computer information in marathi संगणक शाप की वरदान Marathi Nibandh

computer information in marathi संगणक शाप की वरदान Marathi Nibandh

Computer information in Marathi
Computer information in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! computer information in marathi nibandh करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये संगणक शाप की वरदान निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून computer mahiti marathi विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.


शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये संगणक शाप की वरदान निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया computer information in marathi कडे.

🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️


संगणक शाप की वरदान Marathi Nibandh ||computer mahiti marathi


तांत्रिक प्रगतीच्या आधुनिक जगात संगणक म्हणजे विज्ञानने आम्हाला दिलेली एक अद्भुत भेट आहे. यामुळे लोकांची राहणीमान व जीवनमान बदलले आहे. संगणकाशिवाय जीवनाची कल्पना कोणीही करू शकत नाही कारण त्याने कमी वेळात बरीच कामे सुलभ केली आहेत. संगणक विकसनशील देशांच्या विकासात मोठी भूमिका बजावत आहे. हे केवळ स्टोरेज किंवा प्रोसेसिंग डिव्हाइसच नाही तर हे एका देवदूतासारखे आहे जे काहीही शक्य करु शकते. बर्‍याच लोकांद्वारे याचा वापर मनोरंजन आणि संप्रेषणाचा स्रोत म्हणून केला जातो.

व्हिडिओ चॅट किंवा ईमेलच्या माध्यमातून आम्ही आमच्या मित्रांसह, नातेवाईकांशी, पालकांशी किंवा इतरांशी संपर्क साधू शकतो. संगणकात इंटरनेट वापरुन आम्ही आपल्या शिक्षण किंवा प्रकल्प कार्यासाठी उपयुक्त असलेल्या कोणत्याही विषयावरील विपुल माहिती शोधू आणि परत मिळवू शकतो.

कोणत्याही खात्यात बँकांमार्फत व्यवसायाच्या व्यवहारासाठी हे अतिशय सुरक्षित आणि सोपे आहे. डाटा स्टोरेजची सुविधा उपलब्ध करून देऊन शासकीय आणि अशासकीय कार्यालयांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये कागदाची कामे कमी झाली आहेत. संगणकाद्वारे घरी राहून ऑनलाइन शॉपिंग, बिल भरणे इत्यादीद्वारे बरेच लोक आणि वेळेची बचत करू शकतात.

कौशल्याची पातळी वाढविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक जीवनात सुलभता वाढविण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये आणि इतर शैक्षणिक संस्थांमध्ये भारत सरकारकडून संगणक शिक्षण सक्तीचे केले गेले आहे. आधुनिक काळातल्या सर्व कामांमध्ये संगणक शिकणे खूप आवश्यक आहे. उच्च शिक्षणामध्ये नेटवर्क प्रशासन, हार्डवेअर मेंटेनन्स, सॉफ्टवेअर इंस्टॉलेशन इत्यादी विषय आहेत जे कौशल्य वाढविण्यासाठी आहेत.

                1970 सालात हिंदुस्थानात संगणक आला. झटपट काम करणारे जादुचे यंत्र अशी किर्ती असलेला हा संगणक इंग्रजी पुस्तकात धडा म्हणून होता.
 
               त्या काळातला संगणक अत्यंत कमी स्मरणशक्ती साठ्वणारा भल्या मोठया आकाराचा होता. त्यात विशिष्ट पंचकार्ड वापरले जायचे. आता लॅपटॉप, पामटॉप असेछोटेछोट आणी भरपुर स्मरणशक्ती असलेले संगणक जागतिक जीवनाच महत्वाच्‍ अंग होत चालले आहेत.

               या जुन्या आठवणींवर जुन्या कमी स्मरणशक्तीच्या फ्लॉपी, सीडी वापरात असणारे मोठे मोठे संगणक भंगारात जाउन छोटे छोटे जास्त स्मरणशक्ती साठ्वणारे संगणक या भुतलावर अवतरले. स्टीव्ह जॉबज याने हा संगणक स्वतःच्या वडीलांच्या गॅरेजात बनवला तेव्हां त्याची किंमत 666 डॉलर एवढी होती.
     
               केबी,एमबी,जीबी,टी.बी करीत संगणक स्मरणशक्ती वाढ्वत गेला. त्याचा जगातील वापरही वाढत गेला नेट,फेसबुक,आयपॉड अशी उत्क्रांती ही वाढत गेली संगणकाने मानवी जीवनातली  सर्व क्षेत्र कमी वेळात व्यापुन टाकली. त्यामुळे माणसाच्या जीवन शैलीचा चेहरा मोहराच संगणकाने बदलुन टाकला.    आणी आता तर संगणकाच्या करामतीने खरा चेहराही बदलण शक्य झाल आहे. त्यामुळे त्याचा उपयोग जास्त प्रमाणात सिनेमा सृष्टीत व्हायला लागला आहे.
     
               ऑस्कर विजेते  60 वर्षीय अभिनेते जेफ बिजेश यांनी पुन्हा एकदा तिशीतल्या तारुण्यात नेण्याच काम संगणकाने केले आहे. त्यामुळे हा 60 वर्षीय म्हातारा 30 शीतला तरुण म्ह्णुन चित्रपटात काम करणार आहे .आतापर्यंत एखादी व्यक्तीरेखा सिनेमात लहानपणापासुन वृद्धत्वापर्यंत दाखवताना किमान तीन जणांना ती साकारावी लागत असे आणी त्यामुळे काही बारकावे नजरेआड करावे लागत असत  संगणकातील सर्वात नवीन आणी धक्कादायक क्रांती आपल्या समोर आहे

                 हिंदुस्थानात संगणक आला तेंव्हा परदेशात रहाणारी आपली मुल रोज रात्री आपल्याशी बोलु लागली तिथे काय करताआहेत ते घर बसल्या दिसु लागली. त्यामुळे मुल लांब गेल्याच दुःख कमी झाल. मुल घरातच असल्याचा भास होऊ लागला. त्यामुळे सुखदुःख वाटता आली ही हिंदुस्थानातील्‍ आईबाबांना एक पर्वणीच ठरली.
जे काही मनात आहे ते संगणकामुळे दाखवु व बोलुही शकली.

                 संगणकावर आपले विचार कथा, कविता,पाककृती,गोष्टी लिहिता येतात त्यासाठी प्रकाशकाची किंवा वृत्तपत्रकारांची गरज लागत नाही. प्रसिद्धिसाठी कुठल्याही माद्धमाची गरज नाही. जो संगणक वापरतो तो ती माहीती वाचु शकतो आणी आजच्या घट्केला संगणक न वापरणारा मिळणच कठिण झाल आहे त्यामुळे संगणक माणसाचा मित्र,सोबती झाला आहे.

                 पुस्तक वाचा ,गाणी ऐका,चित्र काढा पत्ते खेळा किंवा इतरही विविध खेळ खेळा एकाच वेळी बर्‍याच व्यक्तींशी चाट करा स्वतःची कामे करा,हिशोब ठेवा किंवा दुसर्‍याकडुन माहीती मिळ्वा आपल्याकड्ची माहीती दुसर्‍याला पोहचवा अगदी क्षणात शक्य झाले आहे.

                आज संगणकाचा आकारही लहान म्हणजे आपल्या तळहाताएवढा झाला आहे. आणि किंमतही पहिल्यापेक्षा खुपच कमी झालेली आहे ज्यांना टाईप करायचा कंटाळा आहे त्यांना संगणकावर विशिष्ट काठीने लिहीता येत. लिहिलेले जतनही करता येत. पुस्तकरुपी छापताही येत किती गोष्टी हा संगणक करतो. जादुच कपाट म्हणाव इतकी मजल हया संगणकाने मारली आहे.
 आपण जाऊ तिथे त्याला बरोबर नेता येत  खर्‍या अर्थाने संगणक माणसाचा सोबती झाला आहे

                 आपल्याला हव्या त्या भाषा निवडीच स्वातंत्रही त्यात उपलब्ध आहे त्यामुळे मराठी माणसे संपुर्ण मराठीतुन संगणकावर काम्‍ करु शकतात. पूर्वी इंग्रजी येणारेच त्यावर हक्क दाखवायचे भाषा निवडीच्या स्वातंत्र्यामुळे घराघरातुन लहान मोठ्यांचा ,वृद्धांचा संगणक सोबती झाला आहे. काही ठिकाणी तर इंग्रजीतून टाइप केल्यावर ते आपोआप मराठीत बदलते ही किमया लोकसत्ता वर्तमान पत्राने वाचकांना मिळ्वून दिलेली आहे . आपली प्रतिकिया आपण मराठी शब्द इंग्रजीत लिहावीत ती मराठीत बदलतात. हा बदल तर क्रांती घडवतो आहे. असा हा संगणक लहान थोराचा खर्‍या अर्थाने सोबती, मित्र्‌ बनला आहे. मानवाची विचारशक्ती  इतकी भन्नाट आहे की अजुनही भरपुर बदल संगणकात सतत होतच रहातील यात शंकाच नाही.

🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️💻🖥️

computer information in marathi nibandh तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे संगणक शाप की वरदान or computer mahiti marathi nibandh आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा