माझा आवडता प्राणी maza avadta prani Marathi Nibandh | my favourite animal essay in marathi

माझा आवडता प्राणी maza avadta prani Marathi Nibandh | my favourite animal essay in marathi

Maza avdata prani
Maza avdata prani

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! माझा आवडता प्राणी निबंध करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये maza avadta prani Marathi Nibandh येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून my favourite animal essay in marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये माझा आवडता प्राणी  निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया maza avadta prani Marathi Nibandh कडे.

🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕


maza avadta prani माझा आवडता प्राणी|| my favourite animal dog essay in marathi


तसे मला प्राणी फारसे आवडत नसत, मला प्राण्यांची थोडी भीतीच वाटत असे. पण आता एका प्राण्याची मला आजिबात भीती वाटत नाही तो म्हणजे, आमचा “ब्रूनो”.

ब्रूनो हा आमचा माझा पाळीव कुत्रा आहे. तो जेमतेम १ वर्षांचा आहे,पण तो वाटतो ३ ते ४ वर्षांचा. मागच्या वर्षी माझ्या घराशेजारच्या परिसरात त्याचा जन्म झाला. दुर्देवाने काही दिवसात त्याच्या आईला एक गाडीने उडवले. बिचारी दोन पिल्ले आई शोधात होते. मला तसे प्राणी आवडत नसत, पण त्या दोन पिल्लांची अवस्था बघून मला आणि माझ्या मित्राला दया आली. आम्ही दोघांनी एक एक पिल्लू घरी आणले.

हलका तांबूस रंग, टपोरे डोळे, बघता क्षणीच तो घराच्या सर्वाना आवडला. त्याच्या ब्रूनो नावामागे हि एक गम्मत आहे. घरी आल्यावर त्याचे काय ठेवणार यावर चर्चा सुरु झाली. कोणी म्हणे टॉमी, तर कोणी म्हणे टायगर, मला काहीतरी वेगळं नाव ठेवायचे होते. एके दिवशी मी माझ्या एका आवडत्या इंग्रजी गायकाचे गाणे ऐकत होतो, त्याचे नाव आहे “ब्रूनो मार्स”. त्या क्षणी मी ठरवले, त्या चिमुकल्याला मी ब्रूनो म्हणणार. आई, बाबा, आजीला सुरवातीला थोडे अवघड वाटले, पण नंतर सवय झाली.

सुरवातीला त्याची सर्व काळजी मी घेत असे. त्याला अंघोळ घालणे, खायला घालणे, खेळवणे, डॉक्टरकडे घेऊन जाणे आदी. काही महिन्यांत मात्र सगळ्यांना त्याचा लळा लागला. आता आम्ही सर्व मिळून त्याची काळजी घेतो.

मागच्या सुट्टी मध्ये मी कुत्रा आणि मानव यांच्यातल्या खास नात्याबद्दल वाचायला लागलो. मला असे कळले की, दुसऱ्या कुठल्याही प्राण्यापेक्षा कुत्राचे आणि माणसाचे दृढ आणि विश्वासाचे असते. या नात्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. कुत्रे अगोदर जंगलात राहत असत, म्हणूनच त्यांना जंगली कुत्रे म्हणत. अजूनही काही कुत्रांच्या जाती कोल्हे आणि लांडग्यांसारख्या दिसतात. हळू हळू मानवाने कुत्र्यानं पाळीव बनवण्याच्या पद्धती शोधून काढल्या.

हि पाळीव कुत्री मानवाच्या घराची राखण करत, शिकारी प्राणी आले की ते आपल्या मालकाला सावधान करत. मग ते मानवाला शिकारी मध्ये सुद्धा मदत करू लागले. कुत्रांची एक खासियत जी मनुष्याला उपयोगी पडते ती म्हणजे त्याची हूंगण्याची क्षमता. कुत्रे वासाचे विश्लेषण मानवापेक्षा ४० पटीने जास्त चांगल्या प्रमाणाने करतात. म्हणूनच गुन्हेगार किंवा बॉम्ब शोधण्यात त्यांची मदत घेतली जाते. शेकडो वर्षांच्या अश्या प्रवासानंतर कुत्रा हा आता पाळीव प्राणी झाला आहे. आता जंगली कुत्रे खूप क्वचितच पाहायला मिळतात. आता कुत्रा आणि मानवाचे नाते हे आणखी प्रबळ झाले आहे. आता आपण कुत्रा घर राखण्यासाठी घेत नाही. आता लोक कुत्र्यांना, मांजरांना अगदी मित्रच नव्हे तर मुलांसारखे मानतात. आजकालच्या स्वतंत्र जीवनशैलीमध्ये लोक एकटे एकटे पडतात, अश्या कुत्रा, मांजरीसारखे प्राणी त्यांना एक मानसिक आधार देतात, त्यांना एक विरंगुळा देतात.

मला हे सारे विचित्र वाटायचे, पण आता एक वर्षांनंतर कळते की ब्रुनो हा आता माझा फक्त मित्र झाला नाही तर, आमच्या कुटुंबाचा जणू एक सदस्यच झाला आहे.

🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕🐕

माझा आवडता प्राणी निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे maza avadta prani or my favourite animal essay in marathi आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा