टोपी वाल्याची गोष्ट topiwala chi goshta || stories for kids in marathi ||chan chan goshti
![]() |
Topiwala chi goshta |
नमस्कार,माझ्या बालमित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज मी आपल्याकरिता टोपी वाल्याची गोष्ट topiwala chi goshta व लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी आमच्याकडे रेत असतो,त्यामुळे stories for kids in marathi उपलब्ध करून दिले आहे.Top 5 Moral stories in Marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत आहे.
लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.
👨👧👦👩👩👧👧👨👧👨👧👧👨👦👨👦👦👨👧👦👨👧👧👨👧👧👨👦👨👧👨👧👦
Marathi goshti || Chan Chan goshti
Marathi story: 1
topiwala chi goshta || topiwala ani makad chi goshta || टोपी वाल्याची गोष्ट
एक टोपीवाला होता. तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे. जाताना जंगल लागत असे. एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना तो थांबतो व झाडाच्या खाली जरा वेळ विश्रांती घेतो. तेव्हा तेथे झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या टोप्या घेऊन झाडाचे टोक गाठतात.
थोडया वेळाने, त्या टोपीवाल्याला जाग येते. पाहतो तर काय. पेटीतील सगळ्या टोप्या गायब. तो इकडे तिकडे बघतो. काहीच दिसत नाहीत. मग वर बघतो, तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या.
तो काळजीत पडतो. काय करावे हे त्याला सुचत नाही. तो त्यांना दगडे मारतो. पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात.
शेवटी वैतागून तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो. हे पाहून ती माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तेथून निघून जातो.
तात्पर्य : शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.
🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵
stories for kids in marathi & marathi stories with moral values
Marathi story: 2
माकड आणि गारुडी || लहान मुलांचे गोष्टी || story marathi
एका गावात एक गारुडी राहत असतो. त्या गारुडीकडे काही साप , एक माकड आणि इतर प्राणी असतात. तो गावोगावी जाऊन साप, माकड आणि दुसऱ्या प्राण्यांचे वेगवेगळे खेळ करून लोकांची करमणूक करायचा. त्याचे खेळ लोकांना आवडत असे त्यामुळे त्या प्राण्यांच्या जीवावर त्याचे पोट चालले असे. तो क्रूर गारुडी माकडाकडून आणि सापांकडून फक्त खेळच करून घेत असे .
त्यांना पोटभर खायला देत नसे. एक दिवस काहीच कारण नसताना गारुडयाने माकडाला खूप मारतो. मग माकड गारुडयाची नजर चुकवून लांब पळून जाते.
आता गारुडयाकडे फक्त साप उरतात . गारुडी त्यांचे खेळ करू लागतो. पण लोकांना आता त्याचे खेळ आवडेनासे झाले. जास्त पैसेही मिळत नव्हते. मग गारुड्याला कळलं कि लोकांना आपला खेळ माकड असल्यामुळे आवडायचा. आता तो गारुडी माकडाला शोधू लागतो. गारुड्याला माकड एका झाडावर बसलेलं दिसते.
गारुडी अश्रू भरल्या डोळ्यांनी माकडाला म्हणाला, ' माझ्या प्रिय माकडा, मला तुझी खूप आठवण येते ' माकड त्याला म्हणते, ' तुला माझी आठवण येते कारण लोकांना आता तुझा खेळ आवडत नाही ', आणि माकड तिथून पळून जाते. गारुड्याला त्याची चूक कळते आणि तो आपल्या प्राण्यांबरोबर प्रेमाने वागायला सुरुवात करतो.
तात्पर्य - जसाच तसे.
🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵
लहान मुलांचे गोष्टी मराठी गोष्ट || stories for kids in marathi
Marathi story: 3
गाढव, माकड आणि चिचुंद्री Chan Chan goshti Marathi
एके दिवशी एक गाढव आणि एक माकड बोलत बसले होते.
गाढव म्हणाले, 'माझे कान इतके लांब आहेत त्यामुळे मला सगळेजण हसतात आणि मला बैलासारखी शिंगही नाहीत.
माकड म्हणाले, 'माझ्या या लांबच लांब शेपटाची तर मला फारच लाज वाटते.
त्याऐवजी मला कोल्ह्यासारखी गोंडेदार शेपूट असतं तर किती मजा आली असती.
'हे सर्व ऐकून एक चिचुंद्री हळूच पुढे आली आणि म्हणाली, 'तुम्ही उगाच का रडत बसता?
मला तर शिंग नाहीतच, शेपूटही इतकं आखूड आणि डोळ्यांनी सुद्धा नीट दिसत नाही.
मग माझ्यापेक्षा तुमची स्थिती जास्त चांगली नाही कां ?'
तात्पर्य - देवाने आपणास काय दिले आहे, त्यात समाधानी रहावे.
🐒🐵🐒🦍🐒🐵🐒🦍🐒🐵🐒🦍
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story: 4
माकड आणि मासा [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]
एकदा एक तारू मुंबईजवळ एका खडकावर आपटून फुटले. तेव्हा त्यावर असलेले एक माकड समुद्रात पडून बुडू लागले. तेव्हा एका माशाला वाटले तो मनुष्यच आहे. म्हणून त्याला आपल्या पाठीवर घेऊन मासा किनार्याकडे निघाला. वाटेत त्याने माकडाला विचारले, 'अरे माणसा, तू कोणत्या गावचा ?'
माकडाने सांगितले, 'मी मुंबईचा?'
माशाने पुन्हा विचारले, 'गिरगावाची माहिती तुला आहे' आपण मनुष्य आहोत असे त्याच्या मनावर बिंबवावे म्हणून माकडाने उत्तर दिले, 'गिरगाव हे गृहस्थ माझे नातेवाईकच आहेत; माझे वडील आणि ते सख्खे भाऊ.'
या मूर्खासारख्या बोलण्याचा माशाला इतका राग आला की, त्याने त्या माकडाला ताबडतोब पाठीवरून फेकून दिले. त्याबरोबर ते समुद्रात बुडून मरण पावले.
तात्पर्य - खोटे बोलणे कधी न कधी उघडकीस येतेच.
🐒🐵🐒🐵🦍🐵🐵🐒🦍🐵🐵🐒
marathi goshti || stories for kids in marathi
Marathi story: 5
माकड आणि घंटी Kids story in Marathi
एकदा एक चोर मंदिरातील काही गोष्टी चोरतो. पकडल्या जाण्याच्या भीतीने तो पळू लागतो. खूप दिवस प्रवास केल्यानंतर तो एका मोठया डोंगरावर जातो. डोंगराच्या शिखरावर गेल्यावर आराम करण्यासाठी तो थोडया वेळ तेथे बसतो. अचानक तिथे एक वाघ येतो. त्या चोराला बघून तो वाघ त्याच्याकडे झेप घेतो, व त्याला मारून टाकतो. त्या झटापटीमध्ये चोराची पिशवी उघडली जाते व त्यातील वस्तु अस्ताव्यस्त जमीनीवर पसरल्या जातात. त्या चोरीच्या वस्तुंमध्ये मंदिरातील घंटाही होती.
माकडांचा एक झुंड तेथून जात होता, तेव्हा त्यांनी ती घंटा बघितली. ते ती घंटा उचलतात आणि वाजवायला सुरूवात करतात, त्यांना तो आवाज आवडतो. त्यामुळे ते ती घंटा वाजवतात व त्याबरोबर ते खेळतात.
डोंगराच्या पायथ्याशी एक छोटे गांव होते. त्या गावातील लोक अतिशय साधी होती. त्यांची एक विचित्र समजूत होती. डोंगरावरून येणाऱ्या घंटीच्या आवाजामुळे सर्व गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते व त्या डोंगरावर कोणीतरी राक्षस रहात आहे, तो राक्षस ती घंटी वाजवून आपण येण्याची सूचना देत आहे अशी बातमी गावकऱ्यांमध्ये पसरली.
त्यांना खात्री झाली की जो कोणी डोंगरावर जाईल त्याचा तो राक्षस बळी घेईल. अशा प्रकारच्या अनेक अफवा त्या गावात पसरल्या होत्या. अंधार झाल्यावर लोंकानी त्यांच्या घराबाहेर जाणे बंद केले होते. अगदी दिवसासुध्दा जेव्हा ते घंटीचा आवाज ऐकत असत तेव्हा त्यांचा भीतीने थरकाप होत असे. त्या सर्वांमध्ये एक शूर मुलगा होता. तो राक्षस व भूतांना घाबरत नव्हता, त्याचा असा विश्वास होता की प्रत्येक गोष्ट घडण्यामागे कारण असते. तो गावातील बाकीच्या लोकांवर हसत असे. तो त्यांना सांगत असे की, कदाचित काही माकडांना घंटी सापडली असेल व ते त्या बरोबर खेळत असतील. परंतु त्यावर कोणीही विश्वास ठेवत नव्हते.
एक दिवस एक सरदार गावातील सर्वांना एकत्र बोलवतो व सांगतो की, ‘जो कोणी त्या राक्षसाचा पाठलाग करून त्याला हाकलून लावेल त्याला बक्षिस देण्यात येईल.’ तो धाडसी मुलगा समोर आला व बोलला मी हे कार्य करीन.
दुसऱ्या दिवशी सकाळी तो बहादूर मुलगा शेंगदाण्यांनी भरलेली थैली घेऊन डोंगरावर जायला निघाला. सर्वजण त्याच्याकडे बघत होते आणि विचार करत होते की हा परत कधीही येणार नाही. प्रत्येकजण त्या मुलाबद्दल अशुभ बोलत होते.
डोंगराच्या शिखरावर पोचल्यावर घंटीचा आवाज येणाऱ्या दिशेकडे तो गेला. काही अंतर चालून गेल्यावर त्याने बघितले की, काही माकडे घंटी बरोबर खेळत आहेत. ते घंटी खेळण्यात इतके मग्न होते की तो मुलगा आल्याचे त्यांना समजले नाही. तो तेथे उभा राहीला व विचार करू लागला, ‘तर हाच तो राक्षस आहे का? आता जर गावकऱ्यानी माकडांना बघितले तर त्यांना स्वतःची लाज वाटेल.’
तो माकडांपासून घंटी परत घेण्याचा विचार करू लागला. त्याने थैलीतून शेंगदाणे काढले. आणि काही शेंगदाणे जमीनीवर फेकले. माकडांनी शेंगदाणे बघितले आणि ते घंटीबद्दल सर्व विसरून गेले. त्यानंतर त्यानी घंटी तिथेच फेकून दिली व शेंगदाणे खायला सुरूवात केली.
त्या हुशार मुलाने ती घंटी उचलली, आणि तो गावाकडे परत आला. त्याला गावामध्ये आलेला बघून सर्व गावकरी चकित झाले. तो गावातील सरदाराला भेटतो व बोलतो, मी त्या राक्षसाला पळवून लावले आहे त्याचा पुरावा म्हणून मी घंटी घेऊन आलो आहे.’ व तो ती घंटा सरदाराकडे देतो. सर्वांना त्याचा अभिमान वाटतो.
‘आता मी तुम्हाला खरे काय सांगतो, घंटा ही काही माकडांकडे होती. मी एक युक्ती केली, माकडांकडे काही शेंगदाणे फेकले व त्यांच्याकडून घंटी घेऊन आलो. व आता शेवटी तुमच्या सर्वांच्या हे लक्षात आले पाहिजे की, भूत किंवा राक्षस यासारखे काही नसते कोणाच्याही सांगितलेल्या गोष्टींवर स्वतः बघितल्या शिवाय विश्वास ठेवू नये.’
सर्वजण त्याच्याशी सहमत झाले. सर्वांना स्वतःची लाज वाटली त्या सर्वांनी त्याला आश्वासन दिले की, यापुढे भविष्यात मूर्खासारखे वागणार नाही. गावातील सरदाराने त्या बहाद्दूर मुलाला सांगितल्याप्रमाणे बक्षिस दिले.
तात्पर्य - कोणाच्याही सांगितलेल्या गोष्टींवर आपण स्वतः बघितल्याशिवाय विश्वास ठेवू नये.
🐒🦊🐱🐱🦊🐒🐈🦊🐵🐒🦍🐵
मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
Kids story टोपी वाल्याची गोष्ट topiwala chi goshta कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा