कावळा चिमणीची गोष्ट stories for kids in marathi || कावळ्याची गोष्ट छान छान गोष्टी

कावळा चिमणीची गोष्ट stories for kids in marathi || कावळ्याची गोष्ट छान छान गोष्टी

कावळ्याची गोष्ट छान छान गोष्टी
कावळ्याची गोष्ट

नमस्कार,माझ्या मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता कावळा चिमणीची गोष्ट stories for kids in marathiलहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. चिमणी कावळ्याची गोष्ट व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi उपलब्ध करून दिले आहे.Top 4 kavala chimani chi goshta या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत आहे.


लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories काहीतरी चांगल शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया Stories for kids in Marathi कडे.


🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1
कावळा चिमणीची गोष्ट kavala chimani chi goshta [ छान छान गोष्टी ]
कावळा आणि मैना:-पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात ढग भरून आले होते. एका निंबाच्‍या झाडावर खूप सारे कावळे बसले होते. ते सारे कावळे झाडावर बसून काव-काव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते. तितक्यात तिथे एक मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर जावून बसली. 

     मैनेला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. बिचारी मैना त्यांना म्हणाली,"आज खूपच अंधारून आलंय, त्यातच मी माझ्या घरट्याचा रस्ता पण विसरले आहे मला कृपा करून इथे राहू द्या." सगळे कावळे एकसुरात ओरडले,"नाही, नाही, हि आमची बसायची जागा आहे तू इथे राहू शकत नाही." मैना म्हणाली," झाडे तर ईश्‍वराने सर्वासाठी बनविलेली आहेत. मी खूप छोटी आहे, तुमच्‍या ब‍हिणीसारखी आहे मला कृपा करून इथे राहू द्या.'' कावळे म्‍हणाले,'' आम्‍हाला तुझ्यासारखी बहिण नको, तु देवाचे नाव घेतेस ना, मग जा त्‍या ईश्‍वराकडे आसरा मागायला, इथे कशाला तडमडायला आलीस, तू जा नाहीतर आम्‍ही तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ.'' कावळे हे आपआपसात नेहमीच भांडणे करताना आपणास नेहमी पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे करताना रोज संध्‍याकाळी आपणास ते पाहावयास मिळू शकेल. मात्र दुस-या कोणत्‍या पक्ष्‍याविरूद्ध मात्र ते एकत्र होऊन ते लढतात हे पण खरे आहे. मैनेच्‍याबाबतीतही तसेच झाले. 

                 मैनेला कावळ्यांनी जाण्‍यास सांगितल्‍यावर ती बिचारी तिथूनच जवळच असणा-या एका आंब्‍याच्‍या झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसली. थोड्याच वेळात मोठा पाऊस पडू लागला. पावसाचे मोठमोठे थेंब व त्‍याच्‍याबरोबरच गाराही पडू लागल्‍या. गारा देखील मोठमोठया पडू लागल्‍या. गारा पडू लागल्‍या व त्‍या कावळ्यांना कळेना की कोठे जावे. कारण निंबाच्‍या झाडावर फारसा आडोसा होत नाही. त्‍यांना गारांचा मार बसू लागला. बाहेरही पडता येईना की झाडावरही बसता येईना. बंदूकीतून सोडलेल्‍या गोळीसारखा गारांचा मार त्‍यांना बसू लागला. इकडे मैना ज्‍या झाडावर बसली होती त्‍या आंब्‍याच्‍या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तेथे एक आडोसा (खोपा) तयार झाला. छोटीशी मैना त्‍या खोप्‍यात सहजपणे बसू शकत होती. मैना आत गेली आणि तिला त्‍या पावसाचा व गारांचा काहीच मार बसला नाही. रात्रभर मुसळधार पाऊस पडला. सकाळ झाली आणि मैना त्‍या खोप्‍यातून बाहेर पडली आणि तिने जे पाहिले ते आश्‍चर्यचकित व दु:खद होते. 

        रात्रीच्‍या गारांच्‍या माराने बहुतांश कावळे मृत्‍युमुखी पडले होते. तिला त्‍याचे खूप दु:ख झाले. तिला उडताना पाहून त्‍यात मरणोन्‍मुख असणा-या कावळ्याने विचारले की मैना तू जिवंत कशी यावर मैनेने उत्तर दिले,'' मी ज्‍या झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्‍वराची प्रार्थना केली व त्‍यानेच मला या संकटातून वाचविले. दु:खात परमेश्‍वरच आपली सुटका करू शकतो.

तात्‍पर्य :- ईश्‍वर संकटातून सुटका करतो किंवा संकटकाळात ईश्‍वर आपल्‍याला सुबुद्धी देऊन संकटात मार्ग सुचवितो.

🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧

stories for kids in marathi & marathi stories with moral values 
            
              MARATHI STORY 2


कावळ्याची गोष्ट || पाकोळी आणि कावळा kavla chi goshtaएक पाकोळी आणि एक कावळा स्वतःच्या सौंदर्यावरून भांडत होते. 
बोलता बोलता कावळा पाकोळीला म्हणाला, 'तुझं सौंदर्य फक्त उन्हाळ्यातच पहावं, माझं सौंदर्य सदासर्वदा सारखंच असतं त्यामुळे मी नेहमीच सुंदर दिसतो,'

तात्पर्य - दोन सुंदर वस्तूंपैकी जिचे सौंदर्य जास्त टिकाऊ तीच अधिक उपयोगी म्हटली पाहिजे.

🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 3कावळ्याची गोष्ट डोमकावळा आणि साप:- Moral stories for childrensएका अतिशय भुकेलेल्या डोमकावळ्याने, एका सापाला झडप घालून पकडले आणि आता त्याला मारून खाणार, तोच त्या सापाने त्याच्या अंगाभोवती वेटोळे घातले आणि त्याच्या मानेला दंश करून त्याचा प्राण घेतला. तेव्हा तो डोमकावळा म्हणाला, 'दुसर्‍यांना मारून स्वतःची भूक शांत करणार्‍याला हीच शिक्षा योग्य आहे.'

तात्पर्य - जो पदार्थ आपणास मिळणे शक्य नाही तो मिळविण्याचा प्रयत्‍न करणे म्हणजे स्वतःचा नाश ओढवून घेणे होय.

🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦🐧🐦

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

                Marathi story: 4कावळ्याची गोष्ट [शेळी आणि कावळा]:- Chan Chan goshti एकदा एक कावळा एका गरीब शेळीच्या पाठीवर बसून तिच्यावर चोची मारू लागला. तेव्हा शेळी त्याला म्हाणाली, ‘अरे, तू माझ्यासारख्या गरीबाला टोचतोस त्यापेक्षा जर कुत्र्याला टोचशील तर तू खरा.’
त्यावर कावळा म्हणाला, ‘कुणालाही त्रास देण्यापूर्वी मी त्याच्याकडून आपल्याला त्रास होणार नाही ना असा विचार करतो. जे शक्तिवान आहेत त्यांच्या वाटेला मी कधीच जात नाही, पण जे दुबळे आहेत त्यांना मात्र मी भरपूर त्रास देतो.’

तात्पर्य :- जो मनुष्य इतरांना त्रास देतो तो कुणालातरी भीतच असतो.

👨‍👩‍👧🦄👨‍👩‍👧🦄👨‍👩‍👧🦄🦄👨‍👩‍👧🦄

मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील Most popular 
Kids story कावळा चिमणीची गोष्ट kavala chimani chi goshta कशी वाटली जरूर सांगा व ह्या सर्व Moral Stories Marathi आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
No comments:

Post a comment