राजा राणीची गोष्ट || stories for kids in marathi || chan chan goshti

राजा राणीची गोष्ट || stories for kids in marathi || chan chan goshti

राजा राणीची गोष्ट Stories for kids in Marathi
राजा राणीची गोष्ट

नमस्कार,माझ्या प्रिय मित्रांनो आणि बंधु-भगिनींनो.आज आपल्याकरिता मी राजा राणीची गोष्ट  stories for kids in marathiलहान मुलांचे गोष्टी chan chan goshti चा collection या पोस्टमध्ये केला आहे. राजा राणीची गोष्ट व इतर गोष्टी दाखवा असा प्रश्न नेहमी लहान मुले विचारत असतात,त्यामुळे stories for kids in marathi उपलब्ध करून दिले आहे.Top 8 chan chan goshti in Marathi या पोस्टमधून आपल्यासमोर प्रस्तुत करित आहे.


लहान मुलांचे छान छान गोष्टी शेवटपर्यंत नक्की वाचा आणि या Marathi Moral Stories मधून काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न नक्की करा.चला तर मग वळूया राजा राणीची गोष्ट Stories for kids in Marathi कडे.


🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊🍊

 Marathi goshti ||  Chan Chan goshti

             MARATHI STORY 1



राजाची महानता:- lahan mulancha marathi goshti


  भोजराजा महादानी आणि धार्मिक प्रवृत्तीचा होता. त्‍याच्‍या उदारपणाच्‍या अनेक कथा त्‍याच्‍या राज्‍यापासून अन्‍य राजातही प्रसिद्ध होत्‍या. याच कारणांमुळे तो बहुसंख्‍य लोकांचे श्रद्धास्‍थान बनलेला होता. राजा भोज यांना एकदा अस्‍वस्‍थ वाटू लागले. तेव्‍हा वैद्यांनी हात टेकले. राजा भोजने तत्‍क्षणी आपल्‍या दिवाणास निमंत्रित करून त्‍याला सांगितले, मी आता फार वेळ जगणार नाही. जेव्‍हा माझी अंत्‍ययात्रा स्‍मशानस्‍थळी घेऊन जाल तेव्‍हा माझा एक हात पांढरा व दुसरा हात काळा करा. ते दोन्‍ही हात सर्व लोकांना असे दाखवतच घेऊन जा. भोज राजाची ही इच्‍छा दिवाणास मोठी विचित्र वाटली. त्‍याने विचारले, महाराज असे करण्‍यासाठी तुम्‍ही का सांगता आहात. 

        राजा म्‍हणाला,’’माझे रिकामे हात पाहून सगळ्यांना माहित होईल की राजा असो वा भिकारी सर्वजणच रिकाम्‍या हातानेच जातात. पांढरा आणि काळा रंगांचे वैशिष्‍ट्य म्‍हणजे की व्‍यक्तिसोबत जे जाते ते त्‍याचे चांगले किंवा वाईट कर्म. मला यातून सर्वाना हेच सुचवायचे आहे की जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.’’

तात्‍पर्य :- जन्‍मापासून मृत्‍यूपर्यंत सत्‍कर्म आणि चांगले आचरण ठेवावे.

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

stories for kids in marathi & marathi stories with moral values 
            
             MARATHI STORY 2


राजा जनक आणि ऋषि अष्‍टावक्र:- लहान मुलांचे गोष्टी || moral stories in marathi 



राजा जनक राजा असूनही त्‍यांना राजवैभवात आसक्ती नव्‍हती. लोभ मोहापासून ते सदैव दूर राहात. विनम्रता त्‍यांच्‍या स्‍वभावात होती. त्‍यामुळे ते आपले दोष दूर करण्‍याचा प्रयत्‍न करत असत. आत्‍मशोध घेण्‍याचा त्‍यांचा सदैव प्रयत्‍न सुरुच असे. 
      एकदा ते नदीकाठावर एकांतात बसून ‘सोऽहम’ चा जप करत होते. मोठ्या आवाजात त्‍यांचा जप सुरु होता. तेवढ्यात तेथून अष्‍टावक्र ऋषि चालले होते. ते परमज्ञानी असल्‍याने त्‍यांना राजा जनकाचा जप ऐकून ते जागेवरच थांबले व एका हातात छडी घेऊन थोडे दूर अंतरावर उभे राहिले. मग मोठ्या आवाजात तेही बोलू लागले,’’माझ्या हातात कमंडलू आहे आणि माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनकाच्‍या कानात ऋषींच्‍या बोलण्‍याचा आवाज गेला पण त्‍याने आपला जप सुरुच ठेवला. अष्‍टावक्रही ही गोष्‍ट जोरजोरात बोलत राहिले. शेवटी जनकाने जप थांबवून विचारले,’’मुनिवर, हे तुम्‍ही मोठमोठ्याने काय सांगत आहात’’ अष्‍टावक्र जनकाकडे पाहून हसले आणि म्‍हणाले,’’माझ्या हातात पाण्‍याचा कमंडलू आहे, माझ्या हातात छडी आहे’’ राजा जनक आश्‍चर्यात पडला व विचारू लागला,’’ महाराज अहो हे तर मलाही दिसत आहे की तुमच्‍याजवळ छडी आणि कमंडलू आहे पण हे दिसत असतानासुद्धा तुम्‍ही मोठ्याने ओरडून का सांगत आहात.’’ तेव्‍हा अष्‍टावक्रांनी जनक राजांना समजाविले,’’ राजन, माझ्याजवळ असणारा कमंडलू आणि छडी दिसत असतानासुद्धा ओरडून सांगणे हे जसे मूर्खपणाचे आहे तसेच तुमचे सोऽहम उंच आवाजात म्‍हणणे आहे. मंत्राला घोकण्‍याने काहीच फळ मिळत नाही. मंत्र आत्‍मसात करणे किंवा त्‍याला आतल्‍या चेतनेशी जोडल्‍यावरच त्‍याचे फळ मिळते.’’

तात्‍पर्य :- कोणतेही ज्ञान घोकंपट्टी करून मिळवण्‍यापेक्षा ते आत्‍मसात करण्‍याचा प्रयत्‍न झाला पाहिजे. कोरडे पाठांतर काहीच कामाचे नसते. 

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

लहान मुलांचे गोष्टी मराठी गोष्ट || stories for kids in marathi 

                  Marathi story: 3



अन राजाचे डोळे उघडले Chan Chan goshti Marathi



रामगडचा राजा अतिशय सणकी होता. एके रात्री त्याच्या डोक्यात अशी सनक शिरली. त्याने आपल्या दरबारातील मंत्र्याला बोलावून घेतले आणि सांगितले कि," आम्ही हे जाणून घेवू इच्छितो कि राज्यात कुणी प्रामाणिक व्यक्ती आहे कि नाही?" राजा आणि मंत्री रात्रभर आणि पूर्ण दिवस नगरात फिरत होते. शहराबाहेर त्यांना एक झोपडी दिसली, राजाने त्याच्याजवळील १०० सुवर्णमुद्रांची एक थैली त्या झोपडीत टाकली व ते दोघेजण राजवाड्याच्या दिशेने निघाले. राजाने वाटेल त्याची कल्पना मंत्र्याला सांगितली,"या झोपडीत राहणारा प्रामाणिक असेल तर तो सुवर्णमुद्रा परत करण्यासाठी आपल्याकडे परत येईल तेंव्हा आम्ही त्याला बक्षीस देवू आणि त्याने त्या परत केल्या नाहीत तर त्याला शिक्षा करू." ती झोपडी श्याम नावाच्या एका गरीब व्यक्तीची होती. त्याने राजाला आणि मंत्र्याला झोपडीकडे येताना पहिले होते. राजा सणकी आहे हे त्याला माहित होते. त्याने राजाला त्या मुद्रा परत केल्या आणि या मुद्रा माझ्या नाहीत त्यावर माझा अधिकार नाही म्हणून परत घ्या असे राजाला त्याने सांगितले. राजाने खुश होवून त्याला २०० सुवर्णमुद्रा भेट दिल्या. नंतर हाच क्रम चालू राहिला. 
        
               दर पाचव्या दिवशी कुणीतरी सुवर्णमुद्रा घेवून दरबारात येत असे व राजा त्याला दुप्पट मुद्रा देत असे.मंत्र्याने याला विरोध केला कारण यातून तिजोरी खाली होत चालली होती. प्रामाणिकतेच्या नावाखाली चालू असलेला हा बनाव आहे हे मंत्र्याला समजत होते पण त्याचा नाईलाज होता.हे सगळे सहन न झाल्याने त्याने अखेर एक दिवस धाडस करून मंत्री राजाला घेवून श्यामच्या घरी गेला तर पाहतो काय? श्याम आणि भेटी मिळवणारा प्रत्येकजण तेथे हजर होता. झोपडी आता झोपडी राहिली नव्हती तर एक अलिशान वाडा झाला होता. सर्वजण ऐषारामात राहत होते. सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला. त्याचे डोळे उघडले, त्याने श्यामला तुरुंगात टाकले व सुवर्णमुद्रा राजकोशात जमा करण्याचे आदेश दिले.

तात्पर्य-मदत करतानाही ती योग्य पद्धतीने योग्य माणसाला मिळते आहे कि नाही याचाही विचार व्हायला हवा.

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

stories for kids in marathi || Moral stories in Marathi || story marathi

              Marathi story 4



राजाचा अंत - मराठी गोष्टी [ लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti ]




एका देशाचा राजा हा लालची होता. तो आपली तिजोरी भरण्यासाठी प्रजेवर वेगवेगळे कर लादीत असे. एकदा राजा खूप आजारी पडला, अंतिम घटिका जवळ आली, यमाचे दूत नेण्यासाठी समोर उभे ठाकले असता, यमदूतांना समोर पाहून घाबरून राजाने विनवणी केली,"हे यमदूत!मला आणखी काही दिवस जगू दे, मी प्रजेच्या भल्यासाठी काही नवीन योजना तयार केल्या आहेत. त्यांना साकार करण्यासाठी मला आणखी काही दिवस वाढवून दे." 

             यमदुताने त्याला म्हटले,"राजन!प्रत्येक मनुष्य अमर होवू इच्छितो, पण ते शक्य नाही." हे ऐकूनही राजाचा अजूनही आग्रह सुरूच होता. तेंव्हा यमदुताने राजाच्या हातात एक कलश देत सांगितले, " ह्या कलशात तुझे जीवनजल भरले आहे. जोपर्यंत तू हे पीत राहशील तोपर्यंत तू जिवंत राहशील." राजाने विचारले," परंतु हे जल संपले तर?" यमदूत म्हणाले," तू थोडे थोडे पीत राहा ते दीर्घकाळ पर्यंत जाईल आणि तू जिवंत राहशील, एकदाच पिण्याचा प्रयत्न केलास तर तुझा मृत्यू अटळ आहे." राजाने काही दिवसांपर्यंत थोडे थोडे जीवन जल पिणे पसंत केलं आणि त्यानुसार दीर्घकाळ जीवन जगण्याचा प्रयत्न करीत गेला. पण एकेदिवशी त्याच्यातील लालची माणसाने त्याच्या संयमावर मात केली आणि त्याच्या मनात सर्व जल पिवून अमर होण्याचा विचार आला. त्याने तो अंमलात आणला आणि त्याचबरोबर यमदूतानी सांगितलेले पण खरे झाले. राजाचे मरण त्याचवेळी आले.

तात्पर्य - लोभाचा अंत कष्ट,संकट, विफलतेशी असतो. त्यामुळे मनावर संयम असणे हेच चांगले असते.

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

short moral stories in marathi written || lahan mulancha chan chan goshti
       
                 Marathi story 5


राजा आणि मंत्री - मराठी गोष्टी



एका सम्राटाला रात्री येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वत:तपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.

तात्पर्य-सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते.

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

parichay goshti || gavakadchya goshti in Marathi

                   Marathi story: 6


राजा आणि भिक्षू  - मराठी गोष्टी Chan Chan goshti Marathi



एक राजा नेहमी उदास राहायचा. लाखो प्रयत्न करून त्याला शांतता मिळत नसे. त्याच्या नगरात एक भिक्षु आला भिक्षूच्या ज्ञानपूर्ण उपदेशाने राजा प्रभावित झाला त्याने भिक्षूला विचारले." मी राजा आहे, माझ्याकडे सर्व काही आहे पण मनाला शांतता मिळत नाही. मी काय करायला हवे?" भिक्षु म्हणाले,"आपण एकांतात बसून चिंतन करा." राजा दुसऱ्याच दिवशी आपल्या कक्षात आसन घालून बसला. तेव्हा महालाचा एक कर्मचारी सफाई साठी तिकडे आला. राजाशी तो चर्चा करू लागला. कर्मचाऱ्याला राजाने त्याची समस्या विचारली. ती ऐकून राजाचे हृदय भरून आले. त्यानंतर राजाने प्रत्येक कर्मचाऱ्याचे कष्ट व दु:ख जाणून घेतले. सर्वांची व्यथा जाणून घेतल्यावर राजाला समजले कि कमी वेतनामुळे सर्व कर्मचारी त्रस्त आहेत. 

             राजाने त्यांच्या वेतनात वाढ केली. त्यामुळे ते खुश झाले. त्यांनी राजाचे आभार मानले. दुसऱ्या दिवशी राजाची भिक्षुशी भेट झाली. तेंव्हा भिक्षूने विचारले," राजन! आपल्‍याला काही शांतता मिळाली का?’’ राजा म्‍हणाला,’’ मला पूर्णपणे शांतता मिळाली नाही पण जेव्‍हापासून मी मनुष्‍याच्‍या दु:खाचे स्‍वरूप जाणले तेव्‍हापासून अशांतता थोडी थोडी कमी होत आहे.’’ तेव्‍हा भिक्षुने समजावले,’’ राजन, आपण आपला शांततेचा मार्ग शोधला आहे. बस्‍स, त्‍या मार्गाने पुढे जा, एक राजा तेव्‍हाच प्रसन्‍न राहू शकतो जेव्‍हा त्‍याची प्रजा सुखी असेल.’’

तात्‍पर्य – दुस-याचे दु:ख समजून घेण्‍यातच खरी शांतता लाभते. दुस-याच्‍या आनंदात जसे सहभागी होता येते तसे दु:खातही सहभागी व्‍हावे. त्‍याचे दु:ख कमी करता आले तर आपल्‍या मनाला शांतता मिळते. सहकार्य महत्‍वाचे आहे.

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

marathi goshti || stories for kids in marathi 
               Marathi story: 7


राक्षस  आणि  राजा Kids story in Marathi



           एका गावात एक राजकुमार राहत असे. तो अत्यंत शूर असतो. एक दिवस तो जंगलातून जात असताना त्यला एक राक्षस अडवतो. राक्षस त्याला धमकावतो 'आता मी तुला खाणार आहे.' राजकुमार म्हणतो, मी तुला माझ्या शस्त्रांनी ठार मारून टाकीन.

         राजपुत्र राक्षसाबरोबर खूप वेळ धाडसाने लढाई करतो. राक्षसाला आश्चर्य वाटते, तो राजकुमाराला विचारतो. तू मला खरच घाबरत नाहीस? 
राजकुमार त्याला म्हणतो,' माझ्या पोटाच्या बेंबीत हिरा आहे आणि तेच माझ मोठ शस्त्र आहे. जर तू मला मारून टाकले तर तू देखील मरणार. त्यामुळे मला तुला घाबरण्याचे  काहीच कारण नाही. 

        हे सर्व राक्षसाला खरच  वाटले आणि तो राजकुमारला सोडून देतो: परंतु प्रत्यक्षात राजकुमारच्या पोटात हिऱ्याचे शस्त्र वगैरे काहीच नसते.ते राजकुमारने केलेले एक नाटक असते शेवटी त्याला त्याचे हजरजबाबिपनाचेच शस्त्र वाचवते.

तात्पर्य -  शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ट.

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

stories for kids in marathi & marathi stories with moral values 

                   Marathi story: 8



चतुर राजा || लहान मुलांचे गोष्टी || story marathi



        खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एकदा बनारसचा राजा दुसऱ्या राजावर हल्ला करतो आणि त्याची सर्व संपती लुटून त्याचे राज्यही कबजा करतो  . युद्धातून आणलेली सर्व  संपत्ती तो पत्र्याच्या पेट्यांमध्ये ठेवतो आणि त्या पेट्या आपल्या बागेत पुरून टाकतो. या युद्धाच्या धामधुमीत पराभूत राजाचा राजकुमार स्वतःची सुटका करून घेतो आणि तो तेथून पळून जातो. विजेत्या राजाने त्याला कधीच पाहिलेले नसते. 

        राजकुमार संन्याशाचे रूप धारण करतो आणि बनारसच्या राजाला भेटायला जाण्याचे निर्णय घेतो. तो आणि त्याचे अनुयायी बनारसच्या राजाकडे जातात. बनारसचा राजा त्याचे तेज:पुंज रूप पाहून त्याला चांगला पाहुणचार करतो त्याला राजेशाही वागणूक देतो. 

         तो संन्यासी त्याच्या जादूच्या मंत्राच्या शक्तीने खजिना कोठे पुरून ठेवला आहे हे शोधून काढतो. तो त्याला राजवाड्याच्या आवारातील बागेत सापडतो, लवकरच ते  सारे  धन घेऊन तेथून पळून जातो. जेव्हा बनारसच्या राजाला त्याच्या खजिन्याच्या चोरीबद्दल समजते. त्याला खूप दु:ख होते. 

        तेव्हा त्याचा  प्रधान त्याला म्हणतो महाराज आपण का दु:खी होता, जी संपत्ती तुमची कधी नव्हतीच तिच्याबद्दल आपण का दु:ख बाळगत आहात? बनारसच्या राजाला सत्य उमगते. राजा दुखातून बाहेर पडतो.   

तात्पर्य - करावे तसे भरावे.

🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸🤴👸

   मित्रांनो तुम्हाला या लहान मुलांचे गोष्टी Chan Chan goshti आवडल्या की नाही नक्की कळवा । अशाच सुंदर छान छान गोष्टी मराठीतून आपल्यासमोर प्रस्तूत करनार आहोत.या पोस्टमधील stories for kids in marathi राजा राणीची गोष्ट कशी वाटली जरूर सांगा व या सर्व Marathi Moral Stories  आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका .

धन्यवाद.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा