पोर डोंगरावर भाळली ranvedi kavita | marathi poems on nature | मराठी कविता

पोर डोंगरावर भाळली ranvedi kavita | marathi poems on nature | मराठी कविता

Por dongravar bhalali marathi kavita
Por dongravar bhalali

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! पोर डोंगरावर भाळली कविता तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.ranvedi kavita साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून पोर डोंगरावर भाळली माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये पोर डोंगरावर भाळली ranvedi kavita उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया marathi poems on nature | मराठी कविता कडे.

🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺🌹🌻


कविता : पोर डोंगरावर भाळली


पोर डोंगराव भाळली
त्याच्या नादी लागुनिया
अख्ख्या रानात पांगली ॥धृ.॥

रानगवताची फुलं
तिच्या कानामंदी डूल
अन् चाईचा मोहर
गळ्यामंदी गळसर
अहो टनटनी फुलली
तिच्या नाकामंदी फुली
अन् बुरांडीची फुलं
तिनं केसांत माळली ॥१॥

पोर माळावर खेळली
अन् वार्‍यासंग बोलली
वड-पारंबीचा झुला
तीचा गेला आभाळाला
पानसाबरीचं बोंड खाल्लं
लाल झालं तोंड
अहो हसता हसता
मऊ गवताव लोळली ॥२॥

गायी दांडाच्या वाटानं
चाली यंगत नेटानं
ढोल ढगांचा वाजला
नाच मोराचा पाहिला
आली पाऊस पहाळी
तव्हा गडदीक पळाली
पावसानं भिजवली
तरी उन्हात वाळली ॥३॥

तिचं मन डोंगरात
तिला दिलं शहरात
आता गच्चीवर जाते
दूर डोंगर न्याहाळते
त्याचा आठव येऊन
येतो हुंदका दाटून
त्याला हात जोडताना
दोन आसवे गाळली॥४॥


तुकाराम धांडे🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺

पोर डोंगरावर भाळली ranvedi kavita तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही ranvedi kavita or marathi poems on nature मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !

No comments:

Post a comment