Marathi kavita on life partner मराठी कविता प्रेमाच्या | love poem in marathi

Marathi kavita on life partner मराठी कविता प्रेमाच्या | love poem in marathi

Marathi Kavita on love
Marathi Kavita on life partnerनमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Marathi kavita on life partner तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच. love poem in marathi साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून मराठी कविता प्रेमाच्या माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Marathi kavita on life partner उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया marathi kavita on love | मराठी कविता कडे.

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


Marathi kavita on life partner [सख्‍या रे तुझी साथ]


सख्‍या रे तुझी साथ रे हवी,
एकटी भरकटते मी वाटेवरी..

भेटशील ना रे मज तू सांगना,
झाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...

गहि-या क्षणी वाटते मनी,
नवे रेशमी स्‍वप्‍न उमलावे...

रेशमी खुशीत सख्‍या रे तुझ्या,
आज धुंद होवून मी हरवावे..

भेटशील ना रे मज तू सांगना,
झाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...

गुलाबी ओठावरी शब्‍द ही नवी,
मनी झंकारते प्रेमळ गाणी...

स्‍वप्त सुरांच्‍या लाटेवरी साद ऐकू येई,
नवे सूर गुंजते माझ्या मनी...

भेटशील ना रे मज तू सांगना,
झाली मी बावरी वेडी तुझ्यापरी...

नयनात रंगलेले स्‍वप्‍न रे तुझे,
स्‍वप्‍नात गुंतलेले अधिर मन माझे...

रोज भेटते मी तुज स्‍वप्‍न नगरी,
की वेडे भास होतात रे मला तुझे...

भेटशील ना रे मज तु सागंना,
झाली मी बावरी वेडी तुझ्यापरी....!!

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


love poem in marathi [तुझ्या प्रेमात पडलोय ग ]


मी खरंच तुझ्या प्रेमात पडलोय ग़
अजुन ही तुला हे कसे कळत नाही
तू नसताना ही तुझ्या आठवणीतच असतो
तू असतेस तेव्हा ते प्रेम तुला कसे कळत नाही

कधी पासून प्रेम करतोय तुझ्यावर
माझे मलाच ठाऊक नाही
पण एवढे मात्र नक्की आहे की
आता तुझ्या शिवाय मला काहीच ठाऊक नाही

तू नसतेस पण असे कधी वाटले ही नाही
तू असतेस कायम माझ्या मनातल्या घरा
तुझा आभासच अधिक सुखावतो मला
तुझ्या असण्याहून ही प्रिय आहे जरा

मनातले बोल ओठांवर येत नाही कधी
तुझ्या दुरावण्याची भीती उगीच मनी असते
तू असतेस तेव्हा बरेच काही बोलायचे असते
ते तसेच राहते आणि वेडे मन स्वत:शीच हसते

तुझी प्रतिमाच अधिक बोलते माझ्याशी
निदान माझे प्रेम तिला जाणवते तरी
पण मन पुन्हा स्वप्नातच रमते जागेपनी
प्रेम कळेल माझे तुला ही अन होशील माझी कधी तरी


👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


Marathi kavita on life partner [एक प्रेयसी पाहिजे]


एक प्रेयसी पाहिजे,
पावसात चिंब भिजणारी;
अन मलाही तिच्यासोबत,
भिजायला लावणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
फुलपाखरांमागे धावणारी;
फुलांचे सारे रंग उधळत,
झाडां मागे लपणारी .
एक प्रेयसी पाहिजे,
मुग्धपणे हसणारी;
माझ्या बाहूपाशात,
अलगद येऊन बसणारी,
एक प्रेयसी पाहिजे,
कशीही दिसणारी;
पण मनाने मात्र,
अप्रतिम सुंदर असणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
जिवलग मैत्रीणअसणारी;
आमच्या नाजुक नात्याला,
हळुवारपणे जपणारी.
एक प्रेयसी पाहिजे,
माझ्या भावना जाणणारी;
मी जसा आहे तसेच,
माझ्यावर प्रेम करणारी.
एक प्रेयसी पाहीजे,
प्रेमाला प्रेम समजणारी;
सुखा-दुःखात माझ्या,
तन्मयतेने साथ देणारी.

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


Marathi kavita on life partner [प्रेम तुझं खरं असेल तर]


प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


love poem in marathi [सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल]


येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

वेड हसण्याची वेड दिसण्याची वेड रुसण्याची ग
वेड्या चंद्राची वेड्या ता-यांची रात्र वेडाची ग
वेड्या प्रश्नाच वेड उत्तर देशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

माझ्या नेत्रात माझ्या गात्रात मनात माझिया
तुझ्या गंधाचा तुझ्या छंदाचा उधाणे पुरिया
तुझ्या भरतिचा चंद्र नवतिचा करशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

बघ जरा एकदा , ऐक माझ्या फुला
मौन माझे आता सांग बघते तुला
तुच स्वप्नातली चंद्रिका साजिरी
तुच सत्यातली मोहिनी लाजरी
अभ्र विरताना रात्र ढळताना येशिल का जरा??
कोणी नसताना काही कळताना येशिल का जरा??
तुझ्या नावात माझ्या नावाला घेशिल का जरा??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला??
तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
सांग तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


Marathi kavita on life partner [कायमचा अलविदा]


अचानक लाइफ मध्ये आली कोणी अशी
कोण जाणे ती परी दिसते तरी कशी
आवाज तिचा आहे नाजुक परी सारखा
पण हरकती अगदी लहान मुलीसारख्या
बोलते तेव्हा वाटतं एइकतच रहावं
हसताना वाटतं की पाहतच रहावं
का कोण जाणे काय जादू आहे तुज्यात...


कसा मी सापडलो तुज्या फ्रेंडशिप च्या काचाटयात
तुज्याशी बोललो की मन खुप सुखावतं
दिवसभराचा टेंशन कुठच्या कुठं दुरावातं
बोलतेस तू मला मी आहे खुप छान
अग पण तू तर आहेस माज्या पेक्शाही खुप महान
तुज्या वागण्या बोलन्यावर जालो आहे मी फ़िदा
प्लीज कधी मला बोलू नकोस कायमचा अलविदा ...!

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


  love poem in marathi [कॉलेजमध्ये असताना]


कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..

वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति

कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली

आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास

मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?

तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.

मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..

ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…

अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास

युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫


मराठी प्रेम कविता [ तुझी आठवण ]


नाते तुझे हळुवार जपायचे,
आठवण आली की अलगद उमलायचे,
नको करूस अट्टाहास,
सांग कधी भेटायचे,
दरवेळी मात्र मीच वीचारायचे,
तु फक्त हो म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?
मन मात्र तुझ्याभोवती घुटमळायाचे,
या वेडयामनाला कोण समजावयाचे?
सांग आठवण आली की काय करायचे?
तुझ्या जवळ बसले असता मनं कधी गप्पा मारायचे.
मनातले हे बोल सांग कधी कळायचे?
सांग आठवण आली की काय करायचे?
नाही भेटले की डोळे अलगद ओले करायचे,
सैर वैर झालेल्या मनाला गप्प मात्र मीच करायचे,
येऊन घेशील मिठीत असे मीच म्हणायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?
फोन मात्र मीच करायचं,
How.....R... U मात्र तू बोलायचे,
तु दिसलास की डोळे भरून पहायचे,
ऊघडले डोळे की ते मात्र स्वप्नच ठरायचे,
सांग आठवण आली की काय करायचे?

👩‍❤️‍👩💏💘💞💘💑👨‍❤️‍👨💔💗💔👫💟👫

Marathi kavita on life partner तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही मराठी कविता प्रेमाच्या or love poem in Marathi मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा