kusumagraj kavita कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता | kusumagraj poems in Marathi

kusumagraj kavita कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता | kusumagraj poems in Marathi

Kusumagraj poem in marathi
Kusumagraj kavita in marathi

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! kusumagraj kavita तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून kusumagraj poems in Marathi माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये kusumagraj kavita उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता  कडे.

🌷🌻🎄🌷🌻🎄🌷🌻🎄🌷🌻🎄🌷🌻


अनंत by kusumagraj kavita in marathi


एकदा ऐकले काहींसें असें
असीम अनंत विश्वाचे रण
त्यात हा पृथ्वीचा इवला कण
त्यांतला आशिया भारत त्यांत
छोट्याशा शहरीं छोट्या घरांत

घेऊन आडोसा कोणी 'मी' वसें
क्षुद्रता अहो ही अफाट असें!
भिंतीच्या त्रिकोनी जळ्मट जाळी
बांधून राहती कीटक कोळी


तैशीच सारी ही संसाररीती
आणिक तरीही अहंता किती?
परंतु वाटलें खरें का सारें?
क्षुद्र या देहांत जाणीव आहे
जिच्यात जगाची राणीव राहे!


कांचेच्या गोलांत बारीक तात
ओतीत रात्रीत प्रकाशधारा
तशीच माझ्या या दिव्याची वात
पाहते दूरच्या अपारतेंत!

अथवा नुरलें वेगळेंपण
अनंत काही जेंत्याचाच कण!
डोंगरदऱ्यांत वाऱ्याची गाणीं
आकाशगंगेत ताऱ्यांचे पाणीं

वसंतवैभव उदार वर्षा
लतांचा फुलोरा
केशरी उषा....प्रेरणा यांतून सृष्टीत स्फुरे
जीवन तेज जें अंतरी झरे

त्यानेच माझिया करी हो दान
गणावे कसे हें क्षुद्र वा सान?

🌷🌻🎄🌷🌻🎄🌷🌻🎄🌷🌻🎄🌷🌻


स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या kusumagraj kavita in marathi


स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या, राजस राजकुमारा
अपार माझ्या काळोखाला दिलास जीवनतारा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला श्रावण सुंदर मोती

मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
रात्र एक मी अथांग होते नव्हता दीप उशाला

जागही नव्हती, नीजही नव्हती, नव्हता अर्थ कशाला
हारपलेल्या या नौकेला गवसे आज किनारा

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


कोलंबसचे गर्वगीत kusumagraj kavita in marathi


हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनिने त्या
समुद्रा, डळमळू दे तारे !
विराट वादळ हेलकावूदे पर्वत पाण्याचे
ढळुदे दिशाकोन सारे !

ताम्रसुरा प्राशुन मातुदे दैत्य नभामधले
दडुद्या पाताळी सविता
आणि तयांची ही अधिराणी दुभंग धरणीला
करायला पाजुळुदे पलीता !

की स्वर्गातुन कोसळलेला, सुड समाधान
मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती
करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भिषण नर्तन असेच चालु दे
फुटू दे नभ माथ्यावरती
आणि, तुटु दे अखंड ऊल्का वर्षावत अग्नी
नाविका ना कुठली भिती

सहकाऱ्यानो, का हि खंत जन्म खलाशांचा
झूंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापरी असीम नभामध्ये संचरावे
दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे
असे का हा आपुला बाणा
त्याहुनी घेऊ जळी समाधि, सुखे कशासाठी
जपावे पराभुत प्राणा ?

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती
जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फ़िरतो सात नभांखाली
निर्मीतो नव क्षितिजे पूढती !

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन, ना दारा
घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड सारा !

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयसक्ती अनंत अन आशा
किनारा तुला पामराला”

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺माझे जगणे होते गाणे kusumagraj kavita


जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी

माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺डाव  kusumagraj kavita


तिन्ही सांजच्या धुक्यात
किती कळशी घेऊन
कुंकाउ कापली भरून
 गेलीस तू

वाट पाहून माझे
शेवाळलेले डोळे
पाय भयभीत वाले नदीकडे
तेथे काळे तुझा डाव
घाट पदे घाटावर
रेषा कुंकवाच्या चार पाण्यावरी


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


बर्फाचे तट पेटुनि उठले कुसुमाग्रज kusumagraj poems


बर्फाचे तट पेटुनि उठले सदन शिवाचे कोसळते
रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते

असुरांचे पद भ्रष्ट लागुनी आज सतीचे पुण्य मळे
अशा घडीला कोण करंटा तटस्थतेने दूर पळे ?

कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे ?
साममंत्र तो सरे, रणाची नौबत आता धडधडते

सह्यगिरीतिल वनराजांनो या कुहरातुन आज पुढे
रक्त हवे जर स्वतंत्रतेला, रक्ताचे पडतील सडे

एक हिमाचल राखायास्तव करा हिमालय लक्ष खडे
समरपुराचे वारकरी हो समरदेवता बोलविते

खडक काजळी घोटुनि तुमचे मनगट-बाहू घडलेले
कडेकपारीमधील वणवे उरात तुमच्या दडलेले

काबुल-कंदाहार पथावर डंके तुमचे झडलेले
शिवतेजाची दीपमाळ पाठीशी अपुल्या पाजळते

कोटि कोटि असतील शरीरे मनगट अमुचे एक असे
कोटि कोटि देहांत आज या एक मनिषा जागतसे

पिवळे जहरी सर्प ठेचणे - अन्य मना व्यवधान नसे
एक प्रतिज्ञा, विजय मिळेतो राहिल रण हे. धगधगते

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


तिमिरातुनी तेजाकडे kusumagraj kavita in marathi


 तिमिरातुनी तेजाकडे...
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


जीर्ण पाचोळा kusumagraj kavita


आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास
उषा येवो शिंपीत जीवनासी
निशा काळोखी दडवु द्या जगासी
सूर्य गगनातुनि ओतु द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा
तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मुठभर ते गवतही मजेने
वाटसरु वा तुडवीत त्यास जात
परि पाचोळा दिसे नित्य शांत
आणि अंती दिन एक त्या वनांत
येइ धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरुनी तयाते
नेइ उडवुनि त्या दूर दूर कोठे
आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडण्या वरतून पर्णराशी

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


चार होत्या पक्षिणी त्या kusumagraj poems


चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी
चार कंठी बांधलेली एक होती साखळी
दोन होत्या त्यात हंसी, राजहंसी एक ती
आणि एकीला कळेना जात माझी कोणती
बाण आला एक कोठुन जायबंदी हो गळा
सावलीला जाण आली जात माझी कोकिळा
कोकिळेने काय केले ? गीत झाडांना दिले
आणि मातीचे नभाशी एक नाते सांधले
ती म्हणाली, एकटी मी राहिले तर राहिले
या स्वरांचे सूर्य झाले, यात सारे पावले

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


प्रेम कर भिल्लासारखं-कवी kusumagraj kavita


पुरे झाले चंद्र-सुर्य, पुरे झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा राहा,
जाळासारखा नजरेत नजर बांधून पाहा
सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा.

शेवाळलेले शब्द आणिक यमक-छंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत,
जास्तीत-जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगीनचिठ्ठी आल्याशिवाय राहील काय?

म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ,
प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ

प्रेम म्हणजे वणवा होउन जाळत जाणं,
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहाणं

प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं,
मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं

शब्दांच्या या धुक्यामधे अडकु नकोस,
बुरूजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस

उधळून दे तुफ़ान सारं मनामधे साचलेलं,
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं!

🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


माझे जीवनगाणे kusumagraj kavita


माझे जगणे होते गाणे
सुरेल केंव्हा, केंव्हा बेसुर
तालावाचून वा तालावर
कधी तानांची उनाड दंगल
झाले सुर दिवाणे

कधी मनाचे कधी जनाचे
कधी धनास्तव कधी बनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नादतराणे

आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केंव्हा फक्त बहाणे

राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रन्दन
अजाणतेचे अरण्य केंव्हा
केंव्हा शब्द शहाणे

जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरली काही
अदॄश्यातिल आदेशांचे
ओझे फक्त वाहणे

सुत्रावाचून सरली मैफल
दिवेही विझले सभागॄहातिल
कशास होती आणि कुणास्तव
तो जगदीश्वर जाणे


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


अजूनही kusumagraj kavita in marathi


अजूनही
निळया जांभळ्या नदीला
आंबेवनाची सावली
भेट पहिलीवहिली
अकल्पित
... भेट दुरस्थपणाची
गर्भरेशमी क्षणाची
सौदामिनीच्या बाणाची
देवघेव.
गुलबक्षीच्या फुलानी
गजबजले कुपण
वेचू लागला श्रावण
मोरपिसे।
ओल्या आभाळाच्या खाली
इद्रचापाचे तुकडे
तुझा करपाश पडे
जीवनास.
कधी रेताडीचे रस्ते
कधी मोहरली बाग
कधी प्रासादास आग
कर्पुराच्या।
सप्तसुरातुनी गेले
माझ्या जीवनाचे गीत
तुझ्या सारगीची तात
साथ झाली.
बर्फवाट शिशिराची
आता पुढलिया देशी
तुझ्या मिठीची असोशी
अजूनही.


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


गाभारा kusumagraj poem in Marathi


दर्शनाला आलात? या..
पण या देवालयात, सध्या देव नाही
गाभारा आहे, चांदीचे मखर आहे.
सोन्याच्या सम्या आहेत, हिर्यांची झालर आहे.
त्यांचही दर्शन घ्यायला हरकत नाही.
वाजवा ती घंटा, आणि असे इकडे या
पाहीलात ना तो रिकामा गाभारा?
नाही..तस नाही, एकदा होता तो तिथे
काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा,
दरवाजे बंद करुन, बरोबर बाराला जेवायचा
दोन तास वामकुक्षी घ्यायचा
सार काही ठीक चालले होते.
रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग
पडत होते पायाशी..
दक्षिण दरवाज्याजवळ, मोटारीचे भोंगे वाजत होते
मंत्र जागर गाजत होते
रेशीम साड्या, टेरीनचे सुट समोर दुमडत होते.
बॅंकेतले हिशेब हरीणाच्या गतीने बागडत होते.

सारे काही घडत होते.. हवे तसे
पण एके दिवशी.. आमचे दुर्दैव
उत्तर दरवाज्याजवळ अडवलेला
कोणी एक भणंग महारोगी
तारस्वरात ओरडला “बाप्पाजी बाहेर या”
आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तर काय
गाभारा रिकामा
पोलीसात वर्दी, आम्ही दिलीच आहे..
परत? कदाचित येइलही तो
पण महारोग्याच्या वस्तीत, तो राहिला असेल तर
त्याला पुन्हा..
प्रवेश द्यावा की नाही, याचा विचार करावा लागेल,
आमच्या ट्रस्टींना,
पत्रव्यवहार चालु आहे.. दुसर्या मुर्तीसाठी
पण तुर्त गाभार्याचे दर्शन घ्या.
तसे म्हटले तर, गाभार्याचे महत्व अंतिम असत,
कारण गाभारा सलामत तर देव पचास.


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


वादळवेडी kusumagraj poems


नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात

... उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात

हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात

ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात


🥀🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷🌺


निरोप kusumagraj kavita in marathi


गर्दीत बाणासम ती घुसोनि
चाले, ऊरेना लव देहभान
दोन्ही करांनी कवटाळूनीया
वक्ष:स्थळी बालक ते लहान

लज्जा न, संकोच नसे, न भीती
हो दहन ते स्त्रीपण संगरात
आता ऊरे जीवनसूत्र एक
गुंतोनी राहे मन मात्र त्यात

बाजार येथे जमला बळींचा
तेथेही जागा धनिकांस आधी
आधार अश्रूसही दौलतीचा
दारिद्र्य दु:खा दुसरी उपाधी

चिंध्या शरीरावरी सावरोनी
राहे जमावात जरा उभी ती
कोणी पहावे अथवा पुसावे?
एकाच शापातून सर्व जाती

निर्धार केला कसला मानसी
झेपाउनी ये ठिणगीप्रमाणे
फेकूनिया बाळ दिले विमाने
व्हावे पुढे काय प्रभूच जाणे

"जा बाळा जा, वणव्यातुनी या
पृथ्वीच आई पुढती तुझी रे
आकाश घेईं तुजला कवेंत
दाही दिशांचा तुज आसरा रे"

ठावे न कोठे मग काय झाले
गेले जळोनीं मन मानवाचे
मांगल्य सारे पडले धुळीत
चोहीकडे नर्तन हिंस्त्रतेचे!

🌹💐🌻🌼🌺🍀🌴🌾🌲🌳💮🌷

kusumagraj kavita कुसुमाग्रज यांच्या मराठी कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही kusumagraj kavita in marathi or marathi poems मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !

२ टिप्पण्या: