Information about cricket in marathi | क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti

Information about cricket in marathi | क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti

Cricket information in Marathi
Cricket information in Marathi


नमस्कार मित्रांनो,कसं आहात तुम्ही.सर्व मजेत ना! Cricket खेळाविषयी जाणून घेण्याची जी उत्सूकता तुमच्यामध्ये आहे,त्यामुळे आज या लेखातून आपण Information about cricket in marathi क्रिकेट ची माहिती मराठी मधे पाहणार आहोत.या पोस्टमध्ये तुम्हाला क्रिकेट ची माहिती cricket marathi mahiti मिळणार आहे.आपणास विनंती आहे कृपया हा आर्टिकल शेवटपर्यंत वाचा,जेणेकरून आपल्याला information about cricket in marathi मिळेल.




Cricket information in Marathi | क्रिकेट खेळाची माहिती

Cricket ground map
Cricket ground map


क्रिकेट एक बॅट(फळी) आणि बॉल(चेंडू) ने खेळावयाचा खेळ आहे. क्रिकेटची सुरुवात इंग्लंड मध्ये झाली. ज्या देशावर ब्रिटीश राज्य (Commonwealth Countries) होते त्या देशात हा खेळ मोठ्या प्रमाणात खेळला जातो. भारतीय उपखंडात तर क्रिकेट हाच मुख्य खेळ आहे. लोकप्रिय आंतरराष्ट्रीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट ईंडिझ, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, झिंबाब्वे, केन्या आहेत.


इतिहास असे समजले जाते की ह्य खेळाची सुरवात इंग्लंड मधील केंट व ससेक्स प्रांतात झाली. तेराव्या शतकात इंग्लंडचे युवराज एडवर्ड यांनी नेवेन्डन, केंट येथे क्रिकेट खेळल्याची नोंद आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये १९५८ मध्ये सर्व प्रथम क्रिकेट या शब्दाची लिखित नॊंद झाली. सतराव्या शतकात या खेळाची लोकप्रियता खूप वाढली. १८०० मध्ये खेळात बरेच परिवर्तन झाले व हा खेळ इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ घोषित करण्यात आला. १९६३ साली सामन्याचा निकाल लागण्याच्या दृष्टीने प्रत्येक डावात विशिष्ट षटके टाकण्याचा नियम आणला. हा क्रिकेट प्रकार लोकप्रिय झाला व पुढे १९७१ मध्ये एकदिवसीय क्रिकेट या नावाने प्रसिद्ध झाला. २००० साली क्रिकेटचा नवीन प्रकार ट्वेंटी२० क्रिकेटची सुरवात करण्यात आली. या खेळाची मुख्यत्वे दोन अंगे आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजी. कसोटी क्रिकेटमध्ये ४ डाव, तर इतर प्रकारांत २ डाव खेळले जातात. दोन्ही संघ आलटून-पालटून फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. खेळ सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या कप्तानांसमोर नाणेफेक होते. नाणेफेक जिंकणारा कप्तान प्रथम डावात फलंदाजी करायची अथवा गोलंदाजी, याची निवड करतो. फलंदाज करणाऱ्या संघाचा उद्देश जास्तीत जास्त धावा करण्याचा असतो. जेव्हा दोघे फलंदाज विरूध्द दिशेच्या यष्टी पर्यंत जातात तेव्हा १ धाव पूर्ण होते. सहसा फलंदाज जेव्हा चेंडू फलंदाजी करणारया फलंदाजाच्या बॅटला लागतो तेव्हाच धाव घेतात. फलंदाजाने चेंडू सीमापार केल्यास, यष्टींदरम्यान धाव घेण्याची आवश्यकता नसते. अशा वेळी चेंडूचा पहिला टप्पा सीमेवर अथवा सीमेपार पडला तर सहा धावा, नाहीतर चार धावा फलंदाजाच्या खात्यात जमा होतात. ह्या शिवाय गोलंदाजाने गोलंदाजीचे नियम तोडले तरी सुध्दा फलंदाजी करणारया संघास धाव मिळते. 


         गोलंदाजी करणाऱ्या संघाचा उद्देश दुसऱ्या संघाच्या प्रत्येक फलंदाजाला बाद करणे असतो. फलंदाजाला वेगवेगळ्या प्रकारे बाद करता येते (त्रिफळाचीत, झेल,यष्टीचीत, पायचीत (एल.बी.डब्ल्यू.),धावचीत).हा खेळ सहा चेंडुचे १ षटक या प्रमाणे खेळला जातो. प्रत्येक षटकाच्या शेवटी गोलंदाजाचे टोक बदलले जाते व क्षेत्ररक्षण करणारया संघाचा नविन खेळाडू गोलंदाजीस येतो. ह्याच वेळेस पंच सुध्दा आपाआपली जागा बदलतात. प्रत्येक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याच्या संघातील नविन फलंदाज फलंदाजीस येतो. जेव्हा १० फलंदाज बाद होतात तेव्हा तो संघ सर्वबाद झाला असे म्हणले जाते. ह्या नंतर फलंदाजी करणारा संघ गोलंदाजी करतो तर गोलंदाजी करनारा संघ फलंदाजी करतो. जो संघ दिलेल्या षटकमर्यादेत सर्वात जास्त धावा करतो त्याला विजयी घोषित केले जाते. क्रिकेटच्या वेगवेगळ्या प्रकारात सामना संपण्याचे मापदंड वेगवेगळे आहेत.


फलंदाज बाद होण्याचे प्रकार
Cricket rules and regulations
Cricket rules and regulations

दहा वेगवेगळ्या पध्दतीने फलंदाज बाद होऊ शकतात. एक फलंदाज बाद झाल्या नंतर त्याची जागा नविन फलंदाज घेतो. जेव्हा दहा फलंदाज बाद होतात तेव्हा एक डाव संपतो. खाली दिलेल्या दहा प्रकारांन पैकी पहिल्या सहा प्रकाराने फलंदाज सहसा बाद होतो.

झेल - जेव्हा फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक जमिनीला लागण्याच्या आधी पकडतो तेव्हा त्या बाद होण्याच्या प्रकाराला झेलबाद म्हणतात.झेलबाद्चे क्षेय गोलंदाज व क्षेत्ररक्षक दोघांना ही दिल्या जाते. ( नियम ३२)
त्रिफळाचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु फलंदाजी करणारया फलंदाजाच्या टोकावरिल यष्टींना लागतो तेव्हा त्याला त्रिफळाचीत म्हणतात. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३०)

पायचीत - जेव्हा गोलंदाजाने टाकलेला चेंडु बॅटला न लागता फलंदाच्या पायावर,पॅड्वर किंवा शरीरावर आदळतो तेंव्हा पंच चेंडु यष्टींन वर गेला असता कि नाही हे ठरवुन फलंदाजाला बाद देउ शकतो. गोलंदाजाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते.


धावचीत - जेंव्हा क्षेत्ररक्षक, गोलंदाज अथवा यष्टीरक्षक, फलंदाज धाव घेण्यासाठी धावत असतांना अथवा इतर कोणत्याही कारणासाठी क्रिझ मध्ये नसतो तेव्हा चेंडु मारुन यष्टी उडवतो तेव्हा त्याला धावचीत म्हणतात. ह्या बळीचे क्षेय कोणालाही दिले जात नाही.


यष्टीचीत - चेंडु खेळतांना जेंव्हा फलंदाज क्रिझच्या बाहेर जातो व चेंडु त्याला चकवुन यष्टीरक्षकाच्या हातात जातो तेंव्हा बाद होण्याच्या प्रकाराला यष्टीचीत म्हणतात. गोलंदाजा व यष्टीरक्षकाला ह्या बळी चे क्षेय दिले जाते. (नियम ३९)




History in the Cricket in Marathi क्रिकेटचा ‍इतिहास 

Cricket information in Marathi
Cricket information in Marathi


क्रिकेटचा शोध कोणत्या साली लागला याची नेमकी माहिती उपलब्ध नाही. पण इंग्लंडमध्ये वेल्स येथे असलेल्या घनदाट जंगलात लहान मुले हा खेळ खेळत होती, अशी नोंद मात्र सापडते. सतराव्या शतकाच्या सुरवातीला तरूण हा खेळ खेळू लागले. पण त्याला सध्या असणारा क्रिकेट हा शब्द मात्र, क्रिकेट न खेळणार्‍या फ्रान्स या देशाची भाषा फ्रेंचमधून आला आहे.


पहिला आंतराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये खेळला गेला. त्यानंतर आजपर्यंत या खेळाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सध्या जगमरात जवळपास २० देशात हा खेळ खेळला जातो. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडीज, श्रीलंका, न्यूझीलंड या देशात हा खेळ सर्वांत जास्त खेळला जातो.

क्रिकेटचा प्रसार करण्याचे श्रेयसुद्धा इंग्लंडला जाते. इंग्रजांनी ज्या देशांवर राज्य केले तेथे त्यांचे अधिका‍री क्रिकेट खेळत. त्यामुळे हा खेळ इंग्लंडबाहेर गेला. १७४४ मध्ये क्रिकेटचे नियम बनायला सुरूवात झाली. १७७४ मध्ये त्यात प्रथम सुधारणा होत, पायचीत, तीन यष्टी, बॅटची लांबी यांचे नियम ठरवण्यात आले.
त्यानंतर दोन पंच नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. १७७८ साली लॉर्डसवर एमसीसी क्लबची स्थापना करण्यात आली. 

१७५१ साली यॉर्कशायर हे सामन्याचे पहिले अधिकृत ठिकाण ठरले. १७६० मध्ये गोलंदाजी चेडू टाकू लागले. फिरकी गोलंदाजी करू लागले. १७७२ मध्ये धावफलक निर्माण झाला. अठराव्या शतकाच्या सुरवातीला लंडन व डार्टफोर्ड हे दोन क्लब अस्तित्वात आले.

पहिला आंतरराष्ट्रीय सामना १८४४ मध्ये अमेरिका व कॅनडात झाला. १८५९ मध्ये इंग्लंडचे व्यावसायिक खेळाडू उत्तर अमेरिकेच्या दौर्‍यावर गेले. १८६४ मध्ये ओव्हरआर्म गोलंदाजी टाकण्यात येऊ लागली. १८७७ मध्ये पहिली कसोटी इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान खेळली गेली. १८८२ मध्ये प्रतिष्ठेच्या अॅशेस करंडक सामन्यांना इंग्लंड व ऑस्ट्रेलियादरम्यान सुरवात झाली.
१८८९ मध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी खेळणारा तिसरा देश म्हणून मान्यता मिळाली. १८८९ पर्यंत एक षटक चार चेंडूंचे होते. त्यानंतर पाच चेंडूंचे एक षटक झाले, तर १९०० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले. त्यानंतर आठ चेंडूंचे एक षटक करण्याचा प्रयोगही या क्रिकेट खेळणार्‍या तीन देशांमध्ये झाला. पुन्हा १९४० मध्ये सहा चेंडूंचे एक षटक झाले.

दुसर्‍या महायुध्दाच्या आधी भारत, वेस्ट इंडीज व न्यूझीलंड या तीन देशांना कसोटी खेळण्याची मान्यता मिळाली. युध्दानंतर पाकिस्तानलाही कसोटी खेळणारा देश म्हणून मान्यता मिळाली. विसाव्या शतकाच्या शेवटी श्रीलंका, झिंबाव्वे व बांगलादेश यांनाही मान्यता मिळाली. अशा तर्‍हेने क्रिकेट सर्वत्र पसरत गेल


स्वतंत्र देश म्हणून भारताला अस्तित्व मिळण्यापूर्वी ती इंग्रजांची वसाहत होती. इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या वास्तव्यामध्ये क्रिकेट हा त्यांचा प्रसिध्द खेळ भारताने नुसताच आत्मसात केला असे नाही, तर त्यावर प्रभुत्व मिळवले. क्रिकेट हा भारतामध्येही अतिशय लोकप्रिय खेळ आहे. कसोटी सामन्यांप्रमाणेच एक दिवसाचे सामने देखील चित्तवेधक ठरतात.


भारतामध्ये शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे अशा सर्व स्तरांवर क्रिकेटच्या स्पर्धा होतात. 'रणजी ट्रॉफी', 'दिलीप करंडक' व 'इराणी ट्रॉफी' हया सामन्यांमधे चमकणा-या खेळाडूंपैकी निवडक खेळाडू भारताचे प्रातिनिधित्व आंरराष्ट्रीय पातळीवर करतात.


क्रिकेट खेळासंबंधीचे प्राथमिक नियम असे आहेत


क्रिकेटचा सामना हा दोन संघांमध्ये होतो. प्रत्येक संघाचा एक कप्तान व एक उपकप्तान असून एकंदर ११ खेळाडूंचा असा हा संघ असतो. खेळताना एखाद्या खेळाडूस इजा झाल्यास पर्यायी खेळाडू असावा, यासाठी दोन ते तीन जास्त खेळाडूंचा मिळून संघ बनतो. बदली खेळाडू हा क्षेत्ररक्षण करू शकतो, किंवा फलंदाजाऐवजी पळू शकतो. बदली खेळाडूला फलंदाजी किंवा गोलंदाजी करता येत नाही. बदली खेळाडू निवडताना, विरूध्द संघाच्या कप्तानाची हरकत नाही ना, याची खात्री करावी लागते. खेळाबाबत निर्णय देणारे दोन पंच असतात व ते प्रत्येकी एकेक बाजू सांभाळतात. दोन्ही संघाच्या कप्तानांच्या परवानगीशिवाय सामन्यासाठी निश्चित केलेले पंच बदलता येत नाहीत. पंचांनी केलेले इशारे व खुणा समजून घेऊन गुणलेखक हा धावांची नोंद करतो.

क्रिकेटची साधने व पटांगण

चेंडू - वजन  १५५ ग्रॅम्स, परिघ  २३ सें.मी., चेंडू बदलण्याविषयी - ७५ षटकांनंतर चेंडू बदलता येतो. बॅट - रूंदी - ११ सेंमी, लांबी - ९५ सें. मी.


विकेटस् - तीन स्टंप्स व त्यावरील दोन बेल्स मिळून विकेट तयार होते. दोन विरूध्द बाजूच्या विकेटस् मधील अंतर २२ यार्ड (साधारणपणे २० मीटर) असते. एकमेकांच्या समोर व समांतर अशा विकेटस् असतात. विकेटची रूंदी २२.५० सें. मी. असते. विकेटस् मधील स्टंप्स समान असतात. व त्यांची जमिनीपासून उंची ७० सें. मी. असते. ४ बेल्स हया ११ सें. मी. लांबीच्या असतात.


पिच् - दोन विकेटस् मधील अंतरास पिच् म्हणतात. चेंडू फेकणे व फलंदाजाने तो फटकावणे हया क्रिया सारख्या पिच् वर होत असल्याने, पिच् चांगले असणे महत्त्वाचे. पावसापाण्यामुळे अनपेक्षित रित्या पिच् फारच खराब झाल्यास दोन्ही संघांच्या कप्तांनांची हरकत नसल्यास, सामना सुरू असताना ते बदलता येते.



खेळाची सुरूवात [ cricket in marathi ]



क्रिकेटच्या सामन्यात दोन डाव किंवा इनिंग्ज असतात. नाणेफेक जिंकणा-या संघाचा कप्तान फलंदाजी म्हणजे बॅटिंग किंवा क्षेत्ररक्षण यापैकी एकाची निवड करतो.


फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत फलंदाजी करणाऱ्या संघाचा कप्तान आपल्या इच्छेनुसार आपल्या संघाची फलंदाजी संपवल्याचे केव्हाही जाहीर करू शकतो. एक फलंदाज बाद झाल्यावर दोन मिनिटांत दुसरा फलंदाज आला पाहिजे. एका संघाची फलंदाजी संपल्यावर १० मिनिटांच्या आत दुस-या संघाची फलंदाजी सुरू झाली पाहिजे. 'प्ले' असा आदेश प्रत्येक डावाच्या सुरवातीला पंच देतात, व खेळ सुरू होतो. बाद खेळाडू क्रिडांगणा बाहेर जाण्यापूर्वी नवीन खेळाडू आत यावा असा संकेत आहे.


ज्याला क्रिकेटपटू व्हायचे आहे, त्याने क्रिकेटमधील सर्व नियम लक्षात घ्यावेत. खेळण्याचा भरपूर सराव हवा. बॅट, बॉल, स्टंप्स, पायमोजे, पॅडस् तसेच काउंटी कॅप देखील हवी. पांढरा शर्ट, पांढरी पँट, कॅनव्हास शूज, व लोकरी पायमोजे घ्यावेत. कपडे, मोजे हे वारंवार धुवावेत. क्षेत्ररक्षण म्हणजे, चेंडू अडविण्याची क्षमता ही प्राथमिक व मौलिक बाब आहे. क्षेत्ररक्षण गचाळ असल्यास, त्या संघास नामुष्की पत्करावी लागते.


information about cricket in marathi बद्दल आपल्याला हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.तुमचा प्रतिसाद व आपल्या कौतूकाची साथ मला असे आर्टिकल लिहण्यास स्फुर्तिदायक ठरेल.आपणास विनंती आहे क्रिकेट खेळाची माहिती आपल्या मित्र परिवारात नक्की शेअर करा.


जय हिंद,वंदे मातरम


धन्यवाद



1 टिप्पणी: