Maza avadta rutu माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध || Marathi Nibandh

Maza avadta rutu माझा आवडता ऋतू  पावसाळा निबंध || Marathi Nibandh

Pavsala Nibandh
Maza avadata rutu

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Maza avadta rutu करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये माझा आवडता ऋतू : पावसाळा निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Maza avadta rutu विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आज essay in marathi on rainy season आपल्याला उपलब्ध करून देत आहोत.

        मित्रांनो,या पोस्टमध्ये पावसाळा निबंध उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा मराठी निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Maza avadta rutu पावसाळा निबंध कडे.

⛈️🌤️🌕⛅🌕⛅⛈️🌕⛅⛈️🌕⛅


maza avadta rutu पावसाळा निबंध || essay in marathi on rainy season


 पृथ्वीवरती विविध ऋतू आहेत, जसे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हे ऋतू म्हणजे निसर्गाची अजब जादूगारीच म्हणावी लागेल. या बदलत्या ऋतूंमुळेच पृथ्वीवरती सजीव जन्माला आले आणि त्यांची प्रगती झाली. भुतळ,वारा, पाणी, दबाव, चंद्र, सूर्य मिळून हा ऋतूंचा अजब आणि अनोखा खेळ मांडतात, ते सुद्धा दरवर्षी, न चुकता.

                  तसे सर्वच ऋतू महत्वाचे आहेत अगदी ग्रीष्म ऋतू पासून वसंत, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर सगळेच पण मला आवडतो तो पावसाळा किंवा वर्षा ऋतू. तसा सर्वाना हिवाळा जास्त आवडतो, मला हि आवडतो पण पावसाळ्याची गोष्टच वेगळी आहे.

                     जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी मे च्या शेवटच्या आठवड्यात आभाळ दाटू लागते, वारा सुटतो, आणि पावसाची पहिली सर पडते. मातीचा सुटलेला वास, वातावरणात अचानक पसरलेला गारवा वेगळाच आनंद देऊन जातो. या क्षणांची जादू काही अशी असते कि भरपूर कवी, लेखकांना प्रेरणा देते. पावसाच्या या पहिल्या सरीचे अनुभव त्यांनी आपल्या शब्दामध्ये कैद करून ठेवले आहेत. माझा आवडता कवी “सौमित्र” म्हणजेच किशोर कदम यांची एक कविता मला खूप आवडते,उन्ह जरा जास्त आहे दर वर्षी वाटतं.भर उन्हात पाऊस घेउन आभाळ मनात दाटतं,तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही.घामाशिवाय शरीरामध्ये कोणीच बोलत नाही.तितक्यात कुठून एक ढग सुर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो
 वारा उनाड मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडावरती छ्परावरती चढून पाहतोदुपार टळुन संध्याकाळ्चा सुरु होतो पुन्हा खेळ उन्हामागुन चालत येते गार गार कातर वेळ चक्क डोळ्यांसमोर ऋतु कुस बदलून घेतो पावसाआधी ढगांमधे कुठून गारवा येतो

                  पावसाळा फक्त कवीमन प्रसन्न करत नाही तर धरतीला सुद्धा तृप्त करतो, म्हणून मला पावसाळा ऋतू आवडतो. उन्हाने होरपळलेली धरती, झाडे, झुडपे आभाळातून पडलेले अमृत पिऊन खूष होतात. पाऊस आपले ओढे, नाले, नद्या पाण्याने भरतो; आपली पिके पिकवतो. जमिनीत मुरलेले हे पावसाचे पाणी मग झरे, विहिरी, बोअरवेल च्या रूपाने बाहेर येते आणि वर्ष भर आपली तहान भागवते.

                   भारत अजूनही एक शेती प्रधान देश आहे, भारतातील ६७% लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने शेतीवर अवलंबून आहेत. हि शेती मोठ्या प्रमाणात मान्सून हंगामावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे. हा पावसाळा लाखो लोकांना उपजीविकेचे साधन देतो, त्यांचे पोट भरतो, आणि म्हणून मला पावसाळा आवडतो. आपल्या भारतामध्ये पावसाला देवाचा दर्जा दिला जातो आणि त्यांची पूजा, अर्चना सुद्धा केली जाते.

**********************************


माझा आवडता ऋतू हिवाळा || maza avadta rutu Marathi Nibandh


                  हिवाळा म्हणजे, गवताच्या पातीवर सावरलेलं दव, सोनेरी किरणांनी नटलेली सकाळ, अंगणात खेळणारी थंडी. हिवाळा म्हणजे स्वेटरची शोधा-शोध, पहाटेचे धुके आणि गरम गरम चहा भजी. हिवाळा माझा आवडता ऋतू आहे. हिवाळ्यात सर्व वातावरण प्रसन्न असते, दिवसाचे उन्ह हि हवेहवेसे वाटते. थंड वातावरणामुळे दमछाक होत नाही, दिवसभर ताजे तवाने वाटते. मला हिवाळा ऋतू आवडतो कारण यात उन्हाळ्याचा घाम नाही आणि पावसाचा चिखल हि नाही.

                  हिवाळ्याच्या अश्या आल्हाददायक वातावरणामुळे खूप लोक कुटुंबियांसोबत सहली काढतात. शाळेची वार्षिक सहल सुद्धा याच ऋतू मध्ये काढली जाते. हिवाळ्यातील प्रवास आपल्याला दमवत नाही या उलट पावसाने रंगवलेले हिरवेगार डोंगर, पर्वत, दऱ्या निखळ पाण्याने वाहणाऱ्या नद्या सारा प्रवास एक सुखद अनुभव बनवतात.

                   हिवाळ्याच्या थंड रात्री पांघरुणात शिरून झोपही छान लागते, सकाळी उठावेसे वाटत नाही. पण पहाटेच्या धुक्यात फिरण्याची एक वेगळीच मजा असते, अगदी ढगांमध्ये चालल्यासारखे वाटते. गुलाबी थंडी, धुके, सर्वत्र प्रसन्न वातावरण, हिवाळ्यातले दसरा, दिवाळी, क्रिसमस सारखे सण या सर्वांमुळे मला हिवाळा ऋतू खूप आवडतो.

⛈️🌤️🌕⛅🌕⛅⛈️🌕⛅⛈️🌕⛅

Maza avadta rutu निबंध तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपले प्रतिसाद आम्हाला खुपच मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे माझा आवडता ऋतू  पावसाळा  व माझा आवडता ऋतू हिवाळा आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

No comments:

Post a comment