Aai kavita आईची कविता [ poem on mother in marathi ] | aai poem in marathi

Aai kavita आईची कविता [ poem on mother in marathi ] | aai poem in marathi

Aai poem in marathi
Aai kavita

नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो,कसं आहात तुम्ही ? सर्व मजेत ना ! Aai kavita आईची कविता तुम्ही School मध्ये शिक्षक/शिक्षिकांकडून ऐकली असेलच.poem on mother in marathi साठी सर्व माझ्या प्रिय मित्रांची मागणी होती.त्यामुळे आज मी या लेखाच्या माध्यमातून aai poem in marathi माझ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे.शाळेत परीक्षांमध्ये विविध मराठी कविता ऐकायला मिळतात.आमच्या या ब्लाग वर आपल्याला Marathi kavita उपलब्ध करून देत असतो.
        मित्रांनो,या पोस्टमध्ये Aai kavita आईची कविता उपलब्ध करून दिले आहे.सर्व विद्यार्थी ही मराठी कविता पाठांतर करू शकता.चला तर मग वळूया poem on mother in marathi मराठी कविता कडे.

🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤱🤰

हंबरून वासराले कविता [ hambrun vasrale kavita ]


हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले ...

आया बाया सांगत व्हत्या, व्हतो जवा तान्हा,
दुस्काळात मायेच्या माझ्या आटला व्हता पान्हा,
पिठामंदी..... पिठामंदी
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय ...
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..
रे हंबरून वासराले...

कण्या काट्या वेचायला माय जाइ राणी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी,
काट्या कुट्या ......रं काट्या कुट्या
काट्याकुट्यालाही तीचं मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय...
रे हंबरून वासराले...

बाप माझा रोज लावी, मायेच्या मागे टुमन,
बास झालं शिक्षाण आता, घेवुदे हाती काम,
आग शिकून शान .....ग शिकून शान.....
शिकून शान कुठ मोठा मास्तर व्हनार हायं...
तवा मले मास्तरमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.....
रे हंबरून वासराले.....

दारू पिवून मायेला मारी जवा माझा बाप,
थरथर कापे अन, लागे तीले धाप,
कसा ह्याच्या .......रं कसा ह्याच्या....
कसाह्याच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय.....
रे हंबरून वासराले...

नं बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आलं पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी,
न भरल्या डोळ्यान ............न भरल्या डोळ्यान,
भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावर् चि सायं,
तवा मले दुधामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........
रे हंबरून वासराले....

गो म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी
पुन्हा एकदा जनम घ्यावा ग माये तुझ्या पोटी,
तुझ्या चरणी......गं तुझ्या चरणी,
तुझ्या चरणी ठेवून माथा धराव तुझ पाय,
तवा मले पायामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय..........

हंबरून वासराले चाटते जवा गाय,
तवा मले तिच्यामंदी दिसती माझी माय, दिसती माझी माय
रे हंबरून वासराले.....

🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤱🤰

 Aai kavita आईची कविता | aai poem in marathi


कुणीच नाही माझे ..आई
 करूणेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असे जवळ - तसे दूर भाबडे अंतराळ माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
 करूणेचे तळहात पोरके ..आई

असेल - आहे - असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई

🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤱🤰

   poem on mother in marathi [ एका आईची अंतयात्रा ]


आता सर्व काही आठवेल तुला
अगदी सर्व सर्व..

कदाचित रडशीलही
प्रेक्षकांच्या आग्रहास्तव..

तूला जन्म दिला होता
याची परतफेड करशील..

मान खाली घालशील
शरमेने..

खांद्यावर घेशील तेव्हा
तहान शमेल मस्तकातली..

किणार्‍यावर पोहोचवशील
पाचव्या ईसमाच्या मदतीने..

हे करतांना क्षणभर का होईनात
पण..

आठवेल का रे तुला
माझा खांदा..?

घामांच्या धारांतून वाहणारा माझाच अंश
तुझ्या डोळ्यांतील भावनेला कवटाळेल
नकळत..

तेव्हा तरी संवेदनांची जाणीव होईल का रे
तुला..?

सर्व काही रितसर पार पाडशील
उघडा-नागडा माझा देह, उकळून घेशील भाजण्याआधी..

जाळशील आणि जळशील
देखावा सजवशील, अखेरचा..

माझा आणि तुझाही
माझा आणि तुझाही

🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤱🤰

    marathi kavita aai  [ माझी आई ]


किती वर्ष झाली
गेली जरी माय
परी तिची सय
जात नाही ||

घरासाठी तिने
काया झिजवली
तक्रार न केली
कधी काही ||

अवघे सहज
नच ठरवून
प्रेमाने भरून
दिले आम्हां ||

नच घडविले
संस्कार सांगून
अवघे जीवन
हेची गुरु ||

असे वागायचे
हे न करायचे
नव्हते शब्दांचे
काही काम ||

वाट्या आले जैसे
तिने ते जीवन
आनंदे जगून
दाखविले ||

दुःखाचे चटके
सोसले हसत
नच सुस्थितित
गर्व केला ||

आणि मृत्यू रोगी
लढली खंबीर
मानली न हार
कदापीही ||

भोगियले दु:ख
वेदना अनेक
अश्रू परी एक
न दाविला ||

तिची ती दुर्दम्य
जिगीषा पाहून
मृत्यूही लपुनी
हळू आला ||

सोबत अजून
तिच्या आठवणी
जणू ती होवुनी
वावरती ||

मज संभाळती
हळू निजवती
चुकता दावती
मार्ग कधी ||

हवी ती शिक्षा
देवा कुणा देई
कधी पण आई
नेवू नको ||

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे

🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤰🤱👩‍👧‍👧🤱🤰

Aai kavita आईची कविता तुम्हाला कसी वाटली आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा, आपलं प्रतिसाद आम्हाला खुप मौल्यवान आहे.असेच Marathi Kavita तुम्हाला आमच्या या ब्लागवर नेहमी मिळणार आहेत.आपण ही poem on mother in marathi or aai poem in marathi मराठी कविता आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

धन्यवाद !



1 टिप्पणी: