Lokmanya tilak information in marathi || लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध bal gangadhar tilak information

Lokmanya tilak information in marathi लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध bal gangadhar tilak information

Lokmanya tilak information in Marathi
Lokmanya tilak information in Marathi

नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही ?  सर्व मजेत ना ! lokmanya tilak information in marathi करिता School मध्ये शिक्षक/शिक्षिका विद्यार्थ्यांना लिहायला सांगतात.दरवर्षी परीक्षांमध्ये लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध येत असतो,या Marathi nibandh ची आवश्यकता सर्व माझ्या प्रिय मित्रांना होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून bal gangadhar tilak information विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी निबंध लिहायला येत असतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi Nibandh आपल्याला उपलब्ध करून देत असतो.
       मित्रांनो,या पोस्टमध्ये lokmanya tilak information उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी हा निबंध आपल्या परिक्षेकरीता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया लोकमान्य टिळक माहिती निबंध कडे.

👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳

लोकमान्य टिळक माहिती मराठी || about bal gangadhar tilak || lokmanya tilak information

                         [No.1]

बाळ गंगाधर टिळक (जुलै २३, इ.स. १८५६ - ऑगस्ट १, इ.स. १९२०) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या स्वातंत्र्यलढयाचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.बालपण टिळकांचा जन्म जुलै २३ इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. टिळकांचे पूर्वज रत्नागिरीजवळील चिखलगावाचे खोत होते. गंगाधरपंतांचे ते तीन मुलींनंतरचे चौथे अपत्य होते. त्यांचे खरे नाव केशव ठेवले असले तरी सर्वजण त्यांना बाळ या टोपणनावानेच ओळखत असत. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला.
त्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारण्याचे ठरविले. इ.स. १८८३ च्या सुमारास त्यांनी या कामाला सु्रुवात केली. संस्थेच्या विश्वस्त समितीमध्ये अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. यामध्ये सर विल्यम वेडरबर्न, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या संस्थापकांपैकी एक असे महादेव गोविंद रानडे, इतिहासकार रामकृष्ण गोपाळ भांडारकर, शिक्षणतज्‍ज्ञ एम. एम. कुंटे तसेच प्रख्यात वकील के. पी. गाडगीळ यांचा समावेश होता. तेव्हाचे मुंबईचे गव्हर्नर सर जेम्स फर्गसन हे संस्थेचे पहिले देणगीदार होते. त्यांनी संस्थेसाठी १२५० रुपयांची देणगी दिली. सर जेम्स फर्ग्युसन यांच्या कार्याची दखल घेण्यासाठी संस्थेच्या कॉलेजचे नाव फर्ग्युसन महाविद्यालय ठेवण्याचे एकमताने ठरवण्यात आले. यामागे एक व्यावहारिक उद्देशपण होता. गव्हर्नरचे नाव कॉलेजला दिल्यामुळे अनेक भारतीय संस्थानिक स्वतःहून देणगी देण्यासाठी पुढे आले आणि जानेवारी २ इ.स. १८८५ ला फर्ग्युसन कॉलेज अस्तित्वात आले. फर्ग्युसन कॉलेजच्या संस्थापकांचे स्पष्ट मत होते की पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे. चिपळूणकर आणि टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. संस्थेच्या कामाने प्रभावित होऊन सरकारने डेक्कन कॉलेजचे व्यवस्थापन संस्थेला सुपूर्त करण्याचा प्रस्ताव मांडला. बाह्य-उत्पन्नाच्या विषयावरून झालेल्या वादामुळे डिसेंबर इ.स. १८९० मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा राजीनामा दिला आणि स्वतः पूर्णवेळ केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे संपादन करू लागले.
१८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतक-यांना संघटित होण्याचे आवाहन केले तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार ’दुष्काळ विमा निधी’ अतंर्गत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. तसेच सरकारच्या 'Famine Relief Code' नुसार दुष्काळ पडला असतांना शेतक-यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची (Bubonic Plague) साथ आली. ऑक्टोबरमध्ये मुंबईत गाठीच्या प्लेगची साथ पसरली व १८९७ येईपर्यंत ही साथ पुण्यापर्यंत पोहोचली. रँडच्या प्रशासनाने या बाबतीत अक्षम्य अतिरेक केला. रोगग्रस्त लोकांसोबतच अनेक निरोगी लोकांनापण केवळ संशयावरून रोग्यांच्या छावणीत हलविण्यात आले. टिळक निर्जंतुकीकरण व सार्वजनिक स्वच्छतेच्या विरोधात नव्हते, पण रॅंडने वापरलेल्या कार्यपद्धतीला त्यांचा विरोध होता, असे डी.व्ही. ताम्हणकरांसारख्या काही लेखकांचे मत आहे.
यादरम्यान टिळकांनी केसरीमध्ये "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" व "`राज्य करणे' म्हणजे `सूड उगवणे नव्हे'" हे दोन अग्रलेख लिहिले. रँडच्या खुनानंतर अनेक अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांनी टिळकांवर टीकेची झोड उठविली. याचाच परिणाम म्हणजे, ब्रिटिश सरकारने टिळकांवर दोन राजद्रोहात्मक लेख केसरीमधून लिहिल्याच्या आरोपाखाली खटला भरला. .या खटल्याची सुरुवात सप्टेंबर ८ , इ.स. १८९७ रोजी मुंबईच्या उच्च न्यायालयात झाली.

bal gangadhar tilak information in Marathi लाल-बाल-पाल  माहिती

👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳

लाला लाजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बंकीमचंद्र पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिपुटीला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले. बंगालच्या फाळणीविरूद्धचा लढा होमरूल ८ जून १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. काँग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले; परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच टिळकांचे ध्येय होते.

bal gangadhar tilakl माहिती मराठी निबंध


                              [No.2]

                बाळ गंगाधरपंत टिळक हे कोकणातील दापोली तालुक्यातल्या चिखलगाव येथे वडीलोपार्जीत शेती सांभाळत राहात होते पण शेतीवर चरितार्थ चालविणे अवघड झाले तेव्हां त्यांनी दरमहा पाच रुपये पगारावर शिक्षकाची नोकरी स्वीकारली संस्कृत आणि गणित या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास होता.चिखलगाव येथेच लोकमान्य बाळ  गंगाधर टिळक यांचा २३ जुलै १८५६ मध्ये जन्म झाला. त्यांच्या मातेचे नाव पार्वतीबाई होते. मुळनाव केशव ठेवले होते. तरी सर्वजण बाळ असेच म्हणत.तेच नाव पुढे कायम झाले. कुशाग्र बुद्धी आणि अभ्यासू वृत्ती असल्याने बाळला गंगाधरपंतांनी संस्कृत आणि गणित या विषयांत तरबेज केले. बाळने हि हे विषय आवडीने अभ्यासले. यातूनच संस्कृत ग्रंथाचे वाचन करणे,अवघड गणिते सहजपणे सोडविणे याचा बाळला नादच लागला.
               प्राथमिक शिक्षणा नंतर बाळ पुण्यात आले. आपल्या हुश्यारीने बाळने येथील शिक्षकांचे प्रेम संपादन केले. शालेय जीवनापासूनच त्यांच्यात सत्यप्रीयता,स्पष्टवक्तेपणा आणि अन्याअयाचा प्रतिकार करण्याची वृत्ती प्रकट होत होती. १८७२ मध्ये दहावी उतीर्ण झाल्यावर डेक्कन कॉलेजां तून त्यांनी १८७६ मध्ये बी.ए. हि पदवी परीक्षा उतीर्ण केली. १८७९ मध्ये ते एल.एल.बी.झाले. डेक्कन कोलेजात असताना त्यांचा विष्णूशास्त्री चिपळुनकर आणि गोपाळराव आगरकर यांच्याशी परिचय झाला. ते तिघेही देशभक्त आणि स्वातंत्र्यप्रेमी होते.त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते. या परकीय सत्तेखाली पारतंत्र्यात जगणार्या भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य प्रेम निर्माण केले पाहिजे.या वर तिघांचे एकमत झाले. अगदी बालपणापासूनच मुलांच्या मनात स्वातंत्र्यप्रेम निर्माण केले पाहिजे असे ठरवून त्यांनी १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
                 बाळ लोकमान्य टिळकांनी तसेच विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आणि गोपाळराव आगरकरांनी सरकारी नोकरी आणि मोठा पगार यानकडे न वळता शिक्षकी पेशा स्वीकारला. या शिक्षकी पेशात टिळकांच्या संस्कृत आणि गणित या विषयांतील आवडीचा चांगला उपयोग झाला. या तिनहि देश भक्तांच्या मनातील देशभक्तीची भावना अत्यंत तीव्र होती. त्यामुळे केवळ शालेय विद्यार्थ्यापुरते शिक्षकाचे काम मर्यादित न ठेवता सर्व समाजात आपले विचार पोचवावे. म्हणून त्यांनी ‘ केसरी ‘व ‘मराठा’ हि वृत्त पत्रे सुरु केली. लोकांच्या मनात या वृत्त पत्रांतील लेखनाने स्वदेशा विषयीची निष्ठा वाढवावी, व परकियांच्या सत्तेतून मुक्तता व्हावी, भारतीयांवर होणार्या अन्यायाला वाचा फुटावी ; असा त्या वृत्तपत्रा मागील हेतू होता.
                ‘केसरी’ या वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणार्या लेखनात १८८२ मध्ये एकदा कोल्हापूर संस्थानातील अन्यायाला वाचा फोडणारा मजकूर प्रसिद्ध झाला. आणि त्यावरून प्रकरण चिघळले.त्यांच्यावर खटला झाला. टिळक, आगरकरांना १०१ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगाच्या बाहेर पडल्यावर टिळक-आगरकरांच्या पुढाकाराने १८८५ साली पुण्यात ‘फर्ग्युसन’ कॉलेज सुरु झाले. तिथे हे दोघे प्राध्यापकाचे काम करू लागले. त्यावेळीही त्यांचे वृत्तपत्राचे काम चालूच होते.पुढे टिळकांचे कॉलेजमधील सहकार्यांशी मतभेद झाले.आणि टिळकांनी केसरी पत्र स्वत:चालविण्यास घेऊन कोलेज्शी असलेला सम्बंध तोडला. नंतर टिळक स्वतंत्रपणे, सामाजिक व राजकीय विषयांवरची आपली मते प्रभावीपणे मांडू लागले. टिळकांच्या निर्भीड, उग्र, सत्य लेखनाने ‘केसरी’ लोकप्रिय होऊ लागला.
               ‘केसरी’ मधील लेख वाचून लोकांच्या मनात ब्रिटीश राजवटी बद्दलचां असंतोष वाढू लागला. सरकारला ‘ केसरी’ आणि टिळक यांचा धाक निर्माण  होऊ लागला.
                १८९६ — ९७ मध्ये पुण्यात प्लेगने थैमान घातले. त्या पेक्षाही इंग्रज सरकारच्या अधिकारांनी यावेळी केलेल्या अन्यायांनी कळस गाठला. त्याचा अखेर शेवटी एका इंग्रज अधिकार्याच्या खुनात झाला. या सर्व प्रकारांबद्दल टिळकांनी जे लेखन केले त्याचे निमित्त करून सरकारने संधी साधली. आणि टिळकांना तुरुंगवासात पाठविले. या सरकारच्या कृतीचा परिणाम उलटा होवून टिळकांना अधिकच लोकप्रीयता मिळाली. टिळक ‘लोकमान्य’ नेता झाले. “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे” आणि “तो मी मिळविणारच, अशी त्यांची धारणा होती.
                लोकमान्य हे ब्रिटीश सरकारबद्दल लकांच्या मनात असंतोष निर्माण करणारे नेते म्हणून एकीकडे कार्य करीत होते; त्याच वेळी त्यांचा आवडत्या विषयांचा अभ्यासही सुरूच होता.त्यामुळेच राष्ट्रीय पातळीवर,सामाजिक परिस्थितीवर आणि प्रासंगिक घटनांवर ‘केसरी’ तून लेखन करतानाही “आर्यांचे वस्तीस्थान” ओरायन” “शास्त्रीय पंचांग” “गीतारहस्य”  असे ग्रंथ लिहून आपल्या अभ्यासाचा परिचय घडविला. समाजातल्या सर्वांना एकत्रित आणून व्याख्यांनान द्वारे मतप्रचार करण्यासाठी त्यांनी ” गणेशोत्सव ” श्री शिवछत्रपतींच्या जयंतीचा उत्सव असे नवे उपक्रम सुरु केले.
                 लोकमान्यांची लोकप्रीयता वाढतच हती. राष्ट्रीय नेता म्हणून त्यांचा उल्लेख होत होता, त्यामुळे सरकार बेचैन होत होते.टिळकांना लोकांपासून दूर ठेवण्याची संधी सरकार शोधत असायचे.लोकमान्य अत्यंत कडक शब्दात सरकारी धोरणांवर निर्भीडपणे टीका करीत असत. १२ मे १९०८ च्या ‘ केसरीत’ त्यांनी लिहिलेल्या ‘ देशाचे दूर्दैव ‘ या लेखाबद्दल सरकारने टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला. सहा वर्षाची शिक्षा भोगण्यासाठी टिळकांना मंडालेच्या तुरुंगात भारताबाहेर पाठविण्यात आले. पण तरीही टिळकांनी तेथेही चिंता न करता, शांत मनाने  ‘गीतारहस्य’ सारखा मोठा ग्रंथ लिहिण्याचे धाडस केले. या काळातच त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पण टिळकांनी ते दु:ख हि शांतपणे पचविले. भारतीयांच्या मनात इंग्रज सरकार विरुद्ध  नेहमीच असंतोष निर्माण करीत असत त्यामुळे त्यांना  ‘ असंतोषाचे जनक’ असे संबोधण्यात येत असे. या त्यांच्या अनेक कार्यांनी त्यांनी सरकारला कधी लेखणीद्वारे तर कधी व्याख्यानातून हादरवून सोडलेले होते. पण नंतर  लोकमान्य १ ऑगष्ट १९२० मध्ये ते निधन पावले.  त्यांना आपणा सर्वभारतीयांचा कोटी कोटी प्रणाम !

👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳👳

lokmanya tilak information in marathi तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Nibandh तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण हे लोकमान्य टिळक माहिती मराठी निबंध or bal gangadhar tilak information आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा