Mangesh padgaonkar kavita मंगेश पाडगावकर कविता | Marathi poem

Mangesh padgaonkar kavita मंगेश पाडगावकर कविता |  Marathi poem

Mangesh padgaonkar kavita in Marathi
Mangesh padgaonkar poem

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! Mangesh padgaonkar kavita तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.मंगेश पाडगावकर कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Mangesh padgaonkar kavita माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi poem उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Mangesh padgaonkar kavita Marathi poem उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया मंगेश पाडगावकर कविता कडे.

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय By Mangesh padgaonkar



सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचुन, सुट्टी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

भोलानाथ भोलानाथ, खरं सांग एकदा
आठवड्यातून रविवार, येतील का रे तीनदा ?

भोलानाथ उद्या आहे, गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ भोलानाथ चॉकलेट मिळेल काय ?
आकाशातून वेफर्सचा पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा शंख मिळेल काय ?
भोलानाथ परीसारखे पंख देशील काय ?


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी By Mangesh padgaonkar


डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना, सांगू नको कहाणी

कामात गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू, माझी उदास गाणी

वाटेवरी खुणेच्या, शोधू नको फुले ती
ना ठेविते फुलांची माती इथे निशाणी

कळणार हाय नाही, दुनिया तुला मला ही
मी पापण्यांत माझ्या, ही झाकिली विराणी


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी By Mangesh padgaonkar


अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी, संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते, डोळ्यांतील पाणी
जखम उरी होते ज्यांच्या, तेच गीत गाती

सवर् बंध तोडूनी जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे, हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा, आणिक जवळ मात्र काटे
असे फुल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडीत धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला ह्या स्वरांनी
डोळ्यांतून माझ्यासाठी लाव दोन ज्योती

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले By Mangesh padgaonkar


जाहल्या काही चुका अन्‌ सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले

चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले

सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन्‌ विंधणाऱ्या वेदना
मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले

संपता पूजा स्वरांची हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे By Mangesh padgaonkar


जरि या पुसून गेल्या साऱ्या जुन्या खुणा रे
हा चंद्र पाहताना होते तुझी पुन्हा रे

त्या बावऱ्या कळीने ते स्वप्न पाहिलेले
वेड्या क्षणास एका सर्वस्व वाहिलेले
छळतो अजून जीवा तो लाजरा गुन्हा रे
ते श्वास कापरे अन्‌ आभास सावल्यांचे
रे चांदणेच झाले डोळ्यांत बाहुल्यांचे
अन्‌ सूर सूर झाल्या त्या सर्व भावना रे

नाही विचार केला, मी पाहिले न मागे
आले तुझ्याकडे मी तोडून सर्व धागे
का घालिता उडी ही घर आठवे कुणा रे ?

मी घातली उडी हा नच दोष रे कुणाचा
चुरडे कळी मनाची हा खेळ प्राक्तनाचा
स्वप्ने विरुन येते हातात वंचना रे

हरवून स्वप्न गेले, अश्रूच आज जागे
वेडी तुझी कळी ही बघते वळून मागे
का पापण्यांत मिटते निःशब्द वेदना रे ?


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती By Mangesh padgaonkar


अखेरचे येतिल माझ्या हेच शब्द ओठी
लाख चुका असतिल केल्या, केली पण प्रीती

इथे सुरु होण्याआधी संपते कहाणी
साक्षीला केवळ उरते डोळ्यांतिल पाणी
जखम उरी होते ज्यांच्या तेच गीत गाती

सर्व बंध तोडुनि जेव्हा नदी धुंद धावे
मीलन वा मरण पुढे हे तिला नसे ठावे
एकदाच आभाळाला अशी भिडे माती

गंध दूर ज्याचा आणिक जवळ मात्र काटे
असे फूल प्रीती म्हणजे कधी हाय वाटे
तरी गंध धुंडित धावे जीव तुझ्यासाठी

आर्त गीत आले जर हे कधी तुझ्या कानी
गूज अंतरीचे कथिले तुला या स्वरांनी
डोळ्यांतुन माझ्यासाठी लाव दोन ज्योती


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


आम्‍लेट By Mangesh padgaonkar


कोंबडीच्‍या अंड्यामधून
बाहेर आलं पिल्‍लू ;
अगदी होतं छोटं
आणि उंचीलाही टिल्‍लू !
कोंबडी म्‍ह्‍णाली,” पिल्‍लूबाय,
सांग तुला हवे काय ?
किडे हवे तर किडे,
दाणे हवे तर दाणे ;
आणून देईन तुला
हवे असेल ते खाणे !
पिल्‍लू म्‍ह्‍णाले,” आई,
दुसरे नको काही
छोट्याशा कपामध्‍ये चहा भरुन दे ,
मला एका अंड्याचे आम्‍लेट करुन दे !

मंगेश पाडगावकर


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


मन मोकळं, अगदी मोकळं करायचं By Mangesh padgaonkar


मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं !

सूर तर आहेतच : आपण फक्त झुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत ?
डोळे उघडून पहा तरी :
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत !

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं !

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा !

झुळझुळणार्या झर्याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या !

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं !
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं !


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा By Mangesh padgaonkar


तिची का रंगते मेंदी नका मागू खुलासा
तिच्या रंध्रांत मी अद्यापही आहे जरासा

जरी नाहीत भेटी , बोलणे नाही अता
जगाच्या उंबऱ्याला लंघणे नाही अता
कुणाला ना कळू देताच ती स्मरते मला
मनाचा एक कप्पा राखलेला .. आपलासा

कसा दाबून ठेवी हुंदका ती कोण जाणे
कसे ते बंद झाले ओठही शिवल्याप्रमाणे
कधी बेबंद झाले जर जुने आनंदगाणे
जगाला ऐकु जाई फक्त तो हळवा उसासा

किती पायांत बेड्या घातलेल्या आपल्यांनी
असे जखडून नेले ती जणू की “बंदिनी”
तरी पाहून गेली एकदा मागे वळूनी
मला जगण्या पुरेसा एक तो आहे दिलासा


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


गंधातुन गुढ उकलतें By Mangesh padgaonkar


तें किती लपविलें तरिही
मज नकळत कळतें कळतें
पाकळ्यांत दडलें तरिही
गंधातुन गुढ उकलतें

मातीत गाढ निजलेलें
जरि बीज न नयनां दिसतें
घन वळता आषाढाचे
मज नवखी चाहुल येते

रात्रीचा घन अंधारीं
जरि गहनच सगळें असतें
तें नि:शब्दाचें कोडें
मज नक्षत्रांतून सुटतें

श्रावणांत चित्रलिपीचे
जरि अर्थ न कळले पुरते
तरि ॠतुचक्रापलिकडचें
प्राणांत उमलतें नातें

लहरींतुन थरथरणारया
जरि भुलवित फसवित पळतें
पावसांत उत्तररात्रीं
मज अवचित लय उलगडले

प्रतिबिंबच अस्फ़ुट नुसतें
जरि शब्दांतुन भिरभिरतें
मौनांत परी ह्रुदयींच्या
कधिं पहाट हौउनि येतें

दूरांत पलिकडे जेव्हां
हळू गगन धरेला मिळतें
तें अद्भुत मज कळल्याची
वेदनाच नुसती उरते

तें किती लपविलें तरिही
मज नकळत कळतें कळतें
पाकळ्यांत दडलें तरिही
गंधातुन गुढ उकलतें

मंग॓श पाडगांवकर


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


जिप्सी By Mangesh padgaonkar


एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून
आठवतें बालपण जेव्हां होतों मी खेळत
होतों बांधीत मी घर सवंगड्यांच्या संगत
कौलें पानांचीं घराला आणि झावळ्यांच्या भिंती
आठवतें अजूनहि होतों रंगत मी किती !
पण अकस्मात होतों जात सारे उधळून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

शाळेंतले ते दिवस पाटी-पुस्तक हातांत
टोपी जरीची सुंदर … स्वारी निघाली थाटांत
जाड काचेची चाळिशी लावूनिया डोळ्यांवर
होते बोलत पंतोजी उग्र रोखून नजर
पण ठरेचना मन चार भिंतींच्या जगांत
उडे खिडकीमधून दूरदूरच्या ढगांत
झाडें पानांच्या हातांनीं होतीं मला बोलवीत
शेपटीच्या झुबक्यानें खार होती खुणवीत
कसें अवरावें मन ? गेलॊं पळून तिथून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

आणि पुढें कशासाठीं गेलॊ घर मी सोडून !
सारीं सारीं सुखे होतीं, काही नव्हतेंच न्य़ून
पण खोल खोल मनीं कूणी तरी होतें द:खी
अशा सुखांत असून जिप्सी उरला असुखी
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
मिटलेल्या डोळ्यांपुढें खळखळणार्या लाटा …
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

कधीं कधीं पहाटते उरीं आगळी प्रतीती
जाळीमधून धुक्याच्या तेज झिरपतें चित्तीं
जाचूं लागते जिप्सीला द्न्यात विश्वाची चौकट
आणि जाणवतें काहीं गूढ … अंधुक … पुसट !
खेळ सांडिलेला सारा पुन्हा उधळाया सजे
आपणच निर्मिलेलें आपणच मोडूं धजे
गुढ अद्न्यात धुक्यांत आणि जातसे बुडून
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

घर असूनहि आतां घर उरलेलें नाही
चार भिंतींची जिप्सीला ओढ राहिलेली नाही
कुणीं सांगावें ? असेल पूर्वज्मींच्या हा शाप
घडी सुस्थिरपणाची विसकटे आपोआप …
कुणी तरी साद घाली दूर अनंतामधून …
एक जिप्सी आहे माझ्या खोल मनांत दडून

मंग॓श पाडगांवकर


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


आज By Mangesh padgaonkar


आज तुझ्या लोचनांत
मला दिसलें आकाश
गूढ निरोप घेऊन
आज आले तुझे श्वास
आज तुझिया स्पर्शात
कांहीं निराळ्याच खुणा :
भारावली अमॄतानें
ज्यांत जन्मांची वेदना

आज तुझिया बोलांत
सीमा सरून शब्दांची
नकळत उमलली
पहाट ही नि:शब्दाची

आज निराळेंच भासे
तुझ्या अधरींचे स्मित
लकेरच चांदण्याची
जणुं भिजली दंवांत

आज तुझ्या पावलांत
झालें भविष्य चकित
फलभारें जड झाला
निळा सोनेरी एकान्त

आज तुझ्या रूपांतून
झाला अरूपाचा भास
उरीं पहाटेआधींच
जाग आली प्रकाशास

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही By Mangesh padgaonkar


मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही
विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही

झुरते बन माडांचे, आणि शुक्रतारा
भरतीचे स्वप्न बघत, विकल का किनारा
रंग रंग विरले रे, खिन्न दिशा दाही

सांजवेळ, संथ डोह, हाक जीवघेणी
शब्दाविण डोळ्यांनी, वाचिली कहाणी
तो वेडा स्पर्श काय, छळिल रे तुलाही

का, चुकल्या वाटा अन् का घडल्या भेटी
का जपले दवहळवे, गीत तुझ्यासाठी
सूरसूर बुडले रे, अदय या प्रवाही

सूर मनांतिल कधिही, आणु नये ओठी
लावु नये जीव असा, कधिच कुणासाठी
निर्माल्यच ये करात, गंध उडुन जाई

पुढल्या जन्मीच पुरे हे अधुरे गाणे
पुढल्या जन्मीच पुरे स्वप्न हे दिवाणे
चुरलेली शपथ तिथे विसरणार नाही

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो By Mangesh padgaonkar


नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो…

तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो…

पान-टपरी वाल्याकडे त्याची अगदी महिनो-महीने उधारी असते
तरी तिच्यासाठी चन्द्र आणण्याची त्याची एक पायावर तयारी असते
तिच्यासथि काहिही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोल्वर दड्लेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो……..

तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो

कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो……..

बर याला प्रेम म्हणाव, तर
लोक निर्मळ प्रेमाची भाषा करतात
आणि नुकतच प्रेमात पड्लेल्या त्या दोघानकडून
अगदी शुद्ध प्रेमाची
अपेक्षा करतात…

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


आतां उजाडेल ! By Mangesh padgaonkar


खिन्न आंधळा अंधार
आता ओसरेल पार
लहरींत किरणांची कलाबूत मोहरेल
आतां उजाडेल !

शुभ्र आनंदाच्या लाटा
गात फुटतील आतां
मृदु गळ्यांत खगांच्या किलबिल पालवेल
आतां उजाडेल !

वारा हसेल पर्णांत
मुग्ध हिरवेपणांत
गहिंवरल्या प्रकाशी दहिंवर मिसळेल
आतां उजाडेल !

आनंदात पारिजात
उधळील बरसात
गोड कोवळा गारवा सुगंधांत थरालेल
आतां उजाडेल !

फुलतील नकळत
कळ्यांतले देवदूत
निळा-सोनेरी गौरव दिशांतून उमलेल
आतां उजाडेल !

निळें आकाश भरून
दाही दिशा उजाळून
प्रकाशाचें महादान कणाकणांत स्फ़ुरेल
आतां उजाडेल !

आज सारें भय सरे
उरीं जोतिर्मय झरे
पहाटेचा आशीर्वाद प्राणांतून उगवेल
आतां उजाडेल !

मंग॓श पाडगावकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


मी बोलले न काही नुसतेच पाहिले By Mangesh padgaonkar


मी बोलले न काही नुसतेच पाहिले
हृदयात दाटलेले हृदयात राहिले

परतून हाय जाण्या ओठांत शब्द आले
डोळ्यांतले इषारे डोळ्यांत कैद झाले
मी बंद पापण्यांनी हे सर्व साहिले

देऊन सर्व काही नाही दिलेच काही
ज्याला हवे कळाया कळलेहि त्यास नाही
माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले

निःशब्द आसवांनी समजाविले मनाला
की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला
माझ्याच मी मनाशी हे गीत गायिले


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


भेट तुझी माझी स्मरते… By Mangesh padgaonkar


भेट तुझी माझी स्मरते, अजून त्या दिसाची
धुंद वादळाची होती रात्र पावसाची…

कुठे दिवा नव्हता, गगनी एकही न तारा
आंधळ्या तमातून वाहे, आंधळाच वारा
तुला मुळी नव्हती बाधा, भितीच्या विषाची…

क्षुद्र लौकिकाची खोटी झुगारुन नीती
नावगाव टाकून आली अशी तुझी प्रीती
तुला परी जाणिव नव्हती, तुझ्या साहसाची…

केस चिंब ओले होते, थेंब तुझ्या गाली
ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली
श्वासांनी लिहीली गाथा, प्रीतीच्या रसाची…

सुगंधीच हळव्या शपथा, सुगंधीच श्वास
स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास
सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची….

मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


असा बेभान हा वारा…By Mangesh padgaonkar


असा बेभान हा वारा, कुठे ही नाव मी नेऊ
नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ…

जटा पिंजून या लाटा, विखारी झेप ही घेती
भिडे काळोख प्राणांना, दिशांचे भोवरे होती
जीवाचे फुल हे माझ्या, तुझ्या पायी कशी ठेवू…

कुळाचे, लौकीकाचे मी क्षणी हे तोडीले धागे
बुडाले गाव ते आता, बुडाले नाव ही मागे
दिले हे दान दैवाने, करी माझ्या कशी ठेवू…

जगाच्या क्रूर शापांचे, जिव्हारी झेलले भाले
तुझे सौभाग्य ल्याया हे, तुझी होऊन मी आले
तुझे तू घे उरी आता, किती मी हाक ही देऊ….

मंगेश पाडगांवकर

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

Mangesh padgaonkar kavita मंगेश पाडगावकर कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही Mangesh padgaonkar kavita or marathi poem आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा