Spruha joshi kavita स्पृहा जोशी कविता | Marathi poem

Spruha joshi kavita स्पृहा जोशी कविता | Marathi poem

Spruha Joshi poems in Marathi
Spruha Joshi kavita


नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Spruha joshi kavita तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.स्पृहा जोशी कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Spruha joshi kavita माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi poem उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Spruha joshi kavita स्पृहा जोशी कविता उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Spruha joshi kavita Marathi poem कडे.

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


अजून वाट पाहते by Spruha joshi


उगाच शब्द सांडणे, नकोच खेळ मांडणे
नकोच व्यर्थ हे आता स्वतः स्वतःत भांडणे..

नकोच कालचा पुन्हा अबोध कोवळा गुन्हा
नकोच वादळाकडे जुनेच वेड मागणे..

नकोच वाट पाहणे, तसाच जा निवांत तू ,
उगाच हे पुन्हा नको जिवास घोर लागणे.

का पुन्हा पुन्हा हव्या मिठ्या उगाच कोरडया
कशास हे अतां हवे कसेतरीच सांधणे..?

तुलाच शोधते पुन्हा, अजून वाट पाहते
नको नको म्हणूनही हवे तुझ्यात बांधणे !!


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


त्या मंतरलेल्या रानी by Spruha joshi


त्या मंतरलेल्या रानी
मन हळवे वेड स्वरांचे
कळ सोसत आज मुक्याने
झेलते दु:ख जन्माचे

सावल्यान् मागुनी वाटा
पळ्तात रोधुनी श्वास
फरफटते नशीब अवघे
तरीही सम्पेना आस

फुलण्याआधीच कितीदा
कोमेजुन मोहोर जाई,
अंताचे नकोच ओझे
उगमाची एकच घाई!

या मंतरलेल्या रानी
आरसा असे डोहाचा
खळबळते लाट जराशी
चेहरा हसे काळाचा!


विस्तीर्ण नभाच्या खाली
धरती निजलेली शांत
मी अवघडले बावरले
तू घेता हाती हात…

मी काजळ भरले डोळा
अस्फुट अंधुकशा रेषा
बोललो जरी ना काही
डोळ्यांची कळली भाषा…

तो पहिला स्पर्श अनामिक
तो पहिला श्वासही ओला
मन माझे मोहरले हे
अन् उर धपापुन आला

मी उंच उंच जाताना
तू धरला माझा हात
मी फिरून आले खाली
मिठीच्या या विळख्यात…

दाटून काहीसे येते
का दूर दूर जाताना
मी फिरून येईन तेव्हा
तू असाच असशील, हो ना???

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺



Ek Putala Futala Spruha Joshi Kavita


एक पुतळा फुटला
नेहमीप्रमाणे मला
काहीच फरक नाही पडला..
म्हणजे, अगदीच पडला नाही,
असंही नाही,
मी सगळ्यात आधी घाबरले
मग माझा घसा कोंदला
मग छाती जड झाली,
यापेक्षा आणखी काही..
नाही, खरं तर..
फारसा फरक नाही पडला.

मला वाटत खूप काय काय होतं खरं तर
नाही असंही नाही.
वाटत होतं की ओरडून ओरडून बोलावं
अभिव्यक्ती, जातिसंस्था,
‘त्यांचं’ हे, आणि ‘आपलं’ ते..
मेलेली मनं, मुर्दाड अस्मिता
आणखी हे असलं बरंच काय काय..

पण मी घाबरलेच खरं तर
कलाकार असल्यामुळे.
मग ‘त्यांनी’ माझी पुस्तकंच फाडली तर,
नाटकच बंद पाडलं तर
सिनेमाच होऊ दिला नाही तर
किंवा माझ्या तोंडालाच काळंबिळं फासलं तर
किंवा आणखी वाईट..
चारचौघांनी उद्या मलाच धरलं तर!
मी घाबरलेच खरं तर..

मग मी ठरवलं
की आपण शहाणे आहोत
आपलं डोकं ताळ्यावर आहे
आपण अगदीच प्रॅक्टिकल आहोत खरं तर.
आपण नकोच बोलायला खरं तर.
अभिव्यक्ती वगैरेची काळजी
आपण कशाला करायची..
आपण बरे, आपली कला बरी!

फुटायचे ते फुटणार, मरायचे ते मरणार
कुढायचे ते कुढणार
आपण सगळे बहुतेक हे असेच,
असेच संपणार…

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


भिंतीला टेकून उभी आहे मी Spruha Joshi Poems:


भिंतीला टेकून उभी आहे मी
मावळत्या सूर्याकडे एकटक पहात
तोही एकटक, माझ्याकडे पहात
टेकलाय लालभडक क्षितिजाला
थकलाय दिवसभराची शर्यत खेळून..

लाटा किती जवळ जातायत त्याच्या
असं वाटतंय आत्ता पिऊन टाकतील त्याला
एका घोटात!
पण त्याला कायमचा संपवू नाही शकणार त्या कधीच…

उद्या सकाळी तो उगवणाराच आहे
आजच्या इतकाच तेजस्वी,
पुन्हा उद्याची नवी शर्यत खेळायला..!!


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


Majhya Mitra Marathi Kavita by Spruha joshi


माझ्या मित्रा, माझ्या सख्या
एक दिवस इतका अचानक आलास
की ‘काळ’ हैराणच झाला.
माझ्या खोलीत येऊन उभा राहिला.
संध्याकाळचा सूर्य मावळायला आला होता.
पण थबकला.
किंवा आपल्या नशिबात ‘बुडणं’ आहे, हेच विसरून गेला

मग आदी नियमांनी
आपल्याला पिळवटून शपथ घातली,
काळाने त्या तशा उभ्या क्षणांना पाहिलं,
आणि एकदम
खिडकीतून बाहेर पळूनच गेला..

घडून गेलेल्या आणि थांबून राहिलेल्या
क्षणांची ती गोष्ट,
आता तुलाही खूप आश्चर्य वाटतंय
आणि मलाही.
आणि कदाचित काळालाही
पुन्हा ती चूक होणं मान्य नाही.

आता सूर्य रोज वेळेवर मावळतो
आणि अंधार रोज माझ्या उरात भरून येतो!
घडून गेलेल्या आणि थांबून राहिलेल्या
क्षणांमागे एक सत्य आहे
तुला किंवा मला
ते मान्य आहे की नाही,
ही वेगळीच गोष्ट आहे!

पण त्या दिवशी काळ
जेव्हा खिडकीतून बाहेर पळून गेला,
आणि त्या दिवशी जे रक्त
त्याचे गुढघे खरचटून सांडलं,
ते रक्त माझ्या खिडकीखाली
अजूनही साकळलंय ..!


🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

Spruha joshi kavita स्पृहा जोशी कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही Spruha joshi kavita or Marathi poem मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा