म्हातारीची गोष्ट stories for kids in marathi || भोपळ्याची गोष्ट chan Chan goshti

म्हातारीची गोष्ट stories for kids in marathi || भोपळ्याची गोष्ट chan Chan goshti

म्हातारीची गोष्ट छान छान गोष्टी
म्हातारीची गोष्ट


नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता म्हातारीची गोष्ट stories for kids in marathiलहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. भोपळ्याची गोष्ट व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी वहां मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi उपलब्ध करून दिले आहे.Top 3 Moral stories in Marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत आहे.

लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


भोपळ्याची गोष्ट [ चल रे भोपळया टुणुक टुणुक ]:- कोल्ह्याची गोष्ट lahan mulancha marathi goshti


              एक होती म्हातारी. एकदा ती आपल्या लेकीकडे जायला निघाली. लेक रहायची दुसर्या गावाला. रस्त्यानं जाताना मधेच एक मोठे जंगल होत. म्हातारी काठी टेकत, टेकत रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. पण म्हातारी हुषार होती.
   
            ती म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही. त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठ मुठ्ठ होते, मग मला खा.' कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले.म्हातारी पुढे निघाली. तिला भेटला वाघ. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे, मी तुला खातो'. त्याने डरकाळी फोडली. म्हातारी त्याला म्हणाली 'मला खाऊन तुझे पोट भरणार नाही.त्यापेक्षा थोडे दिवस थांब. लेकीकडे जाते , तूपरोटी खाते, लठ्ठमुठ्ठ होते, मग मला खा. ' वाघाची अशी समजूत काढून म्हातारी पुढे निघाली.लेकीकडे गेली .

           ती खूप दिवस मजेत राहिली. खाऊन पिऊन लठ्ठमुठ्ठ झाली. थोडया दिवसांनी  तिला वाटले की आपण आपल्या घरी जावे तेव्हा तिला आठवले की  कोल्हा आणि वाघ आपल्याला खाणार आहे . तिने हे सर्व आपल्या लेकीला सांगितले  मग लेकीने तिला जादूचा भोपळा दिला . आपल्या घरी परत येताना तिने एक मोठा लाल भोपळा घेतला. त्यात बसून ती भोपळयाला म्हणाली ' चल रे भोपळया टुणुक टुणुक'. भोपळा रस्त्याने निघाला. वाटेत वाघाने भोपळा पाहिला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. चल रे भोपळया टुणुक टुणुक'. त्याबरोबर भोपळा जोरात पळू लागला.
   
         थोडं  पुढे गेल्यावर वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला 'म्हातारे, म्हातारे थांब!' आतून म्हातारी म्हणाली 'कशाची म्हातारी आणि कशाची कोतारी. कोल्ह्यानेही भोपळयाला थांबवण्याचा प्रयत्न केला.
     
           पण म्हातारी आतून म्हणाली 'चल रे भोपळया टुणुक टुणुक!'. पुन्हा भोपळा जोरात पळू लागला. अशी होती म्हातारी हुषार. कोल्हा आणि वाघाच्या तावडीत ती काही सापडली नाही. भोपळयात बसून ती सुखरूप आपल्या घरी पोचली.

तात्पर्य -  शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

🐆🐕🐩🐆🐶🐕🐅🐆🐶🐕🐆🐕

stories for kids in marathi & marathi stories with moral values

                   Marathi story: 2


राक्षस  आणि  राजा || लहान मुलांचे गोष्टी || story marathi


           एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्यला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकावतो 'आता मी तुला खाणार आहे.' राजकुमार म्हणतो, मी तुला माझ्या शस्त्रांनी ठार मारून टाकीन.

         राजपुत्र राक्षसाबरोबर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. राक्षसाला आश्चर्य वाटते, तो राजकुमाराला विचारतो. तू मला खरच घाबरत नाहीस?
राजकुमार त्याला म्हणतो,' माझ्या पोटाच्या बेंबीत हिरा आहे आणि तेच माझ मोठ शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तर तू देखील मरणार. त्यामुळे मला तुला घाबरण्याचे  काहीच कारण नाही.

        हे सर्व राक्षसाला खरच  वाटले आणि तो राजकुमारला सोडून देतो: परंतु प्रत्यक्षात राजकुमारच्या पोटात हिऱ्याचे शस्त्र वगैरे काहीच नसते.ते राजकुमारने केलेले एक नाटक असते शेवटी त्याला त्याचे हजरजबाबिपनाचेच शस्त्र वाचवते.

तात्पर्य -  शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

🤴👹👺👹👺👹👺👹👺👹👺🤴

parichay goshti || gavakadchya goshti in Marathi

                   Marathi story: 3


पती,पत्नी  आणि  गाढव Chan Chan goshti Marathi


    एका गावामध्ये पती आणि पत्नी आपल्या गाढवाला गावाच्या जत्रेत विकण्यासाठी घेऊन जात होते. पत्नी गाढवावर बसलेली आणि पती पायी चालत ते जात असतात .
        एवढ्यात रस्त्यावरील एकजण म्हणाला,"पहा!पत्नी  गाढवावर बसली आहे आणि पती पायी चालवत आहे."हे ऐकताच पत्नी  खाली उतरते  आणि तिने पतीला गाढवावर बसण्यास आग्रह केला .

      तेवढ्यात कोणी तरी म्हटले,"अरे व्वा!बिचारा पत्नी पायी येत आहे आणि तू गाढवावर बसला आहेस? तुला लाज नाही वाटत?"तिच्या पतीला काहीच सुचेना की काय  करावे.लोकांनी प्रश्न विचारू नये म्हणून  पती आणि पत्नी  दोघेही एकदमच गाढवावर बसले.

       काही वेळाने एका मुलीने त्या तिघांना पहिले. मुलगी म्हणाली,"केव्हापासून तुम्ही दोघे गाढवावर बसला आहात? जरा गाढवाला आराम द्या की!"

      लोकांच्या उलट-सुलट प्रतिक्रिया ऐकूनत्यामुळे तिघेपण पायी  चालू लागले.  ते पायी चालत आहे हे एका माणसाने पहिले तो म्हणू लागला कि,"गाढव असून पण पायी चालत आहे ".


तात्पर्य- आपण योग्य मार्गावर आसू तर आपण लोकांच्या उल-सुलट प्रतिक्रियांकडे लक्ष देता कामा नये.

👨‍👩‍👧🦄👨‍👩‍👧🦄👨‍👩‍👧🦄👨‍👩‍👧🦄🦄👨‍👩‍👧🦄

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
Kids story म्हातारीची गोष्ट or भोपळ्याची गोष्ट कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a comment