माकड आणि मगर makad ani magar chi goshta || माकडाची गोष्ट chan chan goshti

माकड आणि मगर makad ani magar chi goshta || माकडाची गोष्ट chan chan goshti

माकड आणि मगर गोष्ट
माकड आणि मगर


नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज मी आपल्याकरिता म्हातारीची गोष्ट stories for kids in marathi लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. भोपळ्याची गोष्ट व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी वहां मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi उपलब्ध करून दिले आहे.Top 3 Moral stories in Marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत आहे.

लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🐒🦍🐒🦍🐒🦍🐒🐵🐒🦍🐒🦍

Marathi goshti ||  Chan Chan goshti
       
                 Marathi story: 1


माकड आणि मगर magar ani makad chi goshta || माकडाची गोष्ट


    नदीच्या किनारी एक आंब्याचे  झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला शिकार मिळाली नव्हती म्हणूनच मगराला खूप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला. मला खूप भूक लागली आहे. मला काहीतरी खायला दे.

       भुकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची  फळे खायायला दिली. रोजच मगर माकडाकडे येउन आंबे  मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघे चांगले मित्र झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेली. ती अत्यंत गोड फळे खाल्ल्यावर मगराची बायको त्याला म्हणाली , ' इतकी गोड फळे खाणाऱ्या माकडाचे हृदय किती गोड असेल नाही का...?'

        माकडाचे हृदयच मला खाण्यासाठी आणून द्या. असा हट्ट बायकोने धरल्यामुळे मगराचा निरुपाय झाला. मगर निरुपायास्तव या कामासाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी  मगर माकडाला म्हणाला., प्रिय मित्र तुला माझ्या बायकोने घरी जेवणासाठी बोलावले आहे. चल आपण घरी जेवायला जाऊ.
मगर माकडाला पाठीवर घेऊन घरी जाययला निघाले.

      मगराला राहवले नाही म्हणून त्याने प्रिय  मित्राला सांगितले कि, ' माझ्या प्रिय पत्नीला तुझे हृदय हवे आहे,' म्हणून आपण घरी चाललो आहोत. अत्यंत हुशार असणाऱ्या त्या माकडाने क्षणाचाही विलंब न लावता मगराला  सांगितले कि, ' अरेरे..! माझे हृदय तर झाडावरच आहे.' मगर म्हणाला 'मग आपण परत झाडाकडे जाऊयात.'

          दोघेही नदीकिनारी पोहचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. सुरक्षित जागी पोहचल्यावर माकड मगराला म्हणाले, 'मित्रा तू विश्वासघातकी आहेस' निघ आता..! मगर खजील झाले. त्याने स्वत:चा चांगला मित्र गमावला होता.

तात्पर्य - कोणाचाही विश्वास घात करू नये.

    🐒 🦍🐒🦍🐒🦍🐒🦍🦍🐒

stories for kids in marathi & marathi stories with moral values
           
              MARATHI STORY 2


सुतार आणि  माकड || लहान मुलांचे गोष्टी ||moral stories in marathi माकडाची गोष्ट


          एका जंगलामध्ये सुतार लाकूड तोडायला जात असे. त्या जंगलामध्ये काही माकडे राहत होती. एके दिवशी सुतार लाकूड तोडत असताना काही माकडांनी पहिले. त्या माकडांना ते पाहून कुतूहल वाटले.

        दुपारच्यावेळी सुतार जेवण करण्यासाठी घरी जातो. त्यातील एका माकडाला सुताराची फजिती करावीशी वाटते, म्हणून तो तिकडे जाऊन लाकडामध्ये लावलेली पाचार काढण्याचा प्रयत्न करत असतो. तेवढ्यात जेवण करून सुतार तिथे येत असतो.
 
       जेव्हा माकड त्या सुताराला पहातो आणि घाबरून जातो. तो पळून जाण्याचा  प्रयत्न करत असतो परतुं , त्याच वेळेस माकडाची शेपटी लाकडामध्ये अडकते आणि त्या माकडाला  पळून जाता येत नाही. सुतार तिथे पोहचल्यावर त्याला माकड दिसते. माकडाचे हे कृत्य पाहून सुतार त्याला खूप मार देतो.   

तात्पर्य -आपण दुसऱ्यांच्या कामामध्ये ढवळाढवळ करता कामा नये.

🐒🦍🐒🐵🐒🦍🐒🐵🐵🦍🐒🐵

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 3


माकड  आणि  डॉल्फिन [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ] marathi stories for childrens


             एकदा एक नावाडी समुद्रकिनारी प्रवासाला निघाला. प्रवासात त्याने सोबत म्हणून एक माकड बरोबर नेले. प्रवासात असताना जोरदार वादळ सुटले. वादळामुळे बोट समुद्रात बुडते. नाविक पोहत किनाऱ्याला जावू लागला पण माकडाला जाता येईना हे सर्व डॉल्फिन मासा पाहत होता. डॉल्फिन माशाला दया आली व त्यांना  मदत करण्याचे ठरवते.
     
   एका डॉल्फिन माशाने माकडाला पाठीवर घेतले. डॉल्फिनने माकडाला माणूस समजून पाठीवर घेतले.

        डॉल्फिनला माणसाला खूप प्रश्न विचारायचे होते. डॉल्फिन पोहत किनाऱ्याकडे निघाला. त्याने माकडाला विचारले " तू अथेन्स शहरात राहतोस का?"

             माकडाने क्षणभर विचार केला आणि तो खोटे बोलला. माकड म्हणाला, होय मी अथेन्स शहरातील एका मोठ्या सरदार घराण्यात वाढलो आहे."
         डॉल्फिनने त्याला अथेन्स शहराजवळील प्रसिद्ध बंदराविषयी प्रश्न विचारला "तुला पायरायस माहित आहे का?"  माकडाला वाटले कि, पायरायस हा माणूस आहे. माकड पुनः एकदा खोटे बोलला हो. मी त्याला चांगलाच ओळखतो. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मी त्याला भेटायला कायमच उत्सुक असतो.

        डॉल्फिनला कळून चुकले कि माकड खोटे बोलत आहे. त्याने माकडाला तत्काळ पाण्यात फेकले. माकडाला त्याच्या खोटे बोलण्याची शिक्षा मिळाली. जर तो डॉल्फिनशी खरे बोलला असता तर तो किनाऱ्यावर सुखरूप पोहचला असता. जे आपणास माहित नाही ते माहित असल्याचा आपण करू नये.

तात्पर्य - नेहमी खरे बोलावे .

🦁🐵🐒🦍🦁🐵🐒🦍🦁🐵🐒🦍🦁🐵🐒🦍

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
Kids story माकड आणि मगर or  माकडाची गोष्ट कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा