ससा आणि कासव गोष्ट || stories for kids in marathi || सशाची गोष्ट chan chan goshti

ससा आणि कासव गोष्ट || stories for kids in marathi || सशाची गोष्ट chan chan goshti

ससा आणि कासव गोष्ट
सश्याची गोष्ट


नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज मी आपल्याकरिता ससा आणि कासव गोष्ट stories for kids in marathi लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. सशाची गोष्ट व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी वहां मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi  करूनमधून उपलब्ध दिले आहे.Top 3 chan chan goshti in Marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत आहे.

लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


ससा आणि कासवाची  गोष्ट:- lahan mulancha marathi goshti


    ही गोष्ट आहे ससा आणि कासवाची. एक होता ससा. ससा  सगळ्या गोष्टींमध्ये असतोना तसाच. गोरा गोबरा, मऊ, लांब कानांचा, मण्यासारख्या लालचुटुक डोळ्यांचा आणि टुण्ण टुण्ण उड्या मारत झटकन पसार होणारा. एकदा एका कासवाशी त्याची मैत्री झाली. पण कासव होतं हळू, जसं नेहमी असतं तसचं.

       ससा नेहमी कासवा समोर बढाया मारी. त्याच्यासमोर फुशारकी गाजावे. एकदा ससा असाच फुशारकी करीत कासवाला म्हणाला, माझ्या चपळते पुढे तू फारच क्षुद्र आहेस. माझ्याबरोबर चालण्याची, पळण्याची बरोबरी कोणीच करणार नाही.

       दोघेही एकाच पालकच्या मळ्यात कोवळा पाला खायला जायचे. ससा कासवाला म्हणाला,''किती रे तु हळू'' '' कासव म्हणालं, ''पण तुला माहिती आहे का, सगळ्या गोष्टींमध्ये ना मीच शर्यत जिंकतो.

          सशाला त्याचं हे म्हणणं जरा आवडलं नाही. नाक मुरडत ससा म्हणाला ''मग काय भाऊ लावायची का शर्यत परत एकदा? या समोरच्या डोंगरावरच्या त्या आंब्याच्या झाडापर्यंत''  कासवं म्हणालं '' हो पण जरा मला सराव करायला दोन दिवसांचा वेळ लागेल. तुला चालेल का?'' ससोबा म्हणाला, '' ठीक आहे मग रविवारी सकाळी नऊ वाजता इथेच भेटूया.''
   
          शर्यत ठरल्यानंतर ससा तडक त्याच्या आजोबांकडे गेला. त्यांना म्हणाला,'' हे काय हो आजोबा प्रत्येक गोष्टीत कासवंच शर्यत का जिंकतं. मला ही गोष्ट खोटी पाडायची आहे. आता काय काय करु ते सांगा.'' ससोबाचे आजोबा त्याला म्हणाले,'' बाळा, जर न थांबता धावलं ना तरच जिंकता येईल शर्यत आणि झोप तर अगदी वर्ज्य. मी झोपल्यामुळेच शर्यत हारलो होतो. '' ससा म्हणाला,'' ठीक आहे मी लक्षात ठेवीन आणि शर्यत जिंकूनच दाखवीन.''

             रविवारी सकाळी ठरलेल्या वेळेवर कासव आणि ससा यांची शर्यत सुरु झाली. ससोबा अगदी वेगाने धावत सुटले. कासवही निरनिराळ्या युक्त्या लढवत कधी घरंगळत तर कधी वेगाने चालण्याचा प्रयत्न करत निघाले होते. अर्ध्या रस्त्यात ससोबांना एक मोठी टोपली दिसली त्यातून कोवळा पाला, गाजरं आणि मुळे डोकावत होते. ससोबांनी अदमास घेतला.
     
            कासव अजून किमान दोन तास तरी त्यांच्या आसपास फिरकू शकणार नव्हते. ससोबा झाडाच्या सावलीत बसले आणि टोपलीतला पाला, गाजरं खाऊ लागले. टोपलीतल्या वस्तू संपत असताना ससोबांना एक छानशी गोल चमकणारी वस्तू दिसली. ससोबांनी ती आपल्या चेहर्या समोर धरली. तो एक आरसा होता. त्यांनी यापूर्वी ही वस्तू कधी पाहिलीच नव्हती.

             पाण्यात अस्पष्ट दिसणारं त्यांचं रुपडं इतकं स्पष्ट दिसत होतं की ससोबा हरखले. ते त्या आरशात स्वत:ला न्याहाळू लागले, लांबलांब कान, छानदार डोळे, मिष्कील मिशा. आपल्या चेहर्याच्या विविध मुद्रा पहाण्यात ते इतके रमले की शर्यत बिर्यत साफ विसरले. संध्याकाळी घरी जाणार्या सूर्याचे किरण आरशात दिसल्यानंतर ससोबांना शर्यतीची आठवण झाली.
     
            ते वेगाने टुण्ण टुण्ण उड्या मारत आंब्याच्या झाडापर्यंत पोहोचले, कासव तिथे त्यांची वाट पहात होते. ससोबा स्वत:शीच तणतणू लागले '' पण मी तर खूप पुढे होतो आणि आजोबांनी सांगितल्याप्रमाणे झोपलो पण नाही तरी कसा शर्यत हारलो.'' कासव म्हणाले,'' ससोबा मला सुद्धा आजोबा आहेत. तु जसं तुझ्या आजोबांना विचारलंस ना तसचं मी सुद्धा विचारलं आणि आम्ही दोघे ती भाज्यांची टोपली आणि आरसा कालच रस्त्यात ठेवून आलो होतो.'' खरोखर न थांबता पोहोचण्याचा प्रयत्न केला ना तरचं शर्यत जिंकता येते.


तात्पर्य- प्रयत्न केला तर यश मिळते.

🐰🐇🐰🐇🐰🐇🐰🐇🐇🐇🐇🐇

stories for kids in marathi & marathi stories with moral values

                   Marathi story: 2


ससा आणि सिंह || लहान मुलांचे गोष्टी || story marathi सशाची गोष्ट


          खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही  एका जंगलात एक क्रूर सिंह राहत होता. तो दररोज एका प्राण्याला ठार मारीत असे. एके दिवशी सर्व प्राणी एकत्र आले. सर्व प्राण्यांनी त्या सिंहाला तू प्राण्याना ठार मारू नकोस, अशी विनंती केली.

          माझ्या जेवणाच्या वेळी रोज एका प्राण्याला माझ्याकडे पाठवा. म्हणजे मी अन्य प्राण्यांना त्रास देणार नाही असे सिंह म्हणाला. ज्या दिवशी एकही प्राणी येणार नाही त्या दिवशी मी  तुन्हा सर्वाना ठार मरीन, अशी धमकी त्या सिंहना सर्व प्राण्यांना दिली.

         रोज ठरल्याप्रमाणे एक-एक प्राणी सिंहाकडे जाऊ लागला. एके दिवशी सशाची वेळ आली. तो सिंहाकडे जायला निघाला तेव्हा रस्त्यात त्याला एक विहीर दिसली. विहीर दिसताच सशाला एक कल्पना सुचली. भन्नाट कल्पना सुचण्याच्या आनंदात  ससा दिवस भर जंगलात फिरत राहिला. संध्याकाळी उशिरा तो सिंहाच्या गुहेपाशी गेला. सिंहाने त्याला गुरगुरतच विचारले - काय रे, दिवसभर तू कोठे होतास?
ससा अत्यंत नम्रपणे म्हणाला ' मी येतच होतो पण रस्त्यात मला दुसरा सिंह भेटला त्याने मला अडवले.'

          सिंहाने त्याला रागावूनच विचारले, 'कोठे आहे दुसरा सिंह?'  ससा म्हणाला चल मी दाखवतो. साशाच्यापाठोपाठ सिंहाची स्वारी निघाली, दोघेही विहिरीपाशी आले. ससा म्हणाला , महाराज तो सिंह या विहिरीत लपला आहे.

          सिंहाने  विहिरीत डोकावून पहिले. स्वत:चेच प्रतिबिंब त्याने पहिले. ते प्रतिबिंब म्हणजे त्याला  दुसरा सिंह वाटला. अत्यंत रागाने त्याने विहिरीत उडी मारली.  अत्यंत खोल असलेल्या विहिरीत तो सिंह पडला. आणि जंगलातील  प्राण्यांचा प्रश्न कायमचाच सुटला. सर्व प्राण्यांना खूप आनंद झाला.

तात्पर्य - शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ

🐰🦁🐰🦁🐰🦁🐇🦁🐰🦁🐇🦁

parichay goshti || gavakadchya goshti in Marathi

                   Marathi story: 3


ससा आणि शिकारी कुत्रा Chan Chan goshti Marathiएक ससा शेतात शिरला. तेथील कुत्रा त्याच्यामागे धावला. ससा पुढे व कुत्रा मागे अशी शर्यत बराच वेळ चालली. शेवटी कुत्रा थांबला व मागे परतला.ते पाहून बाजूला चरत असलेल्या काही बकऱ्या म्हणाल्या, "कुत्रा केवढा मोठा आणि ससा किती लहान. पण शेवटी ससा जिंकला आणि कुत्रा हरला.'ते ऐकून कुत्रा त्यांना म्हणाला, "बायांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मी रोजीरोटीसाठी धावत होतो, तर ससा प्राणासाठी धावत होता. मी नोकरी बजावायची म्हणून धावत होतो, तर ससा जिवाच्या आकांताने धावत होता. धन्यासाठी काम करणे आणि स्वत:साठी काम करणे हयात फरक असणारच.'

तात्पर्य : प्रत्येकाने आपापली कामगिरी व्यवस्थित-पणे पार पाडली पाहिजे.

🐇🐕🐰🐕🐇🐰🐕🐇🐕🐰🐕🐇

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच अनेक सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
Kids story सशाची गोष्ट or  ससा आणि कासव गोष्ट कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories in Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा