Marathi prem kavita मराठी कविता प्रेमाच्या | Love poem in Marathi
Marathi prem kavita |
नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Marathi prem kavita तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.मराठी कविता प्रेमाच्या साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून Marathi prem kavita माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
मित्रांनो,या पोस्टमध्ये Love poem in Marathi उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी प्रेम कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया Marathi prem kavita कडे.
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
Marathi kavita [मी आणि ती]
तिला माझ्या कविता आवडतात ,
आणि मला कवितेतली ती
कवितेत ती स्वतःला शोधते ,
आणि मी तिच्यात कविता शोधतो
कळत नकळत शब्द जुडतात
भावना अलगद स्पर्श करतात
तिला कवितेतला साधताना भावतो
तिचा कवितेतला भाव मला बराच काही सांगतो
कवितेत न कळत ती हरवून जाते
शब्दात माझ्या ती गुंतून राहते
तिच्या वाचण्याने मिळे कवितेला स्वर
शब्द लेखणी वरून वाहती ओठांवर
अर्थ लाभतो कवितेस तेव्हा
हसू येई तिच्या गाली जेव्हा..!!!
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
Prem kavita [ प्रेयसी म्हणजे ]
प्रेयसी म्हणजे स्वप्न
बायको वास्तव
बायको म्हणजे बर्फ
प्रेयसी विस्तव
स्वप्नावर कविता होतात
वास्तवावर नाही
वर्षातल्या एका दिवाळीचं कौतुक
रोजच्या दिवेलावणीचं नाही
पण एक मात्र खरंय यार हो
ती सोडून जाते
आणि ही जवळ असते
कविता केली नाही तरी
ही हाताशीच असते.
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
Marathi prem kavita [ तू मला विसरून जाणार ]
तू मला विसरून जाणार
असं वाटतंय,
तू मला विसरून जाणार...!
मग कधीतरी कुणाच्या तोंडून
नावऐकायला मिळालं,
काय करते आता ती?
कुठे आहे सध्या ?
मग लक्षात आलं,अरे !
आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढला,
तिचा नंबर शोधायला,
पण तिचा नंबरच लागला नाही...
कदाचित बदललेला नंबर माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे
तिचा नंबर भेटतोय का ?
कारण तिची मनापासूनच
आठवण येत होती,
न सांगता एकमेकांच्या
मनातलं ओळखणारे,
असं नातं होतं आमचं,
कुणाचीही नझर लागण्यासारखं...
पण असं काहीतरी घडलं,आणि....
आता कशी असेल ती ?
कुठे असेल ती ?
असे अनेकानेक प्रश्न
डोक्यात येत राहीले...
आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...
मग तिच्या घरी
सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे,
अशी विचारपूस करायला ?
खरं तर फक्त तिच्यविषयी
विचारायचं होतं,
विचारलं मग,
कसे आहेत सगळे ?
थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...
माझी मैत्रीण काय म्हणते ?
ती आता काय बोलणार ?
आणि ती काही बोलू शकते का आता ?
थोड्या शांततेनं मग मी विचारलं..
असं का म्हणताय ?
अरे, ती काही बोलायला,
ती या जगात असायला तरी पाहिजे ना ?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस...
तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते...
मग आवाज आला, ऐकतोयस ना.. !!!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस,
असं तिनंच मला सांगितलंय
तुला सांगायला...
आणि हो तुझ्यासाठी काहीतरी
लिहून तिनं ठेवलंय,
ती म्हणालेली,
माझी आठवण त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल,
तेव्हा त्याला दे...
तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला...
तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही,
नाहीतर तिही रडत राहणार,
दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच...!!!
मग मी तिच्या घरी जाऊन
ती चिट्टी घेऊन आलो...
चिट्टी -खरं सांगू जाता जाता,
तुझी खूप आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून,
जीव तुझ्यात अडकून राहिला होता,
पण तू नाही आलास,
मग विचार केला,
तुझ्यासाठी जाता जाता,
काहीतरी बोलून जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील..!!!
या जन्मात मी तुझी होऊ शकली नाही...
पण पुढच्या जन्मी माझा होशील ना रे...?
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
love poem in marathi [माझे पण डोळे बरसले आहेत रे]
"कसा आहेस ?खूप दिवस झाले तुझ्याशी बोलली नाहीये रे...
आवाज तुझा ऐकायला माझे पण कान तरसले आहेत रे..."
मला काहीच फरक पडला नाहीयेय असे तुला वाटत असेल ना?
पण तुझ्या इतकेच माझे पण डोळे बरसले आहेत रे...."
"माझ्या प्रत्तेक छोट्या छोट्या गोष्टीत होतास तू,
माझ्या प्रत्तेक स्वप्नात होतास तू,
खूप भिजला असशील ना माझ्या आठवणींच्या पावसाने?
माझ्याही गालावरून रोज घरंगळलायस तू".
सुरूवात झाली तेव्हा आपण खूप खूप बोलायचो,
लपले नव्हते काहीच,एकमेकांसमोर मनाचे दरवाजे खोलायचो,
रागवण्यात आणि मनवण्यात मजा होती वेगळी,
आयुष्याची स्वप्न रंगवण्यात अक्खा दिवस घालवायचो.
खांद्यावर तुझ्या डोके ठेवून समुद्राच्या लाटा किती सुंदर वाटायच्या,
हाताने माझा हात धरलास कि,मनात संसाराच्या कल्पना थाटायच्या,
काळजीने जरी ओरडलास तरी माझ्या अश्रुधारा सुटायच्या,
पावसाच्या सरी मला तुझ्या सारख्या भेटायच्या.
शिक्षण संपले अन तुला नोकरी लागली,
तेव्हाच बहुतेक आपल्या नात्याला कुणाची तरी नजर लागली,
तुझ्यावरच्या प्रेमाची माझी तहान अजून नव्हती रे भागली,
विश्वास कर माझा, मी मुद्दाम नाही रे अशी वागली.
तुझ्या नोकरीनंतर खूप काही बदलले,
तासन तास चालणारे फोन मिनिटामध्ये घसरले,
एकटेपणा हळू हळू माझ्या अंगवळणी पडला,
आपल्या प्रेमाचा बंगला त्या एकांतात दडला.
दिवसा वेळ नाही म्हणून आपले रात्री विषय निघायचे,
दमलेल्या तुझे डोळे बोलता बोलता निजायचे,
जागा आहेस असे मानून मग मी एकटीच बडबडायचे,
सांगून झाले कि माझे डोळे थोडेसेच पण..... नक्की भिजायचे.
दमले होते रे मन त्या एकटेपणाला,
तुझ्या जवळ राहून सुद्धा आलेल्या एकांताला,
तरसले होते रे तुझ्या सहवासाला,
कंटाळले होते तू आहेस सोबत अश्या त्या भासाला.
अडकवून ठेवायचे नव्हते,म्हणून मोकळे केले मी तुला,
विसरताना खूप त्रास होईल पण जमले माफ कर मला
,
खूप चांगला आहेस तू, उंच उंच भरारी घेशील,
येईल कोणीतरी नवीन तुझ्या आयुष्यात तिला स्वर्गसुख देशील.
यात काही चुकले का रे माझे...!!!
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
Premachya kavita [जुन्या आठवणी आठवले]
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले .
वादात राहिलेले ते
माझे प्रेम आठवले.
एका क्षणात डोळ्यात
या पाणी दाटवले.
होते ते सारे आज
का संमपवले.
हाथ माझे हे कापू
लागले.
जेव्हा डोळ्यातले
पाणी ते पुसू लागले.
मनास मन हे
एकदा भिड्ले.
पण मन तूटल्या नंतर
मन कधी न हसले.
जुन्या आठवणी त्या
एकांतात आले.
म्हणून या गालावर
आश्रु पसरले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले.
आज पुन्हा त्या तुझ्या
जुन्या आठवणी आठवले...
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
मराठी कविता प्रेमाच्या [काळीज मी आणि ठोका तु]
सोडून जातांना एकदा
तू मागे वळायचं होतं.....
तुझं माझं नातं
थोडं जपायचं होतं.....
पाठ फिरवली मी,
तु हाक मारायचं होतं....
लपवलेल्या अश्रुंना माझ्या
थोडं न्याहाळायचं होतं.....
काय हरवलं आहे आपल्यात ?
एकदा विचारायचं होतं....
अबोला धरला मी,
तु कारण ताडायचं होतं. ...
हसतांना मला बघुन ,
तु जरा गोंधळायचं होतं
एक हुंदका मी जपला,
तु ओळखायचं होतं....
स्वार्था पुरतीचं प्रेम माझं,
हे ही खरंच होतं....
पण स्वार्थातल्या या प्रेमात
एक "प्रेम" तेवढंच मुद्याचं होतं....
मार्ग आपले वेगळे, हे तर
शेवटी होणारच होतं...
स्वीकारायचं कसं.... हेच फक्त
कळत नव्हतं...
काळीज मी आणि ठोका तु एवढच
मला म्हणायचं होतं....
तुझं माझं नशीब, त्याने असच
का लीहायचं होतं....??
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi prem kavita [फक्त एकदा येऊन जा ...]
कोमेजलेल्या फुलांना जरासा सुगंध देऊन जा
सुकलेल्या अश्रुना जराशी ओल देऊन जा
कसला दिवस अन कसली रात्र तुझ्याविना
आणखी काही दिवस माझ्या नावे करून जा
एकदा येऊन जा...
स्वप्न बघण्याची भीती वाटतेय आता
कारण त्या स्वप्नात तू नाहीस
स्वप्नात का होईना एकदा येऊन जा...
हात रिकामा भासतोय मला
कारण हातामध्ये तुझा हात नाही
त्या स्पर्शामधले शहारे एकवार देऊन जा
एकदा येऊन जा...
बंधनांच्या गर्दीत हरवून गेलीस तू
त्या गर्दीत भिरभिरल्या डोळ्यांनी शोधतोय तुला
त्या नजरेला तुझ्या दिसण्याचा आभास का होईना देऊन जा
एकदा येऊन जा ...
तुझ्या असण्याची इतकी सवय झाली होती
तू नाहीस हे आता मन मान्यच करत नाही
एकदा फक्त येऊन त्या वेड्या मनाला हे समजावून जा ...
फक्त एकदा येऊन जा...
फक्त एकदा येऊन जा ...
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi prem kavita [ ते क्षण मझ्यासवे.]
तिला ही आठवण येत असेल माज़ी,
अन रडत ही असेल ना आठवणीत माझ्या...
तिला ही हसवावेसे वाटत असेल ना मला,
अन लाजावेसे ही वाटत असेल ना प्रेमात माझ्या...
तिच्या स्वप्नांत ही येत असेल ना मी,
अन स्वप्नात ही यावेसे वाटत असेल ना माझ्या...
तिला ही पहावेसे वाटत असेल ना मला,
अन डोळ्यांत माझ्या सामावावेसे देखील वाटत असेल...
तिला ही फिरावेसे वाटत असेल ना,
अन फिरता फिरता सहवासात हरवावे से ही वाटत असेल ना माझ्या...
तिला ही खूप काही सांगायचे असेल ना मला,
खूप बडबड करुण निजावेसे ही वाटत असेल ना कुशीत माझ्या...
तिला ही आनंदाने जगावेसे वाटत असेल ना,
अन हे जीवन सरवावेसे ही वाटत असेल ना सोबती माझ्या...
तिला ही मन आहे
हृदयातील भावना ही आहे तिला...
मग का नाही अनुभवले
ते क्षण मझ्यासवे...
असो
पण प्रिये आठवणीत सदा राहशील तू माझ्या...
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi kavita on love [तूच माझे जीवन आहे]
तूच माझे जीवन आहे....!
तूच माझे जगण्याचे कारण...!
म्हणूनच देवाला प्राथना केली मी..!
माझे सर्व सुख; तिला दे..!
आणि तिचे सर्व दुख; मला दे.....!
मंग का आशी सोडून गेली अधुऱ्या वाटेवर..!
एकेकट्या वाटेवर एकटाच राहिलोय मी..!
एकटा राहिल्यावर मनाला शांती मिळते..!
मित्रांनी विचारले
का असा एकटा राहतोय..!
का असा दुखी; राहतोय..!
मी मित्रांना पाहून बोललो..!
मी देवाला प्राथना केल्थी..!
ती पूर्ण झाली...!!!
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi kavita on love [तुज बघता]
तुज बघता सारा हिशेब चुकला होता
मी अमावास्येला चंद्र पाहिला होता
तो एकच झाला गुलाब अवघा लाल
जो ओठांवरती तुझ्या टेकला होता
तालात नादली तुझी पैंजणे तिकडे
हृदयाचा ठोका इकडे हुकला होता
डोळ्यात अचानक उभ्या जळाच्या लाटा
मी डाव प्रीतीचा पहिला शिकला होता
निथळता चांदणे असह्य अंगावरती
मी चंद्र तुझ्या वस्त्राने टिपला होता
तू मिठीत घेता श्वास थांबले होते
मज मारायचा डाव चांगला होता
पाहिले जयाने तुझे लाजरे हासू
माणूस तो आयुष्यातून उठला होता
चढणार होते जहर तुला हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi prem kavita [सात जन्माची काय गत]
प्रिये तुझ्या आठवणीत ,
प्रिये तुझ्या आठवणीत चालत असतांना
मला चार टाके पडले
रक्त वाया ण घालवता
मी त्यानेच प्रेमपत्र रखडले
य सार्यात डॉक्टरने मात्र
चारशे रुपये लाटले
प्रिये मी सारच वसूल करणार आहे
पण त्याआधी तुझ्या आठवणीत
मी एक झाड लावणार आहे
तू माझी झालीस कि
त्या झाडाची गोड फळे चखनार आहे
जर तू माझी नाही झालीस तर ते झाड कापूनी मी
माझे चारशे रुपये मिळवणारच आहे
प्रिये तुझ्या आठवणीत
तुला मी प्रेमपत्र लिहणार आहे
त्यासाठी आभाळाचा कागद
अन समुद्राची शाइ करणार आहेच
तुझा नकार असेल तर
मग माझा कागद परत दे
मी त्यावर पाणी तापवणार आहे
प्रिये तुझा नकार मिळ्यावरही
तुझ्या आठवणीची आठवण ठेवणार आहे
थोडा वेळ दुख व्यक्त करणार आणि
मग लगेच दुसरीच्या शोधात निघणार आहेच .
लाग आताच लग्नासाठी मुलगा शोधायला
आपली वाट आपणच शोधायला
हृदयातील दुख हृदयातच दाबायला
चेहऱ्यावर खोत खोत हसू आणायला
नाही जगणार हा एक जन्म माझ्या सोबत
सुदेव म्हण किवा दुर्देव
मग सात जन्माची काय गत
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi prem kavita [फक्त मिठीत घे ]
फार काही नको रे तुझ्याकडून
फक्त मिठीत घे …
सगळी दुनिया विरोधात असल्यावर
फक्त मिठीत घे …
जगण्याची इच्छाच असेल गेल्यावर
फक्त मिठीत घे …
मरणाच्या आधी दोन क्षण
फक्त मिठीत घे …
फार काही नको रे तुझ्याकडून
फक्त मिठीत घे …
फक्त मिठीत घे … -
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
prem kavita [आज तिचा फोन आला]
“आज तिचा फोन आला,,
“आज तिचा फोन आला,,
शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,,
स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ लग्न ठरलं ,,
ती सावरली पण तो क्षणात ढासळला ,,
अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,,
शब्द सगळे हवेत विरले.,,
ती म्हणाली माफ करशील ना रे मला ??
तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस ?
कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखातेस ,,
या जन्मी नाही झालीस माझी ,, तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्तमाझा हक्क असेल ,,
ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल ,,
धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,,
कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला ...
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
prem kavita [एकदाच प्रेम केल .]
एकदाच प्रेम केल ..
खूप काही सहन केल आयुष्यात ..
पण कधी रडावस वाटल नाही…
मनात होत खूप काही….
पण कधी बोलावस वाटल नाहिच ..
सर्वांनी प्रेम दिल मला ..
पण कुणावर परम कारावास वाटल नाहिच ..
प्रेम एकदाच केल मी त्यात सुदधा फसलो ..
आणि पुन्हा कधी जगावस वाटल नाही …
काही झाले तरी एकदम मस्त जगायचे :
काही झाले तरी एकदम मस्त जगायचे
काहीहि झाले तरी एकदम मस्तच जगायचे
अडचणी या येताच राहतात
त्या येण्यासाठीच तर असतात
आत्मविश्वासाने त्यांना सामोरे जायचे
काही झाल तरी एकदम मस्त जगायचं
अपयश आल म्हणून खचायच नाही
थारा देऊन त्याला बरोबर घ्यायाच नाही
नव्य जोमाने पुन्हा उभे राहायचे
काही झाल तरी एकदम मस्त जगायचे
आजची वेळ गेली तरी हसले पाहिजे
ते पाहून मरणही वाट चुकले पाहिजे
समाधानी मनाने हसून निघायचे
म्हणूनच काही झाल तरी एकदम मस्त जगायचं
काही झाल तरी एकदम मस्त जगायचं .
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
मराठी कविता प्रेमाच्या [स्वप्नपरी]
आहे एक सुंदर परी ,
माझ्या स्वप्नात बसलेली …
समोर नाहि पण ,नेहमीच
माझ्या हृदयात असलेली ….
तिच्या आठवणीत नेहमी
मन झुरते माझे …
बोलणे झाले नाहि तर ,
मनच लागत नाही कुठे …
अशी कशी मनात
घर करून गेलीस तू …
हृदयात ण विसरणारी ,
सुखद झखम केलीस तू …
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi kavita [तुझाविन जगणे अधरे वाटे ]
झुळूक लाजरी येते
अन स्वप्न वेलीवर झुलते ..
सांज सावली येते
अन उगीच धडपड होते ….
देणा चाहूल साजणी
आज भाव मनी हा दाटे…
येशील का तू सांग एकदा
तुझाविन जगणे अधरे वाटे …
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi prem kavita [एकटेच शब्द हे माझे]
एकटेच शब्द हे माझे
सोबतीला सूर नाही
डोळ्यांत दाटले अश्रू
पण आसवांचा पूर नाहि
हाचआहे तो किनारा
येथेच झाली होती भेट आमुची
अन् संपली जेथेच कहाणी
तोही पत्थर आज दूर नाहि
तू जिथे असशील तेथे
पौर्णिमेचा चंद्र सदा नांदो
आंधळ्या माझ्या नभाला मात्र
चांदण्यांचा नूर नाहीच
ही मेजवानी चालली
माझाच केला घात त्यांनी
पंगतीला यावे अन बसावे
मी एव्हढा हि काही मजबूर नाहिच
रात्र त्यांची नेहमीच झिंगलेली
पण आत्मे मात्र अस्थिर
शांत आहे झोप माझी
अंतरी काहीच काहूर नाही…..
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi prem kavita [प्रेम करावस वाटत]
तुला चोरून बघताना
मला खुप बर वाटत,
तुझ्या मागुन फिरताना
तुझ्या सोबत फिरावस वाटत,
तुझ ते निरागस हास्य
...निहारून पहावस वाटत,
हातात हात घालून
तुझ्या सोबत चालावस वाटत,
तुझ्या त्या लाजन्या कड़े
एकटक पहावस वाटत,
तुझ्या समोर उभा राहून
तुझा चेहरा मनात भरावसा वाटत,
मला खुप खुप खुप
तुझ्या सोबत बोलावस वाटत,
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत,
खरच
तुझ्यावर जिवापार
प्रेम करावस वाटत....
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
love poem in marathi [कुणीतरी असाव]
कुणीतरी असाव
गालातल्या गालात हसणार
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसाणार.
कुणीतरी असाव
आपल म्हणता येणार
केल पारक जगन
तरी आपल करून घेणार .
पुसणार कोणी असेल तर
डोळे भरण्याला अर्थ आहे .
कुणाचे डोळे भरणार नसतील तर
हे मरण देखील व्यर्थ आहे.
अंतरीचे दुख व्यक्त करताना
हृदय माझे भरून आले
जीवनाची व्यथा सांगताना ,
नयनी अश्रू ढळू लागले .
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
love poem in marathi [शपथ तुला प्रेमाची.]
शपथ तुला प्रेमाची...
शपथ तुला प्रेमाची
सोडुन मला जाऊ नकोस,
जुळलेलं नातं क्षणात अस तोडुन जाऊ नकोस.
.
शपत तुला प्रेमाची
ह्रदयाच्या पंखावरती कोरलेलं तुझ नाव मिटवून जाऊ नकोस,
तुझ्याच प्रेमाने भरलेल माझं ह्रदय असं तोडुन जाऊ नकोस
.
शपथ तुला प्रेमाची
विसरुन मला दुर जाऊ नकोस,
तुझ्यासोबत जगलेले ते अविस्मरणीय क्षण असे पुसुन जाऊ नकोस.
.
होईल तुला पच्छाताप
जाणिव माझ्या प्रेमाची तुला झाल्यावर
तेव्हा रडूनी काय करशील एकदाच प्रेम हातचं निसटल्यावर
.
शपथ आहे तुला माझ्या प्रेमाची माझ्यापासून दूर तु जाऊ नकोस...
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
marathi prem kavita [प्रेम नसतं फक्त]
प्रेम नसतं फक्त दाखवण्यासाठी
ते असतं आयुष्यभर जपण्यासाठी
प्रेम नसतं मजबुरीन सोडण्यासाठी
ते असतं मरूनही जिवंत राहण्यासाठी !
प्रेम नसतं फक्त बघण्यासाठी
ते असतं काहीतरी वेगळ करण्यासाठी
प्रेम नसतं तू माझा ,मी तुझी म्हणण्यासाठी
ते असतं नविन इतिहास घडविण्यासाठी !
प्रेम नसतं तू मला आवडतेस म्हणण्यासाठी
ते असतं मनातील भावना मोकळ्यापणान सांगण्यासाठी
प्रेम नसतं फक्त हसण्यासाठी
ते असतं दु:खात एकमेकांच्या सहभागी होण्यासाठी !
प्रेम नसतं कधी लपवण्यासाठी
ते असतं वेळ ,काळाच भान ठेवण्यासाठी
प्रेम नसतं फक्त जीवन जगण्यासाठी
ते असतं एकमेकांना प्रत्येक वळणावर साथ देण्यासाठी !
प्रेम नसतं फक्त मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणण्यासाठी
ते असतं म्हणेन ते करण्यासाठी
प्रेम नसतं कधी आपला नफा करून घेण्यासाठी
ते असतं एकमेकांच सुख साधण्यासाठी !
प्रेम नसतं फक्त एकमेकांना विचारण्यासाठी
ते असतं दोघांनीही निभावण्यासाठी
प्रेम नसतं कुणाचतरी ऐकून गैरसमजूत करून घेण्यासाठी
ते असतं आपल्या विश्वासावर ठाम राहण्यासाठी !
प्रेम नसतं फक्त करण्यासाठी
ते असतं एकमेकांची काळजी घेण्यासाठी
प्रेम नसतं इतरांना दुखावण्यासाठी
ते असतं सदैव एकमेकांना मनात बसवण्यासाठी !
💝💖💞💘💝💖💞💘💝💖💞💘💝
Marathi prem kavita संग्रह तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही मराठी कविता प्रेमाच्या or love poem in marathi मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
धन्यवाद !
Thanks for Sharing मराठी हृदयस्पर्शी प्रेम कविता
उत्तर द्याहटवाThis is very intresting post. Thank you so much for sharing this article with us.
उत्तर द्याहटवाbirthday wishes in Marathi for friend