lahan mulanchya goshti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
lahan mulanchya goshti लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

Bal goshti लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Bal goshti लहान मुलांचे गोष्टी || Stories for kids in marathi

Stories for kids in marathi
Bal Goshti

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Bal goshtiलहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. lahan mulanchya goshti व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे Bal goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 6 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

Bal goshti छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


खरा न्याय:- Bal goshti [ छान छान गोष्टी ]


           एका गावात  राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.

          शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो

            शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.

         राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला  योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.


तात्पर्य -खरा न्याय करावा.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi & marathi stories with moral values
         
              MARATHI STORY 2


लालची कुत्रा :- Bal goshti लहान मुलांचे गोष्टी


         एका गावात एक दुकानदार मटण विकण्याचा व्यवसाय करत असतो. दुकानात काही लोक काम करत असतात आणि कोपऱ्यात एक कुत्राही बसलेलं असते. एकदा दुकानदार मटण कापतो तेव्हा काही तुकडे खाली जमिनीवर पडतात. कुत्रा ते तुकडे पाहतो. थोडाही वेळ न लावता कुत्रा तो तुकडा उचलतो आणि तेथून धूम ठोकतो.

          कुत्रा तो तुकडा घेऊन खाण्यासाठी जागा शोधत असतो तिथे त्याला तो तुकडा शांतपणे चघळत खायचा असतो. एवढ्यात त्याला त्याची सर्वात आवडती नदीपलीकडील जागा आठवते आणि तो तिकडे पळू लागतो. नदी ओलांडताना तो पाण्यात डोकाऊन पाहतो तर त्याला त्याचेच प्रतिबिंब दिसते पण त्याला वाटते तो कुणी दुसरा कुत्रा आहे.

           त्याच्याकडील मटणाचा तुकडा आपण घेऊ कारण तो पण त्यालाच पाहिजे असतो आणि तो त्याच्यावर भुंकू लागतो. त्याचा मटणाचा तुकडा पाण्यात पडतो आणि कुत्रा मटणाचा तुकडा गमावतो.



तात्पर्य -जेवढ मिळाले तेवढ्यात सामाथान मानव जास्त गोष्टीचा हव्यास करू नये .

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 3


संगत:- Chan Chan goshti ] marathi stories for childrens


एक गोसावी रानातून आपल्या गुहेकडे चालला होता. वाटेत त्याला एक अस्वल कण्हताना दिसले. गोसावी त्याच्या जवळ गेला, त्याने पाहिले, अस्वलाच्या पायात काटा रुतला होता. त्याने तो काढला तेव्हा अस्वल म्हणाले, "महाराज मला वेदनेतून मुक्त करून माझ्यावर फारच उपकार केलेत. मला त्याची परतफेड म्हणून तुमच्याबरोबर राहून तुमच्या सेवेची संधी द्या. गोसावी म्हणाला, "अरे मी काही उपकार केले नाहीत, माझा धर्मच आहे तो. तरीही अस्वल आपला हट्ट सोडेना. शेवटी गोसावी त्याला आपल्याबरोबर गुहेत घेऊन गेला. गोसावी विश्रांतीसाठी झोपला तेव्हा त्याच्या तोंडावर माशा बसत होत्या. गोसाव्याची सेवा करावी म्हणून ते अस्वल या माशांना मारू लागले, हाकलू लागले. पण एक धटींगण माशी गोसाव्याच्या नाकावर पुन्हा पुन्हा बसत होती. त्या माशीचा राग येऊन अस्वलाने आपला पंजा माशीला एवढ्या जोराने मारला की माशीचा चेंदामेंदा झाला, पण गोसाव्याचे नाकही तुटले व त्याचा चेहरा विद्रूप झाला!


तात्पर्य : शहाण्याचे सेवक व्हावे, पण मूर्खाचे मालक होऊ नये. काही वेळा चांगल्या संगतीचा वेगळाच परिणाम होतो.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

              Marathi story 4


हुशार  हत्ती :- [ लहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi ]



            एकदा एका गावामध्ये एक हुशार माणूस राहत असतो. ते गाव खूपच लहान असते. गावात थोडीच घरे असतात. तो माणूस सर्वांना चांगली जीवनमूल्ये शिकवीत असतो तसेच चांगले मार्गदर्शन करीत असे. त्यामुळे आता गावातल्या लोकांमध्ये खूप चांगले बदल होतात. कोणाचीच कोणाशी भांडणे होत नाहीत. अशाप्रकारे गाव तंटामुक्त होते.

             गाव तंटामुक्त झाल्यामुळे गावाचा प्रमुख मात्र नाराज होतो. कारण आता गावात कोणाचीच तक्रार नाही. त्यामुळे त्याला पैसे मिळत नाही. त्याअगोदर त्याला या सर्व गोष्टीमुळे पैसे मिळत असत. आपल्याला परत पैसे मिळू लागावेत म्हणून त्या माणसाचा बदला घेण्याचा विचार करून तो राजाकडे जातो. दरबारात सांगतो कि, काही गावकऱ्यांच्या घरात चोरी झाली आहे. राजा लगेचच सैनिकांना चोरांना पकडायला सांगतो आणि जो चोर असेल त्याला हत्तीच्या पायाखाली तुडवण्याचे आदेश देतो.

          राजाचे सैनिक गावातील सर्व प्रमुख व्यक्तींना आणि त्या सदगृहस्थाला चोर म्हणून पकडून आणतात. जेव्हा त्यांना हत्तीकडे घेऊन जातात. तेव्हा हत्ती त्यांना चिरडत नाही. राजा आश्चर्यचकित होतो.

           मग तो सदगृहस्थ राजाला सांगतो आम्ही काहीही  चूक केलेली नाहीये. आमचे मन पवित्र आहे. आम्ही कोणालाही इजा केलेली नाही. हाच आमचा सदगुण हत्तीने जाणला. त्यांनी आम्हाला शिक्षा केली नाही. त्या शहाण्या माणसाने राजाला खरा प्रकार सांगितल्यावर राजाने गावप्रमुखास शिक्षा केली. 



तात्पर्य - करावे तसे भरावे.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

              Marathi story 5


गेलेला ऋतूच बरा:- [ लहान मुलांचे गोष्टी Stories for kids in marathi ]


 हिवाळ्याचे दिवस होते. एक गाढव थंडीने कुडकुडत होते व खायला शिळे गवत मिळत होतं तेव्हा त्याला वाटले, उन्हाळ्याचेच दिवस बरे होते. आपल्याला उन्हाळा आवडत नव्हता पण या हिवाळ्यापेक्षा तेच दिवस बरे होते. हवाही उबदार होती व गवतही ताजे मिळत होते. गाढवाच्या मनात असे विचार आले, त्याच दिवशी त्याच्या मालकाने त्याला गोठ्यात बांधले व ताजे गवत खायला घातले. असे बरेच दिवस त्याला जागेवरच ताजे गवत मिळू लागले, त्या बदल्यात मालक त्याच्याकडूनच बरेच काम करून घेई. आता हिवाळ्याचाही त्याला कंटाळा आला व तो पावसाळा येण्याची वाट पाहू लागला. लवकरच पावसाळा तोंडावर आला. मृगाचा पहिला पाऊस पडला आणि त्याचा मालक चार महिने शेतीची कष्टाची कामे गाढवाकडून करून घेऊ लागला. तेव्हा त्या गाढवाला वाटले, हिवाळाच बरा होता, म्हणजे येणाऱ्या ऋतुपेक्षा गेलेलाच ऋतू बरा असे त्याला वाटू लागले.


तात्पर्य : कुठलेही कसेही दिवस आले तरी अतृप्त मनाच्या माणसांचे कधीही समाधान होत नाही.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || Marathi bodh katha

              Marathi story 6


एका तांदळाची खीर:- [ Stories for kids in marathi || Chan Chan goshti ]


एकदा गणपतीने एका लहान बालकाचे रूप घेतले. बालकाच्या एका हातात एक चमचा भरून दूध होते आणि दुसऱ्या हातात एक तांदूळ होता. तो बालक प्रत्येक घरात जाऊन म्हणत होता, “कोणीतरी माझ्यासाठी खीर बनवून द्या.” बालकाच्या हातातील एक चमचा दूध व एक तांदूळ बघून घरातील बायका त्याला खूप हसत असे. त्या त्याला म्हणत, “एवढयामध्ये काय खीर होणार?”

तो बालक जेव्हा जास्त हट्ट करत तेव्हा त्या काही तरी कारण काढून त्याला टाळत किंवा काहीजणी चिडून त्याला घरातून हाकलून देत. सकाळची संध्याकाळ झाली परंतु बालकासाठी खीर बनवायला कोणीही तयार नव्हते.

संध्याकाळी बालक एका झोपडीसारख्या घरात गेला. तेथे एक वृध्द महिला रहात होती. बालक त्या महिलेला विनवणी करून म्हणाला, “आई, माझ्यासाठी खीर बनवून दे. मी प्रत्येक घराघरात फिरून आलो. माझ्याजवळ तांदूळ आहे व दूध पण आहे. पण मला कळत नाही की खीर बनवायला अशी किती मेहनत लागते की सर्व सामान देऊनही मला कोणी खीर बनवून देत नाही!”

तेव्हा त्या वृध्देने बालकाला प्रेमाने जवळ घेतले व ती म्हणाली, “अरे माझ्या लाडक्या, दे मी तुझ्यासाठी खीर बनवून देते.”

त्या वृध्देने लगेच आपल्या सुनेला सांगितले, “मला एक छोटी कढई आणून दे खीर बनवाण्यासाठी.”

ते ऐकून बालकाने आता नवीन हट्ट सुरू केला तो हा की, घरात जी सर्वात मोठी कढई असेल त्यातच खीर बनवायची. त्या वृध्द महिलेने बालकाचे तेही म्हणणे मान्य केले व ती खीर बनविण्याच्या तयारीला लागली आणि बालक बाहेर खेळावयास निघून गेले.

जेव्हा महिलेने कढईमध्ये एक चमचा दूध व एक तांदूळ टाकला. तेव्हा ती कढई तांदूळ व दूधानी काठोकाठ भरून गेली. तो चमत्कार पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. वृध्द महिलेने त्या बालकाला गावात सगळीकडे खूप शोधले परंतु तो सापडला नाही. त्या महिलेच्या सुनेनी जेव्हा ती खीर बघितली तेव्हा तिने गुपचूप एका वाटीत खीर घेऊन देवाला नैवेद्य दाखविला.
इकडे वृध्द महिला सगळीकडे बालकाला हाक मारत फिरत होती. तेव्हा अचानक एक आवाज आला, “आई, मी दरवाजाच्या पाठीमागे लपून गुपचूप खीर खाल्ली आहे. आता तू ती खीर पूर्ण गावाला वाटून खाऊ घाल.”

ती महिला सर्व गावात खीर वाटत-वाटत तोंडाने म्हणत होती, “बनवायची ती खीर, खा एका तांदळाची खीर.”

एका तांदळाची खीर बनविण्यासाठी नाही म्हणणारे ते महालात राहणारे सर्व लोक एका गरीब वृध्देची खीर खात देवाच्या चमत्कारापुढे नतमस्तक झाले.


तात्पर्य:यावरून आपल्याला असे समजते की, जर परमेश्वराची कृपा असेल तर एक चमचा दूध आणि एका तांदळाच्या दाण्याने सुध्दा पूर्ण गाव तृप्त होऊ शकते.

👳👱🤶💂🕵️👮👨‍✈️👩‍💼👨‍⚖️👩‍🍳👩‍🔧👨‍🚀

मित्रांनो तुम्हाला या Bal goshti लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच Stories for kids in marathi आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular
Bal goshti कश्या वाटल्या जरूर सांगा व ह्या सर्व marathi goshti आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Moral story in marathi || marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी

Moral story in marathi || marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी

Chan chan goshti
Moral story in marathi

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Moral story in marathiलहान मुलांचे गोष्टी marathi goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Moral story in marathi व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.

Moral story in marathi शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या marathi goshti मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1


घाबरट  शिकारी :- Moral story in marathi


        खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होते त्या गावाजवळ एक जंगल होते. त्या जंगलात एक सिंह राहत होता. जेव्हा सिंह भूक लागेल तेव्हा तो  गावात जायचा आणि पाळीव प्राण्याची शिकार करून न्यायचा व शेतकऱ्यांचे नुकसान करायचा. सिंहाच्या या त्रासाला सर्व गावकरी कंटाळले होते. सगळे गावकरी या सिंहाला घाबरून राहत होते.

        सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि जे कोणी  सिंहाला मारेल त्याला बक्षीस द्यायला तयार झाले. तेव्हा एक शिकारी गावात आला व त्याने  सिंहाला मारण्याचे आव्हान स्विकारले.

        पण तो शिकारी काही फार मोठा शूरवीर नव्हता. परंतु त्याने आपण शूर आहोत असा आव आणला आणि तो जंगलात गेला. सिंहाच्या पाऊलखुणा शोधण्याचा त्याने प्रयत्न सुरु केला.

   शिकारी फिरत आसताना त्याला जंगलात एक लाकुडतोड्या भेटला. शिकाऱ्यांने त्याला विचारले कि, सिंहला पहिले का?

        लाकुडतोड्या म्हणाला, चल मी तुला प्रत्यक्ष सिंहच दाखवतो. "हे ऐकताच शिकारी घाबरला. सिंहाचे दर्शन घ्यायचे या कल्पनेनेच तो घाबरला. शिकारी त्याला घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "नको धन्यवाद ! मी तुला सिंहाच्या पाऊल खुणाविषयी विचारले आहे. सिंहाच्या प्रत्यक्ष भेटीची गरज नाही. "घाबरट शिकारी शिकार करण्याऎवजी तेथून पळून गेला.


तात्पर्य -  नेहमी खरे बोलावे.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

Moral story in marathi || marathi goshti
         
              MARATHI STORY 2


धूर्त बोकड :-लहान मुलांचे गोष्टी


            एक बैल जंगलात चरण्यासाठी जात असे. त्या जंगलात जवळच गवताळ कुरण होते तिथे बैल चरत होता. त्याच्या नकळत एक सिंह त्याच्यवर लक्ष ठेऊन होता. लांबवर एका झुडपाच्या मागे लपून सिंह, बैल शिकारीच्या टप्यात येण्याची वाट बघत होता.

         सिंहाने बैलावर हल्ला केला पण बैलाने संधी साधून सिंहच्या तावडीतून स्वताची कशीबशी सुटका करून घेतली. बैल एका गुहेत आश्रयासाठी पळून गेला. या गुहेचा वापर मेंढपाळ स्वतासाठी आणि मेंढयांसाठी करीत असत. जोरदार पाउस किंवा वादळवारे सुटलेल्या मेंढपाळ मेंढ्यांना या गुहेत नेत असत.

        बैल गुहेत शिरला तेव्हा त्या गुहेत एक बोकड राहिलेले होता. गुहेत बैल आलेला पाहून बोकड रागावला. आपल्या ताकतीची पर्वा न करता तो बैलाच्या अंगावर धावून गेला. आपल्या छोठ्याशा शिंगांनी बैलाला जखमी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. बैल त्याला काहीच प्रतिकार करत नव्हता. गुहेच्या बाहेर सिंह उभा आहे हे माहीत असल्यामुळे बैलाने त्याला प्रतिकार केला नाही.

         बैल बोकडाला म्हणाला ,"मी तुला घाबरत आहे असे तू वाटू देऊ नको. तू मनातही असा विचार अनु नकोस. ज्या क्षणी सिंह गुहेच्या दारापासून निघून जाईल त्या क्षणी मी तुला आयुष्यभर लक्षत राहील असा धडा शिकवेन ." बोकडाला आपली चूक समजली आणि त्याने बैलाची क्षमा  मागितली.


तात्पर्य -  आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी

                   Marathi story: 3


उंटाचा नाच :- Moral story in marathi


           एका जंगलात खूप प्राणी रहात होते. एकदा जंगलातील सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्याचा बेत ठरवला. या कार्यक्रमात सर्वांनी आपणास येणारी कला सादर करण्यची असे ठरवण्यात आले. प्रत्येक प्राणी त्या दिवसाची उसुकतेने वाट बघत होता. अखेर तो दिवस उजाडला. कार्यक्रम सुरु झाला. प्रत्येक प्राणी येऊन आपला कलेचे प्रदर्शन करू लागला.

       अखेर माकडाची वेळ आली. माकडाने सर्व प्राण्यांना खुश केले. त्याने अनेक कसरती करून प्राण्यांना आनंदित केले. प्रत्येकाला आश्चर्य वाटले. सर्व प्राण्यांनी माकडाची स्तुती केली. त्याच्या कलेचे कौतुक केले. सर्वच प्राण्यांनी त्याला टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला.

        एक उंट हे सगळे लांबून बगत होता. त्याने माकडासाठी  टाळ्याही वाजवल्या नाहीत आणि त्याचे अभिनंदनही केले नाही. तू मनातल्या मनात माकडाचा द्वेष करू लागला. माकडापेक्षा चांगली कला सदर करण्यासाठी आणि सर्व प्राण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उंट नाचू लागला.

       आपल्या नाचण्याच्या कलेतून सर्व प्राण्यांचे मन जिंकण्याचा उंटाने प्रयत्न  केला पण उंटाचा  नाच उरलेल्या प्राण्यांना आवडला नाही. सर्व प्राण्यांकडे दुर्लक्ष करून तो नाचतच राहिला. नाचाला कंटाळलेल्या प्राण्यांनी उंटाला मारून  काढले. उंटाचा अपमान करून त्याला हाकलून दिले.


  तात्पर्य - कलेचा आदर करावा

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4


जंगली बकऱ्या :- Moral story in marathi


     एक गावात राम राहत होता. त्याच्याकडे खूप बकऱ्या होत्या. तो बकऱ्याचे दुध विकून पैसे कमवित असे. एक दिवस बकऱ्या घेऊन तो जंगलात गेला. बकऱ्या  नेहमी प्रमाणे चारा खाऊ लागल्या.

        जंगलात याच वेळी काही जंगली बकऱ्या चरत होत्या. जेव्हा हा राम पाळीव बकऱ्या घेऊन घरी निघाला. तेव्हा त्याच्या कळपात काही जंगली बकऱ्या घुसल्या. त्याच्या कळपात घुसलेल्या जंगली बकऱ्याना घरी पोहोचल्यावर त्या रामने या सगळ्या बकऱ्यांना सुरक्षित जागी बांधून टाकले.

         दुसऱ्या दिवशी अकस्मात बर्फ पडू लागला म्हणून राम आपल्या बकऱ्या चरायला बाहेर नेऊ शकला नाही. त्यांना घरातच चारा द्यावा अशा विचारात तो होता. जंगली बकऱ्या आपल्या घरी राहाव्यात असाही त्याचा विचार होता. फुकट मिळालेल्या बकऱ्यांना ठेवून घेण्यासाठी त्याने जंगली  बकऱ्यांना जादा गवत खायला दिले.
      पाळीव बकऱ्या हे सगळे बगत होत्या. पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. बर्फ पडण्याचे थांबल्यावर जंगली बकऱ्या बाहेर पळून गेल्या. रामला राग आला. तो जंगली बकऱ्यांना म्हाणाला, " मी तुम्हाला जास्त चारा खायला दिला तरी तुम्ही येथून पळून जात आहात ."

        जंगली बकऱ्या म्हणाल्या ,जर आम्ही तुझा बरोबर राहिलो आणि उद्या नव्या बकऱ्या कळपात आल्या तर तू त्यांना आमच्या पेक्षा जास्त खायला देणार. नव्या बकऱ्या आल्या की जुन्या बकऱ्ययांवर अन्याय  करणार. हे ऐकताच रामचा चेहरा पडला. बकऱ्या खर बोलत असल्यामुळे राम  निरुत्तर झाला.


तात्पर्य -  आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.


🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

lahan mulanchya goshti || Chan chan goshti

                 Marathi story : 5


बोलणारे हरीण :- Moral story in marathi


         एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक हरीण राहत होते. ते सामान्य हरीण नव्हते. ते खूप ताकतवान आणि माणसांप्रमाणे बोलणारे हरीण होते.

         एक दिवस एक राजा शिकार करण्यासाठी जंगलात येतो. राजा त्या बोलणाऱ्या हरिणाला पाहतो आणि बाणाचा नेम धरतो.
         हरणाला समजते कि राजाने आपल्या दिशेने नेम धरलेला आहे. ते पाहून हरीण जोरात धावते. राजपण त्याच्या मागे धावत असतो . राजा हरिणाच्या मागे धावत असताना पुढे एक भला मोठा खड्डा येतो पण त्याला समजत नाही . धावता धावता राजा त्या खड्ड्यात पडतो. हरणाला राजाची दया येते.

            हरीण राजाला मदत करण्याचे ठरविते आणि त्याच्याजवळ जाऊन राजाला म्हणते, 'मला वाटते कि तुला मोठी जखम झाली नसेल . मी तुला येथून बाहेर काढतो.'

            राजाला हरिणाचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटते. त्याला समजते कि हे हरीण सामान्य नाही. हरीण राजाला बाहेर निघण्यासाठी मदत करते. राजाला आपल्या कृत्याची लाज वातू लागते . तो हरिणाची माफी मागतो.


तात्पर्य - दुसर्यांना नेहमी मदद करावी.

🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅

मित्रांनो तुम्हाला या Moral story in marathi लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील marathi goshti कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏