Moral story in marathi || marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी
![]() |
Moral story in marathi |
नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता Moral story in marathi व लहान मुलांचे गोष्टी marathi goshti चा संग्रह या पोस्टमध्ये केला आहे. Moral story in marathi व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे chan chan goshti उपलब्ध करून दिले आहे.Top 5 लहान मुलांचे गोष्टी या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.
Moral story in marathi शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या marathi goshti मधून काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.
🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅
Marathi goshti || Chan Chan goshti
MARATHI STORY 1
घाबरट शिकारी :- Moral story in marathi
खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक गाव होते त्या गावाजवळ एक जंगल होते. त्या जंगलात एक सिंह राहत होता. जेव्हा सिंह भूक लागेल तेव्हा तो गावात जायचा आणि पाळीव प्राण्याची शिकार करून न्यायचा व शेतकऱ्यांचे नुकसान करायचा. सिंहाच्या या त्रासाला सर्व गावकरी कंटाळले होते. सगळे गावकरी या सिंहाला घाबरून राहत होते.
सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि जे कोणी सिंहाला मारेल त्याला बक्षीस द्यायला तयार झाले. तेव्हा एक शिकारी गावात आला व त्याने सिंहाला मारण्याचे आव्हान स्विकारले.
पण तो शिकारी काही फार मोठा शूरवीर नव्हता. परंतु त्याने आपण शूर आहोत असा आव आणला आणि तो जंगलात गेला. सिंहाच्या पाऊलखुणा शोधण्याचा त्याने प्रयत्न सुरु केला.
शिकारी फिरत आसताना त्याला जंगलात एक लाकुडतोड्या भेटला. शिकाऱ्यांने त्याला विचारले कि, सिंहला पहिले का?
लाकुडतोड्या म्हणाला, चल मी तुला प्रत्यक्ष सिंहच दाखवतो. "हे ऐकताच शिकारी घाबरला. सिंहाचे दर्शन घ्यायचे या कल्पनेनेच तो घाबरला. शिकारी त्याला घाबरलेल्या आवाजात म्हणाला, "नको धन्यवाद ! मी तुला सिंहाच्या पाऊल खुणाविषयी विचारले आहे. सिंहाच्या प्रत्यक्ष भेटीची गरज नाही. "घाबरट शिकारी शिकार करण्याऎवजी तेथून पळून गेला.
तात्पर्य - नेहमी खरे बोलावे.
🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅
Moral story in marathi || marathi goshti
MARATHI STORY 2
धूर्त बोकड :-लहान मुलांचे गोष्टी
एक बैल जंगलात चरण्यासाठी जात असे. त्या जंगलात जवळच गवताळ कुरण होते तिथे बैल चरत होता. त्याच्या नकळत एक सिंह त्याच्यवर लक्ष ठेऊन होता. लांबवर एका झुडपाच्या मागे लपून सिंह, बैल शिकारीच्या टप्यात येण्याची वाट बघत होता.
सिंहाने बैलावर हल्ला केला पण बैलाने संधी साधून सिंहच्या तावडीतून स्वताची कशीबशी सुटका करून घेतली. बैल एका गुहेत आश्रयासाठी पळून गेला. या गुहेचा वापर मेंढपाळ स्वतासाठी आणि मेंढयांसाठी करीत असत. जोरदार पाउस किंवा वादळवारे सुटलेल्या मेंढपाळ मेंढ्यांना या गुहेत नेत असत.
बैल गुहेत शिरला तेव्हा त्या गुहेत एक बोकड राहिलेले होता. गुहेत बैल आलेला पाहून बोकड रागावला. आपल्या ताकतीची पर्वा न करता तो बैलाच्या अंगावर धावून गेला. आपल्या छोठ्याशा शिंगांनी बैलाला जखमी करण्याचा तो प्रयत्न करू लागला. बैल त्याला काहीच प्रतिकार करत नव्हता. गुहेच्या बाहेर सिंह उभा आहे हे माहीत असल्यामुळे बैलाने त्याला प्रतिकार केला नाही.
बैल बोकडाला म्हणाला ,"मी तुला घाबरत आहे असे तू वाटू देऊ नको. तू मनातही असा विचार अनु नकोस. ज्या क्षणी सिंह गुहेच्या दारापासून निघून जाईल त्या क्षणी मी तुला आयुष्यभर लक्षत राहील असा धडा शिकवेन ." बोकडाला आपली चूक समजली आणि त्याने बैलाची क्षमा मागितली.
तात्पर्य - आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.
🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅
marathi goshti || लहान मुलांचे गोष्टी
Marathi story: 3
उंटाचा नाच :- Moral story in marathi
एका जंगलात खूप प्राणी रहात होते. एकदा जंगलातील सर्व प्राण्यांनी एकत्र येऊन कार्यक्रम करण्याचा बेत ठरवला. या कार्यक्रमात सर्वांनी आपणास येणारी कला सादर करण्यची असे ठरवण्यात आले. प्रत्येक प्राणी त्या दिवसाची उसुकतेने वाट बघत होता. अखेर तो दिवस उजाडला. कार्यक्रम सुरु झाला. प्रत्येक प्राणी येऊन आपला कलेचे प्रदर्शन करू लागला.
अखेर माकडाची वेळ आली. माकडाने सर्व प्राण्यांना खुश केले. त्याने अनेक कसरती करून प्राण्यांना आनंदित केले. प्रत्येकाला आश्चर्य वाटले. सर्व प्राण्यांनी माकडाची स्तुती केली. त्याच्या कलेचे कौतुक केले. सर्वच प्राण्यांनी त्याला टाळ्या वाजवून भरभरून प्रतिसाद दिला.
एक उंट हे सगळे लांबून बगत होता. त्याने माकडासाठी टाळ्याही वाजवल्या नाहीत आणि त्याचे अभिनंदनही केले नाही. तू मनातल्या मनात माकडाचा द्वेष करू लागला. माकडापेक्षा चांगली कला सदर करण्यासाठी आणि सर्व प्राण्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी उंट नाचू लागला.
आपल्या नाचण्याच्या कलेतून सर्व प्राण्यांचे मन जिंकण्याचा उंटाने प्रयत्न केला पण उंटाचा नाच उरलेल्या प्राण्यांना आवडला नाही. सर्व प्राण्यांकडे दुर्लक्ष करून तो नाचतच राहिला. नाचाला कंटाळलेल्या प्राण्यांनी उंटाला मारून काढले. उंटाचा अपमान करून त्याला हाकलून दिले.
तात्पर्य - कलेचा आदर करावा
🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅
stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi
Marathi story: 4
जंगली बकऱ्या :- Moral story in marathi
एक गावात राम राहत होता. त्याच्याकडे खूप बकऱ्या होत्या. तो बकऱ्याचे दुध विकून पैसे कमवित असे. एक दिवस बकऱ्या घेऊन तो जंगलात गेला. बकऱ्या नेहमी प्रमाणे चारा खाऊ लागल्या.
जंगलात याच वेळी काही जंगली बकऱ्या चरत होत्या. जेव्हा हा राम पाळीव बकऱ्या घेऊन घरी निघाला. तेव्हा त्याच्या कळपात काही जंगली बकऱ्या घुसल्या. त्याच्या कळपात घुसलेल्या जंगली बकऱ्याना घरी पोहोचल्यावर त्या रामने या सगळ्या बकऱ्यांना सुरक्षित जागी बांधून टाकले.
दुसऱ्या दिवशी अकस्मात बर्फ पडू लागला म्हणून राम आपल्या बकऱ्या चरायला बाहेर नेऊ शकला नाही. त्यांना घरातच चारा द्यावा अशा विचारात तो होता. जंगली बकऱ्या आपल्या घरी राहाव्यात असाही त्याचा विचार होता. फुकट मिळालेल्या बकऱ्यांना ठेवून घेण्यासाठी त्याने जंगली बकऱ्यांना जादा गवत खायला दिले.
पाळीव बकऱ्या हे सगळे बगत होत्या. पण त्या काहीच करू शकत नव्हत्या. बर्फ पडण्याचे थांबल्यावर जंगली बकऱ्या बाहेर पळून गेल्या. रामला राग आला. तो जंगली बकऱ्यांना म्हाणाला, " मी तुम्हाला जास्त चारा खायला दिला तरी तुम्ही येथून पळून जात आहात ."
जंगली बकऱ्या म्हणाल्या ,जर आम्ही तुझा बरोबर राहिलो आणि उद्या नव्या बकऱ्या कळपात आल्या तर तू त्यांना आमच्या पेक्षा जास्त खायला देणार. नव्या बकऱ्या आल्या की जुन्या बकऱ्ययांवर अन्याय करणार. हे ऐकताच रामचा चेहरा पडला. बकऱ्या खर बोलत असल्यामुळे राम निरुत्तर झाला.
तात्पर्य - आपली चुकी मान्य करणे फायद्याचे ठरते.
🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅
lahan mulanchya goshti || Chan chan goshti
Marathi story : 5
बोलणारे हरीण :- Moral story in marathi
एक घनदाट जंगल होते. त्या जंगलात एक हरीण राहत होते. ते सामान्य हरीण नव्हते. ते खूप ताकतवान आणि माणसांप्रमाणे बोलणारे हरीण होते.
एक दिवस एक राजा शिकार करण्यासाठी जंगलात येतो. राजा त्या बोलणाऱ्या हरिणाला पाहतो आणि बाणाचा नेम धरतो.
हरणाला समजते कि राजाने आपल्या दिशेने नेम धरलेला आहे. ते पाहून हरीण जोरात धावते. राजपण त्याच्या मागे धावत असतो . राजा हरिणाच्या मागे धावत असताना पुढे एक भला मोठा खड्डा येतो पण त्याला समजत नाही . धावता धावता राजा त्या खड्ड्यात पडतो. हरणाला राजाची दया येते.
हरीण राजाला मदत करण्याचे ठरविते आणि त्याच्याजवळ जाऊन राजाला म्हणते, 'मला वाटते कि तुला मोठी जखम झाली नसेल . मी तुला येथून बाहेर काढतो.'
राजाला हरिणाचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटते. त्याला समजते कि हे हरीण सामान्य नाही. हरीण राजाला बाहेर निघण्यासाठी मदत करते. राजाला आपल्या कृत्याची लाज वातू लागते . तो हरिणाची माफी मागतो.
तात्पर्य - दुसर्यांना नेहमी मदद करावी.
🕵️🦉🐢🐬🦋🐠🐍🦅🦉🐟🐋🦅
मित्रांनो तुम्हाला या Moral story in marathi लहान मुलांचे गोष्टी आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील marathi goshti कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व लहान मुलांचे गोष्टी आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .
धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा