयत्री इंदिरा संतांना 'वर आकाशी सूर्याची भट्टी तापली, तापली' ह्या वास्तवाचे वर्णन करावे लागते. जमिनीला तडे पडतात. जो सूर्य एरव्ही सप्तसिंधुंतून आपल्यासाठी पाणी आणतो, तोच सूर्य दिन प्रतिदिन, साठलेले पाणीही आकाशात उडवून लावतो. सारी सजीव सृष्टी पाण्यावाचून तडफडू लागते. अन् मग वाटतं की नको हा सूर्याचा ताप. अशावेळी, कल्पना करा की दर दिवशी सकाळी ११ ते दुपारी ४ सूर्यानी जर वामकुक्षी घेतली तर किती बरे होईल. तुम्ही विश्वास ठेवणार नाही. पण सध्यातरी हे खरेच शक्य आहे. भर उन्हाळ्यात उटीला जाऊन रहा. सूर्य माथ्यावर यायचाच अवकाश की आकाश ढगांनी भरून येईल. पावसाचा शिडकावा वातावरण कमालीचे गार करेल. अन् त्यावर इंद्रधनुष्ये विखुरण्यासाठी पुन्हा सूर्य आकाशात तळपू लागेल. यावरून एक वेगळेच वास्तव उघडकीस येईल. मानवाला स्वर्ग वाटेल असे वातावरण सूर्यच र्निर्मितो. पण ते सृष्टीवर जिथे असते तिथे सारेच लोक मात्र राहू शकत नाहीत. दैव, दैव म्हणतात ते हेच तर नाही!

 स्वर्गसमकक्ष सृष्टी सजते कधी? तर ऋतुचक्र पूर्ण होतांना! हिवाळा, ऊन्हाळा, पुन्हा पावसाळा अशाप्रकारचे ऋतुचक्र पूर्ण होते तेंव्हा सुगीचे दिवस येतात. स्वच्छ कोरडी हवा, ऊबदार सूर्यप्रकाश, भरपूर पाणी व विपूल अन्नधान्य यांनी सृष्टी संपन्न असते. स्वर्ग सृष्टीवर अवतरतो. आणि हो, हा स्वर्ग साऱ्यांनाच उपभोगता येतो. म्हणूनच सूर्य संपावर गेला तर ......  काय होईल ह्या निष्फळ चिकित्सेत उगाच न गुंतता सूर्य सजीवांना धार्जिणा होतो तेंव्हा ...... म्हणजेच ऋतुचक्र पूर्ण होतांना हिवाळयात, माणसे सण अन् उत्सवांत रमून जातात. अन् हीच या शिर्षकास समर्पक साठा उत्तरांची कहाणी नव्हे काय?

🌕🌖🌔🌕🌖🌖🌗🌓🌔🌕🌗🌕


सुर्य संपावर गेला तर मराठी निबंध surya ugavala nahi tar essay in marathi


                     [ No. 2 ]

सकाळी सहा वाजण्याच्या गजराने मला गाढ झोपेतून जाग आली. माझी सकाळची शाळा असल्याने मला न राहवून उठणे भाग होते. मी डोळे किलकिले करत.. उलट्या हाताने डोळे चोळत उठून अलार्म जवळ ओढले. पक्ष्यांचा किलकिल आवाज माझ्या कानांना जाणवत होता. त्या आवाजातच आलार्मचा कर्कश आवाज मिसळत होता. मी अलार्म बंद करून टेबलवर ठेवून दिले. त्याचवेळी एक गोष्ट माझ्या अचानक लक्षात आली.

आज घर एकदम सामसुम गाढ झोपेत विराजमान होते. म्हणजे माझ्या आईची रोज पाचला होणारी सकाळ आज सहा वाजले तरी तिला उठण्याचे ध्यानच राहीले नव्हते. मग आज शाळेला सुट्टी हा विचार करून मी टुणकन बेडवर उडी मारून ब्लँकेट अंगाभोवती लपेटून झोपून घेतले. पण रोज उठण्याच्या सवयीमुळे मला आज झोपायला मिळत असूनही झोपच येत नव्हती. आज काहीतरी विचित्र घडतय असं जाणवत होतं. मला काहीतरी विस्कटल्याचा भास होत होता. मी ब्लँकेट डोळ्यापर्यंत ओढून फक्त विचार करत होतो. पण आठ वाजले तरी सुर्य उगवायचे नावच घेईना.. आई कधीचीच उठलेली पण तिला काहीच काम करावेसे वाटेना. सगळ्यांना कंटाळवाणसं झालं होतं. आज सुर्यांने सुट्टी घेतल्यासारखे वाटत होते. रोज वेळेत उगवणारा सुर्य आज अचानक गायब होऊन बसलेला.

मी धावत पळत टेरेसवर गेलो. इकडून तिकडून मान वळवून पाहिले पण सुर्य काही दिसेचना. आता मोठी पंचाईत झालेली. मग आज दिवस पाहायलाच मिळणार नाही. मला चिंकीसोबत खेळताही येणार नाही. किती निष्ठूर झालाय ना सुर्य..? असं मी स्वतःशीच बडबडत दाणदाण पाय आपटत खाली पोचलो.

आईला माझा बदललेला नुर लगेचच काय तो लक्षात आला. मला पाय आपटत खाली येताना पाहून तिने हातातले काम तसेच चालू ठेवत एक नजर माझ्याकडे पाहून मला विचारले. “काय रे… असे पाय आपटायला काय झाले?

“बघ ना आई.. तो सुर्य आहे ना… तो रोज उगवतो ना गं… आज बघ ना कुठे लपून बसलाय.. कधीचा उगवायचे नावच घेईना. आईला आधी माझ्या बोलण्याने हसूच आले. पण तिने हसू दाबत मला जवळ बोलावून घेतले. आज आमच्या घरी कांदाभज्जीचा बेत चालू होता. आई ने एक गरम गरम भज्जी माझ्या हातात देत मला म्हणले. शोन्या.. तुला असते किनई संडेला सुट्टी.. मग तो बिचारा किती काम करतो… तो दमत नसेल का रे.? मग त्याला पण दिलेली असेल कि देवाने आजची सुट्टी. आई चे उत्तर जखमेवर फुंकर मारून काही वेळासाठी जखमेला थंडावा देण्यासारखं होतं. पण माझ्या मनाला तिचे काही पटेचना.

“अरे असं कसं होऊ शकत.? सुर्य उगवलाच नाही तर माणूस जगणार कसा? त्याला सुर्यापासून मिळणारे व्हिटॅमिन कसे मिळणार? अशाने झाडेसुध्दा उन्मळून पडतील.. सारं जग कसं ओसाड पडेल.. कुणी जगणारच नाही. जीवन जगण्या जितकं अन्नपाण्याची गरज आहे तितकच प्रकाषाचीही आहेच. मग सारं जग अंधारमय झालं तर?

मी असा विचार केला आणि माझ्या डोळ्यात पाण्याचे मोठे मोठे ढग उभे राहीले. एक थेंब टपकन पायाच्या अंगठ्यावर पडला. दुसरा मी गालावरच पुसून टाकला. मनान अस्वस्थता घेतली होती. इतुका जीव माझा आता मोठ्या मोठ्या विचारांत गढला होता. मी देवघरात धाव घेतली. देवाला सांगितल कि आजची सुर्याची सुट्टी कॅन्सल करून टाक… पण बिचारा खूप दमला असेल ना रे तो? मग तु दोन सुर्य का ठेवत नाहीस? माझी आई म्हणते कि बाबांची एकच शिफ्ट असते… बाबा दमतात म्हणून मग त्यांच्या जागेवर दुसय्रा शिफ्टला दुसरा माणूस असतो.. तु पण देवा.. दुसरा सुर्य ठेव ना… म्हणजे एका सुर्याला आराम करायला मिळेल. पण देवा आज सुर्याची सुट्टी कॅन्सल कर रे. आज संडेसुध्दा नाहीये.. मला स्कुल ला जायचय… आई बाबांना जॉब ला जायचय. सुर्य न उगवण्याने लोकं कंटाळवाणी बनलेयत..

शहरातल्या लोकांच एकवेळ ठिक आहे रे.. पण ज्या गावात अजून विजेचा पुरवठा झालेला नाही. त्या गावातल्या लोकांच सर्व काम कसं सुर्याच्या प्रकाषात चालत. मग सुर्य आज संपावर गेला तर त्यांचा आजचा सर्व दिवस खोळंबा होईल रे. त्यांच्यातली लोकं डोळे ताणून फक्त तुझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहात असतील. तुच जर असा अन्याय केलास तर त्यांच काय होईल रे. इतका निष्ठूर नको बनूस देवा… कृपा करून आज सुर्याला पाठवून दे.. मी देव्हाय्रात बसून कित्येक वेळ देवाला विनवत बसलेलो. मग काही वेळाने पुन्हा सुर्याच्या येण्याची काही चिन्हे दिसतात का ते पाहायला बाहेर आलो. पण तसे काही घडलेच नाही. दुरदुरपर्यंत सुर्याचे काही चित्रच दिसत नव्हते.

निराशेने मी माझ्या खोलीत परतलो. दाणकन बेडवर उडी मारली. पण मी बेडवर नाही तर जमिनीवर जाऊन आदळलो. कंबरेत जोराची विज सणकून गेली. डोळे चोळत मी उभा राहीलो. बाहेर पाहीलं तर सुर्य केव्हाचाच उगवलेला.. म्हणजे मला ते सुर्य संपावर गेल्याच स्वप्न पडलेलं. मी आनंदान उडी मारली. कॅलेंडरकडे नजर गेली… “अरे आज तर शाळेला सुट्टी… मी परत आनंदाने बेडवर लोळत पडलो… पण ते स्वप्न मला पुन्हा तसेच आठवू लागले…. खरचं सुर्य संपावर गेला तर….???

🌕🌖🌔🌕🌖🌖🌗🌓🌔🌕🌗🌕

सूर्य उगवला नाही तर निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे surya chi mahiti Marathi Nibandh or sun information in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा