कोल्ह्याची गोष्ट chan chan goshti || stories for kids in marathi
![]() |
कोल्ह्याची गोष्ट |
नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज मी आपल्याकरिता कोल्ह्याची गोष्ट kolha chi goshta व लहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी वहां मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi मधून उपलब्ध करून दिले आहे.Top 6 Moral stories in Marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत आहे.
लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.
👨👧👦👩👩👧👧👨👧👨👧👧👨👦👨👦👦👨👧👦👨👧👧👨👧👧👨👦👨👧👨👧👦
Marathi goshti || Chan Chan goshti
MARATHI STORY 1
कोल्हा आणि द्राक्षे || kolha chi goshta lahan mulancha marathi goshti
एका जंगलात एक कोल्हा राहत होता. एके दिवशी, सकाळी त्या कोल्हाला भूक लागते. तो काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकू लागला. पण त्याला खायला काहीच मिळत नव्हते.एकदा कोल्हा खाण्याच्या शोधात फिरत फिरत एका द्राक्षाच्या वेलाजवळ आला. वेलीला द्राक्षाचे घोस लोंबत होते. ती पिकलेली सुंदर द्राक्षे पाहून कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटले. आणखी कुठे खायला मिळेल का, हे शोधण्यापेक्षा इथेच द्राक्षावर ताव मारावा असे त्याच्या मनात आले.
सगळीकडे द्राक्षांचे घडच घड लटकलेले दिसतात. कोल्ह्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो विचार करतो, ही फळे चवदार दिसत आहेत. मला ती पाहिजेत.
कोल्हा तिथे थोडा वेळ बसतो आणि द्राक्षांचे वेल आणि द्राक्षे नीट पाहत असतो. द्राक्षे खूप उंचावर असतात. त्याच्या पोहंचण्यापलीकडे उंच लटकत होती. त्यामुळे तो उडी मारून पिकलेले द्राक्षे पकडण्याचा प्रयत्न करू लागतो.
कोल्हा उड्या मारीत द्राक्षे खाण्याच्या प्रयत्न करू लागला. बराच प्रयत्न केला तरी द्राक्षे काही त्याच्या हाती लागेनात.खुप प्रयत्न करून सुद्धा तो द्राक्षापर्यंत पोहचू शकत नाही. तो पुन्हा पुन्हा उंचच उंच उड्या मारतो पण द्राक्षे नेहमी त्याच्या उंचीपासून लांबच लांब असतात. काही वेळाने तो उड्या मारून मारून दमून गेला.
त्यानंतर तो स्वतःशीच पुटपुटला, कोणाला खायला हवी ही आंबट द्राक्षे? मला तर नकोतच..! असे म्हणून तो तेथून निघून जातो. आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींचा तिरस्कार कारण खूप सोप्पं असतं.
तात्पर्य - अंथरून पाहून पाय पसरावे.
🐵🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵🐒🐵🐒
MARATHI STORY 2
stories for kids in marathi & marathi stories with moral values
दुष्ट कोल्ह्याला शिक्षा || लहान मुलांचे गोष्टी || story marathi
एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्हा कोल्हा म्हणाला,'' मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.
उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.
त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.
तात्पर्य : करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला प्राप्त होते.
🐅🐆🐕🐅🐕🐆🐅🐕🐅🐆🐕🐆
Marathi story 3
लहान मुलांचे गोष्टी मराठी गोष्ट || stories for kids in marathi
सिंह, लांडगा आणि कोल्हा Chan Chan goshti Marathi
जनावरांचा राजा जो सिंह तो एकदा फार आजारी पडला. पुष्कळ औषधोपचार केले, पण काही गुण येईना. त्याच्या समाचारास सगळे पशु रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे कोल्हयाचे व लांडग्याचे वैर होते.
लांडग्याने सिंहास सांगितले की, ‘महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात हजर राहात नाही, यावरून तो आपल्या विरुद्ध काहीतरी कारस्थान करीत असावा, असे मला वाटते.’ हे भाषण ऐकून सिंहास कोल्हयाविषयी संशय आला व त्याने त्यास ताबडतोब बोलावून आणण्यासाठी एका पशूस पाठविले. हुकुमाप्रमाणे कोल्हा दरबारात येऊन हजर होताच सिंह त्यास म्हणतो, ‘काय रे, मी इतका आजारी असता माझ्या समाचारास तू मुळीच येत नाहीस, याचे कारण काय बरे ?’ कोल्हा उत्तर करतो, ‘महाराज, आपल्यासाठी एकदा चांगलासा वैदय मी पहात होतो.
शेवटी कालच एका मोठया वैदयाची व माझी गाठ पडली; त्यास मी आपल्या प्रकृतीसंबंधीने विचारले, तेव्हा त्याने सांगितले की, नुकतेच काढलेले लांडग्याचे ओले कातडे पांघरावयास घेतले असता, हा रोग बरा होईल; याशिवाय अन्य उपाय नाही.’ कोल्हयाचे हे भाषण सिंहास खरे वाटले व त्याने कातडयासाठी लांडग्याचा तात्काळ प्राण घेतला.
तात्पर्य:- दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धारण करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.
🐅🐯🦁🐕🐯🦁🐆🐅🐕🦁🐯🐆
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story 4
कोल्हा, रानमांजर आणि ससा [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]
एक लहानसा ससा होता. तो खूप भित्रा होता. तो भित्रा ससा एका बिळात रहात असे. त्याने एके दिवशी आपल्या बिळाच्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले, तो खूप घाबरला. पण त्याने विचार केला की, बिळाचे तोंड लहान आहे. त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही. मग त्याची भीति कमी झाली.
नंतर, एक दिवस त्याने कोल्हा आणि रानमांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले. हे काही बरे नाही असे त्याला वाटले. थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्याला आपल्या पंजानी ओरबाडू लागले. ससा भिऊन बाहेर पळाला. तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली.
मरता मरता ससा म्हणाला, ‘तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखलं की आता आपली काही धडगत नाही.’
तात्पर्य -एकमेकांशी सतत भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो.
🐰🐆🐕🐆🐰🐇🐰🐇🐆🐕🐆🐕
short moral stories in marathi written || lahan mulancha chan chan goshti
Marathi story 5
हुशार कोल्हा आणि धूर्त कावळा :-
एक शेतकरी शेतामध्ये दुपारच्या वेळी झाडाखाली बसून जेवण करत असतो. तिथे त्याच्याबरोबर त्याची पत्नी आणि त्याचा लहान मुलगा जेवण करत असतो. त्या झाडावर तिथेच भुकेजलेला कावळा बसलेला असतो. त्याला खूप भूक लागलेली असते.
तो कावळा नजरचुकीने त्या छोट्या मुलाच्या हातातील भाकरीचा तुकडा पळवतो. एक कावळा, भाकरीचा मोठा तुकडा तोंडात धरून उडाला, तो एका उंच झाडावर जाऊन बसला. ते पाहून एक कोल्हा त्या झाडाखाली गेला आणि कावळ्याचा तोंडातला भाकरीचा तुकडा त्याला मिळावा म्हणून, कपटाने त्यांच्या सौंदर्याची तारीफ करू लगला; तो म्हणतो, ‘रे पक्ष्या, मी मी तुला खरेच सांगतो, तुझ्यासारखा देखणा पक्षी माझ्या पहाण्यात आजपर्यंत कधी आला नाही. तुझी पिसे काय सुंदर ! किती कोमल अहाहा ! तुझ्या शरीराचे तेज किती वर्णू ! तुझ्या अवयवांच्या ठेवणीकडे तर पहातच रहावे ! तुला इतके सर्व अनुकूल आहे, त्यावरून तुझा शब्दही तसाच चांगला असेल, असे मला वाटते. तो जर खरोखरच गोड असेल, तर मग तुझी बरोबरी कोण करणार आहे!’ ही स्तुती ऐकून आपण कोण, हे कावळा विसरला आणि अंमळ नटूनमुरडून मनात म्हणतो, ‘आपल्या स्वराच्या गोडपणाबद्दल यास शंका आहे, तेवढी काढून टाकावी.’ मग त्याने गाण्यास प्रारंभ केला ! तोंड उघडताच त्यात धरलेला भाकरीचा तुकडा खाली पडला, तो घेउन कोल्हा त्याच्या मूर्खपणास हसत हसत चालता झाला !
तात्पर्य:- आपल्या खोटया प्रशंसेस भुलून जे लबाडाच्या नादी लागतात, ते शेवटी बहुत करून फसतात.
🐆🐕🐆🐕🐆🐕🐆🐕🐆🐕🐕🐆
stories for kids in marathi || chan chan goshti
Marathi story : 6
हुशार कोल्हा parichay goshti || marathi fairy tales || marathi stories for childrens
एक जंगल होते तिथे सर्व प्राणी रहात होते. एके दिवशी जंगलाच्या मद्यभागी कोल्ह्यला एक मेलेला हत्ती दिसतो पण तो हत्तीच्या जाड कातडे असल्यामुळे तुकडे करून खाऊ शकत नसतो.
थोड्या वेळाने तिथे सिंह येतो. कोल्हा म्हणतो ,महाराज मी तुमच्या जेवणाचे रक्षण करत आहे. सिंह म्हणतो मी दुसर्यांनी शिकार केलेले प्राणी खात नाही. सिंह निघून जातो. कोल्ह्यला असा कोणीतरी हवा असतो की जो हत्तीच्या कातडयाचे तुकडे करू शकेल आणि त्यामुळे कोल्हा हत्तीचे मांस सहज खाऊ शकेल.
लवकरच तिथे चित्ता येतो. कोल्हा म्हणतो, सिंहराजाने या हत्ती ला मारलेले आहे. तो त्याच कुटुंब आणण्यासाठी गेला आहे. तो पर्यंत खाऊन घे. 'चित्ता म्हणतो अरे पण ...! सिंह मला मारून टाकिल ना.. तेव्हा कोल्हा म्हणाला तू जा आणि त्या हत्तीचे मांस खायला लाग.सिंह जवळ येताना दिसला कि मी तुला इशारा करीन.
चिता हतीच्या मांसावर तुटून पडतो. चिता मांस वरील कातडी फाडतो तेव्हा कोल्हा त्याला सिंह आल्याचा खोटा इशारा देतो आणि चित्ता पळून जातो. कोल्हा खाली बसतो आणि जेवणाचा आंनद लुटतो.
तात्पर्य- शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
🐕🐶🐆🐕🐶🐕🐅🐆🐕🐶🐆🐕
मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच अनेक सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
Kids story कोल्ह्याची गोष्ट chan chan goshti कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा